Tuesday, 11 February 2025

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही पणन विभागाचे स्पष्टीकरण

 सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून 

नव्याने मुदतवाढ नाही

पणन विभागाचे स्पष्टीकरण

 

मुंबईदि. १० - महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दि. १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ दि. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती.

       

काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणामध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याचे वृत्त प्रसृत झाले. तथापि सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने दि. ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 

महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार

 

नवी दिल्ली दि. 10 :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  सरहदपुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाणार आहेअशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली.

11 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल.

५ लक्ष रुपयेमानपत्रसन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

               कार्यक्रमाच्या पूर्वी शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

0000


जिन्दगी का साथ निभाते चला......

 तीन मनोरंजक लघु कथा. या तीनही कथांना सखोल अर्थ आहे. या कथा वाचून आपल्याला नक्कीच हसायला येईल. तुम्हीही वाचा आणि आवडल्यास पुढे पाठवा.


१. "गहन"


मी लिफ्ट मध्ये एका लहान मुलाला आईस्क्रीम खात असलेलं बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो, "आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील!"


तो मुलगा उत्तरला, "माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली."


मी विचारलं, "आइसक्रीम खाल्यामुळे?"


तो म्हणाला, "नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खूपसत नाही!"


किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात! आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय - कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय?


२. "थकलेला"


आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंट बद्दल बातम्या पाहात होतो - लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.


ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते मी सुटकेचा निश्वास टाकला.


बापरे, माझ्या मनावरचा ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!


मात्र मी एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.


३. "थांबा"


एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तीनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, "सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात."


त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागान ओरडून म्हणाला, "हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं ?"


त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या शिटापाशी उभी राहिली.


ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली, "सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं"


तात्पर्य, मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो. ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं. 


या तीन गंमतदार छोट्या गोष्टी इतक्या चांगल्या आहेत की तुम्ही त्यांना शेअर केल्याशिवाय राहूच शकणार नाही. मग उशीर कशाला? तुम्हीही द्या पाठवून पुढे, इतरांनाही थोडं हसू द्या. 😊

Monday, 10 February 2025

ग्लोबल मीटर मॅन्यु कं.ची मीटर विक्री तात्काळ थांबविण्याचे न्यायालयाचे आदेश Pl share

 ग्लोबल मीटर मॅन्यु कं.ची मीटर

विक्री तात्काळ थांबविण्याचे न्यायालयाचे आदेश

 

मुंबई, दि. 10 : मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीच्या उत्पादीत ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटर ची विक्री व वितरण तात्काळ थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

पुण्याच्या या कंपनीद्वारे केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नमुन्यामध्ये (मॉडेल अप्रुव्हल) ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने फेरबदल करण्यात आल्यासंदर्भातील याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीपुणे यांनी त्यांनी Model Approval No.-IND/०९/०६/१६३ अन्वये उत्पादित केलेल्या मीटरची खरेदी करु नये तसेच वाहनावर हे मीटर न बसविण्याचे आवाहन नियंत्रणवैद्यमापनशास्त्र यांनी केले आहे

मंत्रालय प्रवेशासाठी ‘फेस डिटेक्शन’ न झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची फेरनोंदणी एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालय सुरक्षा व पारदर्शकेत वाढ

 मंत्रालय प्रवेशासाठी फेस डिटेक्शन’ न झालेल्या

अधिकारी व कर्मचाऱ्यांची फेरनोंदणी

एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालय सुरक्षा व पारदर्शकेत वाढ

 

मुंबईदि. 10 : मंत्रालय प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस’ तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. तसेच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यास मदत होणार आहे. शासकीय अधिकारीकर्मचारीलोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावीजेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फेस डिटेक्शन न झाल्यामुळे मंत्रालय प्रवेशास विलंब किंवा अडथळा होत असल्यास अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अद्ययावत छायाचित्रासह फेर नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मंत्रालयात कामानिमीत्त येणाऱ्या  अभ्यांगताना व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी  यांना डिजी प्रवेश’ या अॅप आधारीत ऑनलाईन प्रणालीमार्फत मंत्रालय प्रवेश सुनिश्चीत करण्यात येणार असून त्याबाबत पुढील आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

            या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. तसेच अनधिकृत प्रवेश व अनधिकृत प्रवृत्तींना चाप बसणार आहे. या प्रणालीमुळे अनुचित प्रवेश रोखले जाणार असून मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. यामुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण येऊन शासकीय कामकाजात अधिक सुलभता येईल. तसेच लोकांची कामे जलद गतीने होण्यास मदत मिळणार आहे.

            मंत्रालय ही अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची आस्थापना असल्याने या आस्थापनेची सुरक्षा महत्त्वाची बाब आहे. त्याअनुषंगाने मंत्रालय अंतर्गत सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आला आहे. मंत्रालय अंतर्गत सुरक्षा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.  मंत्रालय परिसर एकात्मिक सुरक्षा आणि देखरेख अंतर्गत टप्पा 2 प्रकल्प हा टप्पा 1 प्रकल्पाचा नैसर्गिक विस्तार म्हणून राबविण्यात येत आहे.

            या प्रकल्पांतर्गत मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना फेसीअल रिकॉग्नीशन’ व आरएफआयडी’ कार्ड आधारित प्रवेश देण्याबाबत तरतूद आहे. याकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त मंत्रालयातील 10 हजार 500 अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांचा तपशिल या प्रणालीमध्ये भरण्यात आलेला आहे. तसेच सर्व मंत्री कार्यालयेसंसदेचे व विधानमंडळाचे सर्व विद्यमान व माजी सदस्य यांचा तपशिल मागविण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने कार्यान्वयन कंपनीमार्फत सर्व प्रवेशद्वार येथे फेसीअल रिकॉग्नीशन’ यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली आहे.   जानेवारी 2025 पासुन मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना फेसीअल रिकॉग्नीशन’ व आरएफआयडी’ कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहे.           

मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना दि.26 सप्टेंबर 2023 रोजीच्या  शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. त्यामधील सुचनेनुसार बाहेरील खाद्यपदार्थ मंत्रालयात आणण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा भाग म्हणून अभ्यागतांजवळील पाण्याच्या बॉटल्सऔषधे व इतर पदार्थ प्रवेशद्वार येथेच काढून ठेवण्यात येत आहेतअसे गृह विभागाचे कक्ष अधिकारी प्रविण ढिकले यांनी कळविले आहे.

ग्रामीण कला, संस्कृती अनुभवण्यासाठी 'महालक्षमी सरस' ला आवर्जून भेट द्यावी प्रदर्शन दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान

 ग्रामीण कला, संस्कृती अनुभवण्यासाठी 'महालक्षमी सरसला आवर्जून भेट द्यावी 

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन - २०२५ ला दि. ११ फेब्रुवारी पासून सुरुवात

मुंबई दि. १० - ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात सहाय्यक असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास दि 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात बचतगटांच्या उत्पादनांची विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन वैविध्य पूर्ण उत्पादनेग्रामीण कलासंस्कृतीचा अवश्य लाभ घ्यावाअसे आवाहन ग्राम विकास व पंचायत राज विभाग मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. 

राज्यस्तरीय प्रदर्शनांमध्ये ५०० पेक्षा अधिक स्टॉल

ग्रामविकास व पंचायत राज विभागमहाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५  उद्घाटन सोहळा दि. ११ फेब्रुवारी२०२५ रोजी बांद्रा कुर्ला संकुलमुंबई येथे होत आहे.

या   राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये ५०० पेक्षा अधिक स्टॉल असणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ४०० आणि इतर राज्यातून साधारण १०० स्टॉल असणार आहेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुगरणीचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ८० स्टॉलचे भव्य असे फूड कोर्ट असणार आहे.

मुंबईकरांच्या विशेष पसंतीच्या असलेल्या या भव्य प्रदर्शनातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन शहरी नागरिकांना होणार आहे. हे प्रदर्शन प्रशस्त मोकळ्या पटांगणात असून वातानुकूलित असल्याने मुंबईठाणेनवी मुंबई आणि पनवेल शहरातील नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता येणार आहे. तो घेण्यासाठी मुंबईठाणे आणि जवळच्या सर्व महानगरातील नागरिकांनी अवश्य भेट देण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.  

प्रदर्शन   दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान

सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला दि. ११ ते २३ फेब्रुवारी,  या कालावधीत भेट देता येणार आहे.

या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तूहातमागावर तयार केलेले कपडेवुडन क्राफ्टबंजारा आर्टवारली आर्ट च्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरीलहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल असणार आहे. या ठिकाणी  प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे  यांच्या नेतृत्वात  ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिवएकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे  भव्य आयोजन करण्यात येत  आहे.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

उमेद  हे राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिकसामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अभियानामार्फत या महिलांना अनेक प्रकारची कौशल्ये व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे दिली जातात. आज अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत.  त्यांनी तयार केलेली ही विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दरवषी महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन आयोजित केले जाते. आतापर्यंत मुंबईनवी मुंबईनागपूर या ठिकाणी महालक्ष्मी सरस चे आयोजन करण्यात आले असून नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे.

****

या वर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव

 या वर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई दि. 10 : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जगप्रसिद्ध आहे. त्याचे महत्त्व आणि व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी यावर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्याची घोषणा पर्यटनखनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

 मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीस माजी आमदार संजय रायमुलकरपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन विभागाचे संचालक  डॉ.बी. एन. पाटील‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशीबुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जगात उल्कापातामुळे तयार झालेली तीन सरोवरे आहेत त्यापैकी एक बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये आहे. त्याचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी राज्याच्या पर्यटन विभागातर्फे यावर्षी पासून लोणार पर्यटन महोत्सव घेणार असल्याचे श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधी व संबंधितांची लवकरच बैठक घेऊन महोत्सवाची तारीख व वेळ घोषित करण्याचे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi