Monday, 4 August 2025

मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी

 मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी

- उपमुख्यमंत्री अजित पवार

§  डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेच्या अटीत शिथिलतेसाठी

 प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

 

   मुंबई दि. ३० : राज्यात हाताने मैला उचलण्याची प्रथा बंद करण्यासाठी राज्यात मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ ही मोहीम सुरू करण्यात आली असूनया माध्यमातून गटारेसिवेज लाइनसेप्टिक टाक्या यांची सफाई यांत्रिकीकरणाच्या मदतीने केली जाणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीची अट २५ वर्षांवरून २० वर्षे करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तयार करून तो मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक आयोजित झाली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटआमदार संजय मेश्रामआमदार अतुल भातखळकरवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ताअपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरासामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यांच्यासह नगर विकास, सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य सफाई कर्मचारी आयोग व सफाई कर्मचारी संघटना यांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

१५० शाळांमध्ये अनुभवाधिष्ठित शिक्षण प्रणाली विकसित होणार;

 १५० शाळांमध्ये अनुभवाधिष्ठित शिक्षण प्रणाली विकसित होणार;

आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत कार्यरत श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व शालेय शिक्षण विभाग यांच्यातील कराराअंतर्गत सुरुवातीस १५० शाळांमध्ये या कार्यप्रणालीचे कार्यान्वयन करण्यात येणार  आहे. शाळांची पूर्वतपासणी व  शाळा विकास आराखडा तयार केला जाईल.

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात उल्लेख असलेल्या स्कूल कॉम्प्लेक्स’ संकल्पनेनुसार मॉडेल शाळापीएम श्री व सीएम श्री शाळांचा यात समावेश असेल. ही संस्था शिक्षणग्रामीण व कौशल्य विकासात कार्यरत असून शाळांमध्ये पायाभूत सुविधाशिक्षक व विद्यार्थ्यांचे क्षमता विकास आणि समाजाचा सक्रिय सहभाग यावर भर देईल. अशी माहिती यावेळी देण्यात आले.

‘डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’

 डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम

खान अकॅडमी यांच्याशी कराराअंतर्गत डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ राबविला जाणार आहे. त्याचा उद्देश १ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांचे गणित व विज्ञान विषयातील आकलन वाढवणे हा आहे.  मराठी व इंग्रजी भाषांमध्ये हे अध्ययन कार्यक्रम उपलब्ध असणार आहे. खान अकॅडमी ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची संस्था विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने (self-paced learning) शिकण्याची संधी देत असून त्यांनी १० हजारांहून अधिक शैक्षणिक व्हिडिओ विकसित केले आहेत.

हा करार ३ वर्षांच्या कालावधीसाठी आहे.  उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (SCERT) करणार आहे.

खान अकॅडमी व श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत सामंजस्य करार दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षणा

 दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षणातून राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रास नवी दिशा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खान अकॅडमी व श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत सामंजस्य करार

 

मुंबईदि. ३० :- राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षण मिळावेया उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने खान अकॅडमी’ आणि श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या दोन नामांकित संस्थांशी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण दोन स्वतंत्र सामंजस्य करार (MoU) केले. या करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेराज्यमंत्री डॉ. पंकज भोयरराज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालखान अकॅडमीच्या स्वाती वासुदेवनशोभना मित्तलश्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चे प्रसन्ना प्रभू व मनीष बादियानी तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर डॉ.परदेशीशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओलशिक्षण आयुक्त  सचिंद्र प्रताप सिंहराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची निर्माण करणेत्यांना उत्तम प्रकारे प्रशिक्षित करणे या दिशेने हा करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे." श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या सहकार्याने राज्यातील १५० शाळांमध्ये आधुनिकअनुभवाधिष्ठित शिक्षण प्रणाली विकसित केली जाईल. तर खान अकॅडमीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाने मराठी व इंग्रजी भाषांमध्ये दर्जेदार अध्ययन कार्यक्रम तयार केला जाणार आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यास मदत होईल व इतर शाळांनाही प्रेरणा मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले कीश्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेने यापूर्वीही पाणी व्यवस्थापन व शेतीसारख्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र शासनासोबत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आता शिक्षण क्षेत्रातही त्यांचा सहभाग एक नवा आदर्श ठरेल

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार

 उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 30 : महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रांमुळे 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे उद्योगांना पाणीपुरवठावीजरस्ते व कनेक्टिव्हिटीपर्यावरण मंजुरीवन परवानग्यामजूर कायदेजमीनचे वाटप या सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्‍ध करून दिल्या पाहिजे. उद्योगधंद्यांना सर्व परवानग्‌या ऑनलाईन मिळाल्या पाहिजेयासाठी मैत्री पोर्टल एकिकृत करून त्यावरच सर्व परवानग्या द्याव्यात. त्याचबरोबरउद्योजकांना शासकीय विभागांसदर्भात काही अडचणी असतीलतर त्यासंदर्भात निनावी तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावीअसे स्पष्ट ‍निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध विषयांशी संबंधित मुद्यांवर बैठक झाली. या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेपर्यावरण मंत्री पंकजा मुंडेसार्वजनिक बांधकाम मंत्रि ‍ शिवेंद्रसिंहराजे भोसलेराज्यमंत्री आशिष जयस्वालराज्यमंत्री मेघना बोर्डीकरमुख्य सचिव राजेशकुमारवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लाकामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदनउद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बळगनपर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोजएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासूविकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह यांच्यासह अन्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीउद्योगांकरिता त्यांच्या मागणीप्रमाणे जलसंपदा विभागाने पाणी उपलब्ध करून द्यावे. माजलगावदिघीबुटीबोरीचामोर्शी (गडचिरोली)जयपूर (छत्रपती संभाजीनगर) आणि पीएम मित्रा (अमरावती) येथे वीज सबस्टेशनच्या उभारणी कामाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. उद्योगांसाठी वीज वहन आणि देखभालीच्या समस्यांसंदर्भात वेगळी व्यवस्था करण्यात यावी. पर्यावरण विभागाच्या सर्व परवानग्या मैत्री या पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून द्याव्या. त्याचप्रमाणेसार्वजनिक बांधकाम विभागाने शेंद्रा -बिडकीन मार्ग समृद्धी महामार्गाला जोडण्यासंदर्भात कार्यवाही करावी नवीन उद्योगांनी बुटीबोरी येथे जास्त पसंती दिली असल्याने या भागातील रोड कनेक्टिव्हिटी तात्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

राज्यातील उद्योगांना कन्सेंट टू इस्टब्लिश व कन्सेंट टू ऑपरेट परवानग्या वेळेवर मिळाल्या पाहिजेअसे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीउद्योगांना लागणाऱ्या अनावश्यक परवानग्या बंद कराव्यात. उद्योग प्रतिनिधीच्या अनाहूत तपासण्या बंद कराव्यात. उद्योगांना जमीनी देण्यासंदर्भात निर्णय आणि परिपत्रक ते सुधारित करून एकत्रित करण्यात यावे. उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी,असे ‍ निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्राच्या ज्या भागात एमआयडीसी आहेतत्या भागाला औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यात यावा. औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास दुहेरी करासारखी समस्या निकाली निघेल. उद्योगांना देण्यात येणार पात्रता प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीच्या संपादनासंबंधी तसेच विविध औद्योगिक प्रकल्पासाठी सुरू असलेल्या व प्रस्तावित भूसंपादना  प्रक्रियेचा ‍ सविस्तर आढावा घेतला.

0000

वन ट्रिलियन डॉलर' अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगाने वाटचाल

 'वन ट्रिलियन डॉलरअर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगाने वाटचाल

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आशियाई पायाभूत सोयी - सुविधा गुंतवणूक बँक बैठक

मुंबईदि ३१ : भारताने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात महाराष्ट्राने सिंहाचा वाटा उचलला असून राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलरकरण्यासाठी राज्याची वेगवान वाटचाल सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशियाई पायाभूत सोयी सुविधा गुंतवणूक बँकेने २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी सहकार्य करावेअसे आवाहन केले आहे.

आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या इन्व्हेस्टमेंट सोल्युशनचे उपाध्यक्ष अजय कुमार पांडे यांच्या समवेत सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेविकसित महाराष्ट्राचा आराखडा तीन टप्प्यात तयार करण्यात येत आहे. यामध्ये अल्पकालीनमध्यमकालीन व दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत. राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेगाने सुरु आहेत. अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. यात अनेक वित्तीय संस्थांची मदत लागणार आहे. या प्रकल्पांसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेसारखी संस्था स्वतःहून महाराष्ट्राच्या पाठीशी असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आनंदही व्यक्त केला.

राज्यातील नऊ मोठे प्रकल्प नीती आयोग व वित्त मंत्रालयाला सादर करण्यात आले आहेत. राज्यामध्ये नदीजोड प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात आखणी करण्यात आली आहेत्यासाठी सुद्धा वित्त सहाय्य लागणार आहे. राज्यात पाच नदी जोड प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या वैनगंगा- नळगंगा - पैनगंगा नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचा लाभ केवळ शेतीलाच होणार नसून उद्योगधंद्यांनाही होणार आहे. यासोबतच दमणगंगा - गोदावरी नदी जोड प्रकल्पामुळे समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातल्या गोदावरी खोऱ्यात आणण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पंप स्टोरेज योजनेच्या माध्यमातून एक लाख मेगावॅड ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंप स्टोरेज क्षेत्रात अनेक खासगी कंपन्या सुद्धा आहेत. त्या कंपन्यांना बँकेशी जोडून देण्यात येईल. यातून विकसित महाराष्ट्र संकल्पनेसाठी मोठी मदत होणार आहेअसेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणालेशेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी राज्याला बँकेची मदत लागणार आहे. सौरऊर्जेवर आधारित कृषी पंप योजना युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे. ही योजना देशासाठी दिशादर्शक ठरली असून अन्य राज्यांमध्येही त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी सौरऊर्जेवर आधारित तीन ते चार लाख कृषी पंप बसविण्यात येणार आहे. शहरांमध्ये गतिमान दळण वळणसाठी भुयारी व उन्नत मेट्रोभुयारी मार्गसागरी किनारा रस्ता आदी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना

 शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना

  • शासन निर्णय निर्गमित

 

मुंबईदि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

डिजीटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी साधन असले तरी त्यातून गोपनीय माहितीचा प्रसारखोटी माहिती पसरवणेतसेच शासकीय नियमांचे उल्लंघन होवू नये याकरिता मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसारमहाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम१९७९ हे सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू राहतील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम१९७९ नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना :-

राज्य शासनातील अधिकारी-कर्मचारीस्थानिक स्वराज्य संस्थामंडळेमहामंडळेसार्वजनिक उपक्रम तसेच प्रतिनियुक्तीने किंवा करारपद्धतीने नेमलेले कर्मचारी यांना हे नियम लागू राहणार आहेत.

शासनाच्या किंवा भारतातील कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलिकडच्या धोरणावर प्रतिकूल टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा.

वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया अकाऊंट स्वतंत्र ठेवावेत. केंद्र किंवा राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट किंवा अॅपचा वापर करू नये. शासकीय योजना व उपक्रमांच्या प्रसारासाठी केवळ अधिकृत आणि प्राधिकृत माध्यमांचा वापर करावा.

कार्यालयीन कामकाजाच्या समन्वयासाठी व्हॉट्सअॅपटेलिग्रामसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल.

शासकीय योजनांच्या यशस्वितेसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करता येईलमात्र त्यातून स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. वैयक्तिक अकाऊंटवर शासकीय पदनामलोगोगणवेशशासकीय मालमत्तेचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू नयेत. आक्षेपार्हद्वेषमूलकभेदभाव करणारा मजकूर पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे मनाई आहे. प्राधिकृत मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज सोशल मीडियावर अपलोड करू नयेत. बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाऊंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे.

शासनाने स्पष्ट केले आहे कीया नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल. डिजिटल युगात सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व्हावा आणि शासकीय यंत्रणेचा विश्वासार्हता अबाधित राहावीयासाठी नियमावली करण्यात आली आहेत.

Featured post

Lakshvedhi