Sunday, 2 November 2025

शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी 250 कोटी रुपयांचा निधी

   शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असूनआषाढी दिंडी अनुदानविमा योजना यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने गाईला गोमातेचा दर्जा दिला आहे. हे राज्य संतांचीवीरांचीशेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहेअसेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. तसेच  श्री संत मोरे परिवाराच्या वारकरी परंपरेच्या कार्याचे कौतुक केले.

    यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले कीहे सरकार शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात असलेल्या जनतेच्या मदतीला तत्परतेने धावून जाण्याची आमची भूमिका आहे.

    प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री संत मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचे उद्घाटन तर भक्तनिवास क्र. चे लोकार्पण रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झाले.

या उद्घाटन सोहळ्यामुळे शेगाव दुमाला गावात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असूनवारकरी संप्रदायासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.

संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे

 संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे

            - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज समाधी

मंदिराचे उद्घाटन व भक्तनिवासाचे लोकार्पण

 

       पंढरपूरदिनांक 2: - वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम व्हीआयपी आहे. संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहेअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेत्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेमहसूल राज्यमंत्री योगेश कदममाजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंतआमदार अभिजीत पाटीलजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादमुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमपोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीसंस्था प्रमुख दादा महाराज मोरे माऊलीस्वामी अमृता आश्रम महाराजचकोर महास्वामी बाविस्करह.भ.प. अक्षय भोसले महाराजसरपंच सौ. जयलक्ष्मी माने व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

 नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबईदि. 2:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने आता नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक सेंटर फॉर इन्व्हेन्शनइनोव्हेशनइन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ म्हणजेच सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर करण्यात आले आहे. उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या प्रयत्नांचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये सी-ट्रिपल आयटी उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या पत्राला कंपनीकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असूनदोन्ही जिल्ह्यांसाठी सी-ट्रिपल आयटी’ केंद्रे स्थापन करण्यास टाटा टेक्नॉलॉजीने अधिकृत मान्यता दिली आहे.

सहकारी बँकेमुळे तळागाळातील नागरिकांचा विकास होतो. शेतकरी व लघु उद्योगांना

 मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस म्हणालेसहकारी बँकेमुळे तळागाळातील नागरिकांचा विकास होतो. शेतकरी व लघु उद्योगांना त्वरित कर्ज व बचत सुविधा मिळते. ज्यांना व्यवसायउद्योग स्थापन करावयाचा आहेत्यांना सुरुवातीला कर्ज लागते. त्यावेळी बँकेंचे प्रोत्साहन व सहकार्य महत्त्वपूर्ण ठरते. राज्यात सहकारी बँकांनी कालानुरुप बदल केले आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेत त्या उत्तम स्थान टिकवून आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकाराचे महत्व जाणून 'सहकारिता मंत्रालय स्थापन केले आहे. यामुळे सहकार क्षेत्रात मोठे बदल होत आहे .यातून 'सहकारातून समृद्धीकडेहा मार्ग आहे. गुणवत्तापूर्ण कार्य करून 'अभिनंदन  सहकारी बँकसहकार क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

            मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा यांना शाल -श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता चौधरी यांनी तर आभार संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग यांनी मानले.

 

सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास

 सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

अमरावतीदि. ३०: ज्या ठिकाणी चांगल्या बँका निर्माण होतातत्या ठिकाणी आर्थिक सक्षमता वाढते. नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या बँक महत्त्वपूर्ण ठरतात. सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य होतोअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी 'अभिनंदन हाईट्सया इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या सुविधेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेवा-सुविधेबाबत त्यांनी बँकेचे अभिनंदन केले.

 

    सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयरआमदार सुलभाताई खोडकेआमदार रवी राणाआमदार उमेश उर्फ चंदु यावलकरप्रवीण पोटे-पाटीलभारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथ्थाबँकेचे संस्थापक हुकुमचंद डागाअभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲड. विजय बोथरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रशासकीय एकसंधता आणि स्थैर्य

 प्रशासकीय एकसंधता आणि स्थैर्य

अखिल भारतीय सेवांचे अधिकारी धोरणे आणि जनतेमधील कार्यक्षम दुवा म्हणून देशभरातील  जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये कार्यरत असतात, निवडणुका पार पाडणेसामाजिक कल्याण योजना राबविणेकायद्याचे राज्य आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवणे या सर्व कार्यांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. प्रत्येक जिल्ह्यात त्यांची उपस्थिती शासनाला केवळ शहरी केंद्रांपुरते मर्यादित ठेवत नाहीतर प्रत्येक नागरिकाला राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासात सहभागी बनवते. अनेक भागांमध्ये अधिकारी आपत्ती व्यवस्थापनस्थानिक नियोजन आणि सामाजिक उपक्रमांमध्येही नेतृत्व करतातज्यातून या स्टील फ्रेमचा बहुआयामी प्रभाव दिसतो.

भारताची स्टील फ्रेम – अखिल भारतीय सेवा आणि राष्ट्रनिर्माण

 भारताची स्टील फ्रेम – अखिल भारतीय सेवा आणि राष्ट्रनिर्माण

 

एखाद्या राष्ट्राचे मूल्यमापन केवळ त्याच्या भूगोलाने नव्हे तर त्याच्या संस्थांची कार्यक्षमतानिष्पक्षता आणि लवचिकतेने केली जाते. स्वातंत्र्योत्तर भारतातअखिल भारतीय सेवा (आयएएसआयपीएस आणि आयएफओएसया प्रशासनाच्या कण्याप्रमाणे कार्य करत आहेतया सेवांनी केंद्र आणि राज्यांमधील सुसंवाद सुनिश्चित केला आणि शासन व नागरिक यांच्यातील दुवा साधला. या सेवांचे वेगवेगळ्या क्षेत्रात केलेले योगदान हे दर्शवते की सरदार वल्लभभाई पटेल यांची दृष्टी आजही एका मजबूतएकसंघ आणि प्रतिसादक्षम राष्ट्राच्या कार्यपद्धतीस दिशा देणारी आहे.

Featured post

Lakshvedhi