Thursday, 1 May 2025

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हुतात्म्यांना अभिवादन,मुख्यमंत्री यांनी दिल्या सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

 महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हुतात्म्यांना अभिवादन

भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री यांनी दिल्या सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या  शुभेच्छा

 

मुंबईदि. 1 : महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकरमुख्य सचिव सुजाता सौनिकमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीपोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह राज्याच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीकर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले कीमहाराष्ट्राला सातत्याने पुढे नेण्याचा  निर्धार आहे. राज्याला ट्रिलियन डॉलर ईकॉनॉमी करण्याचा संकल्प आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा आहेअसा  निर्धार आणि निश्चय  महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करत असल्याची भावना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.


66 वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस: राज्यपालांचे राजभवन येथे ध्वजवंदन

 66 वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस: राज्यपालांचे राजभवन येथे ध्वजवंदन

 

मुंबईदि. 1 :  महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे ध्वजवंदन करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करण्यात आले. राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेउपसचिव एस. राममूर्तीराजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.


सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी

 सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी

राज्य शासनाने मुंबईत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णयही घेतला आहे. महाराष्ट्रातील सागरी किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळावायासाठी  शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. हरियाणातील पानिपत येथे 'मराठा शौर्य स्मारकबांधण्याचा निर्णयही  शासनाने घेतला आहे. तसेच आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत असलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

शिक्षण व क्रीडा विकास

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे .उत्तराखंड येथे झालेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण 201 पदके जिंकली आहेत. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात 31 खेळाडूंची शासकीय सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जात आहे.

मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद वाचला. यावेळी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई सशस्त्र पोलीस बलबृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई महिला पोलीस दलमुंबई लोहमार्ग पोलीस दलनिशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वजबृहन्मुंबई पोलीस ध्वजराज्य राखीव पोलीस बल ध्वजमहाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वजबृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज)बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलमुंबई अग्निशमन दलबृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलसुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हाब्रास बँड पथकपाईप बँड पथक यांनी सहभाग घेतला.


कल्याणकारी योजनांचा लाभ आणि शेतकऱ्यांना दिलासा

 कल्याणकारी योजनांचा लाभ आणि शेतकऱ्यांना दिलासा

राज्यपाल म्हणालेप्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी कुटुंबास राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. अडचणीमध्ये आलेल्या धान उत्पादक नोंदणीकृत शेतकऱ्यांना मदतीच्या दृष्टीने 2024-25 या हंगामासाठी प्रती हेक्टर 20 हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 31 लाख 36 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना 3,389 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यात एक लाख सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या 45 लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने मागील हंगामात 11.21 लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली असूनही देशातील सर्वाधिक खरेदी असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये इतके निवृत्तीवेतन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी नमो दिव्यांग अभियान’ राबविण्यात आले असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

राज्यपाल म्हणालेप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा एक अंतर्गत राज्यात 12 लाख 69 हजार 785 म्हणजेच 93.6 टक्के घरे पूर्ण झाली आहेत. तरदुसऱ्या टप्प्यात 18 लाख 47 हजार 291 घरे प्रगतीपथावर आहेत. राज्याने नुकतेच सुधारित वाळू निर्गती धोरण जाहीर केले आहे

विकसित भारता'च्या निर्माणासाठी प्रगत महाराष्ट्र घडवूया

 विकसित भारता'च्या निर्माणासाठी प्रगत महाराष्ट्र घडवूया

- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिन सोहळा शिवाजी पार्क येथे संपन्न

 

मुंबईदि. 1: राज्यातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशकप्रगतिशीलपुरोगामी आणि विकसित राष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. भारताच्या  अमृत काळामध्ये भारताला विकसित राष्ट्र’ बनविण्याचे ध्येय साध्य करताना  महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे असेल. महाराष्ट्राला आधुनिकबलशाली आणि प्रगत राज्य बनविण्यासाठी आपण सर्वांनी काम करूयाअसे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात केले.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकरविधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफस्थानिक लोकप्रतिनिधीमुख्य सचिव सुजाता सौनिकबृहन्मुंबई आयुक्त भूषण गगराणी,पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाशासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिवपोलीस आयुक्त देवेन भारतीअपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मल्लिकार्जुन प्रसन्नअपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकरविविध विभागांचे प्रधान सचिववरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारीतिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारीविविध देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारीआदी यावेळी उपस्थित होते. यावेळ राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायनाने मानवंदना देण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करीत राज्यपाल म्हणालेराज्य शासनाने काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तातडीने  उपाययोजना केल्या. राज्य शासनाने सर्व विभागांना लोककल्याणकारी लक्ष केंद्रित करणारे उपक्रम जलद गतीने राबविण्यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले असून  यामध्ये समाविष्ट बाबींमध्ये विभागांनी समाधानकारक काम केले आहे.

सुरक्षित व उद्योगस्नेही महाराष्ट्र

राज्यपाल म्हणाले कीमहाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा मंडळ तसेच महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण व कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण विकसित करण्यासाठी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत राज्य शासनाने 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांच्या 63 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारांमुळे राज्यात 15 लाख 95 हजार 960 रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

स्टीलमाहिती तंत्रज्ञानहरीत ऊर्जाऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रिक वाहनेवस्त्रोद्योगडेटा सेंटर्सइलेक्ट्रॉनिक्सअवकाश आणि संरक्षणजैवतंत्रज्ञानऔषध निर्मितीपायाभूत सुविधाड्रोन उत्पादनशिक्षण आदी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब’ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तेथे नऊ स्टील उत्पादन प्रकल्पांना देकारपत्रे दिली आहेत. या उपक्रमामुळे एक लाख 60 हजार 238 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि जवळपास 50 हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्यात 78 उद्योग घटकांना देकारपत्रे देण्यात आली असून त्यामुळे सुमारे सहा लाख 55 हजार 84 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे दोन लाख 47 हजार 400 लोकांना रोजगार मिळणार आहेअसेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव

 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग

गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन

 

मुंबईदि 1 :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणेनागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन आज जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे.

भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India)  मार्फत या मोहिमेचे मूल्यांकन करण्यात आले. वेबसाईट कार्यक्षमताकार्यालयीन सोयीसुविधातक्रार निवारण व्यवस्थागुंतवणूक अनुकूलतानागरिकांसाठी सेवा सुलभतातंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले की , "ही मोहिम म्हणजे केवळ व्यवस्थापन नाहीतर उत्तरदायित्वपारदर्शकता आणि लोकहितासाठी कार्यक्षम प्रशासनाचे प्रतिबिंब आहे. या उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे."

शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणेदूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील.

एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

या मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयअधिकारी यादी पुढीलप्रमाणेकंसात टक्केवारी दिली आहे.

सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

ठाणे (९२.००)नागपूर (७५.८३)नाशिक (७४.७३)पुणे (७४.६७)वाशिम (७२.००)

सर्वोत्तम महापालिका आयुक्त

उल्हासनगर (६५.२१)पिंपरी-चिंचवड (६५.१३)पनवेल (६४.७३)नवी मुंबई (६४.५७)

सर्वोत्तम पोलिस आयुक्त

मीरा भाईंदर (६८.४९)ठाणे (६५.४९)मुंबई रेल्वे (६३.४५)

सर्वोत्तम विभागीय आयुक्त

कोकण (७५.४३)नाशिक (६२.२१)नागपूर (६२.१९)

सर्वोत्तम पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक

कोकण (७८.६८)नांदेड (६९.८७)

सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग

महिला व बाल विकास (८०.००),  सार्वजनिक बांधकाम विभाग (७७.९४), कृषी (६६.५४)ग्रामविकास (६३.५८)परिवहन व बंदरे (६२.२६)

सर्वोत्तम आयुक्त / संचालक

संचालकतंत्र शिक्षण (७७.१३)आयुक्तजमाबंदी (७२.६६)आदिवासी विकास (७२.४९)राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (७०.२८)वैद्यकीय शिक्षण (६८.५३)

सर्वोत्तम जिल्हाधिकारी

चंद्रपूर (६८.२९)कोल्हापूर (६२.४५)जळगाव (६०.६५)अकोला (६०.५८)नांदेड (५६.६६)

सर्वोत्तम पोलिस अधीक्षक

पालघर (७०.२१)जळगाव (६०.००)नागपूर ग्रामीण (६०.००)गोंदिया (५६.४९)सोलापूर ग्रामीण (५६.००)

या यादीत चंद्रपूरठाणेपुणेउल्हासनगरमीरा भाईंदरपालघरगोंदियानांदेडकोल्हापूरअकोला यांसारख्या जिल्ह्यांतील कार्यालयांनी लक्षणीय गुण मिळवत इतरांसमोर उत्तम आदर्श ठेवला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.  त्यांनी म्हटले आहे की "या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावीयासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गुणवत्ता मोहिम एक सुरूवात आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेल. नागरिकांना जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावेअसे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात

 राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात

 

नवी दिल्लीदि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त राजधानी दिल्लीत उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीत व राज्य गीत गर्जा महाराष्ट्र माझा…’ गाऊन ध्वजवंदन केले. या कार्यक्रमास अपर निवासी आयुक्त डॉ. नीवा जैनसहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावारस्मिता शेलारमहाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरजीत कौर अरोरामाहिती अधिकारी अंजु निमसरकरमहाराष्ट्र सुरक्षा रक्षकमहाराष्ट्र सदनातील निवासी अभ्यागतदिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम

दिल्ली उपराज्यपाल कार्यालयातर्फे सायंकाळी महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेनामुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

यावेळी दिल्लीत विविध क्षेत्रांत कार्यरत मराठी भाषिक मान्यवरांशी संवाद साधून त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे प्रदर्शन या ठिकाणी करतील. कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याचा जागर करणारा खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने आणि कोकण हापूस आंबा उत्पादक संघदेवगडसिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 व 2 मे दरम्यान भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंब्याचे विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले.

यानिमित्ताने महाराष्ट्राचा सुगंधी राजा’ हापूस आंब्याची खरेदी करण्याचीही सुवर्णसंधी दिल्लीकरांना उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांत मराठी आणि इतर भाषिक दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा आणि सांस्कृतिक वैभव सर्वांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


Featured post

Lakshvedhi