Tuesday, 2 December 2025

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

 नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

मुंबईदि. 1 :- नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द  करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी 16 जिल्ह्यांतील नगरपरिषद / नगरपंचायतीमध्ये  सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथअहिल्यानगर (कोपरगावदेवळाली प्रवरापाथर्डीनेवासा)पुणे (बारामतीफुरसुंगी-उरुळी  देवाची)सोलापूर (अनगरमंगळवेढा)सातारा (महाबळेश्वरफलटण)छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री)नांदेड (मुखेडधर्माबाद)लातूर (निलंगारेणापूर)हिंगोली (वसमत)अमरावती (अंजनगावसूर्जी)अकोला (बाळापूर)यवतमाळ (यवतमाळ)वाशिम (वाशिम)बुलढाणा (देऊळगावराजा)वर्धा (देवळी) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस यांचा समावेश आहेअसे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

0000

भारत–इथिओपिया आरोग्य सहकार्य अधिक

 प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले आणि हाफकिन जैव औषध निर्माण महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक सुनील महेंद्रकर यांच्या हस्ते झाले. डॉ. चंदनवाले यांनी दोन्ही देशांमध्ये संयुक्त संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याबाबत प्रस्ताव मांडला. महेंद्रकर यांनी या सहकार्यामुळे आरोग्य क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतीलअसे नमूद केले.

शिष्टमंडळाने परळ येथील ओरल पोलिओ लस उत्पादन केंद्राला भेट देऊन कार्यपद्धतीची माहिती घेतली. ९ डिसेंबर पर्यंत हा उपक्रम असून प्रशिक्षणादरम्यान विषाणूशास्त्र आणि सेल बायोलॉजी विभागाच्या सहायक संचालिका डॉ. उषा पद्मनाभन यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ पथक शिष्टमंडळाला मार्गदर्शन करणार आहे.

भारतइथिओपिया आरोग्य सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असून स्थिरताप्रगती आणि परस्पर विकासाच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००००

हाफकिन मध्ये इथिओपियन शिष्टमंडळाला लस विश्लेषण प्रशिक्षण

 हाफकिन मध्ये इथिओपियन शिष्टमंडळाला लस विश्लेषण प्रशिक्षण

 

मुंबई, दि. १ :- संयुक्त राष्ट्रांच्या प्रकल्प सेवा कार्यालयाने (यूएनओपीएसमेसर्स टेकइन्व्हेन्शन लाइफकेअर मार्फत इथिओपियातील सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि लस तज्ज्ञांचे शिष्टमंडळ परळ येथील हाफकिन शिक्षणसंशोधन आणि चाचणी संस्थेला लस विश्लेषणावरील विशेष प्रशिक्षणाकरिता भेट दिली. या उपक्रमाचा उद्देश दोन्ही देशांमधील आरोग्य क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करणे हा आहे.

इथिओपियाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार हैलू अशेनाफी डेनिसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे स्वागत हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. सुवर्णा खरात यांनी केले. त्यांनी संस्थेतील संशोधन उपक्रमनवोन्मेषी प्रकल्प आणि भविष्यातील संयुक्त सहकार्याच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.

वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन

 वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात

सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन

 

मुंबईदि. 2 : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार साधण्यासाठी वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन तसेच सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या सहा महिन्यांच्या 135 व्या सत्राचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत होत असून पात्र मच्छिमारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या प्रशिक्षणात मत्स्यव्यवसाय नौकानयनाचे मूलतत्त्वसागरी डिझेल इंजिनचे भागत्यांची दुरुस्तीमासेमारीची आधुनिक साधने तसेच प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश आहे. दारिद्ररेषेवरील प्रशिक्षणार्थींना प्रतिमहिना 450 रुपये तर दारिद्ररेषेवरील प्रशिक्षणार्थींना प्रतिमहिना 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

या प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक असून त्याचे  वय 18 ते 35 वर्षे असावे. प्रशिक्षणार्थीना पोहता येणे बंधनकारक असून तो किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा. त्याला मासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभव आणि बायोमेट्रिक/आधार कार्ड धारक असावा. त्याचप्रमाणे त्याच्याकडे मच्छिमार संस्थेची शिफारस असलेला परिपूर्ण अर्ज आणि दारिद्ररेषेवरील असल्यास संबंधित प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.

या प्रशिक्षण सत्राकरिता इच्छुक व पात्र मच्छिमारांनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रपांडुरंग रामले मार्गतेरे गल्लीवर्सोवामुंबई-19 येथे 22 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावेतअसे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी स. श. भालेराव यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी  सचिन भालेरावमत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी  (9920201207) आणि जयहिंद सूर्यवंशीप्रशिक्षण निर्देशक (7507988552) यांच्याशी संपर्क साधावा.

0000

Monday, 1 December 2025

नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

 नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

मुंबईदि. २०: केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिताभारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. या नवीन फौजदारी कायद्यांविषयी जनसामान्यांना माहिती व्हावीयाकरिता १९ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पाच दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन आझाद मैदान येथे करण्यात आले आहे.  

हे प्रदर्शन २३ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान खुले असणार आहे. प्रदर्शनामध्ये नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित नियंत्रण कक्षन्याय सहाय्यक प्रयोगशाळा संचालनालयन्याय वैद्यक व विष शास्त्र विभागअभियोग संचालनालयनगर दिवाणी व सत्र न्यायालयउच्च न्यायालयमध्यवर्ती कारागृह यांचे स्टॉल्स आहेत. प्रदर्शनामध्ये प्रात्यक्षिकाद्वारे नाट्य रूपांतर पद्धतीने माहिती देण्यात आली आहे.

 या प्रदर्शनाला सर्व नागरिकांनी भेट द्यावी. विशेषतः विधि शाखेचे विद्यार्थीवकील यांनी भेट देत नवीन कायद्याविषयी माहिती जाणून घ्यावीअसे आवाहन गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग यांनी केले आहे.


गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा एकही पात्र गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश

 गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा

एकही पात्र गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश

-         सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. २० : एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या घरांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह म्हाडानगर विकास विभागाचे अधिकारी व कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, शासनाने गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे अनेक गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचे घर मिळाल आहे.  उर्वरित गिरणी कामगारांनाही  लवकर घरे मिळावीत,  एकही गिरणी कामगार घरापासून वंचित राहू नये. सेंच्युरीएनटीसी व इतर गिरण्यातील कामगारांनाही लवकर घरे मिळावित यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून काम गतीने करण्यावर भर देण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.

 

            ज्या  गिरणी कामगारांनी शेलू (कर्जत) आणि कारव (ठाणे) येथील गृह प्रकल्पात संमती दिली आहे त्याची पुन्हा एकदा खात्री करावी. पात्र गिरणी कामगारांना न्याय मिळावा यासाठी संमतीपत्रांची पुन्हा पडताळणी करावी. संबंधित विभागांना प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आणि गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने व समन्वयाने काम करण्याचे आदेशही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.

सीएमआरएस प्रमाणपत्र नंतर दहिसर – काशीमिरा मेट्रोला हिरवा कंदील

 सीएमआरएस प्रमाणपत्र नंतर दहिसर – काशीमिरा मेट्रोला हिरवा कंदील

दहिसर ते काशीमिरा या नव्या मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (सीएमआरएस) प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. ते मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नवीन मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात येईलअशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.


Featured post

Lakshvedhi