Monday, 3 February 2025

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला; वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

 मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला;

वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

 

मुंबईदि. ३ : मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव दि.५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयदादर (पू.) येथे संपन्न होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथोत्सवाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १ या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर "लेखक तुमच्या भेटीला" आणि "एका संगीतकाराची मुशाफिरी" या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दि. ६ फेब्रुवारी रोजी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शनव्याख्याने आणि परिसंवाद होणार आहेत. तसेच "शब्दव्रती" या कार्यक्रमात निवडक मराठी कवयित्रींच्या कविता सादर केल्या जातील. याशिवायग्रंथालयातील महत्त्वपूर्ण घटकांचा प्रातिनिधिक गौरव करून ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.

मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आणि परिसंवाद होणार आहेत. दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा मुंबईकर नागरिकग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारीमुंबई शहर शशिकांत काकड यांनी केले आहे.

0000

राज्यस्तरीय बाल महोत्सवात साहित्य‍िक बालकांना व्यासपीठ उपलब्ध करावे

 

राज्यस्तरीय बाल महोत्सवात साहित्य‍िक बालकांना व्यासपीठ उपलब्ध करावे

बालगृह व निरीक्षण गृहातील प्रवेशितांसाठी दरवर्षी राज्यस्तरीय बालमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाअंतर्गत जी बालके कथाकविता लिहितातज्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे अशा साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेल्या बालकांसाठी विशेष व्यासपीठ या बालमहोत्सवात उपलब्ध करून देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी विभागातील विविध योजना आणि कामांचा तसेच १०० दिवस कृती आराखड्यासंदर्भात आढावा घेतला.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गरोदर महिलास्तनदा माताबालके यांना घरपोच आहारलाभार्थी बालकांचे ग्रोथ मॉनिटरींगलाभार्थ्यांना गृहभेटीद्वारे मार्गदर्शनपोषण विषयक जनजागृतीकरिता समुदाय आधारित कार्यक्रमग्राम बाल विकास केंद्रनागरी बाल विकास केंद्रअंगणवाडी केंद्रांना शौचालयपिण्याच्या पाण्याची सोयजीवन ज्योती विमा योजनाप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाभिक्षेकरींच्या कामाचा मोबदलापिंक रिक्षालाडकी बहीण योजनाफिरते पथक यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला

ग्राम बाल विकास केंद्र, नागरी बाल विकास केंद्र, अंगणवाडी केंद्रांना शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, भिक्षेकरींच्या कामाचा मोबदला.

 ग्राम बाल विकास केंद्र, नागरी बाल विकास केंद्र, अंगणवाडी केंद्रांना शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, भिक्षेकरींच्या कामाचा मोबदला

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी विभागातील विविध योजना आणि कामांचा तसेच १०० दिवस कृती आराखड्यासंदर्भात आढावा घेतला.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गरोदर महिलास्तनदा माताबालके यांना घरपोच आहारलाभार्थी बालकांचे ग्रोथ मॉनिटरींगलाभार्थ्यांना गृहभेटीद्वारे मार्गदर्शनपोषण विषयक जनजागृतीकरिता समुदाय आधारित कार्यक्रमग्राम बाल विकास केंद्रनागरी बाल विकास केंद्रअंगणवाडी केंद्रांना शौचालयपिण्याच्या पाण्याची सोयजीवन ज्योती विमा योजनाप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाभिक्षेकरींच्या कामाचा मोबदलापिंक रिक्षालाडकी बहीण योजनाफिरते पथक यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला.

महिलांसाठी तालुकास्तरावर,रोहा येथील गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीचेश्रीवर्धन येथे सोलार फिश ड्राईंग प्रोजेक्टअस्मिता भवन उभारावे

 महिलांसाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारावे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर भर

 

मुंबई दि. ३ : महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी  तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. बाजारपेठ असलेल्या तालुकास्तरावर हे भवन उभारण्यात येणार असूनयामध्ये माविमच्या जास्तीत जास्त महिला बचतगटांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्रालय येथील दालनात रोहा येथे गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करणेतालुकास्तरावर अस्मिता भवन उभारणेमहिला आर्थिक विकास महामंडळाचे कामकाजराज्य बालहक्क संरक्षण आयोग तसेच १०० दिवस कृती आराखड्याबाबत बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादवआयुक्त कैलास पगारे, ‘माविमच्या कार्यकारी संचालक वर्षा लटाराज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहाविभागाचे सहसचिव वि. रा. ठाकूरअवर सचिव सुनिल सरदारउपसचिव आनंद भोंडवे आदिंसह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या कीश्रीवर्धन येथे सोलार फिश ड्राईंग प्रोजेक्ट अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत बाजारभिमुख उद्योग विकास घटकांतर्गत शेतीशेतीसंलग्न व बिगर शेती आधारित उद्योगांना व नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

याचबरोबर रोहा येथील गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीचे युनिट शहरासह ग्रामीण भागातही सुरू करण्यात यावे. प्रकल्पासाठी पात्र महिलांना योग्य प्रशिक्षण आणि मानधन मिळण्यासाठी पारदर्शक कार्यप्रणाली राबवावी. या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमत्त माविम’ अंतर्गत असलेल्या जास्तीत जास्त बचतगटांना व्यासपीठ उपलब्ध व्हावेतसेच माविमचे कार्य ग्रामीण भागातही पोहोचावे यासाठी राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्याचे निर्देश मंत्री कू. तटकरे यांनी दिले.

बालकांच्या हक्क आणि संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामधील रिक्त पदे कायम स्वरुपासह बाह्यस्त्रोत व कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आल्याची माहिती सचिव अनुपकुमार यादव यांनी दिली.

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन

 कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

·         कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी

·         राज्यात कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्याबाबत आढावा बैठक

 

मुंबईदि. 03 :- शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआयचा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेकृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे)सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरअखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलास पाटीलनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे (व्यय) प्रधान सचिव सौरभ विजयकृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीकृषी आयुक्त सूरज मांढरेसाखर आयुक्त कुणाल खेमनारनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंगसहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटीलबारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. निलेश नलावडेप्रा. योगेश फाटकेप्रा. तुषार जाधवप्रा. शरद ताटे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेजगभरातील प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे क्रांतिकारी बदल घडत आहेत. कृषी क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. येत्या काळात बदलते हवामानअवेळी पडणारा पाऊसपीकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भावमजुरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषणमातीतील कार्बन प्रमाण शोधणेमातीच्या आरोग्याची सविस्तर माहितीतणाचा प्रकार ओळखणेपूर्वीच्या उत्पन्नाची तुलनामातीचे तापमानवातावरणातील आर्द्रतापिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव ओळखणेतसेच पिकांवरील जैविक-अजैविक ताण ओळखणे शक्य होणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पीकांच्या उत्पादनात वाढमजुरी खर्चात बचतरसायनिक खते व औषधांच्या वापरात कपातकापणी कार्यक्षमतेत वाढरोगनियंत्रणाद्वारे बचतपुरवठा साखळीतील कार्यक्षमतेत वाढ आणि एकूण खर्चात कपात होणे शक्य होईल. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक आणि आमूलाग्र बदल घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

0000

महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर (MRSAC) व मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन

 सामंजस्य करार-3

महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्रनागपूर (MRSAC) व मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र शासन

राज्यात मागील २०-२५ वर्षात विविध विभागांमार्फत विविध योजनांतर्गत मृद व जलसंधारणाची कामे झालेली असून मोठ्याप्रमाणावर संरचना (स्ट्रक्चर) निर्माण करण्यात आल्या आहेत. या सर्व संरचनांचे मॅपिंग व पडताळणी करण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात येत आहे.

सॅटेलाईट डेटा व विविध योजनांखालील उपलब्ध डेटाच्या आधारे संरचनांची भौगोलिक स्थाने नकाशावर चिन्हांकित केली जातील. यासाठी वेब पोर्टल व मोबाईल ऍप तयार केले जाईल. शिवार फेरीच्या आधारे या सर्व संरचनांची सद्यस्थिती समजून घेऊन त्याची नोंद ऍप द्वारे घेतली जाईल. त्यानुसार भविष्यात जलयुक्त-०.३ साठी देखभालदुरुस्ती आदी कामांचा नियोजन आराखडा बनविला जाईल. पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी सदर सामंजस्य करार करण्यात येत असून भविष्यात होणारी नवीन कामे तसेच देखभालदुरुस्तीची कामे याची नोंदही ठेवली जाईल.


भारतीय जैन संघटना व मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन

 सामंजस्य करार-2

भारतीय जैन संघटना व मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र शासन

गावांकडून / ग्रामपंचयतींकडून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मागणी जमा करणेती शासनापर्यंत पोहोचविणेयोजनेची प्रचार प्रसिद्धी व एकूणच पाण्याच्या विषयावर राज्यात जनजागृती करणे यासाठी सदर सामंजस्य करार करण्यात येत आहे. यासाठी भारतीय जैन संघटना राज्य व जिल्हा स्तरावर समन्वयकांची नियुक्ती करणार आह.

Featured post

Lakshvedhi