Wednesday, 5 February 2025

राज्यपालांच्या हस्ते 64व्या कला प्रदर्शनाचे उदघाटन; लक्ष्मण श्रेष्ठ यांना वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार प्रदान

 राज्यपालांच्या हस्ते 64व्या कला प्रदर्शनाचे उदघाटन;

 लक्ष्मण श्रेष्ठ यांना वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार प्रदान

 

मुंबईदि.  : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उदघाटन (कलाकार विभाग २०२४ - २५) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. ४ ) जहांगीर कलादालन येथे संपन्न झाले.

यावेळी ज्येष्ठ अमूर्त चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना राज्यपालांच्या हस्ते वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.  पाच लाख रुपयेशालश्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे रूप आहे. शकुंतला कुलकर्णी यांना ज्येष्ठ कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कला हा इतर प्रत्येक विषयाला समृद्ध करणारा विषय आहे. कला विषयामुळे जाणिवा विस्तारतातत्यामुळे वैद्यकीय शिक्षणअभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजेअसे राज्यपालांनी सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार अशा प्रकारे कला विषय निवडण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याला चित्रकलास्थापत्यकला व वास्तू निर्माण कलेचा मोठा वारसा लाभला आहे. शिवकालीन गडकिल्लेभित्तिचित्रे व शिल्पकलेचा देखील वारसा राज्याला लाभला आहे. अशा कला संपन्न राज्यात कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिक प्रदर्शने आयोजित केली जावी तसेच कलाकारांना दिली जाणारी बक्षीस राशी वाढवली जावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात देशविदेशातून पर्यटक येतात. अशावेळी शहरामध्ये एकाच वेळी अनेक कलाकारांना व्यासपीठ देणारे  भव्य बहुमजली कला केंद्र असावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. मुंबईत कला प्रदर्शनासाठी दालनांची संख्या सध्या कमी आहे. ही उणीव दूर करण्यासाठी  भव्य व प्रशस्त कला प्रदर्शन कला केंद्र असावे, असेही त्यांनी सांगितले. 

प्रदर्शनासाठी राज्यभरातील कलाकारांकडून ७७५ कलाकृती प्राप्त झाल्या होत्यात्यापैकी १४८ कलाकारांच्या १८० कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली, अशी माहिती कला संचालक डॉ संतोष क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात दिली.  

शकुंतला कुलकर्णी यांच्यावतीने त्यांच्या भगिनी चित्रा पालेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते रेखा व रंगकलाशिल्पकलाउपयोजित कलामुद्राचित्रण विभाग व दिव्यांग विभाग या प्रवर्गातून १५ कलाकारांना पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डीसर ज जी कला अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा राजनीश कामतप्रदर्शन अधिकारी संदीप डोंगरे व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच कला प्रदर्शन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.      

0000

अल्पसंख्याक समाजाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योजना, उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करा

 अल्पसंख्याक समाजाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योजना,

 उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करा

- अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

 

मुंबई, दि. 5 :- राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायासाठी काटेकोर नियोजन कराअसे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागाचे सचिव रुचेश जयवंशीराज्यातील जिल्हाधिकारीजिल्हा नियोजन अधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपसचिव मिलिंद शेणॉयश्रीमती विशाखा आढाव उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले कीअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावीलोकाभिमुख उपक्रम राबवावेत. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही. अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजनामौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करणेस्वयंसहायता बचतगट योजनाशाळा आधुनिकीकरण अशा महत्वपूर्ण योजना आहेत. अशा सर्व लोकाभिमुख योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाअशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येणार; बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी सुविधा केंद्रावरच

 बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने 

कोठूनही करता येणार;

बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी सुविधा केंद्रावरच

- कामगार मंत्री आकाश फुंडकर

 

मुंबईदि. 5 : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येते. तथापित्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीफोटो आणि बायोमेट्रीक प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या सोईच्या तारखेलाजिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावरच जाऊन करावे. यासाठी  राज्यात 366 तालुका सुविधा केंद्रे निर्माण करण्यात आली आहे. ही सुविधा राज्यातील सर्व बांधकाम कामगारांसाठी 5 फेब्रुवारी 2025 पासून सुरू करण्यात आली असल्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

बांधकाम कामगारांच्या नोंदणीनूतनीकरण आणि लाभ वाटपाकरिता एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली (IWBMS) ही ऑनलाईन प्रणाली आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्राद्वारे यापूर्वी हे काम होत होते.  केंद्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे राज्य शासनाने आता 366 तालुका सुविधा केंद्रे निर्माण केली असून प्रत्येक तालुका सुविधा केंद्रावर प्रति दिन 150 अर्ज हाताळण्यात येतीलअसे  कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

राज्यात 8 नोव्हेंबर2024 पासून सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असूनआजअखेर एकूण 5 लाख 12 हजार 581 अर्ज ऑनलाईन पद्धतीने हाताळण्यात आले आहेत. सध्या अर्ज तालुका सुविधा केंद्रावरून भरले जात आहेतयामध्ये कामगारांची काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास वेळ व रोजगाराचे नुकसान होत असल्याच्या बाबी निदर्शनास येत आहेत. कामगारांच्या वेळेचे व रोजंदारीचे नुकसान न होता निश्चित वेळेत त्यांचे अर्ज भरले जाणे आवश्यक असून विविध लोकप्रतिनिधीकामगार संघटना यांच्या विनंतीनुसार यामध्ये अधिकची सुलभतासुसुत्रता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सुधारीत सूचना देण्यात आल्या असल्याचेही श्री.फुंडकर यांनी सांगितले.

कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले कीलाभ वाटप अर्जाकरिता जिल्हा सुविधा केंद्राची उशिराची तारीख मिळाली असल्यास ती तारीख रद्द करून त्या कामगारांना तालुका स्तरावर नजिकची तारीख उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर जिल्हा मुख्यालय असलेल्या तालुक्याकरिता अतिरिक्त तालुका इमारत कामगार सुविधा केंद्र म्हणून कार्यान्वित करण्यात येईल. जिल्हा सुविधा केंद्रमधील पाच पैकी तीन कर्मचारी हे एंट्री ऑपरेटर म्हणून काम करतील. तर उर्वरीत दोन डाटा एंट्री ऑपरेटर बांधकाम कामगारांना त्याच्या तपशिल बदलाचे काम करतील. बांधकाम कामगारांचे सर्व प्रलंबित अर्ज दिनांक 31 मार्च2025 पूर्वी निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्याने या सर्व कामाकरिता मंडळस्तरावर समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहितीही कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी दिली आहे.

देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीची भूमिका महत्त्वाची

 देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीची भूमिका महत्त्वाची

- सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार

 

मुंबईदि. 5 : देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अल्प सैनिकांसह प्रकाशाच्या वेगाने चपळता दाखवून मराठा लाईट इन्फंट्रीने अतुलनीय पराक्रम गाजवला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर केलात्या प्रित्यर्थ मराठा लाईट इन्फंट्री 4 फेब्रुवारी हा दिवस "मराठा दिन" म्हणून साजरा करत आहे. ही सर्व महाराष्ट्रवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी काढले.

मराठा लाईट इन्फंट्रीला 256 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच मराठा दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच बेळगाव येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी खासदार आण्णासाहेब जोल्लेनिपाणीच्या आमदार श्रीमती जोल्लेब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जीटपाल विभागाच्या संचालक व्ही. तारासांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाने प्रथमच यावर्षी बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीच्या "मराठा दिन" या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

मराठा लाईट इन्फंट्री ही देशाचा आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची जपणूक करूनदेशात व देशाबाहेर मोठा पराक्रम गाजवत असल्याचा अभिमान असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. 4 फेब्रुवारी 1670 रोजी नरवीर तानाजी मालुसरे यांनी असीम पराक्रम करून कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला होता. या घटनेचे स्मरण म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम उलगडवून दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले.

क्रीडा विभागाची एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करा

 क्रीडा विभागाची एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करा

- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

-विभागाचे सक्षमीकरणगतिमान कामकाजासाठी एकात्मिक संगणक प्रणाली

 

मुंबई, दि. ५ :- क्रीडा विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच क्रीडा विकासाच्या बाबींचे सुनियोजित व्यवस्थापन करण्यासाठी  एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. विभागाचे कामकाज अधिक गतीने होण्यासाठी ही प्रणाली विकसित करावीअसे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

ई गव्हर्नन्स अंतर्गत क्रीडा संचालनालय स्तरावर एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्यासंदर्भात आज मंत्रालयात क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकरसहसंचालक सुधीर मोरेउपसंचालक सुधीर पाटीलवरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले कीयोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेक्रीडा विकासाच्या बाबींचे सुनियोजितरित्या व्यवस्थापन करण्यासाठी सुसज्य एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. अशी प्रणाली विकसित झाल्यावर खेळाडूंना योजनांचा लाभ वेळेत मिळेल. स्पर्धा व खेळाडूंच्या कामगिरीचा तपशिल एकत्रित प्रणाली अंतर्गत जतन करता येईल. विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत ई गव्हर्नन्स - प्रशासकीय व्यवस्थापनासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करावीअसे मंत्री श्री. भरणे यांनी स्पष्ट केले.

मंत्री श्री. भरणे म्हणाले कीक्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत क्रीडा विकास व युवा हितावह विविध योजना राबविण्यात येत आहेत. पायाभूत क्रीडा सुविधा निर्माण करणेयशस्वी व प्रतिभावान खेळाडू घडविणेअत्याधुनिक प्रशिक्षणाकरीता आर्थिक सहाय्य करणेखेळाडूंना प्रोत्साहन सवलती व गौरवशालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजनवयोवृद्ध खेळाडूंना मानधनव्यायामशाळा व क्रीडांगण विकास योजना अंतर्गत अनुदानखेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षणजिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत दैनंदिन क्रीडा प्रशिक्षणक्रीडा गुण सवलतखेळाडूंना शिष्यवृत्ती तसेच युवा महोत्सवयुवा कल्याण उपक्रमांना सहाय्य इ. योजनांचा समावेश आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

0000

धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करा; कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी

 धुळेनंदूरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करा;

कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी

- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई, दि. ५ : धुळेनंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणजिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण कराव्यात. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावीअसे निर्देश  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी (दि.५ फेब्रुवारी)  मंत्रालयात धुळे नंदुरबार पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाजलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन व विभागाचे मुख्य अभियंतासह सचिव बी.जी.पवारमुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे धुळे व नंदुरबारचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले१०० दिवस कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छ भारत अभियानाच्या सर्व योजना पूर्ण कराव्यात. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करावीकामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी नियमित भेटी द्याव्यात. वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश दिले.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची कामे 'मिशन मोडवर करावी

उन्हाळ्याचे दिवस लवकरच सुरू होणार आहे.  उन्हाळ्यात ग्रामीण भागात प्रत्येकाला पिण्याचे पाणी सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे. त्यात नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. यासाठी ग्रामीण भागात जल जीवन मिशनपाणी पुरवठा विभागांतर्गत सुरु असलेली पाणीपुरवठ्याची कामे 'मिशन मोडवर  दर्जेदार करावीतअसे निर्देश मंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी दिले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामकाजाचाही  यावेळी आढावा घेण्यात आला.

0000

MAITRI (Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell) पोर्टल उद्योग, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल आहे

 MAITRI (Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell) पोर्टल उद्योग, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल आहे. २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या MAITRI 1.0 पोर्टलचे आता 2.0 व्हर्जन आणण्यात आले असून maitri.maharashtra.gov.in यामध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा आणि तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे उद्योग विकास आयुक्त श्री. कुशवाह यांनी सादरीकरणावेळी सांगितले.

पोर्टलची वैशिष्ट्ये

पोर्टलमुळे महाराष्ट्रातील उद्योग सुलभीकरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग वाढणार. उद्योजकव्यापारी आणि गुंतवणूकदार यांना अधिक सोपी व जलद सेवा मिळणार आहे.

            एकच अर्ज प्रणाली – उद्योगांना विकसनाच्या विविध टप्प्यावर परवानेना- हरकत इ. ची आवश्यकता असते. मैत्री पोर्टल मार्फत विविध परवानेना- हरकत इ. उपलब्ध असल्याने उद्योगांना शासकीय विभागांकडे स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

रिअल-टाईम ट्रॅकिंग आणि डॅशबोर्ड – गुंतवणूकदारांना त्यांच्या अर्जाची सद्य:स्थिती पाहता येणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित चॅटबॉट आणि ऑनलाईन सहाय्य केंद्र – गुंतवणुकदार व उद्योजकांना विविध योजनापरवानेसबसिडी इ. बाबतची विविध माहिती तत्परतेने उपलब्ध होणेसाठी मैत्री पोर्टलवर उद्योग मित्र चॅटबॉट सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

इन्सेंटिव्ह कॅल्क्युलेटर – सरकारी योजनांतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहनपर लाभांचे अंदाजपत्रक समजणार

डिजिटल डॉक्युमेंट डिपॉझिटरी (DigiLocker) – उद्योग संबंधित आवश्यक कागदपत्रांची सुरक्षित साठवणूक आणि सहज उपलब्धता.

राष्ट्रीय सिंगल विंडो सिस्टम (NSWS) सोबत दोन-मार्गी समाकलन – एकाच पोर्टलवरून सर्व अर्ज आणि मंजुरी प्रक्रियांचे संकलन.

विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी

पोर्टलमध्ये १५ विविध विभागांच्या ११९ सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. त्यामधील १०० सेवा संपूर्णपणे एकत्रित करण्यात आल्या आहेत . यामध्ये कामगार विभागऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयबॉयलर्सनगर विकास आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यासारख्या महत्त्वाच्या विभागांच्या सेवांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्राला अत्याधुनिक ऑनलाईन सुविधांचा लाभ मिळणार आहे.

तसेच अतिरिक्त नवीन सेवा समाविष्ट केल्या जातील आणि सेवा संख्येतील वाढ २०० पर्यंत करण्यात येणार आहेअसे आयुक्त कुशवाह यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी

https://x.com/maitri_ifc

https://in.linkedin.com/company/maharashtra-industry-trade-and-investment-facilitation-cell?trk=public_post_follow-view-profile

https://www.facebook.com/ifcMAITRI/

https://www.instagram.com/maitri_ifc/

०००


Featured post

Lakshvedhi