Monday, 3 February 2025

पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्वपूर्ण सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून गडचिरोली जिल्हा होणार मलेरिया मुक्त आदिवासी समाजातील निसर्गपूरक उपचाराला आधुनिकतेची जोड मिळावी

 क्र.454

परिषदेतील विचारमंथनाला अनुसरून आदिवासींच्या आरोग्यासाठी

सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एम्स येथील आदिवासींच्या आरोग्यावर जागतिक परिषदेचा समारोप

पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्वपूर्ण

सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून गडचिरोली जिल्हा होणार मलेरिया मुक्त

आदिवासी समाजातील निसर्गपूरक उपचाराला आधुनिकतेची जोड मिळावी

 

नागपूरदि. 2 :- एम्स  येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे. याबाबत आता पुढचे पाऊल म्हणून परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्नत्याची असलेली उत्तरेतज्ञांच्या सूचना याला अधोरेखित करून आरोग्य विद्यापीठएम्सच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक असे आरोग्यधोरण केले जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थाननागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एम्स’ नागपूर येथे आयोजित आदिवासी आरोग्य परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी,  परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरीविद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभकुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ उपस्थित होते.

या  आरोग्य धोरणात आदिवासींच्या आरोग्य विषयक मुलभूत प्रश्नांवर निश्चित उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी कुलगुरूंना केल्या. हे धोरण केवळ महाराष्ट्रीय स्तरापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याला महाराष्ट्र शासनातर्फे सर्वातोपरी सहकार्य केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

हजारो वर्षांपासून आदिवासी समाज आपल्या उपजत ज्ञानावर स्वतःचे अस्तित्व टिकून आहे. काळाच्या प्रवाहात अनेक स्थित्यंतरे झाली मात्र आदिवासी संस्कृती टिकून राहिली. यातील मूल्यविविध भागातील पारंपारिक आदिवासी उपचार आणि आधुनिक वैद्यकाचा एकत्रित विचार करुन त्याचे उपयोजन केल्यास आदिवासींच्या आरोग्यविषयक मुलभुत सुविधांवर उत्तरे प्राप्त होऊ शकतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आजही आदिवासी क्षेत्रात कुपोषणसिकलसेल आणि मलेरिया यासारखे मुलभूत प्रश्न आहेत. यावर राज्यशासन व केंद्रशासनातर्फे अनेक विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अनेक योजनांना यशदेखील प्राप्त होत आहे. सिकलसेल आजार निर्मूलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू यात असे आवाहन त्यांनी केले.

या परिषदेसाठी निवडलेले स्थळ व ठिकाण याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. आदिवासी गोंड राजा बख्त बुलंद शाह हे या शहराचे संस्थापक होते. इथे आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत असे त्यांनी सांगितले.

बिलगेट्स फाउंडेशनसनफार्माआयसीएमआरए यांच्या सहयोगातून आदिवासी गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करू असे त्यांनी सांगितले. आदिवासींच्या आरोग्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी  MUHS FIST-25  परिषद महत्वपूर्ण आहे. या परिषदेच्या माध्यमातून एकत्रित झालेला डेटा धोरण निश्चितीसाठी महत्वपूर्ण आहे विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले.

एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले कीआरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि एम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासींच्या आरोग्य समस्यांसाठी सुरु करण्यात आलेली परिषद नक्कीच जागतिक स्तरावर नावलौकिक करणार आहे. एम्स’ तर्फे विविध योजना कार्यान्वीत करण्यात आल्या आहे त्याचा सकारात्मक परिणाम मुर्त रुपात दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आदिवासी भागातील लोकांच्या आरोग्य समस्यांसाठी  MUHS FIST-25    च्या यासाठी आरोग्य विद्यापीठाने व एम्स’ ने केलेल सहकार्य महत्वपूर्ण आहे.  आदिवासींच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी आदर्श निर्माण झाला आहे. जेणेकरुन सामाजिक काम करण्याची नवीन टीम तयार होईल असे परिषदेचे आयोजक सचिव डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम्स परिसरात उभारण्यात आलेल्या ट्रायबल व्हिलेज येथे भेट देवून पाहणी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दर्शन दक्षिणदास यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार MUHS FIST-25   चे संयोजन समितीचे सदस्य संदीप राठोड यांनी केले.

00000

नागपुरातील छोट्या मैदानाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 150 कोटी देणार

 नागपुरातील छोट्या मैदानाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 150 कोटी देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

 

नागपूरदि.2 : खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून नागपूर शहराची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल गतीने सुरू आहे. शहरात 700 कोटींच्या खर्चातून मानकापूर क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा येत्या दोन वर्षात उपलब्ध होणार आहेत. स्थानिक खेळाडुंना सरावासाठी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छोट्या मैदानांचा विकास करण्यात येईल व यासाठी  महाराष्ट्र शासनाच्यावतीने 150 कोटींचा निधी देण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

येथील यशवंत स्टेडियमवर आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचे मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीआमदार प्रवीण दटकेमाजी खासदार डॉ. विकास महात्मेमहोत्सवाचे संयोजक संदीप जोशीअर्जुन पुरस्कार प्राप्त दिव्यांग खेळाडू शितल देवीक्रिकेटपटू मोहित शर्मा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूर व विदर्भातील खेळाडुंना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. 58 क्रीडा प्रकारात विजेत्यांना 12हजारांवर पदक प्रदान करण्यात आली आहे. ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा महोत्सवातून विदर्भातील गुणवान कलाकार व खेळाडू पुढे येत आहेत. यातून विदर्भ व नागपूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणारे कलाकार व खेळाडू घडतील. शहरात ऑलिम्पीकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने 700 कोटींच्या निधीतून मानकापूर विभागीय क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाचे कार्य सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणालेगत सात वर्षांपासून खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून खेळाडुंना संधी उपलब्ध करून देणेत्यांचा व्यक्तीमत्व विकास साधणे व नैतृत्वही घडवणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील क्रीडा मैदानाच्या विकासासाठी यापूर्वी 100 कोटींचा निधी दिला आहे. अजुनही छोट्या मैदानांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध व्हावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते खेळाडूप्रशिक्षक आदींना उल्लेखनीय कामगिरीसाठी क्रीडा महर्षीक्रीडा प्रशिक्षकक्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शितल देवी आणि मोहित शर्मा यांनीही यावेळी उपस्थितींना मार्गदर्शन केले. खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले.

खासदार क्रीडा महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे. 12 जानेवारी 2025 पासून यावर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. 21 दिवस चाललेल्या महोत्सवात 58 क्रीडा प्रकारात 77 हजार 663 स्पर्धक सहभागी झाले. नागपुरातील 69 मैदानावर स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण दीड कोटींची बक्षीस तर 12 हजार 317 पदक प्रदान करण्यात आले.

०००००

एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी*

 अप्रतिम लिहिलंय  *सुधीर मोघेंनी...*


*एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी*...."☺️


आयुष्य म्हटलं कि कष्ट आले, त्रास आला ,

मनस्ताप आला ,भोग आले आणि जीव जाई पर्यंत काम आलं...मग ते घरचं असो नाहीतर दारचं....

*बायकांना तर म्हातारपणा पर्यंत कष्ट करावे लागतात...*

75 वर्षाच्या म्हातारीने पण *भाजी तरी चिरुन द्यावी* अशी घरातल्यांची अपेक्षा असते....

हि सत्य परिस्थिती आहे.....

*आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत* हे रहाणारच......

त्यामुळे *हि जी चार भांडीकुंडी आपण आज निटनिटकी करतो*...ती मरेपर्यंत करावी लागणार...

ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच *आपल्या सत्तरीतही* करावा लागणार....

" *मी म्हातारी झाल्यावर ,माझी मुलं खुप शिकल्यावर त्याच्या कडे खुप पैसे येतील मग माझे कष्ट कमी होतील" *हि *खोटी स्वप्न आहेत*😌....

मुलं , मुली कितीही श्रीमंत झाले तरी ..

" *आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तु बनव*.."

असं म्हटलं कि *झालं*...

*पुन्हा सगळं चक्र चालु*..


आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या

अभिमन्यी....,❓🤔


पण..पण ..जर हे असंच रहाणार असेल..

*जर परिस्थिती बदलु शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का* ??

तर नाही.....

*परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं.*....


मी हे स्विकारलय.... *खुप अंतरंगातुन* आणि आनंदाने....


*माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते*🌝..... खुप उर्जा आणि उर्मी नी भरलेली.....🧘‍♀️.


*सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं* तरी मी तेवढ्याच उर्जेनी बोलु शकते *आणि रात्री दहा वाजता* ही...👍

आदल्या दिवशी *कितीही कष्ट झालेले असु देत*....दुसरा दिवस हा *नवाच* असतो....


*काहीच नाही लागत* हो...

हे सगळं करायला🙏.....

*रोज नवा जन्म मिळाल्या सारखं उठा*...

छान आपल्या *छोट्याश्या टेरेस वर डोकावुन थंड हवा* घ्या🏡..आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा...🪴🌳.

*आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या*👩‍❤️‍👩..

इतकं भारी वाटतं ना....

अहाहा....🤗.

सकाळी उठल की ब्रश करायच्या आधीच रेडिओ📸 लागतो माझा...

*अभंग एकत एकत मस्त डोळे बंद करून* ब्रश केला....ग्लास भरुन पाणी पिलं आणि मस्त...आल्याचा चहा पित.... *खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना* 

*कि भारी वाटतंं*👌👍.....


*रोज मस्त तयार व्हा*....

आलटुन पालटुन स्वतःवर *वेगवेगळे प्रयोग करत* रहा😊....

कधी हे कानातले ..कधी ते गळ्यातले.....

कधी ड्रेस...*कधी साडी*....

कधी केस मोकळे...*कधी बांधलेले*....

*कधी हि* टिकली तर कधी ती....

*सगळं ट्राय करत रहा....नवं नवं नवं नवं*...

रोज नवं.....

*रोज आपण स्वतःला नविन दिसलो पाहिजे*....


स्वतःला बदललं कि.... आजुबाजुला *आपोआपच सकारात्मक उर्जा पसरत जाईल*........तुमच्याही नकळत......

आणि *तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याश्या* वाटु लागाल......


मी *तर याच्याही पार पुढची पायरी* गाठलेली आहे....

*माझ्या बद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं कि माझे कान आपोआप बंद होतात*....😃काय माहित काय झालंय त्या कानांना....😃


*आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी* असते....

मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते.....


*जे जसं आहे....ते तसं स्विकारते आणि पुढे चालत रहाते*...

कुणी आलाच समोर कि.." *आलास का बाबा*..बरं झालं ..म्हणायचं... *पुढे चालायचं*....

अजगरा सारखी...*सगळी परिस्थिती* गिळंकृत करायची....😃


*माहीत आहे मला*...

*सोपं नाहीये*....


*पण मी तर स्विकारले आहे*...

*आणि एकदम खुश आहे*....

आणि म्हणुनच रोज म्हणते....


" *एकाच या जन्मी जणु*...

*फिरुनी नवी जन्मेन मी*...

*हरवेन मी हरपेन मी*..

*तरीही मला लाभेन मी*....."🙏

बारा ज्योतर्लिंगां


 

अलिबाग श्रीबाग नं २ महिला आयोजित हळदीकुंकू समारंभ २०२५

 श्रीबाग नं २ महिला आयोजित हळदीकुंकू समारंभ  २०२५


मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

 मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षिततापारदर्शकतेमध्ये होणार वाढ

 

            मुंबईदि. 2 : मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यात मदत होणार आहे. शासकीय अधिकारीकर्मचारीलोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावीजेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईलअसे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. अनधिकृत प्रवेशाला चाप बसणार आहे. अनुचित प्रवेश रोखले जाणार असून त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे अनधिकृत प्रवृत्तींनाही चाप बसणार आहे. यामुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण येऊन शासकीय कामकाजात अधिक सुलभता आणि पारदर्शकता येऊ शकेल. या तंत्रज्ञानामुळे योग्य व्यक्तींना अधिकृतपणे प्रवेश मिळणार असून त्यामुळे लोकांची कामे जलद गतीने होण्यात मदत मिळणार आहे.

अधिकारीकर्मचारीलोकप्रतिनिधी यांच्या प्रवेशासाठी विविध सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामध्ये अडचणी येणार नाहीत. तथापियासाठी सर्व संबंधितांनी फेस डिटेक्शनसंदर्भातील नोंदणी करणे आवश्यक राहील. सर्वांनी यासाठीची नोंदणी आणि फेस डिटेक्शन त्वरित करून घ्यावे.

            अधिकारीकर्मचाऱ्यांच्या  फेस रीडिंग संदर्भातील आवश्यक डेटा हा तातडीने अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून फेस रीडिंग प्रणाली अपडेट होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश सुलभ होईल.

मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मंत्रालयातील अधिकारीकर्मचारी यांचे फेशियल रिकॉग्नीनेशन   आणि आरएफआयडी कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त मंत्रालयातील 10 हजार 500 अधिकारी/कर्मचारी यांचा तपशिल सदर प्रणालीमध्ये सादर करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने कार्यान्वयन कंपनीमार्फत सर्व प्रवेशद्वार येथे फेशियल रिकॉग्नीनेशन यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली आहे.  ही यंत्रणा गो लाईव्ह'  करण्यात आली आहे.  जानेवारी 2025 पासुन मंत्रालयातील अधिकारीकर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना फेशियल रिकॉग्नीनेशन व आरएफआयडी कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहे.

            मंत्रालय ही अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचे असल्याने सदर आस्थापनेची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याअनुषंगाने मंत्रालय अंतर्गत सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आला आहे. सुरक्षा प्रकल्प हा  एक आणि दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.  मंत्रालय परिसर एकात्मिक सुरक्षा आणि देखरेख अंतर्गत टप्पा 2 हा प्रकल्प हा टप्पा एक या प्रकल्पाचा नैसर्गिक विस्तार म्हणून टप्पा 2 प्रकल्प राबविण्यात येत आहे.

            मंत्रालय सुरक्षा प्रकल्प टप्पा दोनमधील कामांचे कार्यान्वयन व वार्षिक देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच अभ्यांगताना तसेच क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारीकर्मचारी यांना डिजी प्रवेश या ॲप आधारीत ऑनलाईन प्रणाली मार्फत मंत्रालय प्रवेश सुनिश्चीत करण्यात येणार आहे.

0000

   

Sunday, 2 February 2025

कर्नाटक परिवहनच्या प्रतिष्ठित सेवेचे प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य



कर्नाटक परिवहनच्या प्रतिष्ठित सेवेचे प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य

-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. 2: कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची "प्रतिष्ठित सेवा " अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य आहे,  असे कौतुकोद्गार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले. ते कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या भेटी दरम्यान बोलत होते.

मंत्री  प्रताप सरनाईक यांनी बंगळुरू येथे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री डॉ.रामलिंगा रेड्डी यांच्यासह राज्याचे परिवहन सचिव डॉ.एन.व्ही. प्रसाद व कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष.रिझवान नवाब तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरनितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र ) हे अधिकारी उपस्थित होते. 

या वेळी मंत्री श्री. सरनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंबारीऐरावतराजहंस यासारख्या प्रीमियम सेवेच्या बसेस बरोबर इतर बसेस ची पहाणी केली.  तसेच या बसेस कशा पद्धतीने चालवल्या जातात याची माहिती घेतली. "आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बस सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. खाजगी बसेसच्या तुलनेमध्ये सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी या बस सेवा अतिशय प्रसिद्ध आहे.

      या वेळी कर्नाटक परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्यात सध्या चालवल्या जात असलेल्या सर्व प्रकारच्या बसेस मंत्री श्री.  सरनाईक यांना दाखविल्या. त्यामध्ये 9 मीटर पासून 15 मीटर पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. अगदी डोंगरी भागापासून हम रस्त्यावर धावतील अशा वेगवेगळ्या इंजिन आणि आसन क्षमतेच्याविविध सोयी -सुविधा असलेल्या बसेस कशाप्रकारे गरजेनुसार प्रवाशांसाठी उपलब्ध केले जातातयाची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. तसेच लांब पल्ल्याची सेवा देणाऱ्या बसेस मध्ये "वायफाय " पासून "युरिनल" पर्यंत सोयीसुविधा प्रवाशांसाठी कशा प्राप्त करून दिले जातात. तसेच ई-तिकीट आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग ची सेवा देखील प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहेहे देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्री श्री. सरनाईक यांना सांगितले.       

     दरम्यान परिवहन सेवेच्या सादरीकरणात माहिती देतानासंपूर्ण राज्याचे व्यवस्थापन वेगवेगळ्या चार प्रादेशिक विभागांमध्ये विभागण्यात आले असून त्यासाठी प्रत्येक विभागाला आय.ए.एस दर्जाचे एक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. तसेच राज्यस्तरावर या सर्वांचे संचालन करण्यासाठी वरिष्ठ आय.ए.एस. दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत .त्यामुळे एकूण राज्याच्या परिवहन सेवेमध्ये सुसूत्रता आणणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा प्राप्त करून देणे यासाठी प्रशासकीय रचनेमध्ये केलेले सकारात्मक बदल महत्वाची भूमिका बजावतात यांची माहिती देखील मंत्री श्री. सरनाईक यांना देण्यात आली.

     मंत्री श्री. सरनाईक म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेतत्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा.  जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून कर्नाटक राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या ऐरावतअंबारीराजहंस यासारख्या प्रतिष्ठित लांब पल्ल्याच्या सेवेची माहिती करून घेणेतसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणेत्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती. यावेळी बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात कर्नाटक परिवहन सेवेचे सादरीकरण करण्यात आले.

0000

Featured post

Lakshvedhi