Thursday, 2 October 2025

भगवानगड विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्यास केंद्र शासनाची मान्यता

 भगवानगड विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्यास केंद्र शासनाची मान्यता

·         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार

 

मुंबईदि 1 : खरवंडी येथील श्री क्षेत्र भगवानगड  ट्रस्टच्या  विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा  देण्यास केंद्र शासनाने  मान्यता दिली असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.

केंद्रीय पर्यावरणवन आणि वातावरणीय बदल विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. खरवंडी येथील ही  4 हेक्टर जागा  भक्तगणांच्या सेवासुविधांसाठीरुग्णालयप्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक  विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

"केंद्र शासनाकडे या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात आला होता त्याला यश आले आहे . श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि  विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती भाविकांना देताना अतिशय आनंद होतो आहे"असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आभार व्यक्त करताना म्हटले आहे.

राजभवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

 राजभवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

 

 

मुंबईदि. २ :  राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी राजभवन येथे अभिवादन करण्यात आले.

राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. त्यानंतर परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडेपरिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवादन केले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट

 

नागपूरदि. २: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीला अभिवादन केले व  आयोजित बुद्ध वंदनेत सहभाग घेतला.

यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमाजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे,  जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर उपस्थित होते.

सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीड्रॅगन पॅलेस टेंपल आज आंतरराष्ट्रीय स्थळ झाले आहे. आता ड्रॅगन पॅलेसची जगभरात ओळख निर्माण होत आहे. परदेशातूनही अनेक नागरिक येथे येऊन बुद्धवंदनेत सहभागी होत असतात. नागपुरात आल्यावर प्रत्येकाची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट द्यायची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

 नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

मुंबई, दि. 1  : राज्यातील 247 नगरपरिषदा व 42  नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या याबाबत हरकती व सूचना मतदार दाखल करू शकतात.

0-0-0


कवलापूर येथे विमानतळाबाबत तात्काळ सर्वेक्षण करा

 कवलापूर येथे विमानतळाबाबत तात्काळ सर्वेक्षण करा

-         मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

मुंबईदि. ३० : सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे विमानतळ उभारणीबाबतची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र कार्गो व नागरी विमानतळाकरिता विमानतळ विकास प्राधिकरणाने तात्काळ सर्वेक्षण हाती घ्यावेअसे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

१५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ९ सेवा ऑनलाईन उपलब्ध

 १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या

९ सेवा ऑनलाईन उपलब्ध

 

मुंबईदि. ३० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नागरिकाभिमुख सेवांचे वेळेत वितरण सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम२०१५ अंतर्गत नऊ सेवांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यापैकी आठ सेवा आता आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

 

उपलब्ध झालेल्या सेवा :

 

१. रस्त्यांवर समांतर किंवा ओलांडून जाणाऱ्या विविध वाहिन्यांसाठी (ऑप्टिकल फायबर केबलगॅसपाणी पाईपलाईन इ.) ना-हरकत प्रमाणपत्र.

२. वीजपाणीसांडपाणी जोडणी व औद्योगिक युनिटसाठी रस्ता खोदकामाकरिता ना-हरकत प्रमाणपत्र.

३. पेट्रोल पंपाच्या पोहोचमार्गाकरिता ना-हरकत प्रमाणपत्र.

४. रस्त्यालगत इमारती बांधकामाकरिता ना-हरकत प्रमाणपत्र.

५. ठेकेदार वर्ग ४ व ४ (अ) मध्ये नोंदणी व नूतनीकरण.

६. ठेकेदार वर्ग ५५ (अ)६ मध्ये नोंदणी व नूतनीकरणसुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची नोंदणीकामगार सहकारी संस्थांचे वर्ग ’ मध्ये वर्गीकरण व नूतनीकरण.

७. ठेकेदार वर्ग ७८ व ९ मध्ये वर्गीकरणकामगार सहकारी संस्था वर्ग ’ मध्ये वर्गीकरणइमारत नोंदणीचे नूतनीकरणनागरी अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचे वर्ग ७ मध्ये नूतनीकरण.

८. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील खड्डे बुजविण्याची सेवा.

 

नागरिकांना शासन कार्यालयांत फेरफटका न मारता घरबसल्या सेवा मिळाव्यात, यासाठी लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत सेवापूर्तीची कालबद्धता निश्चित करण्यात आली असूनठराविक वेळेत सेवा न मिळाल्यास जबाबदारी निश्चित होणार आहे. पारदर्शकताजलद सेवा आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी ही पावले उचलली आहेत.

या उपक्रमामुळे पायाभूत सुविधारस्ते बांधकामऔद्योगिक विकास तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सोयी-सुविधा जलद गतीने उपलब्ध होतीलअसा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.

कामगार विभागाची सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम व कार्यक्षम करावीत

 कामगार विभागाची सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम व कार्यक्षम करावीत

- कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

 

मुंबईदि. ३० : राज्यातील कामगार विभागांतर्गत सर्व सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम आणि कार्यक्षम होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कामगार विभागाने तत्काळ राबवाव्यातअसे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले.

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळांचा सविस्तर आढावा कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला. या बैठकीस कामगार आयुक्त एच.पी.तुम्मोडउपसचिव स्वप्नील कापडणीसअवर सचिव दिलीप वनिरे तसेच कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राज्यातील एकूण १६ सुरक्षा रक्षक मंडळांचा सर्वसाधारण आढावा घेण्यात आला. यावेळी प्रत्येक मंडळासमोरील अडचणीत्यांच्या कार्यातील अडथळे तसेच त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी या मंडळांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

यावेळीविविध आस्थापना आणि जिल्ह्यांतील आरोग्य विभाग तसेच रुग्णालयांमध्ये सुरक्षा रक्षकांची आवश्यकता तपासून त्यानुसार तात्काळ लेखी मागणी घेण्यात यावीअसे निर्देश मंत्री ॲड.फुंडकर यांनी विभागांना दिले.

जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांच्या अध्यक्षांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवून मंडळाचे सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले. या मोहिमेसाठी विभागीय कामगार अतिरिक्त/उप आयुक्तांनी आवश्यक सहकार्य करावेअसेही मंत्री ॲड.फुंडकर यांच्याकडून निर्देशित करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi