Tuesday, 5 November 2024

मुंबई शहर जिल्ह्याबाबत माहिती

 मुंबई शहर जिल्ह्याबाबत माहिती

एकूण मतदान केंद्र - 2538

उत्तुंग इमारतीमधील (Highrise Building) मतदान केंद्र 156

सहकारी गृहनिर्माण सोसायटी मधील मतदान केंद्र 100

झोपडपटटी परिसरात मतदान केंद्र 313

मुंबई शहर जिल्हयात मंडपातील मतदान केंद्र 101

पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्र 17

--

विधानसभा मतदार संघनिहाय मतदार संख्या

धारावी - 261869

सायन-कोळीवाडा - 283271

वडाळा - 205387

माहिम - 225951

वरळी - 264520

शिवडी - 275384

भायखळा - 258856

मलबार हिल - 261162

मुंबादेवी - 241959

कुलाबा - 265251

--

*मतदारांची एकूण संख्या - 25 लाख 43 हजार 610*

• महिला  -  11 लाख 77 हजार 462

• पुरुष -  13 लाख 65 हजार 904

• तृतीयपंथी - 244

• ज्येष्ठ नागरिक (85+) - 53 हजार 991

• नवमतदार संख्या (18-19 वर्ष) -  39 हजार 496

• दिव्यांग मतदार -  6 हजार 387

• सर्व्हिस वोटर - 388

• अनिवासी भारतीय मतदार - 407

--

मतदार यादीत नाव तपासून घ्यावे

मतदार यादीत तुमचं नाव आहे की, नाही हे पाहण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले. मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे क्यूआर कोड ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आले असून त्या माध्यमातूनही नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासता येणार आहे,  असे श्री. यादव यांनी सांगितले. 

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांसाठी दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे

 भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांसाठी दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरीता आचारसंहितेची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्याकडून निवडणूक कामाचा आढावा घेतल्यानंतर मतदान केंद्रांचे विकेंद्रीकरण आणि सुसूत्रीकरण करण्यात आले आहे.  एका मतदान केंद्राच्या ठिकाणी १० पेक्षा जास्त केंद्रे असल्यास ते जवळच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. सुसूत्रीकरणानंतर मतदान केंद्रांमध्ये झालेल्या बदलाबाबत मतदारांना प्रसारमाध्यमसमाजमाध्यमाद्वारे माहिती देण्यात आली आहे. यासोबत मतदान केंद्रांची माहिती असलेल्या क्यूआर कोडसह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्रत्येक मतदारांच्या घरी जावून देण्यात येत आहेत.

       मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पिण्याचे पाणी,  स्वच्छतागृहरांगांमध्ये आसन व्यवस्थातसेच गर्दी झाल्यास मतदारांकरीता प्रतिक्षा कक्ष इत्यादी किमान निश्चित सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

व्होटर हेल्पलाईन ॲप (Voter helpline App) - मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासता येईल व नवीन मतदार नोंदणी या ॲपद्वारे करता येईल.

केवायसी ॲप (KYC App) - उमेदवारांबाबत माहिती या ॲपवर उपलब्ध होऊ शकेल

सी व्हिजील (Cvigil) ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे 100 मिनिटांत निराकरण केले जाते.

मतदार हेल्पलाईन क्रमांक.  1950

जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय- नियंत्रण कक्ष क्रमांक-  022-2082 2781

निवडणूक नियंत्रण कक्ष  7977363304

१८७-कुलाबा विधानसभा मतदारसंघातील १३ अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष

 १८७-कुलाबा विधानसभा मतदारसंघातील १३ अंतिम उमेदवारांचे नावपक्ष

१) अर्जुन गणपत रुखे - बहुजन समाज पार्टी

२) अॅड. राहुल सुरेश नार्वेकर - भारतीय जनता पार्टी

३) हिरा नवाजी देवासी - इंडियन नॅशनल काँग्रेस

४) जीवराम चिंतामण बघेल - राष्ट्रीय समाज पक्ष

५) विलास हरी बोर्ले - लोकशाही एकता पार्टी

६) सूर्यकांत मुलतानमलजी जैन - वीर जनशक्ती पार्टी

७) चंद्रशेखर दत्ताराम शेट्ये - अपक्ष

८) चांद मोहम्मद शेख - अपक्ष

०९) प्रशांत प्रकाश घाडगे - अपक्ष

१०) मनोहर गोपाळ जाधव - अपक्ष

११) मोहम्मद रिजवान कोटवाला - अपक्ष

१२) विवेक कुमार तिवारी - अपक्ष

१३) सद्दाम फिरोज खान - अपक्ष

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील ११ अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष

 --

१८६-मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील ११ अंतिम उमेदवारांचे नावपक्ष

१) अमीन पटेल - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

२) शायना मनिष चुडासमा मुनोत – शिवसेना

३) परमेश मुरली कुराकुला - राईट टू रिकॉल पार्टी

४) मोहम्मद शुऐब बशीर खतीब - आझाद समाज पार्टी (कांशिराम)

५) मोहम्मद जैद मन्सुरी - ऑल इंडिया मजलिस - ए - इन्कलाब - ए - मिल्लत

६) मोहम्मद नईम शेख - एआयएम पॉलिटिकल  पार्टी

७) हम्माद सय्यद - पीस पार्टी

८) आमिर इक्बाल नतिक - अपक्ष

९) नाझीर हमीद खान - अपक्ष

१०) मोहम्मद रझा इस्माईल मोतीवाला - अपक्ष

११) उमा परवीन बाबू जरीवाला - अपक्ष

--

१८५-मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील ०८ अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष

 १८५-मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील ०८ अंतिम उमेदवारांचे नावपक्ष

१) भेरुलाल दयालाल चौधरी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२) मंगल प्रभात लोढा - भारतीय जनता पार्टी

३) केतन किशोर बावणे - राईट टू रिकॉल पार्टी

४) सबीणा सलीम पठाण - एआय एम पॉलिटिकल पार्टी

५) अली रहीम शेख - अपक्ष

६) रवींद्र रमाकांत ठाकूर - अपक्ष

७) विद्या नाईक - अपक्ष

८) शंकर सोनवणे - अपक्ष

--

१८४-भायखळा विधानसभा मतदारसंघातील १४ अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष

 १८४-भायखळा विधानसभा मतदारसंघातील १४ अंतिम उमेदवारांचे नावपक्ष

१) मनोज पांडुरंग जामसुतकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२) यामिनी यशवंत जाधव - शिवसेना

३) वारिस अली शेख - बहुजन समाज पार्टी

४) फरहान हबीब चौधरी - पीस पार्टी

५) फैयाज अहमद रफीक अहमद खान - एआयएमआयएम

६) मोहम्मद नईम शेख - एम पॉलिटिकल पार्टी

७) वहीद अहमद अब्दुल जलील कुरेशी - बहुजन मुक्ती पार्टी

८) विनोद महादेव चव्हाण - दिल्ली जनता पार्टी

९) शाहे आलम शमीम अहमद खान - राष्ट्रीय ओलमा कौन्सिल

१०) सईद अहमद खान - समाजवादी पार्टी

११) अब्बास एफ छत्रीवाला - अपक्ष

१२) गिरीश दिलीप वऱ्हाडी - अपक्ष

१३) रेहान वसिउल्ला खान - अपक्ष

१४) साजिद कुरेशी – अपक्ष

१८३-शिवडी विधानसभा मतदारसंघातील ०७ अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष

 १८३-शिवडी विधानसभा मतदारसंघातील ०७ अंतिम उमेदवारांचे नावपक्ष

१) अजय विनायक चौधरी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२) बाळा दगडू नांदगावकर - महाराष्ट्र नवनिर्माण सेना

३) मदन हरिश्चंद्र खळे - बहुजन समाज पार्टी

४) मिलिंद देवराव कांबळे - वंचित बहुजन आघाडी

५) मोहन किसन वायदंडे - स्वाभिमानी पक्ष

६) अनघा कौशल छत्रपती - अपक्ष

७) संजय नाना गजानन आंबोले – अपक्ष

Featured post

Lakshvedhi