Thursday, 2 October 2025

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परिवहन मंत्र्यांना निर्देश

 राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परिवहन मंत्र्यांना निर्देश

 

मुंबईदि.१ :- राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले कीएस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेवून अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

००००

बारामती, यवतमाळ, धाराशिव, लातूर विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी

 बारामतीयवतमाळधाराशिवलातूर विमानतळांच्या

विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

        मुंबई दि.१ :- बारामतीसह यवतमाळधाराशिव व लातूर विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तातडीने कार्यवाही करावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बारामती विमानतळाचा नाईट लँडिंगसह विकास करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तासामान्य प्रशासन विभागाचे (विमान चालन) अपर मुख्य सचिव संजय सेठीनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयमहाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेयउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखउद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवारमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कैलास भांडेकर हे मंत्रालयातून तर पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारपुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलएमआयडीसी पुणेचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

एमआयडीसीने तयार केलेला बारामती विमानतळ नाईट लँडिंगचा सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करावा. उद्योग विभागाने विमानतळ हस्तांतरणासाठी आवश्यक तो शासन निर्णय निर्गमित करावा. बारामती विमानतळाच्या उन्नतीकरणाचा तपशीलवार बृहत आराखडा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तयार करावाअसे निर्देशही यावेळी देण्यात आले.

 

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या समन्वयाने बारामती विमानतळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्वेक्षण करावे. बारामती विमानतळाच्या उन्नतीकरणासाठी संभाव्य खर्चाचे अंदाजपत्रक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तयार करावेअशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

औंध येथील श्री भवानी संग्रहालय आणि ग्रंथालय हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक संवर्धन महत्त्वाचे

 सातारा जिल्ह्यातील औंध येथील श्री भवानी संग्रहालय आणि ग्रंथालय हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक महत्त्वाचे केंद्र आहे. औंध संस्थानचे अधिपती बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी याची स्थापना केली. जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रेशिल्पकलादुर्मिळ ग्रंथ आणि पुरातन वस्तू यांचा अमूल्य ठेवा या संग्रहालयात जतन केला आहे. संशोधकअभ्यासक आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. औंध संग्रहालयाच्या सर्वंकष विकास आराखड्यासाठी 52 कोटी 6 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असूनत्याअंतर्गत इमारतीचे संवर्धननवीन बांधकामअंतर्गत दालनांची उभारणी तसेच चित्रे-शिल्पे-ग्रंथांचे जतन अशा कामांचा समावेश आहे. कंकालेश्वर मंदिर आणि औंध संग्रहालय. या दोन्ही ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाहीमात्र या वारशाचे संवर्धन करताना दर्जासौंदर्य आणि पर्यावरणाचा समतोल राखूनच कामे करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखावा

 या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करताना दर्जा,

 सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखावा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

बीडच्या कंकालेश्वर मंदिरासह औंधचे संग्रहालय

राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा

 

मुंबईदि. 1 :- बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असूनते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीतअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये तसेच या स्मारकांच्या परिसरातील एकही झाड तोडले जाणार नाहीयाची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी होते. बैठकीत कंकालेश्वर मंदिरबीड व श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालयऔंध (जि. सातारा) या राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन-दुरुस्तीच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णीउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखपुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गेसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजेदूरदृश्य्‍ाप्रणालीद्वारे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनपुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीबाराव्या शतकातील यादवकालीन कंकालेश्वर मंदिराच्या जतन-दुरुस्तीकरिता शासनाने 9 कोटी 14 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. जलकुंडातील स्थापत्यदृष्ट्या आकर्षक असणाऱ्या या मंदिराच्या संवर्धनाबरोबरच परिसराचे सुशोभीकरणसरोवरातील गाळ काढणेपदपथ-दुरुस्तीमंदिर जोत्यांचे मजबुतीकरणगळती प्रतिबंधक योजनाबाग-बगीचा विकास अशी कामे करण्यात येणार आहेत. या मंदिराच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

सर्वाधिक नियुक्त्या कोकण विभागात

 सर्वाधिक नियुक्त्या कोकण विभागात


यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपीक-टंकलेखक श्रेणीतील 5122 उमेदवारांना सुद्धा नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. एकूण 10,309 उमेदवारांपैकी सर्वाधिक 3078 उमेदवार हे कोकण विभागातील असून, 2597 हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात 1674, नाशिक विभागात 1250, तर मराठवाड्यातील 1710 उमेदवार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार अनुकंपाचा अनुशेष संपणार ! · 4 ऑक्टोबरला 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार, यात 5187 अनुकंपा उमेदवार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

अनुकंपाचा अनुशेष संपणार !

·        4 ऑक्टोबरला 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणारयात 5187 अनुकंपा उमेदवार

 

मुंबईदि. 1 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असूनयेत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी 5122 एमपीएससीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार असूनएकाच दिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल.

 

शासकीय नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पणकधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागते. या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतिक्षायादीतील 5187 अनुकंपा उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे. 4 ऑक्टोबरला मुख्य कार्यक्रम हा मुंबईत होईल आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतीलतर पालकमंत्री आपआपल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्रे वितरित करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी 100 दिवस आणि नंतर 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा होता.

नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

 नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

मुंबई, दि. 1  : राज्यातील 247 नगरपरिषदा व 42  नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या याबाबत हरकती व सूचना मतदार दाखल करू शकतात.

Featured post

Lakshvedhi