Saturday, 1 March 2025

नवी मुंबईतील एज्युसिटीला केनेडीकट राज्याची मदत गव्हर्नर नेड लॅमांट यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा

 नवी मुंबईतील एज्युसिटीला केनेडीकट राज्याची मदत

गव्हर्नर नेड लॅमांट यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा

 

मुंबईदि. 28 : नवी मुंबई परिसरामध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ व दळणवळणाच्या दर्जेदार सुविधांमुळे तिसरी मुंबई विकसित होत आहे. सर्व सुविधा लक्षात घेता नवी मुंबईत नवीन 'एज्युसिटीनिर्माण करण्याचा राज्य शासनाचा मानस असून त्यासाठी अमेरिकेतील केनेडीकट राज्याची मदत मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथिगृह येथे कनेक्टिकट राज्याचे गव्हर्नर नेड लॅमांट व त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान एज्यूसिटीउभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या 'पॉवर हाऊस'सोबतच तंत्रज्ञान आणि करमणुक क्षेत्राचे हब आहे. देशातील एकूण परकीय गुंतवणूकीपैकी ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्यात देशाच्या ६० टक्के डेटा सेंटर क्षमता आहे. राज्याला २०३० पर्यंत १ हजार अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यापैकी राज्याने सध्या निम्मे उद्दिष्ट साध्य केले आहे.

 नवीन एज्युसिटीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळच असणार आहे या विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. मुंबईमध्ये पायाभूत सोयी-सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रोनवीन विमानतळआंतरराष्ट्रीय बंदर आदी पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यात येत आहे. यामुळे राज्य अधिक गतीने विकसित होत आहेअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

शिष्टमंडळात गव्हर्नर यांच्यासमवेत केनेडीकट प्रांताचे एक्झिक्यूटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट कॅथी कान्गारेल्लाकेनेडीकट विद्यापीठाचे अध्यक्ष राडेन्का मॅरीकयाले विद्यापीठाचे व्हाईस प्रोवोव्ह फॉर रिसर्च मायकल क्रेअरपेप्सिको कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयीकौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्माउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डीमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडे उपस्थित होते.

0000

Friday, 28 February 2025

महाकुंभ प्रयागराज 2025 आज महाशिवरात्रि अंतिम

 *महाकुंभ प्रयागराज 2025 आज महाशिवरात्रि अंतिम स्नान शानदार वीडियोग्राफी स्पाइसजेट के पायलट कैप्टन समर सेंगर और मोहित द्वारा अद्भुत दृश्य हर हर गंगे*👌👌🚩


पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार

 पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीआगामी पाच वर्षांत महाराष्ट्र सरकार तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. यात वाढवण बंदर हा प्रकल्प एकंदरीतच राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडविणारा आहे. हे बंदर सध्याच्या जे.एन.पी.टी. पेक्षा तीनपट मोठे असून20 मीटर खोल असल्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजे येथे थांबू शकतील. भारताला जागतिक सागरी व्यापारात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारा हा बंदर प्रकल्प असेल. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व नव्या स्मार्ट सिटीच्या उभारणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. हे विमानतळ पूर्ण झाल्यावर परिसरात एक नवीन व्यापारी आणि तंत्रज्ञान केंद्र विकसित केले जाणार आहे. ही नवी शहरे मुंबईच्या तुलनेत तीनपट मोठी असतील आणि उद्योगांसाठी उत्तम संधी उपलब्ध करतील.

विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा आणि गोदावरी नदीजोड प्रकल्प हाती घेतले जात आहेत. या प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेती उत्पादन वाढणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना

 राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना

राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना संदर्भात श्री.फडणवीस म्हणाले कीजगभरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात 70% गुन्हे हे सायबर गुन्हे असतील. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भारतातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारले आहे. सर्व बँकासोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना या यंत्रणेशी जोडले असल्याने आता कोणत्याही आर्थिक फसवणुकीवर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की2000 ते 2014 दरम्यान महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाल्यामुळे अनेक आयटी कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादकडे वळल्या. मात्रअटल सेतूसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई आता एक नवे तंत्रज्ञान केंद्र बनत आहे. मुंबईच्या भविष्यातील विकास आराखड्यावर भाष्य करताना श्री.फडणवीस यांनी सांगितले कीआजच्या मुंबईत व्यावसायिक जागांची कमतरता असल्यामुळे नवी मुंबईनवीन ठाणे आणि वाढवण येथे नवीन शहरे उभारली जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना अधिक जागा उपलब्ध होईल आणि मुंबईवरील भार कमी होईलअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले

व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून "आपले सरकार"च्या 500 सेवा मिळणार

 व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून "आपले सरकार"च्या 500 सेवा मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई टेक वीक 2025 चे उद्घाटनव्हॉट्सअॅप चॅटबॉटभूखंड प्रदान,

उद्योजक संग्रहालयए.आय.हब संदर्भातही घोषणा

 

मुंबईदि. 28 : महाराष्ट्रात आता शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने "आपले सरकार" पोर्टलवरील ५०० हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअँपवर उपलब्ध होणार आहेत. राज्यात मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. आतापर्यंत ऑनलाइन सेवा उपलब्ध असूनही काही नागरिक ऑनलाइन प्रक्रियांपासून दूर राहायचे. मात्रव्हॉट्सअँपचा सहज आणि सर्वदूर वापर पाहताआता शासनाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ थेट व्हॉट्सअँपद्वारे घेता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात "व्हॉट्सअँप गव्हर्नन्स" चा नवा अध्याय सुरू होत आहे. या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढामाहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आपले सरकार व्हॉट्सअँप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मेटा यांच्यात बीकेसी येथे सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर एम.एम.आर.डी.ए. आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. एम.एम.आर.डी.ए. ने एन.पी.सी.आय. ला मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी भूखंड प्रदान केला. तसेच कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि TEAM सोबत नॉलेज AI हब संदर्भात सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक संग्रहालयाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

बीकेसी येथे मुंबई टेक वीक 2025 चा शुभारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी लोकमत समुहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जियो कन्वेंशन सेंटर येथे मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.

फिनटेक आणि ‘एआय’ क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असून देशात महाराष्ट्र राज्य स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. जेव्हा आपण ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहतोतेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीवॉररूममुळे प्रकल्पांच्या निर्णय प्रक्रियेला वेग मिळला आहे. पूर्वी मुंबईत एखादा प्रकल्प सुरू करण्यासाठी 18 विविध सरकारी यंत्रणांची परवानगी घ्यावी लागायचीत्यामुळे प्रकल्पांना विलंब होत असे. वॉररूमच्या माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणून त्वरित निर्णय घेण्यास सुरुवात केली. यामुळे मेट्रोकोस्टल रोडअटल सेतू यासारख्या प्रकल्पांना गती मिळालीअसे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

कोयना परिसर पर्यटन हब बनविणार

 कोयना परिसर पर्यटन हब बनविणार

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

कोयनानगर एमटीडीसी रिसॉर्टचा कायापालट करणार

 

     मुंबईदि. 28 : सातारा जिल्ह्यातील कोयना परिसराला पर्यटनाचे हब बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कोयनानगर रिसॉर्टचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

  पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर येथील पर्यटन विषयक कामांसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशीसंचालक बी. एन. पाटीलअधिक्षक अभियंता बोरसे तर दूरदृश्य प्रणाली द्वारे साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले कीकोयना धरण आणि जलाशय परिसर हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असूनयेथे पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी पर्यटनविषयक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये एमटीडीसी रिसॉर्टचा संपूर्ण कायापालट करून आधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत.

  कोयनानगर येथील पर्यटन विभागाच्या रिसॉर्टची सद्य स्थिती श्री. देसाई यांनी जाणून घेतली. श्री. देसाई म्हणालेया ठिकाणी पाच व्ही.व्हीआयपीपाच व्हीआयपी आणि उर्वरित ठिकाणी कॉटेज तयार करण्याचा प्रस्ताव तयार करावा. या रिसॉर्टच्या जागेसंदर्भात काही प्रश्न असल्याने स्थानिक स्तरावर सोडविण्यात यावेत.

 कोयनानगर येथील नेहरू उद्यान विकसित करण्यासंदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. सध्या तीन एकर जागेवर असलेल्या या उद्यानाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर उद्यान वाढवण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. प्रकल्पाच्या कामांमधील अडीअडचणींचा आढावाही पर्यटन मंत्री देसाई यांनी यावेळी घेतला.

   या उपक्रमांमुळे कोयनानगर परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी येईलअसा विश्वास पर्यटन मंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

****

आर्थिक सक्षमीकरणातून लाडक्या बहिणींची झेप उद्योजकतेकडे

 आर्थिक सक्षमीकरणातून लाडक्या बहिणींची झेप उद्योजकतेकडे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विकसित भारत महिला उद्योजिका संमेलन

            मुंबईदि. 28 : आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास सुरू असून या प्रवासात झेप फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून बचतगटाच्या माध्यमातून महिला उद्योजकतेकडे वळत आहेत. लाडक्या बहिणी लाडक्या उद्योजिका बनत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

झेप फाउंडेशनच्यावतीने विकसित भारत महिला उद्योजिका 2025 च्या संमेलनाचे आयोजन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी, महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

            यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेमहाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादमउपायुक्त डॉ.प्राची जांभेकरनगरसेविका हर्षिता नार्वेकरवर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, ‘झेपच्या संचालिका पौर्णिमा शिरीषकर यांच्यासह बचत गटाच्या महिला आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीजागतिक महिला दिन हा स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा आहे. यानिमित्त झेप फाउंडेशनने 500 पेक्षा जास्त बचत गटाच्या महिलांना एकत्रित केले आहे. दोन कोटीपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातील महिलेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेचा लाभ महत्वपूर्ण ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी महिलांचा आपण आधार होऊ शकतो याचे समाधान लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.

झेप फाउंडेशनने अशा महिलांना एकत्रित करून त्यांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहन दिले. महिलांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. महिलांचेही कुटुंबातील योगदान वाढावे यासाठी हा प्रयत्न आहे. गरजू महिलांना सहकार्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

ज्या महिला शासनाच्या या प्रयत्नांना साथ देत आहेत, चौकटी आणि रूढी परंपरातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना आणि ज्या भगिनी त्यांना यासाठी सहकार्य करीत आहेत अशा सर्वांना महिलादिनाच्या शुभेच्छा महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

प्रधान सचिव अश्विनी भिडे म्हणाल्या कीजिद्द आणि महत्वाकांक्षा असेल तर महिलाही आपले ध्येय गाठू शकतात. लघु उद्योगात ७० टक्के महिला कार्यरत आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनाही उद्यमशील बनवू शकतो. महिलांसाठी आकाश मोकळे आहे त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम राज्य शासन करीत असून केवळ महिलांच्या महत्वाकांक्षा आणि जिद्दीने हे साध्य होणार असल्याचे श्रीमती भिडे यांनी यावेळी सांगत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

०००

Featured post

Lakshvedhi