Monday, 2 September 2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयाने सामुदायिक आरोग्य शिबिरांचा जागर 25 हजार शिबिरांच्या माध्यमातून सुमारे 40 लक्ष नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष

  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयाने
  सामुदायिक आरोग्य शिबिरांचा जागर

25 हजार शिबिरांच्या माध्यमातून सुमारे 40 लक्ष नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष

 

मुंबई, दि. 02 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाअंतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयातून राज्यभर सामुदायिक आरोग्य शिबिरांचा जागर करण्यात येणार असून ही शिबिरे 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. राज्यात सर्वदूर आरोग्य सेवा पोहचविण्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निरामय सेवा फाऊंडेशन, धर्मादाय रुग्णालये यांचे सहकार्य या शिबिरांच्या आयोजनासाठी मिळणार आहे. या सामाजिक आरोग्य शिबिरामध्ये विविध धर्मादाय संस्था (NGOs), मेडीकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नीत खाजगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यार्थी, महात्मा जोतिबा फुले जन – आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असणार आहे.

सामाजिक आरोग्य शिबिरांचे आज प्रायोगीक तत्वावर घाटकोपर येथून उद्घाटन करण्यात आले. तसेच जळगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील शिबिरांचे आयोजनही करण्यात आले. या शिबिरांमध्ये नागरीकांचे स्क्रिनींग करणे, रक्तांच्या तपासण्या, ई.सी.जी तपासण्या, आयुष्मान भारत (आभा कार्ड)  योजनेचे कार्ड वाटप, आवश्यक औषधांचे वाटप, रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनाच्या माध्यमातून उपचाराकरिता समन्वय करण्यात येणार आहे.  तसेच शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजनांची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे.

  तपासण्यांमध्ये रोगाचे निदान झाल्यास आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया किंवा पुढील उपचारासाठी  शासनाच्या धर्मादाय रुग्ण योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून मोफत उपचारासाठी समन्वय करण्यात येईल. शिबिरांमध्ये सर्व तपासण्या विनामूल्य असणार आहेत.  ही शिबिरे सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या वेळेत आयोजित होतील. एका सामुदायिक आरोग्य शिबीरात 100 ते 250  नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सुमारे 25 हजार शिबिरे व 40 लक्ष नागरीकांच्या तपासण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

निदान झालेल्या रुग्णांवर  आवश्यकतेनुसार धर्मादाय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, विविध शासकीय योजना यांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार आहे. शिबिराचे स्थान दलित वस्ती, आदिवासी पाडे, भटक्या जमातीच्या वस्त्या यांच्याजवळील शाळा, समाजमंदिर अशा सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये सुमारे 1500 रुग्णालयांचा समावेश राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांच्या वैद्यकीय कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

0000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड साठ हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड

साठ हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू

- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मुंबई, दि. 2 : शासनाच्या महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत राज्यात एक लाख 10 हजार प्रशिक्षणार्थांना प्रशिक्षणासाठी रुजु होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमधे प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या योजनेमार्फत १० लाख युवकांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

      मंत्री श्री. लोढा म्हणाले की, भविष्यातील रोजगाराची आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देऊन, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' ही राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये सरकारी तसेच खासगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी 8 हजार 170 आस्थापनांनी नोंदणी केली आहे. तसेच 2 लाख 21 हजार 244 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली आहे.

'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. या योजनेला फक्त शहरी विभागातच नाही तर ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागवार या योजनेचा आढावा घेताना छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर अमरावती विभागाने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. जिल्हावार विचार करता धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पाच हजार युवा रुजू झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन १० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळणार आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

या योजनेतून महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. ही योजना वर्षभर सुरु राहणार असून या योजनेमार्फत १० लाख युवकांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वसमावेशक अशी ही योजना शासनाने युवकांसाठी आणली असून युवकांनी आणि उद्योगांनी देखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

मौत के कितने करिब आ गये हुं


 

Sunday, 1 September 2024

राज्यपालांच्या हस्ते ५० युवा नादस्वरम वादकांना शिष्यवृत्ती प्रदान

 राज्यपालांच्या हस्ते ५० युवा नादस्वरम वादकांना शिष्यवृत्ती प्रदान

 

प्रसिद्ध नादस्वरम वादक शेषमपट्टी शिवलिंगम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित


        मुंबई, दि. 01 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते देशातील ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. श्री षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभेने षण्मुखानंद सभागृह येथे रविवारी (दि. १) आयोजित केलेल्या 'नादस्वर उत्सव' या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते युवा व होतकरू नादस्वरम वादकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. सभेतर्फे ही शिष्यवृत्ती तीन वर्षे देण्यात येणार आहे.
           राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रसिद्ध नादस्वर वादक शेषमपट्टी श्री टी शिवलिंगम यांना श्री षण्मुखानंद नादस्वरम चक्रवर्ती संगीत कला विभूषण जीवन गौरव पुरस्कार 
 प्रदान करण्यात आला. अडीच लाख रुपये रोख, सुवर्ण लेपित कांस्याचा दिवा, नादस्वरम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
         कार्यक्रमाला षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष डॉ व्ही शंकर, उपाध्यक्ष डॉ व्ही रंगराज, शेषमपट्टी श्री टी. 
 शिवलिंगम आणि श्रीराम फायनान्सचे उपाध्यक्ष उमेश रेवणकर उपस्थित होते.
        इलेक्‍ट्रॉनिक स्वरवाद्यांच्या वाढत्या प्रसारामुळे नादस्वरम हे ध्वनी वाद्य हळुहळू विलुप्त होत आहे. या वाद्याच्या जतनासाठी सभेतर्फे ५० नादस्वर कलाकारांना चक्रवर्ती टी एन राजा रथिनम पिल्लई फेलोशिप देण्यात येते.
                                                              000

Preserving legacy of a musical instrument

Maharashtra Governor presents Fellowship to 50 young Nadaswaram musicians

Well known Nadaswaram exponent Seshampatti Sivalingam given Lifetime Achievement Award


      
Mumbai, dt. 01: Maharashtra Governor C P Radhakrishnan presented the fellowship grant of Rs.1 lakh each to 50 young Nadaswaram musicians at the Nadaswara Thiruvizha programme organised by the Sri Shanmukhananda Fine Arts & Sangeetha Sabha at Shanmukhananda Auditorium in Mumbai on Sun (1 Sept).
       The Governor presented the Sangeetha Kala Vibhushan Lifetime Achievement  Award to veteran Nadaswaram exponent Seshampatti Sri T. Sivalingam. The award carries a cash prize of Rs.2.5 lakh, a gold coated lamp, a Nadaswaram and a citation.
           President of the Sabha Dr V Shankar, Vice President Dr V Rangaraj, Seshampatti T Sivalingam and Vice President of Shriram Finance Umesh Revankar were present.
          According to Dr V Shankar, Nadaswaram, a non-brass acoustic instrument is slowly slipping into a dying art. The Sabha gives Sri Shanmukhananda Nadaswara Chakravarthi T N Raja Rathinam Pillai Fellowship in Nadaswaram to 50 young and promising Nadaswarm musicians with a view to preserve the musical instrument and support its musicians. The fellowship of Rs. 1 lakh is given for three years.

                                  000


राज्यातील द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न व समस्या केंद्र आणि राज्याच्या समन्वयातून सोडवणार


 

राज्यातील द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न व समस्या

केंद्र आणि राज्याच्या समन्वयातून सोडवणार

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला विश्वास

 

मुंबईदि. 31 :- द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाणा पिकाचा समावेश कृषीमालाच्या यादीत करण्यासंदर्भात नाबार्डसह अन्य संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बेदाण्यावरील पाच टक्के जीएसटी रद्द व्हावा, यासाठी पूर्वप्रक्रिया पूर्ण करुन केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र लिहिण्यात येईल. अवेळी पाऊसगारपीटनैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी द्राक्ष व फळबागांनाही प्लास्टीक आच्छादनांसाठी अनुदान मिळावे यासाठी राष्ट्रीय हॉर्टीकल्चर बोर्डाकडे मागणी करण्यात येईलयासारखे  अनेक निर्णय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.30) मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आले. बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजयऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लाउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा राज्य कर आयुक्त आशीष शर्माकृषी विभागाच्या सचिव जयश्री भोजकृषी आयुक्त रविंद्र बिनवडेमहाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसलेराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉ. अजयकुमार शर्माराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वैज्ञानिक डॉ. प्रशांत निकुंबेअपेडाचे उपमहाव्यवस्थापक प्रशांत वाघमारे आदींसह राज्याच्या विविध भागातून आलेले द्राक्ष उत्पादक बागायतदार संघाचे पदाधिकारीप्रतिनिधीसदस्य उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीद्राक्षापासून बेदाणा तयार होताना कुठलीही यांत्रिकी पद्धत वापरली जात नाही. केवळ सूर्यप्रकाशात वाळवून बेदाणा तयार होतो. त्यामुळे बेदाणा प्रक्रियायुक्त पदार्थ नसल्याने हळद आणि गुळाप्रमाणेच त्याचा समावेशही शेतीमाल म्हणून होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नाबार्ड व अन्य संबंधित यंत्रणांची बैठक आयोजित करुन बेदाण्याला शेतीमालाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात यावा. हा निर्णय झाल्यानंतर बेदाण्याला शेतीमाल म्हणून जीएसटीतून सवलतअवेळी पाऊसगारपीटनैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाईशेतीमाल म्हणून विविध संस्थांकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळणे सोपे होईल. त्यामुळे बेदाण्याचा समावेश शेतीमालाच्या यादीत करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. 

बेदाण्यावरील पाच टक्के जीएसटी रद्द करण्याची मागणीसंदर्भात आवश्यक पूर्वप्रक्रिया पूर्ण करुन केंद्रीय जीएसटी कौन्सिलकडे त्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठविण्यात येईल. तसेच त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. अवेळी पाऊसगारपीटनैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी द्राक्षासह फळबागांनाही प्लॅस्टीक आच्छादनांसाठी अनुदान मिळावे यासाठी राष्ट्रीय हॉर्टीकल्चरल बोर्डाला पत्र पाठवण्यात येईल. द्राक्षांसाठीच्या कोल्ड स्टोरेजसाठी सोलार पॅनल अनुदानातून उपलब्ध करुन देण्यासाठी मॅग्नेट प्रकल्पाच्या धर्तीवर काय करता येईलयाचा अहवाल करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पणन विभागाला दिले. 

नाशिक येथील बेदाणा क्लस्टरसाठी जिल्हा उद्योग केंद्राने घातलेल्या अटी शिथिल करण्याबाबत उद्योग विभागाने त्वरित कार्यवाही करावीअसे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. द्राक्षांसाठी अमेरिका व इतर देशांची बाजारपेठ खुली करण्यासाठी अपेडामार्फत प्रयत्न करण्यात येतील. ठिंबक सिंचनाच्या अनुदानासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनांना अर्थ संकल्पामध्ये केलेल्या तरतुदीनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करुन केंद्रस्तरावरील  द्राक्षबायातदरांचे प्रश्न सोडविले जातील. द्राक्षपिकासाठी वीज सवलतविमा संरक्षणविविध संस्थांचे अनुदान आदी मागण्यांसंदर्भात केंद्र व राज्याच्या संबंधीत यंत्रणांच्या माध्यमातून मार्ग काढण्यात येईलअसा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत राज्यातील द्राक्ष बागायतदारांना दिला.   

पर्यटनच्या नवीन धोरणातून रोजगार निर्मितीसह विविध क्षेत्राची होणार भरभराट

 पर्यटनच्या नवीन धोरणातून रोजगार निर्मितीसह विविध क्षेत्राची होणार भरभराट

पर्यटन मंत्री गिरीश महाजन

  

नागपूर दि.31 राज्य शासनाच्या नवीन पर्यटन धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पर्यटन क्षेत्र उंच भरारी घेण्यासाठी सज्ज असून या क्षेत्रात उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले.

खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तर्फे आयोजित पर्यटन धोरण-2024 अॅडव्हांटेज विदर्भ कॉनक्लेव्हचे आयोजन येथील दक्षिण मेट्रो एअरपोर्ट स्टेशनच्या सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन मार्गदर्शन करत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाईपेंच प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्लाअसोसिएशनचे पदाधिकारी आशिष काळे व गिरीधर मंत्री उपस्थित होते.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, महाराष्ट्राला देशातच नव्हे तर जगातील सर्वोतम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचे आहे. यासाठी सर्वांना सोबत घेवून तसेच प्रत्येक बाबींचा सर्वकष विचार करून राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन पर्यटन धोरण आणले आहे. यातून राज्यात लाख कोटी गुंतवणुकीची व त्यासोबतच 18 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. यासाठी राज्यात विविध ठिकाणी पर्यटन महोत्सव आयोजित करून पर्यटकांना आकर्षित करण्यात येणार आहे.  विविध परिषदांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

पर्यटन धोरणातून विविध वित्तीय प्रोत्साहन व पुरस्कार देण्यात येत आहेत. यात भांडवली गुंतवणूकव्याज अनुदानविद्युत देयकस्टँम्प ड्युटीइको टुरिझममहिला उद्योजकग्रामीण पर्यटन संस्था आदी विविध बाबींवर सुट व प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. रस्ते व दळणवळणाची साधने पर्यटनवाढीसाठी आवश्यक आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशांतर्गत चांगले रस्ते निर्माण करून पर्यटनाला चालना दिली असल्याचे ते म्हणाले. विदर्भाला निसर्गाचा वरदहस्त लाभला असून येथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पर्यटन स्थळे, गडकिल्लेपूरातन मंदिरे आणि वने व वन्य पशू पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. विदर्भात पर्यटन वाढीसाठी गुंतवणूक करून सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशातील सर्वोत्तम पर्यटन धोरण -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

महाराष्ट्राने देशातील सर्वोत्तम पर्यटन धोरण आणल्याबद्दल पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले. पर्यटनातून विदर्भात समृद्धी व रोजगार निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून अभिनव पद्धतीने नवनवीन कल्पकतेच्या माध्यमातून पर्यटनाचा विकास करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. येणारा काळ पर्यटन उद्योगाचा असून पर्यटन धोरणातील वित्तीय प्रोत्साहनामुळे पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी आता स्काय इज द लिमिट’ प्रमाणे अमर्याद संधी उपलब्ध झाल्या आहेत. रिसोर्ट व हॉटेल चालकांनी स्वच्छता व गुणवत्तापूर्ण सेवा आणि त्यासोबतच पार्किंग व पंचतारांकित टॉयलेट उभारण्यास प्राधाण्य द्यावे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाला संबंधीत अधिकारीपर्यटन व हॉटेल क्षेत्रातीत संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

 


मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने राज्यातील महिलांसाठी 'हर घर दुर्गा अभियान' राज्यातील ITI मध्ये घेतला जाणार आत्मसंरक्षणाचा वर्ग

 मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने राज्यातील महिलांसाठी 'हर घर दुर्गा अभियान'

 

राज्यातील ITI मध्ये घेतला जाणार आत्मसंरक्षणाचा वर्ग

 

मुंबईदि. 31 : आता 'हर घर दुर्गा' अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असतेत्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी सुद्धा राखीव तासिका असाव्यात, यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यातूनच 'हर घर दुर्गा' या अभियानाची संकल्पना उदयास आली. 

 

शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटेजुडो यासारख्या स्वरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी  2 तासिका घेण्यात येणार असूनत्याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांना देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक परिसरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार असूनविद्यार्थीनींना नियमित सरावासाठी उद्युक्त करण्यात येणार आहे. याद्वारे मुलींचे शारीरिक बळ वाढेलत्यांचा आत्मविश्वास वाढेल सोबतच त्यांचे मानसिक स्वास्थ सुद्धा सुधारेल. 

 

याबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली महाराष्ट्राची भूमी आहे. आजवर दुर्गारूपाने असंख्य महिलांनी या भूमीच्या संरक्षणासाठीप्रगतीसाठी योगदान दिले. त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा! आज याच महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी, या उद्देशाने 'घर घर दुर्गा अभियानसुरु करत आहोत. माझे महाराष्ट्रातील विद्यार्थीनींना जाहीर आवाहन आहे की त्यांनी या तासिकांचा पुरेपूर लाभ घ्यावा. 

****

Featured post

Lakshvedhi