Tuesday, 1 October 2024

अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा आनंदराव अडसूळ यांनी पदभार स्वीकारला

 अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा

आनंदराव अडसूळ यांनी पदभार स्वीकारला

 

             मुंबईदि. १ : माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.अडसूळ यांनी अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.

   अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्षपदी धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती तर गोरक्षक लोखंडे आणि वैदेही वाढाण यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्यांनीही आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अशी माहिती, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने कळविले आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून आढावा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून आढावा

 

            मुंबईदि. १ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी

घेतला.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक श्री. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती.

            या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरमुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळेबार्टीचे महासंचालक सुनिल वारेसामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुलमहापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे  तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

          केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले कीचैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नयेयासाठी मुंबई महापालिकागृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी.

            चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायींना उच्च दर्जाच्या सुविधा पुरवाव्यातअशा सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या.

            चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्ककडे येणारे रस्ते व त्यावरील वाहतुकीचे नियंत्रणसुरक्षाव्यवस्थाअनुयायांकरीता पिण्याचे पाणीशौचालय आदींची सुविधापरिसर स्वच्छतासीसीटीव्हीची व्यवस्थाविद्युतव्यवस्थाभोजन व्यवस्थाआरोग्य सुविधा याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची सादरीकरणाद्वारे माहिती यावेळी देण्यात आली.

*****

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभातून बँकांचा सेवा शुल्क कपात केला तर कारवाई करणार

 मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभातून

बँकांचा सेवा शुल्क कपात केला तर कारवाई करणार

- मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १ : मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे.या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्सईसीएस मँडेट रिटर्नचेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईलअसे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) घेण्यात आली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवएकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे,सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सिडींग नसल्याने लाभ मिळत नाही.याबाबत अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या मदतीने दि. २ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी. बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात, अशा सूचनाही मंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत उपस्थित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना दिल्या.

नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्षात अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि पुरुषांचे आधार क्रमांक, अकाउंट नंबर दिले गेले त्यामुळे पुरुषांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून ज्या केंद्रांवर हे अर्ज भरलेगेले त्या केंद्र चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

आतापर्यंत २ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी झाली असून १ कोटी ८७ लाख पात्र महिलांना  लाभ देण्यात आला आहे. उर्वरित अर्जांची पडताळणी तातडीने करून घ्यावी, अशा सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी दिल्या.

विटा बसस्थानक पुनर्बांधणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

 विटा बसस्थानक पुनर्बांधणीचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

 

          सांगली दि. १ : विटा येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

          सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये १८ फलाटाची निर्मिती करण्यात येणार आहे. सर्व बांधकाम हे आरसीसी स्वरूपात करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये उपाहारगृहदुकानगाळेसंरक्षित भिंत तसेच प्रवेशद्वार त्याचबरोबर बसस्थानकाच्या अंतर्गत भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

          या अद्ययावत बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे लोकांना अत्याधुनिक सोयी – सुविधांयुक्त बसस्थानक मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडेराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईखासदार धैर्यशील मानेआमदार शहाजी बापू पाटीलजिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसेमनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्तापोलीस अधीक्षक संदीप घुगेमाजी जि. प. सदस्य सुहास बाबरअमोल बाबरआनंदराव पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

आहोत_आम्ही_पुण्यवान

 #आहोत_आम्ही_पुण्यवान


एका बातमीवर नजर पडली - आपल्या सर्वांच्याच आवडत्या - the most famous - Switzerland - स्वित्झर्लंड मध्ये आत्महत्येला सहाय्य करणारे - suicide pods बनवले गेले आहेत आणि त्या पॉड मध्ये जाऊन आत्महत्या करण्यासाठी म्हणे "waiting list" आहे. ज्या वेस्टर्न जगाची, तिथल्या राहाणीमानाची भूल पाडून आपल्याला आपल्या धर्मापासून दूर केले गेले, तिथे ही अवस्था?आत्महत्या करायला रांग? आणि कुपन्स? आपसूक उद्गार निघाले - मी भारतात जन्मले, हो आहेच मी भाग्यवान! In this land, every birth and every death counts! 


त्याच आठवड्यात एका लग्नाच्या मीटिंग साठी ओपंडित (म्हणजे ओव्हर्सिज भटजी/पंडित) कडून गेले होते. मुलगी मराठी आणि मुलगा अमेरिकन. लग्न विधी समजावून सांगताना त्याला मी विचारले - तुझे पालक? म्हणतो - I have no idea, i haven't spoken with my parents for 12 odd years :O 

मी त्याला विचारले - don't you feel lonely? त्याने प्रामाणिकपणे उत्तर दिले - I do... I miss them. Then I drink and then I am okay. I want to change this and hence I decided to get married to an Indian woman. I envy you guys... मी कसंनुसं जराशी हसले - मनात तेच शब्द, तेच वाक्य - होय, होय आहोतच आम्ही भाग्यवान, पुण्यवान...


न मागता मिळालेले सुख म्हणजे भारतात जन्म! त्यातही हिंदु कुटुंबात जन्म! त्यातही धार्मिक भगवंतावर विश्वास असणाऱ्या कुटुंबात जन्म!


"सर्वेपि सुखिन: सन्तु |" अशी मागणी करणारा आपला धर्म! 

Hindus seek out life not destroy it. Hindus are the the only people who have never invaded any land. We live in perfect harmony with nature.


आपले अकरावे इंद्रिय - मन. हे मन जे आपल्या सर्व आयुष्याला आकार देते त्यावर सर्वात जास्त संस्कार करणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म.


"मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथीदेवो भव|" - ह्या मूल्यांवर आधारित आपली संस्कृती व धर्म!


प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जर कुठली संस्कृती देऊ शकते तर ती आहे वैदिक सनातन आर्य हिंदु संस्कृती!


जीवन तर धन्य कराच पण मृत्यूही धन्य करा अशी शिकवण देणारी आपली संस्कृती!


प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक पंथात - मनाला बळकटी देणारे अध्यात्मिक ज्ञान, संत वाङ्मय, उपासना - म्हणजे भारत देश!


"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" - असे सांगणारे स्वामी समर्थ...

"समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?" किंवा "आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो"- असे मनोबल वाढवणारे समर्थ रामदास स्वामी...

"शिवछत्रपती राजा महाराष्ट्राचा अवतार महादेवाचा" - हिंदु साम्राज्य प्रस्थापित करणारे राजे... 


अगणित उदाहरणे, अगणित संदेश पण उद्देश्य एकच - बाबारे, 84 लाख योनिंमधून प्रवास करून मिळालेला मनुष्य जन्म धन्य कर.


तू कुठल्याही वर्णात असशील, तू कुठल्याही आश्रमात असशील, तू श्रीमंत असशील, गरीब असशील, तू आंधळा असशील, पांगळा असशील, तरी हा मनुष्य जन्म धन्य कर. अध्यात्मिक व पारमार्थिक प्रगती कर!

अशी शिकवण देणारी आपली संस्कृती, अशा भारत देशात आम्ही जन्मलो... 

एक अक्खा जन्म कमी पडेल एवढे ज्ञान ह्या भूमीने आम्हाला दिले...


होय! आहोतच आम्ही पुण्यवान, आहोतच आम्ही भाग्यवान! 


--- 

*मृदुला बर्वे, ओपंडित*



https://www.facebook.com/aparna.kalyani.58


डॅा अपर्णाताई कल्याणी यांच्या FB Wall वरुन साभार

कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू

 कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू

          राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंजूरी देण्यात आली.

          राज्यातील १२ हजार ७९३ कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना मिळणाऱ्या १५ हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल. सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजारअपघात यामुळे असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासही मंजूरी देण्यात आली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालक मंडळाची विविध बाबींना मान्यता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालक मंडळाची विविध बाबींना मान्यता

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 

मुंबईदि. ३० :-  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विविध बाबींना मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाणी पुरवठा योजना नफ्यात येण्यासाठी प्रयत्न केले जावेतअशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत आज देण्यात आल्या.

       मंत्रालयातील परिषद सभागृहात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालक मंडळाचे बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाराज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन यांच्यासह मजिप्राच्या दिपाली देशपांडेस्वच्छता मिशनजल जीवन मिशनमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानाची आयोजित आढावा बैठक झाली.

        बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या तयारीतील कामांचा नियोजन आराखडापाणीपुरवठा योजनातील कामेप्रशासकीय मान्यतानिधी मंजुरीमंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येणारे विविध प्रस्ताव या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

          महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी विविध योजना तयार केल्या जातात व नंतर जिल्हा परिषदेस हस्तांतरित केल्या जातात. विविध पाणीपुरवठा योजना नफ्यात  येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पाणी बिलांची वसुली वेळेत होण्याची गरज असून पाणी पट्टी बिलाचे शुल्क भरले जात नसल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठा योजनांवर होतो. या अनुषंगाने चर्चा झाली. यावेळी संचालक मंडळांनी सादर केलेल्या विविध बाबींना पाणीपुरवठा मंत्री श्री पाटील यांनी मान्यता दिली.


Featured post

Lakshvedhi