Sunday, 2 February 2025

महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार



 महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हदगाव येथील पुरातन श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळा

 

हदगाव ( नांदेड ) दि. 2 : पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रध्दास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहेउर्वरित ठिकाणी लवकरच कामे सुरु होतील,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

नांदेड जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हदगाव येथील श्री. गुरुवर्य बापू नगर परिसरातील श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व व कलशारोहण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते उपस्थित होते. मराठवाडा, विदर्भ व महाराष्ट्रातील ठीक ठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते.

वैराग्यमूर्ती मठाधिपती महंत श्री.योगी बापू यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर माहूर पिठाधीश कवीश्वराचार्य माहुरकर बाबा यांच्यासह परिसरातील मठाधिपती धर्मपीठावर विराजमान होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या या मठाधिपतींनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना महानुभाव पंथीयांसाठी केलेल्या कार्यकर्तृत्वाला लक्षात घेऊन स्तुती सुमनांनी साकारलेले सन्मानपत्र बहाल केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्वप्रथम चक्रधर स्वामीना दंडवत घातला. त्यानंतर धर्मपीठावरून बोलताना सर्वज्ञ चक्रधर स्वामी व त्यांच्या अनुयायांनी अतिशय विपरित परिस्थितीत धर्म रक्षणाचे कार्य केल्याचे स्मरण केले. महानुभव पंथीयांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांनी गौरव केला. परकीय आक्रमणामुळे कृष्णदेवाची पुजा करून घेणेहिंदू म्हणवून घेणे कठीण होते. त्या काळात चक्रधर स्वामीनी जातीपातीपंथाचा विचार न करता महानुभव दाखवलासमरसता व समतायुक्त समाज त्याकाळी देशात निर्माण केला.

महाराष्ट्र शासनाने राज्यभरात आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी महानुभाव पंथीयांचे मंदिर आहेत. त्या मंदिरांचा विकास करण्याचे काम केल्याचे सांगितले.रिद्धपुरचा पांचाळेश्वरजाळीचा देवगोविंदप्रभू देवस्थान या अनेक ठिकाणी संवर्धनाचे काम सुरु आहे. याही पुढे हे कार्य सुरू राहील,असे आश्वस्थ केले.

तसेच या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून येथील विकास कामे केली जातील. चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीने पाठिशी उभे राहीलअसे सांगितले.

यावेळी त्यांनी महानुभावपंथीयांच्या ग्रंथ प्रेमाचीधर्म साहित्य निर्मितीच्या चिकाटीचे  कौतुक केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाराजमान्यता मिळाली. यामध्ये महानुभाव साहित्याचा मोठा वाटा आहे. आपण जे पुरावे दिले आणि जे स्वीकारले गेले.यातील एक महत्वाचा पुरावा लीळाचरित्र होते.

मराठी भाषा किती प्राचीन याचा पुरावा यानिमित्ताने देता आला. लीळाचरित्र ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेलात्या रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठाचा विकास पुढील टप्यात करण्यात येणार आहे. महानुभाव पंथाच्या माध्यमातून मराठी भाषा विद्यापीठाचा उपयोग करून आपले साहित्य ,विचार,अध्यात्म जगभरामध्ये पोहोचवण्याचे काम करावेअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

देशाच्या कानाकोपऱ्यात नाही तर अफगाणिस्तानपर्यंत महानुभव पंथ पोहोचला आहे .आज इतका मोठा संप्रदाय आपल्याला समतेच्या अधिष्ठानावर काम करतांना दिसतो. आज या धर्मपीठावर या स्थानावर इतकी मोठी महंत मंडळी येऊन गेली. ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजेअसे त्यांनी धर्मपीठावरील सर्व मान्यवरांना अभिवादन करताना स्पष्ट केले.

तत्पूर्वीश्री. फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर जीर्णोद्धार करण्यात आलेल्या उखळाई माय मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आजच या ठिकाणी संत महात्म्यांच्या उपस्थितीत कलशारोहण झाले. हे मंदिर पाचशे वर्षापूर्वीचे असल्याची मान्यता आहे. यावेळी त्यांनी श्रीकृष्ण मूर्तीचे भक्तार्पण केले. कार्यक्रमाचे आयोजक वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचा सत्कार केला. भक्तांना प्रातिनिधिक सेवा पुरस्कार बहाल केला.

या कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे हरीद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटीलहिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर,आमदार भीमराव केरामआमदार आनंद पाटील बोंढारकरआमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार बालाजी कल्याणकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापजिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालजिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरवउपविभागीय अधिकारी अविनाश कांबळेतहसीलदार सुरेखा नांदेआदीसह राज्यातील विविध ठिकाणच्या महानुभव पंथाचे पिठाधीश व अन्य मान्यवर उपस्थित होते.

0000


 

प्रथ म एज्युकेशन फाउंडेशन

 प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये बरेच सकारात्मक मुद्दे देखील आहेत.

 यातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत :

 

वय वर्ष ६ ते १४ मधील ६०.९ टक्के बालके ही शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत तर ३८.५ टक्के बालके ही खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली व दुसरी मधील वाचन व गणितीय क्रिया यामध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक व अध्ययन स्तर हा वाढल्याचे दिसून येते. इयत्ता तिसरी मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कोरोना मध्ये झालेला अध्ययन क्षय भरून काढण्यात येत आहे असे दिसून येते. शासकीय शाळांमध्ये सन २०२२ च्या तुलनेमध्ये सन २०२४ मध्ये वाचनामध्ये १०.९ टक्के प्रगती दिसून येते. तर खाजगी शाळांमध्ये वाचनामध्ये ८.१ टक्के प्रगती दिसून येते. गणितीय क्रियांमध्ये शासकीय शाळांमध्ये १३.१ टक्के प्रगती दिसून येते व खाजगी शाळांमध्ये ११.५ टक्के प्रगती दिसून येते.

इयत्ता तिसरीतील मुले जी इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकतात याचे महाराष्ट्राचे प्रमाण देशपातळीपेक्षा १० टक्क्यांनी जास्त आहे. इयत्ता तिसरी मध्ये गणितीय क्रियांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र हा देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे. २०२२ च्या तुलनेमध्ये २०२४ मध्ये यात १३ टक्क्यांची वाढ दिसून येते. इयत्ता पाचवीच्या मुलांमध्ये सन २०२२ च्या तुलनेमध्ये सन २०२४ मध्ये वाचनामध्ये २.२ टक्के अधिकची प्रगती झाल्याचे दिसून येते.

वय वर्ष १५ ते १६ याच्यामध्ये ९८ टक्के विद्यार्थी हे शाळांमध्ये प्रवेशित आहेत. सर्वात कमी शाळाबाह्य विद्यार्थी असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे. वय वर्ष १४ ते १६ मधील विद्यार्थ्यांच्या डिजिटल साधनांची उपलब्धता मध्ये राज्यातील ९४.२ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहे व यातील ८४.१ टक्के विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. यामधील १९.२ टक्के विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्मार्टफोन असल्याचे नमूद केले आहे. यातील ६३.३ टक्के विद्यार्थी हे शिक्षणाच्या संदर्भात स्मार्टफोनचा वापर करताततर विविध सामाजिक माध्यमांसाठी ७२.७ टक्के विद्यार्थी स्मार्टफोनचा वापर करतात.


 

 

सन २०२४ मध्ये तीन वर्षाच्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये नोंदणी असणाऱ्या मुलांचे प्रमाण ९५ टक्के आहे२०२२ मध्ये हे प्रमाण ९३.९ टक्के होते. महाराष्ट्रात ६ ते १४ वयोगटातील पटनोंदणी दर गेल्या ८ वर्षांपासून ९९ टक्के पेक्षा जास्त आहे. महामारीच्या काळात शाळा बंद असूनही२०१८ मधील ९९.२ टक्के वरून एकूण पटनोंदणीचे आकडे २०२२ मध्ये ९९.६ टक्के पर्यंत वाढले आहेत आणि २०२४ मध्ये सुध्दा स्थिर असल्याचे दिसून आले. म्हणजेच या वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण ०.४ टक्के आहेजे की देशभरात १.९ टक्के आहेअशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. 

राज्यातील 78.40 टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध विद्यार्थ्यांमधील वाचन आणि गणितीय क्रियांमध्ये देखील प्रगती

 राज्यातील 78.40 टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध


विद्यार्थ्यांमधील वाचन आणि गणितीय क्रियांमध्ये देखील प्रगती


शालेय शिक्षण विभागाची माहिती


 


मुंबई, दि. 2 - प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने शाळा सर्वेक्षणाचा (ग्रामीण) अहवाल (असर) प्रकाशित केलेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत ‘असर’ अहवालाबाबत काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. संस्थेने २०.४ टक्के विद्यार्थ्यांकडून संगणकाचा वापर होत असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. तथापि, एकूण १,०८,१४४ शाळांचा विचार करता संगणकाचा वापर करण्याचे प्रमाण ७२.९५ टक्के इतके आहे. सदर संस्थेने ४८.३ टक्के शाळांमध्ये संगणक नसल्याचे नमूद केले आहे. वास्तविकतः एकूण शाळांपैकी ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध आहे. मुलींकरिता साधारणतः ९६.८ टक्के इतक्या शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उपलब्धता असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.


प्रथम या संस्थेने ४०९ प्राथमिक व ४६३ उच्च प्राथमिक व त्यावरील अशा ग्रामीण भागातील एकूण ८७२ शाळांचे सर्वेक्षण केले आहे. युडायस (UDISE) डाटा सन २०२३-२४ अनुसार राज्यामध्ये एकूण १,०८,१४४ शाळा आहेत. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने एकूण शाळांच्या केवळ ०.८१ टक्के इतक्या शाळांचेच सर्वेक्षण केलेले आहे. तसेच राज्यातील एकूण २,०९,६१,८०० शालेय विद्यार्थ्यांपैकी केवळ ३३,७४६ मुलांचे सर्वेक्षण संस्थेने केले आहे जे की एकूण विद्यार्थ्यांच्या केवळ ०.१६ टक्के इतके आहे. या आधारांवर अहवाल प्रकाशित केलेला आहे.

राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन साजरा

 राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन साजरा



 

मुंबईदि. 2 - राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी तटरक्षक दलाच्या विस्तार योजनेचे कौतुक करताना १५१ हून अधिक जहाजे७८  विमान आणि ४६ प्रगत रडार स्थानकांसहभारतीय तटरक्षक दल जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तटरक्षक दल झाले असल्याचे सांगितले. 

राज्यपालांनी भारतीय तटरक्षक दलाचे देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (EEZ) विस्तीर्ण भागावर चोवीस तास निगराणी ठेवण्यासाठी कौतुक केले. गुजरात आणि केरळमधील विनाशकारी पुरस्थितीनंतर मदत व बचावकार्याच्या वेळी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राज्यपालांनी तटरक्षक दलाचे अभिनंदन केले. राज्यपालांनी किनारपट्टी स्वच्छता मोहिमा आणि वृक्षारोपण यांसारख्या पर्यावरणीय उपक्रमांसाठी तटरक्षक दलाचे विशेष कौतुक केले.

यावेळी नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंहभारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे महासंचालक ए. के. हरबोलातटरक्षक दलाच्या पश्चिम तट विभागाचे कमांडर महानिरीक्षक भिषम शर्मा  तसेच भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी आयोजित चहापानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना राज्यपालांनी तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिकारीकर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व तटरक्षक दलाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पंडित राहुल शर्मा यांनी संतूरवादन सादर केले. पंडित आदित्य कल्याणपूर यांनी त्यांना तबला साथ दिली. 


मोटार वाहन कायदा ड्रायव्हिंग करीता

 


नाकात तूप सोडण्याचे(नस्य करण्याचे) फायदे व नुकसान:-*

 *नाकात तूप सोडण्याचे(नस्य करण्याचे) फायदे व नुकसान:-* 


देशी गाईचे तूप आहारात वापरणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.  पण तुम्हाला नाकात तूप सोडण्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का? 

             हो नाकात देशी गाईचे शुद्ध तूप टाकून तुम्ही बऱ्याच आजारापासून मुक्त होऊ शकता. देशी गाईचे शुद्ध तूप आयुर्वेदात औषध म्हणून ओळखले जाते.  रात्री झोपताना देशी तुपाचे फक्त 2 थेंब नाकात टाकल्याने अनेक फायदे होतात...


 *नाकात तूप सोडण्याचे फायदे:-* 


 *👉🏽त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी*

 वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांना नाकात तूप टाकून समतोल साधता येतो.  यासाठी गाईच्या तुपाचे दोन थेंब दिवसातून तीन वेळा नाकात टाका.


 *👉🏽डोळ्यांसाठी उत्तम आरोग्यासाठी* 

जेव्हा तुम्ही गाईचे तूप नाकात घालता तेव्हा ते डोळ्यांची पाहण्याची क्षमता वाढवते. दृष्टी वाढवण्यासाठी, रात्री झोपताना तुपाचे दोन थेंब नाकात घाला.


 *👉🏽केस गळणे थांबवण्यासाठी*

तुपामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या केसांसाठी फायदेशीर असतात.  तुमचे केस गळणे थांबवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात घाला.


 *👉🏽स्मरणशक्ती साठी* 

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नाकातील तूप फायदेशीर आहे.  तुपाचे दोन थेंब नाकात घाला.


 *👉🏽डोकेदुखीमध्ये* 

 जर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनने त्रास होत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी नाकात गायीच्या तुपाचे दोन थेंब टाका, यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.


  *इतर फायदे -* 

- रात्री झोपण्यापूर्वी तुपाचे दोन थेंब नाकात टाकल्याने निद्रानाशाची समस्या संपते.

 - तूप ओतल्याने नाकाचा कोरडेपणा संपतो.

- नाकात तूप सोडल्याने एखाद्या व्यक्तीला कोमामधून उठवण्यास मदत होते.

- कफाची समस्या दूर होते.

- नाकात तूप टाकल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.

- यामुळे कर्करोग होण्याची शक्यताही कमी होते.


 *नाकात तूप सोडण्याचे तोटे-* 


 गायीच्या तुपाचे काही थेंब(प्रमाणात) नाकात घातल्याने कोणतेही गंभीर नुकसान होत नाही.  यासाठी तुम्ही फक्त देशी गायीचे शुद्ध तूप वापरावे.  जर तुम्हाला तुपाच्या वासाने कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर ते वापरू नये.

टीप- वरील कुठलाही प्रयोग करण्याआधी वैद्यांचा सल्ला घ्या.


*टीप - आपल्या कडील देशी गिरगाईचे (A2) अस्सल गावरान चुलीवर बनवलेले तूप ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा*

*)



 **

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो.*

*आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो.*



1)कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.

2)हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.

3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.

4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या.

5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या.

6)सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.

7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा.




8.)दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.

9)डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा.

10)भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.

काही आजार नसला तरी

अनुलोमीलम 15 मी

कपालभाती 15 मी

सुर्यनमस्कार 12 आर्वतन

रोज करा

आरोग्य संवाद

स्वतः साठी एवढं तरी करा

१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.

२) भरपूर टाळ्या वाजवा.

३) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या.



https://chat.whatsapp.com/JLhphNEF1JuCbKGAZ0RQ3p

४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. ( अँक्युप्रेशर करा )

५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.

६) नियमित प्राणायाम करा. ( भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम )

७) सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.

८) सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.

९) दुपारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत.

१०) संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किंवा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.

११) नाभिचक्र मूळ जागी ठेवा.

१२) पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठेवा.

१३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका.

१४) चौरस आहार घ्या.

१५) जास्तीत जास्त शाकाहारी रहा.

१६) Black Tea च प्या.

१७) जेवणात कोशिंबीर ( कच्चे ) खा.

१८) ध्यानधारणा करा.

१९) सकारात्मक वर्तन / विचार ठेवा.

२०) सत्य बोला. समाजसेवा करा.

२१) भरपूर ऐका मात्र कमी बोला.

२२) *नैसर्गिक जीवन जगा.*

२३) गरज असेल तर घरगुती औषधे ( आजीबाईचा बटवा ) घेणे.

२४) पोट साफ ठेवणे.

२५) वात, पित्त व कफ प्रवृत्ती ओळखून उपचार करा.

*आरोग्य संदेश*

सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट,

हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट.

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक


केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

*उपाय*

कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.

किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.

कंबर दुखी

*उपाय*

१) जायफळ पाण्यात उगळा + तिळाचे तेल मिक्स करा. नंतर गरम करा. थंड करून दुखणा-या जागी लावा.

२) आल्याचा रस + मध दिवसातून २/३ वेळा घ्या.

३) गरम पाण्याने शेक द्या.

४) हलका मसाज करा.

५) बर्फाने शेकवा.

६) रोज सावकाश व्यायाम / योगासने करा.

७) नियमित प्राणायाम करा.

८) प्रथम तेल लावा नंतर श्वास रोखून माँलिश करा. असा उपाय शरीराचा कोणताही भाग / अवयव दुखत असेल तर नक्कीच करा. गुण येतोच.

९) विश्रांति घ्या.

१०) दोन्ही तळव्यांच्या मागील बाजूवर (अंगठा व तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर करा.

११) पोट साफ राहू द्या.

१२) सर्वच उपाय एकाचवेळी करू नका.

१३) नियमित सकाळी कोमट पाण्यातून व संध्याकाळी कोमट दुधातून १ / १ चमचा मेथी दाणे घ्या.

आरोग्य संदेश

व्यायाम व अँक्युप्रेशरने व्हा सुखी,

माझ्या सल्याने थांबेल कंबर दुखी.

मान दुखी - - - - -

कारणे -----

जास्त थंडीमुळे, झोपेत अवघडणे, लचकणे, झटकन वळणे, डोक्यावर जास्त ओझे घेणे, स्नायुंना त्रास होणे, इ.

*उपाय -----*

१) शेक द्या. ( गरम पाणी / वाळू )

२) हळद + चंदन लेप द्या.

३) लसूण रस + कापूर मिक्स करून लावा. जास्तच आग झाल्यास पाण्याने साफ करून खोबरेल तेल लावा.

४) कोमटच पाणी प्या.

५) सुंठ उगाळून लेप द्या.

६) प्रथम तेल लावा. नंतर भरपूर श्वास नाकाने घेऊन रोखून धरा. मानेचे व्यायाम सावकाश करा. किंवा हाताने हलकेसे माँलिश करा.

७) असे १० / १५ वेळा रिकाम्या पोटी सकाळी व संध्याकाळी करा. नक्कीच गुण येतो.

८) अँक्युप्रेशर करा म्हणजेच हातपाय घासा व प्रेस करा.

९) वरील योग्य तेच उपाय करा.

आरोग्य संदेश

निरोगी राहण्यासाठी द्या तुम्ही झोकून.

गुण येण्यासाठी मात्र श्वास धरा रोखून.

|| ध्यान (Meditation) ||*

ध्यान म्हणजे काय?

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्या अस्वस्थ मनाला शांत करणे !

त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !

ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

ध्यानाचे फायदे

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.

ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !

ताबडतोब बरे होणे

सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

स्मरणशक्ती वाढते

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते.

🧘‍♀️🧘‍♂️🧎‍♀️🧎‍♂️


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती  हा ग्रुप जॉईन करा*


Featured post

Lakshvedhi