Monday, 3 November 2025

अतिवृष्टी नुकसान भरपाई

 

सातारा जिल्ह्यातील १४ हजार ६४३ शेतकऱ्यांच्या ५ हजार ८०३.५५ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी पाच कोटी ८० लाख ३६ हजार रुपये. 

नाशिकधुळेनंदुरबारजळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील १६ लाख ५९ हजार २९३ शेतकऱ्यांच्या १२ लाख ११ हजार ५९४ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी १२११ कोटी ५४ लाख ९० हजार रुपये.

अमरावती जिल्ह्यातील चार लाख ९० हजार ९११ शेतकऱ्यांच्या  पाच लाख ४७ हजार ८७६.६५ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी ५४७ कोटी ८७ लाख ६६ हजार रुपये निधी वितरणास मान्यता दिली आहे.

 

रब्बी हंगाम; बियाणांसह अनुषंगिक बाबीसाठी १७६५ कोटींवर मदत

 रब्बी हंगामबियाणांसह अनुषंगिक बाबीसाठी १७६५ कोटींवर मदत

राज्यात खरीप हंगाम२०२५ मध्ये अतिवृष्टी,पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामात बियाणे व अनुषंगिक बाबींची खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य शासनाने विशेष मदत पॅकेज अंतर्गत प्रती हेक्टरी १० हजार रुपये प्रमाणे (तीन हेक्टर मर्यादेत) १,७६५ कोटी २२ लाख ९२ हजार इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

जुलै ते सप्टेंबर २०२५ कालावधीमध्ये  अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना  मदत म्हणून  येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे व अनुषंगिक बाबींसाठी अतिरिक्त मदत मिळण्यासाठी पुणेनाशिक व अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार ही मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य

 नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास

शासनाचे सर्वोच्च प्राधान्य

·         मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

·         अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास मान्यता

 

मुंबईदि.३१ : नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याला तातडीने मदत देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.  त्यानुसार  राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

या बाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्याला मदत करुन त्याला पुन्हा उभे करण्यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत  असून या मदतीमुळे  नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्याला दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला

श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगर समुद्र किनारा विकसित करणार

 श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगर समुद्र किनारा विकसित करणार

-         महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबईदि. ३१  : श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगर समुद्र किनाऱ्याचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यात येणार असूनआधुनिक सुविधासंग्रहालय तसेच स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत हा किनारा लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येईलअशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

दिवेआगर समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीदिवेआगर किनाऱ्याचा सौदर्य दृष्टीने विकास श्रीवर्धन किनाऱ्याच्या धर्तीवर करण्यासंदर्भात कार्यवाही जलद गतीने करावी. यासाठी उच्च दर्जाची व शाश्वत साधनसामग्री वापरून पर्यावरणपूरक सुविधा उभारण्यात याव्यात. पर्यटकांना स्वच्छसुरक्षित आणि आकर्षक वातावरण उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

वन विभागाला देण्यात येणारे प्रस्ताव सल्लागार संस्थांच्या माध्यमातून तातडीने पाठविण्यात यावेत. तसेच समुद्र किनाऱ्याच्या विकासादरम्यान पर्यावरणाचे संतुलन राखून वृक्षांचे पुनर्रोपण करण्यावर भर द्यावा. या विकास प्रकल्पामुळे दिवेआगर परिसरातील पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

000

हंगाम 2024-25 मध्ये नाफेड व एनसीसीएफ

 हंगाम 2024-25 मध्ये नाफेड व एनसीसीएफ यांची प्रमुख अभिकर्ता संस्था म्हणून राज्यामध्ये पणन महासंघामार्फत शेतकरी हिताच्या दृष्टीने कडधान्य व तेलबिया यांची पी.एस.एस. योजनेअंतर्गत 2,56,363 शेतकऱ्यांकडून 55.35 लाख क्विंटल कडधान्य व तेलबिया यांची खरेदी करण्यात आलेली असून 2202.20 कोटी एवढे शेतकरी चुकारे डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले आहेत. पणन महासंघामार्फत आजपर्यंतच्या इतिहासामधील सर्वोच्च सोयाबीन खरेदी केलेली आहे. राज्य शासनाच्या वतीने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्य (ज्वारीमका व रागी) शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत 2,84,791 शेतकऱ्यांकडून 89,54,549.58 क्विंटल धान व भरडधान्य (ज्वारीमका व रागी) खरेदी करण्यात आलेली असून 2200.73 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे.

 

पणन महासंघाची राज्यात 128 गोदामे असून साठवणूक क्षमता 2,80,940 मे. टन इतकी आहे. 2024-25 मध्ये सरासरी गोदाम वापर क्षमता 56 टक्के इतकी असून त्यापोटी 6.48 कोटींचे उत्पन्न गोदाम भाड्यापोटी प्राप्त झालेले आहे. धुळे जिल्ह्यातील बोरविहीर येथील वैभव पशुखाद्य कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता 30 हजार मे. टन असून येथे दर्जेदार व सकस पशुखाद्याची निर्मिती करण्यात येते. 2024-25 मध्ये पशुखाद्य कारखान्यात कोहिनूर रेशन पावडरगोल्ड रेशन पावडरमहाशक्ती रेशन पावडरमिल्क रेशन पावडर व मका भरडा या प्रकारचे उत्पादन घेण्यात आले असून त्याच्या विक्रीतून 1.35 कोटींची रक्कम प्राप्त झाली आहे. वैभव पशुखाद्य कारखान्याच्या परिसरातील गोदामे भाडेतत्वावर दिलेले असून त्यापोटी 49.11 लाख इतकी रक्कम प्राप्त झालेली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

रासायनिक व भगीरथ खत विभाग - पणन महासंघाने राज्यामध्ये सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांना विविध कंपन्यांचे खत

 रासायनिक व भगीरथ खत विभाग - पणन महासंघाने राज्यामध्ये सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांना विविध कंपन्यांचे खत पुरवठा करण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले आहे. 2024-25 मध्ये पणन महासंघाने 65,274 मे. टन रासायनिक खतांची विक्री केलेली असून 83.29 कोटींची उलाढाल केलेली आहे. तसेच भगीरथ मिश्रखताची 1,316 मे. टन विक्री करण्यात आलेली असून 1.82 लाख रुपयांची उलाढाल झालेली आहे.

 

पणन महासंघ ही महाराष्ट्रातील खरेदी-विक्री व पणन

 *महासंघाविषयी :*

 

पणन महासंघ ही महाराष्ट्रातील खरेदी-विक्री व पणन संस्थांची शिखर संस्था असून राज्यातील 827 ‘’ वर्ग संस्था पणन महासंघाच्या सभासद आहेत. संस्थेने आजवरच्या काळात शेती व शेतकरी आणि ग्राहक यांच्या विकासासाठी आणि हितसंरक्षणासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. पणन महासंघाने शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या असून शासनाने पणन महासंघावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. अहवाल सालामध्ये धान व भरडधान्यकडधान्य व तेलबिया खरेदीखत व पशुखाद्य विक्रीचे उल्लेखनीय काम केलेले आहे. शेतीमालाला लाभदायक व वाजवी भाव मिळावा यासाठी विविध भरडधान्य व तेलबिया / कडधान्ये यांची केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने राज्यात खरेदी केलेली आहे. नाफेडएनसीसीएफ व महाराष्ट्र शासनाकरिता पणन महासंघामार्फत कडधान्य (तूरउडीदमुगचना) व तेलबिया (सोयाबीनची) खरेदी झालेली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्य (मकाज्वारी व रागी) खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

Featured post

Lakshvedhi