Wednesday, 10 September 2025

सर्वसामान्यांसाठी घरे प्रकल्पातून वगळल्याप्रकरणी समितीचा चौकशी अहवाल येईपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये

 सर्वसामान्यांसाठी घरे प्रकल्पातून वगळल्याप्रकरणी

समितीचा चौकशी अहवाल येईपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये

- सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश

·         नवी मुंबईत सर्वसामान्यांची घरे प्रकल्पातून वगळल्याप्रकरणी उच्चस्तरीय समितीची बैठक

मुंबईदि. 9 : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत अनेक विकासकांनी सन २०१७ पासून २०२२ पर्यंत अनेक प्रकल्प उभारून सर्वसामान्यांना परवडणारी घरे प्रकल्पातून वगळली. या प्रकरणी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय समितीची बैठक विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या समितीचा चौकशी अहवाल येईपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, असे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.


सभापती प्रा. राम शिंदे म्हणालेदहा लाख व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरपालिका हद्दीतील 4000 चौ.मी. पेक्षा जास्त भूक्षेत्र असलेल्या खासगी जमिनीवर प्रकल्प अंतर्गत २० टक्के राखीव क्षेत्र गाळे म्हाडाला हस्तांतरित करण्याची तरतूद असताना नवी मुंबई महानगरपालिकाअंतर्गत अनेक विकासकामार्फत 20१७ ते २२ पर्यंत अनेक प्रकल्प उभारून सर्वसामान्यांना परवडणारी घरे प्रकल्पातून वगळली असल्याबाबत सभागृहात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. सर्वांना परवडणारे घरे उपलब्ध व्हावे हे राज्य शासनाचे धोरण आहे त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी समितीने घ्यावी आणि चौकशी अहवाल येईपर्यंत अश्या सर्व 11 बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात येऊ नये असे निर्देश सभापती प्रा. शिंदे यांनी दिले.

अतिउच्च दाब प्रकल्प प्रविभाग नागपूरचे

 प्रकल्पाचे कंत्राट कार्यादेश दि. २६ फेब्रुवारी २०२४ अन्वये मे. प्रकाश इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग कार्पोरेशनरत्नागिरी या कंपनीला देण्यात आले. या प्रकल्पाचे काम दि. ११.०४.२०२६ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. परंतुअतिउच्च दाब प्रकल्प प्रविभाग नागपूरचे अधीक्षक अभियंता श्री. जयवंत कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता (प्रकल्प) श्री. जयेश कोल्हे आणि श्री. संजय वाढवे यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हा प्रकल्प दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी म्हणजे तब्बल ८ महिन्याआधी पूर्ण करून कार्यान्वित होऊ शकला.

उपकेंद्र कार्यान्वित करण्यासाठी अधीक्षक अभियंता (स्थापत्य) श्री. प्रविणकुमार दामकेश्री. निशित किरोलीकरकार्यकारी अभियंता (स्थापत्य) श्री. अनिल सावरकरश्री. भूषण खांडेकर यांनी परिश्रम घेतले.

याप्रसंगी महापारेषणचे संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर यांच्या हस्ते प्रकल्पाचे कंत्राटदार मे. प्रकाश इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग कार्पोरेशनचे संचालक श्री. प्रकाश देशमुख यांचा याबद्दल सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी महापारेषणच्या प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरू

 सद्यस्थितीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी महापारेषणच्या प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. विद्युत प्रकल्प उभारणीत परवानाधारक पारेषण कंपनींना अनेकदा अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वीजप्रकल्प उभारणीची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण होत नाहीत. वीजवाहिनीच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये न्यायालयीन प्रकरणेवनविभागाची परवानगीरेल्वे क्रॉसिंगची परवानगीमहामार्ग विभागाची परवानगीआदी अडचणींमुळे प्रकल्पांच्या कामाच्या गतीवर परिणाम होतो.

            महापारेषणचे संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सतीश अणे यांच्या नेतृत्वात त्यांच्या चमूने २२० के.व्ही. पाचगाव उपकेंद्र व वाहिनीचे काम कार्यपूर्ती कालावधीच्या तब्बल ८ महिन्याआधी पूर्ण करून नविन रेकॉर्ड केले आहे.

महापारेषणच्या नागपुरातील पाचगाव उपकेंद्राचे काम वेळेच्या आधीच पूर्ण

  

महापारेषणच्या नागपुरातील पाचगाव उपकेंद्राचे 

काम वेळेच्या आधीच पूर्ण

  • मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

 

मुंबईदि. ९ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) नागपूर परिमंडळांतर्गत २२० के. व्ही. पाचगाव उपकेंद्र आणि संलग्नित २२० के. व्ही. कन्हान-उमरेड लिलो विद्युत वाहिनी (२२ सर्किट कि. मी.) निर्धारित कार्यपूर्ती वेळेच्या तब्बल आठ महिने अगोदरच पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल महापारेषणचे कौतुक केले आहे. 

ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात पाचगाव येथील २२०/३३ के. व्ही. उपकेंद्र आणि संलग्नित २२० के. व्ही. कन्हान-उमरेड लिलो वाहिनी निर्धारित कार्यपूर्ती वेळेच्या तब्बल आठ महिन्याआधी पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली.

२२०/३३ के.व्ही. पाचगाव उपकेंद्र कार्यान्वित झाल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका आणि लगतच्या नागपूर ग्रामीण भागातील घरगुती तसेच औद्योगिक विद्युत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे या उपकेंद्रामुळे विद्युत ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे.

शेत व पाणंद रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी उपाययोजना करणार

 शेत व पाणंद रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी उपाययोजना करणार

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणालेमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागात रस्त्यांची कामे दर्जेदार होत आहेत. बळीराजा शेत पाणंद रस्ते मोहिमेस गती देण्यासाठी शासनाने शासन निर्णय निर्गमित केला असून गाव पातळीवर याची अंमलबजावणी सुरू होत आहे. या अनुषंगाने शेत व पाणंद रस्त्याची कामे गुणवत्ता पूर्ण काम होण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. शेत पाणंद रस्ते बनविताना प्रामुख्याने मातीमुरूम व खडी याचा वापर होत असल्याने त्या माध्यमातून तयार होणारे थर आणि त्यांची मजबुती याकडे लक्ष दिले जावे असे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले.

रोजगार हमी योजना मंत्री गोगावले म्हणालेमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या समन्वयाने महाराष्ट्रात राबविली जात आहे. यातून असंख्य कामे सुरु आहेत. बळीराजा शेत व पाणंद रस्ते मोहिमेत देखील चांगली कामे करण्यात येतील.

राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणालेशेत व पाणंद रस्ते योजनेमुळे भविष्यात निर्माण होणार्‍या तंट्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव श्री. खारगे यांनी योजनेसाठी अभ्यास गटाने तयार केलेल्या उपाययोजनाची माहिती दिली. बैठकीमध्ये उपस्थित सदस्य आमदार यांनी चर्चेत सहभाग घेऊन बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणी व कार्यवाहीसाठी विविध मुद्दे व सूचना मांडल्या.

  शेत व पाणंद रस्ते नोंद करण्यास प्राधान्य देतानारस्ते नोंद नकाशे ग्राम पंचायत स्तरावर प्रदर्शित करणे यासह मंजूर केलेले रस्ते खुले करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 


बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती देण्यासाठी 17 ते 22 सप्टेंबर विशेष मोहिम

 बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती देण्यासाठी

17 ते 22 सप्टेंबर विशेष मोहिम

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

 मुंबईदि. 9 :- बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राज्यस्तरीय समितीची बैठक महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेरोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेवित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालआमदार रणधीर सावरकरआमदार संजय बनसोडे, आमदार सत्यजित देशमुखआमदार दिलीप बनकरआमदार सुमित वानखेडेआमदार हेमंत पाटीलआमदार राजेश क्षीरसागरआमदार विठ्ठल लंगेआमदार उमेश यावलकरआमदार समीर कुणावरमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. आमदार अभिमन्यू पवारजमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभाक्षेत्र निहाय समिती स्थापन केली जाणार असून या समितीचे अध्यक्ष संबंधित विधानसभा क्षेत्राचे आमदार राहतीलविधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे सदस्य सचिव प्रांतअधिकारी राहणार असून त्यांच्या समवेत समितीमध्ये महसूलपोलीस ग्रामविकास अधिक विभागाचे अधिकारी असतील. तांत्रिक व कार्यकारी यंत्रणेच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने अभ्यास गटाने याबाबत आराखडा तयार करावाअसे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी

 महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी

 


नवी दिल्लीदि. 9 : महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीमध्ये विजयी झाले आहेत.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेत मतदान झाले. एकूण ९८ टक्के मतदान झाले असून यामध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना एकूण 752 मतांपैकी पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली आहेत तर इंडिया आघाडीचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी 300 मते मिळाली आहेत.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सकाळी 10 वाजता संसद भवनात सुरू झाली. देशभरातील खासदारांनी आपले मतदान केले. सायंकाळी 5 वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. काटेकोर सुरक्षा व्यवस्था आणि पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या प्रक्रियेचा निकाल सायंकाळी 7:30 वाजता राज्यसभेचे महासचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी. मोदी यांनी जाहीर केला. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया शांततेत आणि पूर्णपणे नियमांचे पालन करून पार पडल्याचे स्पष्ट केले.

सी.पी. राधाकृष्णन हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते असूनत्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी  झारखंड येथेही राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

Featured post

Lakshvedhi