Monday, 3 February 2025

सामंजस्य करार-1 टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन व मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन

 सामंजस्य करारांचे तपशील

सामंजस्य करार-1

टाटा मोटर्सनाम फाउंडेशन व मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र शासन

राज्यातील जलाशयांमध्ये साठलेला गाळ काढून व त्यांचे खोलीकरण करून त्यांची साठवण क्षमता वाढविणेत्या योगे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणेपरिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने शासन गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबववित आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील २३ जिल्ह्यांमधील किमान १००० जलाशय जसे चेक डॅमसार्वजनिक तलावनद्या यांच्यातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सदर सामंजस्य करार करण्यात येत आहे.

नाम फाउंडेशन सदर सामंजस्य करारांतर्गत प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी संस्था असेल. टाटा मोटर्स या प्रकल्पाचे संपूर्ण व्यवस्थापन करणार असून निवडलेल्या प्रत्येक जिल्ह्यात एका वॉटर फेलोची नियुक्ती त्यांच्या मार्फत केली जाणार आहेजेणे करुन सर्व संबंधित यंत्रणांमध्ये योग्य प्रकारे समन्वय साधला जाईल व प्रकल्प वेळेत पूर्ण होईल.

सामंजस्य करार-2

जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभालकरिता नवीन धोरण आणणार

 जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी

दुरुस्ती व देखभालकरिता नवीन धोरण आणणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. 3 : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. राज्य शासन जुने प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

             मृद व जलसंधारण विभाग आणि संबंधित विविध संस्था आणि संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईकसचिव गणेश पाटीलमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगेसचिव अश्विनी भिडेनाम फाउंडेशनचे नाना पाटेकरमकरंद अनासपुरेभारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथाटाटा मोटर्स चे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी जुने आणि अर्धवट राहिलेले जलसंधारणाचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची योजना मांडली आहे. यामुळे कमी खर्चात अधिक काम पूर्ण होईल आणि जलसंधारणाचा प्रभावी वापर होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जलसंधारण प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असूनतीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामध्ये नाम फाउंडेशनटाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनेचा सहभाग आहे.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले,नाम फाउंडेशनने शेतकऱ्यांना जलसंधारणाच्या कामामध्ये सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. जलसंधारणाविषयी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणेजनजागृती करणे आणि ग्रामीण भागाच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे  महत्वपूर्ण काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे.

भारतीय जैन संघटनेने जलसंधारणाच्या चळवळीला प्रोत्साहन दिले असूनतलावांचे खोलीकरणगाळ काढणे आणि अन्य महत्त्वाची जलसंधारण कामे लोकसभागातून केली जात आहेत. जलसंधारण विषयी प्रशिक्षण देवून जलतज्ञ निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम या संघटनेच्या माध्यमातून होत असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचा लाभ

 आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचा लाभ राज्यातील रुग्णांना मिळावायासाठी नोंदणीच्या कामाला गती द्यावी. तसेच यामधील मानवी हस्तक्षेप विरहित डिजिटल यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

या दोन्ही योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्यासाठी जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयाचा तसेच मुंबई शहर व उपनगरातील महापालिकेच्या रुग्णालयांचाही समावेश करावा. आयुष्मान कार्डच्या प्रत्यक्ष १०० टक्के वितरणाकरिता तांत्रिक अडचणी दूर करून आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसाठीही आयुष्मान कार्ड सारखे कार्ड तयार करण्यात यावेअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामध्ये रुग्णालयांच्या समावेशासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी घेतला फ्लॅगशीप योजनांचा आढावा प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या

 मुख्यमंत्र्यांनी घेतला फ्लॅगशीप योजनांचा आढावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- ग्रामीण आवासच्या 19.66 लाख उद्दिष्टांपैकी 16.81 लाख घरकुलांना मंजुरी

- शहरी आवास योजनांनाही गती देण्याचे निर्देश

- जलजीवन मिशनची कामे वेगाने पूर्ण करा

- आयुष्मान कार्ड वितरणातील त्रुटी दूर करून कार्डचे वाटप पूर्ण  करा

मुंबईदि. 3 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 19 लाख 66 हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 16 लाख 81 हजार 531 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचे व घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा वॉररुमध्ये आढावा घेऊन या योजनांना गती देण्याचे निर्देश दिले. यामध्ये आरोग्यगृहनिर्माण व पाणी पुरवठा विभागाच्या योजनांच्या सद्यस्थितीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवारपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलआरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेराज्यमंत्री पंकज भोयर, योगेश कदममेघना बोर्डीकरमुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते.

शहरी व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनांच्या सद्यस्थिती व अंमलबजावणीची माहिती घेऊन श्री. फडणवीस म्हणाले कीभूमीहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहेही आनंदाची बाब आहे. मात्रउर्वरित लाभार्थ्यांना तातडीने जमिन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वयाने मार्ग काढावेत. ज्या जिल्ह्यांत घरकुलांचे उद्दिष्टपूर्ती कमी आहेतेथील जिल्हाधिकाऱयांनी ती पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावेत. तसेच घरकुल योजनेतील अडचणी दूर करून कामांना वेग द्यावे. गायरान जमिनींवरही आवास योजना राबविण्यासाठी कार्यवाही करावी. आवास योजनांसाठीच्या जमिनींच्या समस्या सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्राधान्य द्यावे.

आवास योजनांच्या घरकुलांसाठी वाळूवीटा व सिमेंट आदी एकाच ठिकाणी मिळावेयासाठी घरकुल मार्ट संकल्पना राबविण्यात यावी. यासाठी बचत गटांचे सहाय्य घ्यावे. तसेच आवास योजनांसाठी वाळू देण्यासंदर्भातील परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात यावे. तसेच महसूल विभागाने गावठाणासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी. शहरी भागातील आवास योजनांना गती देण्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश द्यावे. तसेच आवास योजनांच्या प्रगतीची माहिती नियमित अद्ययावत करावी. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनची मंजुरीकामे आदी कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेगाने करावीअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी

            आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचा लाभ राज्यातील रुग्णांना मिळावायासाठी नोंदणीच्या कामाला गती द्यावी. तसेच यामधील मानवी हस्तक्षेप विरहित डिजिटल यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

या दोन्ही योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्यासाठी जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयाचा तसेच मुंबई शहर व उपनगरातील महापालिकेच्या रुग्णालयांचाही समावेश करावा. आयुष्मान कार्डच्या प्रत्यक्ष १०० टक्के वितरणाकरिता तांत्रिक अडचणी दूर करून आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसाठीही आयुष्मान कार्ड सारखे कार्ड तयार करण्यात यावेअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामध्ये रुग्णालयांच्या समावेशासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

जल जीवन मिशनची कामे वेगाने करा

जल जीवन मिशन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध व्हावे यासाठी जलजीवन मिशन योजनेतील कामे गतीनेकालमर्यादेत व गुणवत्ता पूर्ण करावीत. या योजनांचे सोलरायजेशन झाल्यास वीजेबरोबरच वीज बिलात बचत होईलअसेही श्री. फडणवीस म्हणाले.

नळाच्या पाण्याची आणि स्त्रोतांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी वर्षातून दोनदा जीवाणूजन्य आणि एकदा रासायनिक चाचणी करावी. पाणी गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळांमधील पदभरती तत्काळ करावीअसेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.


निबंध स्पर्धेमुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल



 निबंध स्पर्धेमुळे भगवान महावीर यांचे 

जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, दि. 3 : आज जैन धर्म पश्चिम आणि उत्तर भारतात दिसत असला तरी एके काळी तामिळनाडू राज्यात जैन धर्मियांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तामिळ भाषेत जैन साहित्य देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तीर्थकर भगवान महावीर यांचे जीवनकार्य सर्वकाळ प्रेरणादायी असून भगवान महावीर यांच्या जीवनावर राज्यातील शाळाशाळांमधून निबंध स्पर्धा आयोजित केल्यामुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले. 

भगवान महावीर स्वामी २५५० निर्वाण कल्याणाक महोत्सव समितीतर्फे राज्यातील शाळांमध्ये आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राज्यपालांच्या हस्ते रविवारी (दि. २) राजभवन मुंबई येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.     

भगवान महावीरांचे जीवन त्यागमय होते असे सांगताना केवळ स्वतःसाठी जगणे पाप असून इतरांसाठी जगल्यास ईश्वर आपली काळजी वाहिल असे राज्यपालांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.  

या स्पर्धेत राज्यातील शाळांमधील १.२ कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ही अतिशय उत्साहवर्धक बाब असल्याचे सांगून मुलांनी लिखाण तसेच वाचनाची सवय ठेवावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. मुलांनी मोबाईल फोनवर आपला वेळ वाया न घालवता वेळेच नियोजन करून मोबाईलचा वापर करावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुलांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राजभवन येथे होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अहिंसा परमो धर्म हा भगवान महावीरांचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी स्पर्धा उपयुक्त असल्याचे आमदार चैनसुख संचेती यांनी सांगितले. स्पर्धेमुळे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भगवान महावीरांच्या जीवनाचे अध्ययन केले असे जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. यावेळी भगवान महावीरनिर्वाण कल्याणक महोत्सव समितीचे निमंत्रक हितेंद्र मोटा उपस्थित होते. 

राज्यपालांच्या हस्ते स्पर्धेतील  विविध जिल्ह्यांमधून आलेल्या विजेत्यांना बक्षीस रकमेचे धनादेश प्रदान करण्यात आले.  ही स्पर्धा जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात सहकार्य केल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांचा देखील सत्कार करण्यात आला. 


इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट; भारत - ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा

 इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट;

भारत - ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा


 

मुंबई, दि. 3 : सध्या मुंबई भेटीवर असलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (2 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.  

राणी एलिझाबेथ द्वितीय व ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात धाकटे सुपुत्रतसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिन्स एडवर्ड यांनी भारत आणि ब्रिटन मधील संबंध मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना उभय देशांमधील सहकार्य अधिक वृद्धिंगत होण्याची इच्छा व्यक्त केली.

आपण इंग्लंडमधील बाथ विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती असल्याचे सांगताना उच्च शिक्षण क्षेत्रातील सहकार्य भारत व इंग्लंड या दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल असे त्यांनी नमूद केले. 

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना युवराज एडवर्ड यांनी वर्गखोलीच्या बाहेर होत असलेले शिक्षण देखील जीवनात महत्वाचे असल्याचे सांगितले.  

भारतात क्रिकेट 'अभूतपूर्ववाढले असल्याचे नमूद करून बॅडमिंटनमधील भारताच्या प्रगतीचेही त्यांनी कौतुक केले. रविवारी संध्याकाळी मुंबईत होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० सामन्याच्या नाणेफेकीचा वेळी आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या अस्तित्वात असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा महोत्सवासोबतच कॉमनवेल्थ व्यवसाय महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याच्या संकल्पनेवर देखील यावेळी चर्चा झाली.

प्रिन्स एडवर्ड यांचे राज्यात स्वागत करताना भारत आणि इंग्लंड ही जगातील दोन महान लोकशाही राष्ट्रे असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

भारतीय लोकांना इतर देशांच्या तुलनेत लंडनमध्ये  'आपल्या घरासारखेवाटतेअसे सांगताना उच्च शिक्षण दोन्ही देशांमध्ये सहकार्याचे महत्त्वाचे क्षेत्र ठरू शकते असे राज्यपालांनी सांगितले.  भारतीय विद्यार्थ्यांना इंग्लंडमधील शिक्षण पद्धतीशी जुळवून घेणे अधिक सोपे जातेअसेही त्यांनी नमूद केले.

हरित ऊर्जा आणि औषधनिर्माण क्षेत्राबरोबरच भारताला इंग्लंडकडून हॉस्पिटल व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्याचा लाभ होऊ शकतोअसे राज्यपालांनी सांगितले.  इंग्लंडमधील हॉस्पिटल व्यवस्थापन प्रणाली उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण राज्यातील कुलगुरूंना इंग्लंडमधील विद्यापीठांसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यासाठी प्रोत्साहन देऊ असेही राज्यपालांनी सांगितले.  

भारत आज जगातील सर्वात बलशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असून आणि भारत - इंग्लंड यांच्यातील मजबूत व्यापार संबंध इतर अनेक क्षेत्रांतील संबंध बळकट करण्यास साहाय्यभूत ठरतीलअसे राज्यपालांनी सांगितले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात मुक्त व्यापार करार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारतात क्रिकेटशिवाय फुटबॉल खेळ अतिशय लोकप्रिय असूनदेशात फुटबॉलला अधिक चालना देण्यासाठी इंग्लंडने भारताला मदत करावीअशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

बैठकीला ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांगड्यूक यांचे खाजगी सचिव अ‍ॅलेक्स पॉट्स आणि राजकीय व द्विपक्षीय व्यवहार विभागप्रमुख जॉन निकेल उपस्थित होते.

                                

*वो फिर नहीं आते

 ❗ *वो फिर नहीं आते*…


आयुष्यभर अगदी कशीही, कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. ....

आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित् संपर्का पलिकडे पोहोचली असतात. मोबाईलमधे त्यांचा नंबर असूनही *“मीच का?”* अशा या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, bमनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी  हिच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवं….. संपर्कात रहायला हवं. 

अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना ?…. तो संवाद अविरत चालू रहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन… एखादा मेसेज… नाहीतर स्व-लिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. 


ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियतीने दिलेला  आशिर्वाद अन् प्रसाद म्हणून भरभरुन वाटलेला...


त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का ? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं ….. परत येत नाहीत हो …..  *“वो फिर नहीं आते……”* हि अशी अवचित माणसं *भेटण्यापेक्षा* ती *लाभणंच* जास्त महत्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं *“मी”* पणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून, पुन्हा निरखून पाहायला हवीत … त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली कि ती परत येत नाहीत हो. 


गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं कि, ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी हि माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायला हवीत.

*फूल खिलते हैं,*

*लोग मिलते हैं मगर*

*पतझड़ में जो फूल*

*मुरझा जाते हैं*

*वो बहारों के आने से* 

*खिलते नहीं*

*कुछ लोग एक रोज़*

*जो बिछड़ जाते हैं*

*वो हजारों के आने से*

*मिलते नहीं*

*उम्र भर चाहे*

*कोई पुकारा करे उनका नाम*

*वो फिर नहीं आते…*


माणसं हि अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. *भावनाशून्य* या जगात जगताना आपण थोडं *भावनाप्रधान* व्हायला हवं.

ओळख जितकी जूनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि.......

ही मैत्री नावाची 'नाव" अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळे विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.

*आँख धोखा है,*

*क्या भरोसा है*

*दोस्तों शक दोस्ती का*

*दुश्मन है*

*अपने दिल में*

*इसे घर बनाने न दो*

*कल तड़पना पड़े*

*याद में जिनकी*

*रोक लो रूठ कर*

*उनको जाने न दो*

*बाद में प्यार के*

*चाहे भेजो हजारों सलाम*

*वो फिर नहीं आते…* 


आपल्या सगळ्यांचच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय … ठरवलेलं धेय गाठायचंय. आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायचीय. पण ती उभी करताना… पुढे जाताना गवसलेली हि आपली माणसं … आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर…यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कुणीतरी हवं ना….  नसेल तर….? खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्या सोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल ...नाही का...? 

आयुष्य खरंच खुप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत.. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच.

उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणार्‍या  प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत  हीच ती  सुंदर माणसं.... तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी .. सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची....

 सच लिखा है लिखा है 'गुलजार'जी ने...


*...वो फिर नही आते....*


*असं हे किशोर कुमार यांनी गायलेलं सुंदरसं गीत.....* 


*" वो फिर नही आते..."😢🙏*🙏

Featured post

Lakshvedhi