Wednesday, 3 September 2025

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा

 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे

 

मुंबईदि. ३ : रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

बैठकीला महापारेषण कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव कुमारसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री दशपुतेसचिव (वित्तीय सुधारणा) शैला एउपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखसहसचिव (परिवहन) राजेंद्र होळकररेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता विनीत कुमाररेल्वेच्या पुणे विभागाचे अप्पर विभागीय व्यवस्थापक पद्मसिंह जाधवमुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक मिलिंद हिरवेमुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीलामुख्य अभियंता प्रशांत भेगडे आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरबीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनजिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बैठकीत सहभाग घेतला.

कामठी मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) हा जगातील डबल डेकर व्हायाडक्ट आहे.

 कामठी मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) हा जगातील डबल डेकर व्हायाडक्ट आहे. मेट्रो व हायवे वाहतुकीसाठी ५.६३७ कि.मी. लांबीचा सिंगल कॉलम पिल्लरवर उभा असून हा स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन बांधलेल्या या उड्डाणपुलाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे नोंद घेतली आहे. यापुर्वी छत्रपतीनगर येथील ३.२ कि.मी. लांबीच्या डबल डक्ट उड्डाणपुलाची निर्मितीसाठी जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली होती. नागपूरला या निर्मितीमुळे संत्रा शहरासोबतच पायाभूत सुविधांचे शहर म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. या पुरस्काराने नागपूरचा गौरव जागतिक स्तरापर्यंत पोहचला आहे. या डबल डेकर पुलाच्या निर्मितीसोबतच कामठी मार्गावर रेल्वेमहामार्ग वाहतूक तसेच मेट्रो वाहतुकीसाठी जगात प्रथमच अशा प्रकारच्या उड्डाणपुल तयार करण्यात आला आहे. हे जगातील अभियांत्रिकीमधली आश्चर्य आहे. या पुलासाठी १ हजार ६५० टन स्टिलचा वापर करण्यात आला आहे.

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख

 जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले

शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मेट्रोच्या

कामठी मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलाची नोंद

 

नागपूरदि. २ :-  महामेट्रोने अल्पावधीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास केल्यामुळे नागपूर या शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. महामेट्रोने कामठी मार्गावरील सर्वात लांब ‘डबल डेकर’ पुलाची निर्मिती केली असून या पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जागतिक दर्जाच्या या पुरस्कारामुळे नागपूर हे जगातील उत्कृष्ट पायाभूत सुविधा असलेले शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. या जागतिक पुरस्काराबद्दल महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

रामगीरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र प्रदान केले.

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार;

 मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची 

प्रक्रिया सुलभ करण्यात येणार;

गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित

 

  मुंबईदि. ०२ : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपध्दती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबीमराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गावपातळीवर समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आज शासन निर्णय क्र. सीबीसी-२०२५/प्र.क्र. १२९/मावक दिनांक ०२ सप्टेंबर २०२५ निर्गमित केला आहे.

                गावपातळीवर गठीत समिती मध्ये ग्राम महसूल अधिकारीग्रामपंचायत अधिकारीसहायक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल. मराठा समाजातील भुधारक तसेच भूमिहीनशेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दि. १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचे वास्तव्य दाखविणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे.

                 तसेचत्यांच्या कुळातील किंवा नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व त्यांनी अर्जदारासंबंधी प्रतिज्ञापत्र दिल्यासस्थानिक समिती आवश्यक चौकशी करून अहवाल सादर करेल. सक्षम प्राधिकारी या चौकशीच्या आधारे अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतील. याबाबत कार्यपध्दती  करण्यात आलेला शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे.

(सोबत शासन निर्णय क्र. सीबीसी-२०२५/प्र.क्र. १२९/मावक दिनांक ०२ सप्टेंबर २०२५ ची प्रत जोडली आहे.)


झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी संस्थेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी संस्थेस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 

नागपूरदि. २ :-  गोधनी येथील झुलेलाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजी या संस्थेतर्फे श्री गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या संस्थेस भेट देवून श्री गणेशाचे पूजन करुन आरतीत सहभाग घेतला.

यावेळी आमदार परिणय फुकेअल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खानसंस्थेचे अध्यक्ष महेश साधवानीविरेंद्र कुकरेजानॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटचे प्रमुख शैलेश जोगळेकरजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरतसेच घनशामजी कुकरेलाजयप्रकाश गुप्तागिरीष साधवानीअसरानीसंस्थेचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटीउपाध्यक्ष एस.ई. चौधरी आदी लोकप्रतिनिधीपदाधिकारी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गणेश उत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. संस्थेचे प्रमुख महेश साधवानी यांनी स्वागत करुन संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.

००००००

डेकर पुलांची निर्मिती करणारे महामेट्रो व नागपूर हे पायोनिअर असल्याचे

 जगातील पहिल्या सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट या पुलाचे सर्व देशांना आकर्षण आहे. प्रत्यक्ष निर्मितीसंदर्भातील माहिती घेण्यासाठी अभियांत्रिकी व वास्तुकलेतील तज्ञ भेट देवून पाहणी करत आहे. अशा प्रकारच्या डबल डेकर पुलांची निर्मिती करणारे महामेट्रो व नागपूर हे पायोनिअर असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

प्रारंभी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर महामेट्रोतर्फे बांधण्यात आलेल्या भारतातील सर्वात लांब डबल डेकर मेट्रो व्हायाडक्ट या पुलाच्या निर्मितीसंदर्भातील चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. तंत्रज्ञानाचा अतुलनिय वापर करुन उड्डाणपुलावर गड्डीगोदामकडबीचौकइंदोरा चौकनारी रोडऑटोमोटीव्ह चौक या पाच मेट्रो स्थानके बांधण्यात आली आहे. हा उड्डाणपुल चार पदरी असून पहिल्या स्तरावर महामार्गदुसऱ्या स्तरावर मेट्रो आणि जमिन स्तरावर आधीच असलेला महामार्ग आहे. या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी छत्रपती चौकाचा समावेश असलेल्या उड्डाणपुलाला देखील गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कामठी मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) हा जगातील डबल डेकर व्हायाडक्ट आहे.

 कामठी मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) हा जगातील डबल डेकर व्हायाडक्ट आहे. मेट्रो व हायवे वाहतुकीसाठी ५.६३७ कि.मी. लांबीचा सिंगल कॉलम पिल्लरवर उभा असून हा स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन बांधलेल्या या उड्डाणपुलाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे नोंद घेतली आहे. यापुर्वी छत्रपतीनगर येथील ३.२ कि.मी. लांबीच्या डबल डक्ट उड्डाणपुलाची निर्मितीसाठी जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली होती. नागपूरला या निर्मितीमुळे संत्रा शहरासोबतच पायाभूत सुविधांचे शहर म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. या पुरस्काराने नागपूरचा गौरव जागतिक स्तरापर्यंत पोहचला आहे. या डबल डेकर पुलाच्या निर्मितीसोबतच कामठी मार्गावर रेल्वेमहामार्ग वाहतूक तसेच मेट्रो वाहतुकीसाठी जगात प्रथमच अशा प्रकारच्या उड्डाणपुल तयार करण्यात आला आहे. हे जगातील अभियांत्रिकीमधली आश्चर्य आहे. या पुलासाठी १ हजार ६५० टन स्टिलचा वापर करण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi