Wednesday, 2 October 2024

राज्यात ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी ; आता वर्षाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४८५० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

 राज्यात ८ नवीन  वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी ; आता वर्षाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४८५० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

 

          मुंबई, दि. १ : शासनाच्या पाठपुराव्यामुळे राज्यात नवीन ८ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्री कालावधीत मुंबईनाशिक, गडचिरोलीअमरावतीवाशिमजालनाबुलडाणाअंबरनाथभंडाराआणि  हिंगोली अशा एकूण १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. या आठ महाविद्यालयात एकूण ८०० विद्यार्थ्यांना एमबीबीएस करीता प्रवेश मिळणार आहे.

          प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे शासनाचे धोरण आहे. आता राज्यात एकूण ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. आता वर्षाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४८५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी विविध देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जात होते. विद्यार्थी संख्या वाढल्याने आता विद्यार्थी राज्यातच शिक्षण घेऊ शकतात.

          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रीराज्यमंत्री यांच्याही सहकार्यामुळे राज्यात कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली.

        या १० महाविद्यालयांच्या बांधकामाकरिता व इतर आवश्यक साधनसामुग्रीसाठी प्रत्येक महाविद्यालयास ४०३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम दर्जेदारगुणवत्तापूर्वक होण्यासाठी केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत १० महाविद्यालयाची बांधकाम निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच बांधकामे सुरू कराण्यात येणार आहे.

'जय महाराष्ट्र' कार्यक्रम नवीन दिमाखदार रुपात पुन्हा सुरु २ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत

 'जय महाराष्ट्रकार्यक्रम

नवीन दिमाखदार रुपात पुन्हा सुरु

२ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाच्या पहिल्या भागात

 मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत

 

          मुंबईदि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' हा कार्यक्रम नवीन दिमाखदार स्वरूपात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन जनतेच्या भेटीला येत आहे. 'जय महाराष्ट्रकार्यक्रमाच्या नवीन स्वरूपातील पहिल्या भागात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

उदंड प्रतिसाद लाभलेल्या 'जय महाराष्ट्र'चे जनतेच्या मनात आगळेवेगळे स्थान

          माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमाने मागील अनेक वर्षांपासून जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले असून या कार्यक्रमाला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्रीमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरसंबंधित क्षेत्रातील अभ्यासक व विचारवंत यांच्या मुलाखती प्रसारित करण्यात येतात. आताही या कार्यक्रमात नवीन स्वरूपात विविध विषयांवरील मुलाखती व संवाद सादर करण्यात येणार आहेत.

विकसित महाराष्ट्राबाबत मुख्य सचिवांनी मांडले विचार

          राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेत आहे. हे निर्णय विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहे. शिक्षणआरोग्यउद्योगकृषीआपत्ती व्यवस्थापनतसेच महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यात युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक निर्भर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबत मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमाच्या नवीन स्वरूपातील पहिल्या भागात जनतेशी संवाद साधला आहे.

          'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ८ वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

---- 000 ----

Tuesday, 1 October 2024

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत मुंबई विभागातील 800 ज्येष्ठ नागरिक 4 ऑक्टोबर रोजी अयोध्येला जाणार

 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत

मुंबई विभागातील 800 ज्येष्ठ नागरिक

4 ऑक्टोबर रोजी अयोध्येला जाणार

 

          मुंबईदि. 1 : राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहरमुंबई उपनगरठाणे या जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिक 4 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्येसाठी विशेष रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून रवाना होणार असल्याची माहिती मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण)  वंदना कोचुरे यांनी दिली.

          राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरीक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना तिर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये भारतातील एकूण 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थस्थळांचा समावेश आहे.

           या योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्ह्यातून 150मुंबई उपनगर या जिल्हयातून 306 व ठाणे जिल्ह्यातून 471 अर्ज अयोध्येला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील मुंबई शहरमुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यातून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी जाणार आहेत.

          यासाठी  विशेष रेल्वे 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रवाना होईल व 8 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्येतून मुंबईला परत येईल.  या योजनेअंतर्गत मुंबई विभागातून ज्येष्ठ नागरिकांचे दिक्षाभूमी नागपूरअजमेरमहाबोधी मंदीर गयाशेगावपंढरपूर या तीर्थ क्षेत्रासाठी मुंबई शहरमुंबई उपनगरठाणेपालघररायगडरत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून  2505 अर्ज प्राप्त झाले आहेत. यासंबंधी नियोजन सुरू आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे.

महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या प्रकाशित ग्रंथांचे पुनर्मुद्रण करण्यास परवानगी

 महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या

प्रकाशित ग्रंथांचे पुनर्मुद्रण करण्यास परवानगी

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

          मुंबईदि. १ : महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्यावतीने महात्मा ज्योतीबा फुले यांच्यावरील ग्रंथांचे इतर बहुजन कल्याण विभागाकडून पुनर्मुद्रण करण्याची मागणी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी केली होती. या मागणीला आज मान्यता देण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

          आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) घेण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीउपसचिव अशोक मांडेउच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकरसहसंचालक प्रकाश बच्छावसमितीचे सदस्य उपस्थित होते.

          मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या हक्काला कोणतीही बाधा न होऊ देता. अटी आणि शर्तीच्या अधिन राहूनया ग्रंथांचे पुनर्मुद्रण करण्यात येणार आहे. तसेच पुनर्मुद्रण करताना कोणताही बदल न करता आहे तसे पुनर्मुद्रण करण्यास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.


जळगावमध्ये राज्यातील पहिला जल पर्यटन महोत्सव पर्यटनमंत्री

 जळगावमध्ये राज्यातील पहिला जल पर्यटन महोत्सव

पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 

          मुंबईदि. १ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) द्वारा आयोजित महाराष्ट्रातील पहिला एमटीडीसी अॅक्वाफेस्ट २०२४ येत्या २ ते ४ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मेहरूण तलावगणेश घाटजळगाव येथे होणार आहे. या अनोखा महोत्सवाचे २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. एमटीडीसीद्वारे आयोजित हा जलक्रीडा महोत्सव जळगाव शहरातल्या नागरिकांना जल पर्यटनाचा थरारक आणि अनोखा अनुभव अगदी परवडणाऱ्या दरात देणार आहे.

               एमटीडीसी अॅक्वाफेस्ट २०२४ हा फक्त एक महोत्सव नसून तरुणांमध्ये साहसी क्रीडांविषयी आवड निर्माण करणे आणि जलसंपत्तीचे संवर्धन व जलसुरक्षेचे महत्व पटवून देणे हा आहे. पर्यटन सचिव जयश्री भोज व  महाराष्ट्र पर्यटन  विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मपविम ॲक्वाफेस्ट  (MTDC Aqua Fest) चा पहिला महोत्सव जळगाव येथे होत आहे.बोट सफारीसुपर फास्ट जेट स्की राईड्स,सेलिंग बोट,कयाकिंग,फ्लाइंग फिश राईड,बनाना राईड,बंपर राईड,वॉटर झोर्बिंग,इलेक्ट्रिक शिकारा राईड,स्कूबा डायविंग अशा विविध राईडसचा जळगावकरांना आनंद घेता येणार आहे.  

          एमटीडीसीच्या या प्रकल्पामुळे फक्त पर्यटनच नव्हे तर स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. एमटीडीसीने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये एमटीडीसी अॅक्वाफेस्ट आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या मालिकेतील पहिला जलक्रीडा महोत्सव जळगावमध्ये होणार आहे.तिकीट आणि अधिक माहितीसाठी एमटीडीसी च्या अधिकृत समाजमाध्यमांवर तसेच रोहित अहिरेमो. 9769165872 व निलेश काथारमो.9421306870 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन एमटीडीसीने केले आहे. हा उपक्रम महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वालप्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाणसल्लागार सारंग कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली हा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.

          पर्यटन विभागातंर्गत एमटीडीसी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देत आहे. एमटीडीसी नाशिक बोट क्लबगणपतीपुळे बोट क्लब आणि भारतातील सर्वात मोठे स्कूबा डायविंग प्रशिक्षण केंद्र, IISDA (Indian Institute of Scuba Diving and Aquatic Sports) ही जलपर्यटन आकर्षण लोकप्रिय होत आहेत.गोसेखुर्द (भंडारा व नागपूर)कोयना (सातारा)पेंच (नागपूर)उजनी (सोलापूर) या ठिकाणी जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करणार आहे. या प्रकल्पांचा उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये पर्यटनाचा विकास करणे आणि ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हा आहे. या उपक्रमामुळे जल पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशभरात अग्रगण्य राज्य म्हणून नावारूपाला येईल.

फलटण जलजीवन मिशनच्या कामासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा -

 फलटण जलजीवन मिशनच्या कामासाठी

सुधारित प्रस्ताव सादर करावा

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

          मुंबईदि. १ :- जल जीवन मिशन अंतर्गत सातारा जिल्ह्यातील फलटण येथील 'हर घर जल योजने साठी होणाऱ्या कामाचे सुधारित प्रस्ताव सादर करण्यात यावेअसे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

            मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत कामांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरआमदार दीपक चव्हाणपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाराज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रनमाजिप्रचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह जल जीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी उपस्थित होते.

          पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले की, 'हर घर जलअंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या नवीन नळ जोडणीची तरतूद आहे. यामध्ये जुन्या नळ जोडणी बदलण्यास मान्यता नाहीअशी आवश्यकता भासल्यास यासाठी संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मार्फत निधी तरतूद करून कार्यवाही करण्यात येतेअसे पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

          जल जीवन मिशनच्या माध्यमातून होणाऱ्या कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. तसेच पावसामुळे सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी अतिरिक्त उपाययोजना करण्याची गरज भासत आहेया कामांच्या अनुषंगाने वाढ होत असलेल्या खर्चाच्या मागणीसह प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले. पुढील तरतुदीची नियोजन व वित्त विभागाने गतीने कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास २ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास २ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 

         मुंबई, दि. १  : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवारांना २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावाअसे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

 

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्जआधार कार्डपदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला)उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावापासपोर्ट आकाराचा फोटोहमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.

0000

Featured post

Lakshvedhi