Sunday, 2 November 2025

इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ च्या निमित्ताने

 इंडिया मेरीटाईम वीक २०२५ च्या निमित्ताने आज जगभरातील सागरी तज्ज्ञउद्योगपती आणि  प्रतिनिधी भारतात एकत्र आले असल्याचे सांगूनकेंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, गेटवे ऑफ इंडिया’ आता गेटवे ऑफ द वर्ल्ड’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताचा ११ हजार किलोमीटरचा किनारा आता जागतिक विकास केंद्र होत आहे. सागरी क्षेत्र देशाच्या जीडीपीत ६० टक्क्यांहून अधिक योगदान देते. पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारत सागरी व्यापारात अग्रस्थानी होता. आज इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत पुन्हा आपली सागरी ताकद सिद्ध करत आहे. सागरसागरमालागतिशक्ती आणि समुद्रयान यासारख्या प्रकल्पांमुळे सागरी पायाभूत सुविधांना नवे बळ मिळाले आहे. भारत जहाजबांधणीत जगात पाचव्या क्रमांकावर असून नवीन बंदरांचीही उभारणी वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले.

नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज

 नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज

                - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

·         इंडिया मेरीटाईम वीक २०२५ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबईदि. २७ : मुंबई हे भारताच्या सागरी क्षेतातील महत्वाचे स्थान असून इंडिया मेरीटाईम वीक- २०२५ च्या निमित्ताने मुंबईमध्ये भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. तर मुंबई ही देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी नेस्कोगोरेगाव येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक- २०२५ या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय बंदरेजहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवालगुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतओडिशाचे मुख्यमंत्री मोहन शरण मांझीकेंद्रीय राज्यमंत्री शंतनु ठाकूरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारआणि केंद्रीय सचिव विजय कुमार, आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव 14 नोव्हेंबर पर्यंत पाठविण्याचे आवाहनhttps://mdd.maharashtra.gov.in

 डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण  योजनेसाठी

प्रस्ताव 14 नोव्हेंबर पर्यंत पाठविण्याचे आवाहन

 

मुंबई दि.१ – अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे.  राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी या योजनेंतर्गत सुधारित प्रस्ताव सादर करण्यासाठी विहित अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह पूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारीमुंबई शहर (जुने जकात घरशहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई – ४००००१) येथे १४ नोव्हेंबर२०२५ पर्यंत सादर करावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 

अधिक माहिती  https://mdd.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निर्धारित दिनांकानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीतयाची संबंधित मदरसांनी नोंद घ्यावी. मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक – १४ नोव्हेंबर२०२५

जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक  १५ डिसेंबर२०२५ आहे. अधिक माहितीसाठी  जिल्हा नियोजन समितीजिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर येथे अथवा,

दूरध्वनी: ०२२-२२६६०१६७ई-मेल: dpomumbaicity@gmail.com यावर संपर्क साधावा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करण्याचे

 आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करण्याचे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

 

मुंबई, दि. 29 : ज्या भागात लोकसंख्येप्रमाणे अंगणवाडी केंद्रांची आवश्यकता आहेतिथे नव्याने अंगणवाडी सुरू करावी. तसेच मदतनीस व सेविकांच्या नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

 

150 दिवसांच्या कामाचा आढावाअंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या पदोन्नतीअहिल्याभवन उभारण्यासाठी जागा निश्चितीकरणबालसंगोपन योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादवआयुक्त कैलास पगारेसहसचिव वि.रा.ठाकूर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 

पुण्यात अहिल्याभवन अथवा महिलांचे वसतीगृह करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीच्या माध्यमातून उभारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या. तसेचबालसंगोपण योजनेसंदर्भात आढावा त्यांनी यावेळी घेतला.

 

ज्या अंगणवाडीमध्ये विद्यार्थी जास्त आहेत मात्रमदतनीससेविकांची संख्या कमी आहे. आणि जिथे विद्यार्थी कमी आहेत अशा अंगणवाड्यांमध्ये  सेविकांची पुनर्नियुक्ती करावी. नवीन अंगणवाड्यांची आवश्यकता कुठे आहे यासदंर्भात सर्वेक्षण करूनत्याप्रमाणे त्या प्रदेशात अंगणवाडीमदतनीस व सेविका यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच पर्यवेक्षिकाजिल्हा पर्यवेक्षिका यांना ग्रामविकास विभागातून महिला व बालविकास विभागात वर्ग करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

०००

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया https://ladakibahin.maharashtra.gov.in

 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी

-         महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई दि. 29 : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी ची सुविधा 18 सप्टेंबर पासून  दोन महिन्याच्या कालावधी करीता  उपलब्ध करण्यात आली आहे.   ई-केवायसी ची प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून  आत्तापर्यंत  अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी ची प्रकिया यशस्वी पूर्ण केली आहे . इतर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यांवर उपाययोजनाबाबत  आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे.  ही प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ असूनमहिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया कमी वेळात पुर्ण करू शकतात. ज्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही त्यांनी 18 नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पुर्ण करावी.

केवनाळे येथील कुटुंबाचे खासगी मालकीच्या जागेमध्ये तात्पुरते

 मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील म्हणाले, केवनाळे येथील कुटुंबाचे खासगी मालकीच्या जागेमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात येऊन याठिकाणी वीज, पाणी पुरवठा, शौचालय आदी सुविधांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागेचे भूसंपादन करण्यात आले आहे. नागरिकांनी इरशाळवाडी व तळीये येथील नागरिकांना देण्यात आलेल्या घरांप्रमाणे घरे मिळावीत अशी मागणी केली आहे. यासाठी विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अधिकचा निधी मिळण्याबाबत बैठक घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.


 

मौजे केवनाळे येथील पुनर्वसितांच्या घरांसाठी वाढीव निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी

 मौजे केवनाळे येथील पुनर्वसितांच्या घरांसाठी

 वाढीव निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी

-         मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

मुंबईदि. २९ : पोलादपूर तालुक्यातील मौजे केवनाळे (जि. रायगड) गावच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागेचे भूसंपादन करण्यात आले आहे. या जागेवर घर बांधण्यासाठी शासनाकडून प्रत्येक घरासाठी २.३० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र या गावच्या नागरिकांनी घर बांधण्यासाठी वाढीव निधीची मागणी केली आहे. हा वाढीव निधी विविध कंपन्याच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उपलब्ध होण्यासाठी संबधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत रायगड जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर बैठक घ्यावीअसे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

 

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मौजे केवनाळे ता. पोलादपूर (जि. रायगड) गावच्या कायमस्वरूपी पुनर्वसन संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरेआपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाणमदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव संजय इंगळे आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi