Sunday, 7 September 2025

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

 त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील

समिती सदस्यांची नियुक्ती

 

मुंबईदि. ५ : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० जून२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

या समितीमध्ये डॉ. सदानंद मोरे, (माजी अध्यक्षभाषा सल्लागार समिती)डॉ. वामन केंद्रे, (संचालकनॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD)), डॉ. अपर्णा मॉरिस, (शिक्षणतज्ज्ञपुणे)श्रीमती सोनाली कुलकर्णी जोशी, (भाषा विज्ञान प्रमुखडेक्कन कॉलेजपुणे)डॉ. मधुश्री सावजी, (शिक्षणतज्ज्ञछत्रपती संभाजीनगर)डॉ. भूषण शुक्ल, (बालमानसतज्ज्ञपुणे) हे सदस्य तरसंजय यादव, (राज्य प्रकल्प संचालकसमग्र शिक्षा अभियानमुंबई) हे सदस्य सचिव असतील.

 

उपरोक्त समिती दिनांक ३० जून२०२५ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यकक्षेप्रमाणे कामकाज करेल तसेच त्रिभाषा धोरणांसंदर्भातील अहवाल तीन महिन्यांच्या मुदतीत शासनास सादर करेल.


Farewell to Lord Ganesha

 Farewell to Lord Ganesha by the Chief Minister at Girgaon Chowpatty amidst the State Festival Celebrations

Mumbai, Sept 6: The Government of Maharashtra has accorded the status of State Festival to Ganeshotsav, and today the celebrations reached their peak at Girgaon Chowpatty. On this occasion, Chief Minister Devendra Fadnavis personally attended and bid farewell to Lord Ganesha.

At Girgaon Chowpatty, in the spirit of this State Festival, Legislative Council Chairman Prof. Ram Shinde, Deputy Chief Minister Eknath Shinde, Minister Mangal Prabhat Lodha, Union Minister of State Ramdas Athawale, Minister of State Yogesh Kadam, MLA Amit Satam, Municipal Commissioner of Mumbai Bhushan Gagrani, Additional Commissioner Amitkumar Saini, along with thousands of devotees, were present. The atmosphere was electrified with the beats of dhol-tasha and the chants of “Ganpati Bappa Morya.” The Chief Minister Devendra Fadnavis, Chairman Prof. Ram Shinde, Deputy Chief Minister Eknath Shinde, and several dignitaries showered flowers on the Ganesh idols and bid farewell, in a program organized by the Brihanmumbai Municipal Corporation at Girgaon Chowpatty.

Chief Minister Devendra Fadnavis stated that the ten-day Ganeshotsav was celebrated across the state with great enthusiasm and in a peaceful manner. “People celebrated this festival with joy and fervor. During Ganpati Visarjan, there is always a slight sense of sadness, as after ten days Bappa leaves us. But at the same time, there is also the happiness that He will return again next year,” said Mr. Fadnavis.

In Mumbai, Pune, and all towns and villages across the state, Ganeshotsav processions were conducted peacefully and with discipline. “Due to the arrangements made by the Police Department, Municipal Corporations, and the local administration, the festival went off smoothly. Their work deserves appreciation,” Mr. Fadnavis added.

The immersion ceremony at Girgaon Chowpatty witnessed the presence of various dignitaries along with the people of Mumbai. The arrangements for the immersion were carried out with the help of the Municipal Corporation of Greater Mumbai, police, and volunteers.

000

विशेष लेख :

राज्य महोत्सवाच्या जल्लोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप





 राज्य महोत्सवाच्या जल्लोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला  निरोप

 

मुंबईदि. 6 : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहेत्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना दिसला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला.

 

राज्य महोत्सवाच्या या उत्साहात गीरगाव चौपाटीवर विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमंत्री मंगलप्रभात लोढाकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेराज्यमंत्री योगेश कदमआमदार अमित साटममुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीअतिरिक्त आयुक्त अमितकुमार सैनी तसेच हजारो भाविक यांची उपस्थिती होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात वातावरण भारावून गेले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससभापती प्रा.राम शिंदेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला.

 

राज्यात दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लोकांनी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. बाप्पाच्या विसर्जनावेळी मनात थोडीशी खंत व दु:ख होतेकारण दहा दिवसांनी बाप्पा आपल्याला सोडून जातात. पण याचबरोबर पुढच्या वर्षी ते परत येणार आहेत याचा आनंदही असतो, असे श्री.फडणवीस म्हणाले.

 

मुंबईपुणे तसेच राज्यातील सर्व शहरांमध्येगावांमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत व शिस्तीत पार पडल्या. पोलीस विभागमहानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन यांनी केलेल्या व्यवस्थेमुळे हा उत्सव सुरळीत पार पडला. त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

 

गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याला मुंबईकरांसोबत विविध मान्यवरांचीही उपस्थिती होती. मुंबई महानगरपालिकापोलिस व स्वयंसेवकांच्या मदतीने विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली.


महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले महाराष्ट्र सदनात 'श्री गणेशा’चे दर्शन

 महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले

महाराष्ट्र सदनात 'श्री गणेशाचे दर्शन

 

नवी दिल्ली : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र सदन येथे श्री गणेशाचे दर्शन घेतले. निवास आयुक्त आर. विमला यांनी त्यांचे स्वयं सहायता गटांनी तयार केलेल्या पारंपरिक शालीने स्वागत केले. महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्यागेल्या २७-२८ वर्षांपासून महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव साजरा होत आहे. हा उत्सव आपली संस्कृतीपरंपरा आणि श्रद्धा दर्शवतो. दिल्लीत गणपतीचे दर्शन घेण्याचा  आनंद मिळाला. स्वयं सहायता गटांच्या स्टॉल्सना येथे उत्कृष्ट प्रतिसाद मि

पायाभूत सुविधा आणि वाहन उद्योगाला गती

 पायाभूत सुविधा आणि वाहन उद्योगाला गती

पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी सिमेंटवरील जीएसटी २८ टक्के वरून १८ टक्के करण्यात आला आहे. लहान प्रवासी वाहने आणि मालवाहतूक वाहनांवरील कर १८ टक्के निश्चित झाला असूनटीव्हीएअर कंडिशनर यांसारख्या व्हाईट गुड्सवरील करदरही १८ टक्के करण्यात आले. या निर्णयांमुळे वाहन उद्योग आणि निर्यात क्षेत्राला गती मिळेलअसे तटकरे यांनी सांगितले. जीएसटी परिषदेच्या  निर्णयांमुळे शेतीआरोग्यवाहन उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे. हे निर्णय महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देतील आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावतीलअसा विश्वास महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

आरोग्य आणि विमा क्षेत्राला चालना

 आरोग्य आणि विमा क्षेत्राला चालना

परिषदेने सर्व व्यक्तिगत आरोग्य आणि जीवनविमा सेवा पूर्णपणे करमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाज्यामुळे विमा क्षेत्र अधिक सर्वसुलभ होईल. सर्व औषधांवरील जीएसटी १२ टक्के किंवा १८ टक्के वरून  टक्के करण्यात आला असूनकाही जीवनावश्यक औषधे पूर्णपणे करमुक्त झाली आहेत. औषधांच्या किमती कमी झाल्याने आरोग्यसेवा परवडणारी होईलअसेही  तटकरे यांनी सांगितले.

Saturday, 6 September 2025

सर्वसामान्यांसाठी करसवलत

 सर्वसामान्यांसाठी करसवलत

दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरील ‘जीएसटी’ कमी करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. साबणडिटर्जंटटॅल्कम पावडरटूथपेस्टटूथब्रशतयार कपडेपादत्राणे आणि सौंदर्यप्रसाधनांवरील करात लक्षणीय कपात झाली आहे. या सवलती सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चात बचत करतील आणि त्यांचे जीवनमान सुधारतीलअसेही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी अधोरेखित केले.

Featured post

Lakshvedhi