Tuesday, 1 April 2025

Governor presides over the 4th Convocation of the Dr Homi Bhabha State University

 Governor presides over the 4th Convocation of

the Dr Homi Bhabha State University

 

The Governor of Maharashtra and Chancellor of state public universities C.P. Radhakrishnan presided over the 4th Convocation of the Dr Homi Bhabha State University at the Sir Cowasjee Jehangir Convocation Hall in Mumbai. Degrees were awarded to 1155 graduating students. Gold Medals were given to 6 Students from the constituent Institutions.

            Member Secretary and CEO of Indira Gandhi National Centre for the Arts Dr. Sachchidanand Joshi delivered the Convocation Address.

Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, Vice Chancellor of HBSU Dr Rajneesh Kamat, Registrar Prof Vilas Padhye, Deputy Secretary S. Ramamoorthy, Director of Board of Examinations and Evaluation Nanasaheb Fatangare, Members of General Council, Academic Council, Management Council, faculty and students were present.

0000

समर्पित भावनेने काम केल्यास विकसित भारताचे लक्ष्य दहा वर्षे अगोदरच साध्य

 समर्पित भावनेने काम केल्यास

विकसित भारताचे लक्ष्य दहा वर्षे अगोदरच साध्य

- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

·         राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

·         विद्यापीठांनी वार्षिक वेळापत्रकपदवीदान समारोहाची तारीख काटेकोरपणे पाळावी

मुंबईदि. 25 : पूर्वीच्या तुलनेत आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. युवकांनी या संधींचा लाभ घेत देशासाठी समर्पित भावनेने कार्य केल्यास विकसित भारताचे उद्दिष्ट्य 2047 च्या किमान दहा वर्षे अगोदरच साध्य होईलअसे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले.  

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा चौथा वार्षिक दीक्षांत समारंभ मंगळवारी (दि. 25) मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात झालात्यावेळी ते बोलत होते. 

विद्यापीठांच्या कुलगुरूंना विद्यापीठांचे वार्षिक शैक्षणिक वेळापत्रक तयार करण्यास सांगितले असून प्रत्येक विद्यापीठाने आपला वार्षिक दीक्षांत समारोह शेवटची परीक्षा झाल्यानंतर एक महिन्यात करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छ भारत अभियानामुळे आज देशातील सर्व रेल्वे स्थानके तसेच रेल्वे ट्रॅक स्वच्छ झाले आहेत. विद्यापीठांनी आपापल्या विद्यापीठात हा कार्यक्रम यापुढेही राबवावा व शैक्षणिक परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर निश्चित असे ध्येय ठेवावे व ते गाठण्यासाठी आपल्या गतीने सातत्याने काम करावे. जीवनात शिस्त व नीतिमूल्ये पाळल्यास कोणतीही शक्ती तुम्हाला रोखु शकणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.     

आपण विद्यार्थी असताना टेबल टेनिस व मैदानी खेळात नियमितपणे सहभागी व्हायचो त्यामुळे आज ६८ व्या वर्षी  आपले आरोग्य उत्तम असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष्य द्यावे असे राज्यपालांनी सांगितले.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रनवी दिल्लीचे सदस्य सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सच्चिदानंद जोशी यांनी यावेळी दीक्षांत भाषण केले.

यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत पीएचडीपदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आली तर 6 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरेडॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामतकुलसचिव प्रा. विलास पाध्येराज्यपालांचे उपसचिव एस राममूर्तीपरीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक नानासाहेब फटांगरेतसेच विविध विभागांचे अधिष्ठाता. प्राध्यापकस्नातक विद्यार्थी तसेच निमंत्रित उपस्थित होते.

            प्रारंभी कुलगुरू प्रा. कामत यांनी विद्यापीठाचा मागील वर्षाचा अहवाल सादर केला

विभागीय चौकशीसाठी नवीन कार्यपद्धती; चौकशी वेगाने पूर्ण होणार, लाचखोरां ना धडा शिकवणार

 विभागीय चौकशीसाठी नवीन कार्यपद्धतीचौकशी वेगाने पूर्ण होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. २५ : लाच घेणारे व भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपांमध्ये सहभागी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येते. मात्र सध्याची कार्यपद्धती वेळखाऊ असल्याने यामध्ये सुधारणा करण्यात येऊन नवीन कार्यपद्धती तयार करण्यात येणार आहे. यामुळे विभागीय चौकशी निश्चितच वेगाने पूर्ण होऊन प्रकरण लवकर निकाली निघेलअशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.

याबाबत सदस्य वरुण सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य भास्कर जाधव यांनीही सहभाग घेतला.

उत्तरात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेसामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अंतर्गत विभागीय चौकशी विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी काम सुरू आहे. ही चौकशी गतीने पूर्ण करण्यासाठी व्यवस्था निर्माण करायची गरज भासल्यास ती करण्यात येईल. वेळेत दोषारोपपत्र तयार करणे यामुळे शक्य होणार आहे.

राज्य शासन व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विविध सेवा उपलब्ध करून देत आहे. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवा पहिल्या टप्प्यात ऑनलाइन व दुसऱ्या टप्प्यात व्हॉट्सॲप वरून करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जर कुणी काम मुद्दाम अडवले तर, ' डिजिटल फूट प्रिंटतयार होऊन अडविणारा समोर येऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. मजूर संस्थांमध्ये अध्यक्ष हा मजूरच असला पाहिजे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व कामगार विभागाकडून अधिक प्रभावी नियमावली तयार करण्यात येवून संस्थांचा दुरुपयोग थांबविला जाईलअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अवैध हुक्का पार्लर नियंत्रणासाठी कायदा कडक करून अजामीनपात्र गुन्हा करणार

 अवैध हुक्का पार्लर नियंत्रणासाठी कायदा कडक करून

अजामीनपात्र गुन्हा करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. २५: राज्यात तंबाखूजन्य हुक्का पार्लर व्यवसायावर २०१८ मध्ये कायद्याने बंदी आहे. हर्बल हुक्का पार्लर नावाखाली अवैधपणे हुक्का पार्लर व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अवैधरित्या हुक्का पार्लरवर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करून कायदा अधिक कडक करण्यात येईल. अवैध हुक्का पार्लर चालविण्याचा तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास अजामीनपात्र गुन्हा समजण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

अवैध हुक्का पार्लर बाबत सदस्य सुनील कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत संजय केळकरसुधीर मुनगंटीवारनाना पटोलेसिद्धार्थ शिरोळेआशिष देशमुख या सदस्यांनी सहभाग घेतला.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेअवैधरित्या हुक्का पार्लर चालविण्याचा गुन्हा केल्यास तीन वर्ष कैदेची शिक्षा होतेआता दुसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास कैदेसह उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येईल. तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करून हा गुन्हा अजामीनपात्र करण्यात येईल. हुक्का पुरवठा करण्याबाबत हुक्का पार्लरशी संबंधित गुन्हा समजण्यात येईल. पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध हुक्का पार्लरच्या व्यवसायातबाबत कारवाई न केल्यास पोलिसांवर कारवाई करण्यात येईल.

ई सिगारेटचे व्यसन तरुणाईला आपल्या विळख्यात घेत आहे. ई सिगारेट स्टाईल स्टेटमेंटसमजले जात आहे. ई सिगारेटवर बंदी आहेयाबाबत अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम उत्तरात म्हणालेराज्यात विशेष मोहीम राबवून अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात येईल. हर्बल हुक्का पार्लरच्या नावाखाली अवैध हुक्का पार्लर चालवत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी 50 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1.25 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

0000

सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राखालील पाण्यातील संग्रहालय उभारणार

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राखालील पाण्यातील संग्रहालय उभारणार

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबईदि. २५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाचे विविध प्रकल्प सुरू आहेत त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण होत आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राखाली पाण्यामध्ये आय एन एस गुलदार या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे. लवकरच या संग्रहालयाची उभारणी करण्यात येत असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्पाबाबत सदस्य चंद्रकांत सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाच्या उत्तरात पर्यटन मंत्री देसाई म्हणालेगुलदार युद्धनौकेची स्वच्छता करण्यात आली असून लवकर ती संग्रहालयासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०२१ - २२ ते २४ - २५ या कालावधीत १४९.६० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहे. सावंतवाडी येथील उद्यान विकसित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात जागतिक दर्जाची स्कुबा डायव्हिंग सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

0000

मुंबईतील गृहसंकुल पुनर्विकासासाठी महाप्रीत - एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार,

 मुंबईतील गृहसंकुल पुनर्विकासासाठी महाप्रीत - एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार

 

   मुंबई,दि. 27 : महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडनवी दिल्ली गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारची नवरत्न कंपनी  यामध्ये विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्याकरिता  मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला.

 

    एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड या कंपनीची मोठे गृहनिर्माण प्रकल्पआयटी इमारतींचे बांधकाम तसेच स्वदेशात आणि परदेशात पायाभूत सुविधा प्रकल्पांची संकल्पना व अंमलबजावणी करणे आणि अशा प्रकल्पांना निधी देण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

     ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्टभिवंडी महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिका या प्रमुख प्रकल्पांमध्ये पीएमएवाय आणि परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची अंमलबजावणी महाप्रित करत आहे. मुंबईत सुमारे 56 एसआरए प्रकल्प महाप्रित राबविणार आहे. एमएमआर आणि विशेषतः मुंबई शहरातील विविध खाजगी सहकारी गृहसंकुल संस्थांनी त्यांच्या परिसराचा पुनर्विकासासाठी महाप्रितसोबत चर्चा केली आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत मुंबई शहरातील गृहसंकुलाची गरज पूर्ण करण्याकरिता महाप्रित आणि एनबीसीसी या कंपन्या सहकार्य करणार आहेत.

 

     महाप्रित ईएसजी अनुपालनस्वच्छ आणि हरित ऊर्जा निकषांचा अवलंबकचरा पुनर्वापरडीकार्बोनाइज्ड साहित्यनवीनतम आणि पर्यावरणपुरक लवचिक बांधकाम तंत्रज्ञानराष्ट्रीय पर्यावरणपूरक मानकेराज्यातील दुर्बल घटकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि प्रकल्प देखरेखीसाठी आंतरराष्ट्रीय मानके यावर लक्ष केंद्रित करीत आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता  महाप्रित कंपनी अग्रस्थानी आहे. तसेच महाप्रित आणि एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडची तज्ज्ञता व कौशल्यामुळे होणारे फायदे लक्षात घेतादोन्ही सरकारी संस्थांनी समान हितांच्या प्रकल्पांवर पीएमसी अथवा ईपीसी तत्वावर प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे.

 

  यावेळी महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी म्हणालेएनबीसीसी आणि महाप्रित यांच्यातील सहकार्यामुळे पुनर्विकास कार्य करण्यास मदत होईल व गृहसंकुलांना पुनर्विकास करण्याची संधी प्राप्त होईल. तसेच केंद्र सरकारच्या संस्थांना विकासकांची निवड करण्याचे पर्याय उपलब्ध होत असल्यामुळेपुनर्विकासांची कामे राज्य शासनाच्या नियमानुसार करण्यात येईल.

 

    एनबीसीसीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक के. पी. महादेवस्वामी म्हणालेएनबीसीसी (इंडिया) मुंबई आणि महाप्रित यांच्या संयुक्त सहकार्यामुळे मुंबई व मुंबई परिसरातील पुनर्विकासांची प्रकल्प राबविण्यात येतील. तसेच अशाच प्रकारचे प्रकल्प नवी दिल्ली व  इतर राज्यांमध्ये संयुक्तपणे राबविण्यात येतील.

 

  यावेळी महाप्रितचे संचालक पुरुषोत्तम जाधवकार्यकारी संचालक सुभाष नागे,  प्रकल्प संचालक पी. आर.के. मुर्तीकार्यकारी संचालक सुनील पोटे तसेच एनबीसीसी (इंडिया) नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक प्रदिप शर्माकार्यकारी संचालक प्रविण डोईफोडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

0000

*गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर*

 *गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर*

-विनय  मधुकर जोशी

#विनय_उवाच 

आज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया.आज पासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत  गौरीची  पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो.देवघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेऊन हा उत्सव साजरा होतो.अनेक शुभ चिन्हांची रांगोळी" चैत्रांगण " काढली जाते.


गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते.गौरी हि भौतिक समृद्धीची देवता.अन्नधान्य ,वात्सल्य ,धन संपती ,सौंदर्य ,मांगल्य ,कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा.आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान!.योग ,वैराग्य,ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान. शिव पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते.बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूट.


पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व ? 

शिव म्हणले साफ खोट आभासी आहे हे ,

 विश्वातील सौंदर्य ,मांगल्य , नातीगोती ???

ते हि असत्य

बर मग आपण खातो ते अन्न तरी ?

तेही खोट ,असत्य ,आभासीच ,फक्त ब्रह्म तत्वच सत्य !!

झालं ….गौरीला आला थोडा राग . ती म्हणाली बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खर बाकी सगळ आभासी ना.या क्षणी मी अंतर्धान होते. 


गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले ,नात्यांचा गोडवा उडाला ,घराचे घरपण हरपले ,सात्विक सौंदर्य विरले,आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्न धान्य सुद्धा अकस्मात संपले. शिवाना वाटले हरकत नाही..या वाचून जगाचे  काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्या जगातले देव ,मानव ,ऋषी ,पशु पक्षी सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले. महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो. पण भुकेल्या पोटी कसलं  ब्रह्म कसलं ज्ञान.आधी अन्न द्या मग पुढ्च बोला.पण अन्न आणायचे कुठून??

कोणीतरी सांगितल अख्या विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले. 

ओम भवती भिक्षां देहि.


आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान कि वैराग्य ??

महादेवानी पाहिलं ,आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे ,मांगल्य लेवून ,पावित्र्य पांघरून ,समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र ,वात्सल्याच्या पळीने ती प्रतेक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे. प्रपंचाशिवाय  परमार्थ, प्रवृत्तीवाचून निवृत्ती ,शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला.

शिव म्हणाले  ज्ञान -वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी ,त्यासाठी सकस अन्न हवे, अन्न हे पूर्णब्रह्म .त्याचीच  भिक्षा दे !!! 

*ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।*

पार्वती हसली , तिने आनंदने शिवांना भोजन दिले ,शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले .

त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू  सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस ,जगाची आई बनून अन्न पुरवणारी  तू अन्नपूर्णा आहेस.साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.


हि अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींच प्रतिक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवर देखील  द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको  सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेऊ घालत होती.परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे.कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात.तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं ,नाती जपावीत ,घराला घरपण द्याव.हे सगळं करत असताना "गृहिणी कुठे काय करते?" असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.


या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर.रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते.किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात.त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार -शिव, गणेश, नंदी वैगरे.गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.


*स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।*

*दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥*

पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे.

 

शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन

*अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे*|

*ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।*


विनय मधुकर जोशी

#विनय_उवाच 

vinayjoshi23@gmail.com

(वरील लेख नावासह शेयर करायला हरकत नाही )

Featured post

Lakshvedhi