Tuesday, 2 September 2025

अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे

 अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. २६ : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावेअशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

 

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरावैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमारवित्त विभागाच्या सचिव शैला एसंचालक डॉ. अजय चंदनवालेअधिष्ठाता डॉ.शंकर धपाटेउपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श शासकीय संस्थेमध्ये करण्यात यावे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीया महाविद्यालयासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. महाविद्यालयाच्या आधीच सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचा समावेश करून नवीन मास्टर प्लॅन तयार करावा. नवीन रुग्णालयात आधुनिक सुविधासुपर स्पेशालिटी सेवा यांचा समावेश असावाउत्कृष्ट सुविधा असाव्यात. मराठवाड्यासाठी हे महाविद्यालय महत्वाचे असून येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव सादर करावा. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावेसध्या अस्तित्वातील इमारतींचा नियोजनपूर्वक वापर करावाअशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले कीअंबाजोगाईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यवाही वेगाने करावी. महाविद्यालयाचा आराखडा तयार करूनकार्यवाही करावी.

नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस विषयी थोडेसे

 नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस विषयी थोडेसे

·         मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस.

·         नांदेड ते मुंबई असा 610 कि. मी. चा प्रवास फक्त 09 तास 30 मिनिटांत पूर्णइतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी.

·         महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवानसुरक्षित आणि आरामदायी दिवसभरातील वातानुकूलित प्रवासाची सुविधा.

·         हुजूर साहिब नांदेड हून बुधवार व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.

·         नियमित प्रवास करणारे प्रवासीभाविकअधिकारी व व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त.

·         पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे

  मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखी आरामदायी सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे. मुंबई ते नांदेड हे ६१० किलोमीटरचे अंतर ९ ते ९.३० तासात पूर्ण होणार आहे. पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेड पर्यंत जात आहे. या रेल्वे गाडीची क्षमता ५०० वरून १४४० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे ८ वरून २० पर्यंत वाढवण्यात आले आहे.


नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती ' वंदे भारत' एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस च्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.


नांदेड येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड परिशेत्राचे पोलिस उपमहनिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डीएमआर प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.

नांदेड- मुंबई ' वंदे भारत एक्सप्रेस' ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार

 नांदेड- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

 

मुंबईदि. 26 : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. 'वंदे भारत एक्सप्रेस' मुळे नांदेड शहर मुंबईच्या अधिक जवळ आले आहे. यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहेअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरेमध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीनाप्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्तामुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश कुमार पांडेविभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते.

वंदे मातरम' गीत सार्ध शताब्दी महोत्सवासाठी लोगो डिझाईन स्पर्धा सहभागी होण्याचे, लोगो बनविण्याचे कौशल्य विकास

 'वंदे मातरमगीत सार्ध शताब्दी महोत्सवासाठी लोगो डिझाईन स्पर्धा

  • सहभागी होण्याचे, लोगो बनविण्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन
  • सार्ध शताब्दी पूर्ततेच्या निमित्ताने कौशल्य विभागाकडून विविध कार्यक्रम

 

मुंबईदि. १ : थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ मध्ये लिहिलेल्या 'वंदे मातरम्या भारतमातेच्या राष्ट्रगीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात झाली आहे.  'वंदे मातरम्हे गीत देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असून आजही 'वंदे मातरम्ऐकताना भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते या महान साहित्यकृतीला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत.या निमित्ताने सार्ध शताब्दी महोत्साच्या अंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. या महोत्सवाचा लोगो जनतेतून तयार व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.

वंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे. भारतमातेच्या या राष्ट्रगीताचा गौरव जनतेच्या उत्स्फूर्त सहभागाने झाला पाहिजे . त्यामुळे आपले मित्र परिवारसंघटना,  शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच  सामाजिक माध्यमांवर या ऐतिहासिक सोहळ्याला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न असून  या सार्ध शताब्दी महोत्सव स्पर्धेत सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. यात  भाग घेण्यासाठी surl.lu/nmqcfx या लिंकवर क्लिक करावे लागणार आहे. तसेच विशिष्ट क्यूआर कोडवर स्कॅन करावे लागणार आहे. स्पर्धेची अंतिम तारीख १० सप्टेंबर असणार आहे.

"राज्यातील कौशल्य विद्यापीठआचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रशासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'वंदे मातरम्'च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. राज्यातील  प्रत्येक तालुक्यात ५ हजारहून अधिक देशप्रेमींसोबत सार्ध शताब्धी  महोत्सव साजरा होणार असून त्याची रुपरेषा  लवकरच  जाहीर करण्यात  येईल. त्यासंदर्भात 6 शासकीय आणि 7 अशासकीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रतिष्ठित व्यक्तींचा त्यात समावेश करण्यात आला आहे"अशी माहितीही  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

डेहराडून, बडोदा, दिल्ली, बेळगाव, गोवा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव

 गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

  • डेहराडूनबडोदादिल्लीबेळगावगोवा या ठिकाणी

    सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव

 

मुंबई, दि. १ : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याबाहेर मराठीबहुल असणाऱ्या प्रदेशात पाच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमाकरिता सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

गणेशोत्सवानिमित्त कलाकारांना महाराष्ट्र राज्याबाहेर देखील व्यासपीठ मिळणार आहे. याचाच एक भाग म्हणून  २७ ते २९ ऑगस्ट२०२५ दरम्यान वन संशोधन केंद्र डेहराडून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले. उर्वरित कार्यक्रम  ०१ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे तर ३ सप्टेंबर २०२५ रोजी के एम गिरी सभागृहबेळगाव या सीमावर्ती भागात गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.  सर सयाजीराव नगर वडोदरा गुजरात या ठिकाणी  ४ सप्टेंबर २०२५ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. तसेच  ५ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा या राज्यात मराठी बांधवांसाठी भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

            रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

000

पुणे भारतातील पहिला ७० डिग्री कललेला काँक्रीटचा पायलन

 भारतातील पहिला ७० डिग्री कललेला काँक्रीटचा पायलन या पुलामध्ये आहे. उच्च तणावक्षमता असलेल्या २० केबल्स पुलाचा भार उचलण्यासाठी बसविण्यात आल्या आहे. पुलाची एकूण लांबी १७९. ७९१ मीटर तर रुंदी ८ मीटर आहे.  या पुलाची रचना अत्याधुनिक केबल स्टेड ब्रिज’ या तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली आहे. या पुलासाठी नदीपात्रात केवळ दोन खांब उभारण्यात आल्याने नदीच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही. पादचारी पुलाजवळ बालगंधर्व रंगमंदिर असल्याने पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला अनुसरून पुलाची रचना तानपुऱ्यासारखी करण्यात आली आहे. पुलामध्ये अभियांत्रिकी आणि कलेचा उत्तम संगम साधण्यात आला आहे.



Featured post

Lakshvedhi