Tuesday, 20 August 2024

उद्योगांकरिता एमआयडीसीला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करावे

 उद्योगांकरिता एमआयडीसीला अतिरिक्त पाणी

उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करावे

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. १९ :- मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात विविध उद्योग समूह गुंतवणूक करीत आहेत. या उद्योगांना आवश्यक असणारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) मागणी विचारात घेऊन जलसंपदा विभागाने विविध प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्याचे सर्वेक्षण करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            उद्योगांकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमधून अतिरिक्त पाणी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. उद्योग मंत्री उदय सामंतजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरउद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळेजलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरेकोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीमुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात अनेक उद्योगसमूह गुंतवणूक करीत आहेत. या उद्योगांसाठी पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने पाण्याची उपलब्धता विचारात घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात विविध पाटबंधारे प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे सर्वेक्षण करून त्याचे नियोजन करावे.

            उद्योगमंत्री श्री.सामंत यांनी विविध प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्याचे सविस्तर सर्वेक्षण करून ते उच्चाधिकार समितीसमोर मांडण्याची त्याचप्रमाणे पाण्याचा प्रकल्पक्षेत्र निहाय वापर लक्षात घेऊन आरक्षणाबाबत व्यावहारिक निर्णय घेण्याची सूचना केली.

            उद्योगांची भविष्यातील गरज लक्षात घेऊन बारवीराजनाला बंधारापाताळगंगासूर्याभातसा उपसा सिंचन आदी प्रकल्पांमधून अतिरिक्त पाणी मिळावेअशी मागणी उद्योग विभागामार्फत यावेळी करण्यात आली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

000

राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी २८ व २९ ऑगस्ट रोजी मुलाखत

 राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी

२८ व २९ ऑगस्ट रोजी मुलाखत

 

          मुंबईदि.२० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा२०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती  २८ व २९ ऑगस्ट२०२४ रोजी सकाळी  ८.३० वा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील  सीबीडी बेलापूर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

 

            मुलाखतीस अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखतीसाठी विहित दिनांकास व विहित वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय, ११ वा मजलात्रिशुल गोल्ड फिल्डप्लॉट क्रं. ३४सरोवर विहार समोरसेक्टर ११सीबीडी बेलापूरनवी मुंबई-४००६१४ येथे  उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

            सही व शिक्क्यासह प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र मुलाखतीच्यावेळी सादर करणे अनिवार्य आहे.  विहित नमुन्यातील सर्व मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी सादर करणे आवश्यक असूनमूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच कागदपत्रे सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार

 बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल

आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार

 

मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

 

            मुंबई दि. २०: बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईलयासाठी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली.  तसेच शाळांमध्ये सखी सावित्री समित्या स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले.    

 

            बदलापूर पूर्वमधील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तातडीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यास सांगितले.  विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा पाठपुरावा करून त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे.

 

             विद्यार्थिनींना संशय आल्यास संबंधित व्यक्तीस न घाबरता तातडीने प्राचार्यमुख्याध्यापक किंवा शिक्षकांना निदर्शनास आणून देता आले पाहिजे अशी यंत्रणा हवी.  सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी चर्चा करून योग्य ती काळजी घ्यावी. जर संस्थाचालकांची चूक असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.

Monday, 19 August 2024

राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

 राज्यात कायदा-सुव्यवस्थासामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

 

            मुंबईदि. 18 : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांनी सर्व समाज घटकांना शांतता राखण्याचे आणि आगामी सण व उत्सव एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक शहरातील काही भागांमध्ये काल निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती आटोक्यात आली असली तरी अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमहाराष्ट्र हे सामाजिक सलोख्याचे राज्य आहे. राज्याच्या या समृद्ध परंपरेला धक्का लावणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. कोणत्याही समाज घटकाने कायदा हातात घेऊ नये. काही समस्या असल्यास त्या संवादाच्या माध्यमातून सोडविण्यात याव्यात. येत्या काळात विविध सण येत असून या सर्व उत्सवांमध्ये सर्व समाजांनी सहभागी होऊन ते आनंदाने साजरे करावेतअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आपले सण हे आपल्या सांस्कृतिक वैविध्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे प्रत्येक समुदायाने इतरांच्या भावना लक्षात घेऊन आपले सण साजरे करावेतअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तअधीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून कोणतीही अफवा किंवा खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर देखील कडक नजर ठेवली जात असूनसमाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्सवर त्वरित कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना एकजुटीने राहण्याचे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

000000


 

मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करावी

 मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करावी

जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन

 

            मुंबई,दि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात 6 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  दि. 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या व मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव न नोंदविलेल्या नागरिकांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावाअसे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी  संजय यादव यांनी केले आहे.

विशेष मोहीमेत  दि. 20 ऑगस्ट पर्यत नागरिकांनी  मतदार नोंदणी करावी

            दि. 1 जुलै 2024  या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (2) मुंबई शहर  जिल्ह्यातील  विधानसभा मतदारसंघात  विशेष मोहीमेव्दारे राबविण्यात  येत आहे. प्रारूप यादीमध्ये मतदारांनी आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच मतदारांनी आपले नावपत्तालिंगजन्म दिनांकवयओळखपत्र क्रमांकमतदारसंघ इत्यादी तपशील देखील अचूक असल्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे. 

            दि. 1 जुलै 2024 रोजी किंवा त्याआधी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच ज्या मतदारांची नावे वगळली गेलेली आहेत अथवा ज्यांची नावे मतदार यादी मध्ये नाहीत अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक 6 भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत.तसेच मयतकायमस्वरूपी स्थलांतरित यांची नाव वगळणी करिता नमुना -7,  पत्ता बदल करण्याकरिता नमुना 8 भरावा हे अर्ज आपल्या घराजवळील मतदार नोंदणी  अधिकारीविधानसभा निवडणूक कार्यालयात उपलब्ध आहेत.  त्याच कार्यालयात अर्ज भरून जमा करायचे आहेत.

            तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावीआणि अधिक माहितीसाठी  हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधावा.असेही जिल्हाधिकारी संजय  यादव यांनी सांगितले.

परळीत 21 ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव, कृषी, पशु प्रदर्शनासह शेतकरी उपयोगी अनेक उपक्रमांचे आयोजन - कृषी मंत्री धनंजय मुंडे

  

परळीत 21 ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सवकृषीपशु प्रदर्शनासह शेतकरी उपयोगी अनेक उपक्रमांचे आयोजन - कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई दि. 18 – राज्याच्या कृषी विभागातर्फे येत्या 21 ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 

            राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लावलेले नवनवीन शोधविविध आधुनिक उपकरणे खरेदी करता यावेशासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच विविध उत्पादने यांची माहिती मिळावी या दृष्टीने महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवाचे उद्घाटन 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या हस्ते होणार आहे. 

            या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने विविध आधुनिक यंत्र सामुग्रीड्रोन फवारणीची प्रात्यक्षिकेनवनवीन संशोधनचर्चासत्रे तसेच विविध उत्पादनेपशूंच्या विविध प्रजाती यांसह अनेक कृषी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.

मुंडेंकडून तयारीचा आढावा व पाहणी

            मंत्री श्री. मुंडे यांनी  परळी येथील शासकीय विश्रामगृहात  कृषी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटीलकृषी विभागाचे सह संचालक श्री. दिवेकरश्री. मोटेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे  , तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यासह कृषीमहसूल पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

             परळी शहरातील बाजार समिती मैदानावर सुरु असलेल्या  कृषी महोत्सवाच्या तयारीची  मंत्री श्री. मुंडे यांनी पाहणी केली.  मुख्य कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेला मंडपआसन व्यवस्थात्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेले शेकडो स्टॉल्सपार्किंग व्यवस्थाभोजन व्यवस्थासुरक्षा आदी सर्व बाबींची पाहणी करून सर्व व्यवस्थापन चोखपणे करण्याचे निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी  दिले .

00000

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा

पन्नास हजार महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न


            सातारा दि.18 (जिमाका) :   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वकांक्षी व क्रांतिकारी योजना असून ही लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईलअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीणींना दिली.


            सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळयाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.  या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाईमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलकृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदेआमदार सर्वश्री. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेमकरंद पाटीलजयकुमार गोरेदिपक चव्हाण आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमहिला जोपर्यंत सशक्त होत नाही तोपर्यत अर्थव्यवस्था बळकट होत नाही. महिलांना पैसे कुठे कसे खर्च करावे ते चांगले कळते. 
 या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करुन महिला लहान मोठे उद्योग सुरु करतील.  राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही योजना कायमस्वरुपी सुरु ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नाही. दरमहा हजार 500 रुपयांची रक्कम वाढत जावून टप्या-टप्यापर्यंत हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल. शासन बहिणींसाठी हक्काचे माहेर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ही ओवाळणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी मुख्यमंत्री म्हणालेमाझी ताई कष्ट करतेशेतात राबते याची आम्हांला जाणीव आहेअशा कष्टकरी बहीणींसाठी ही योजना सुरु करण्यात आली असून आत्तापर्यंत राज्यात कोटी बहीणींच्या खात्यात हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. 
 शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.  महिला बचत गटकौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकत द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे.  ही योजना महिलाना आत्मनिर्भर बनविणारी योजना आहे.  लाडक्या बहिणींबरोबरच शासन युवकशेतकरीकष्टकरीविद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे. त्यासाठी  मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनामुलींना मोफत उच्च शिक्षण योजनामुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनामुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येत आहे.  विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्न करित आहे.


            यावेळी त्यांनी 17 ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिवस म्हणून आपण सर्वांनी साजरा करुया आणि या योजनेचे स्मरण सदैव ठेवूयाअसे आवाहन केले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेविकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षमविकसीत करुन मुख्य प्रवाहात व अर्थकारणात आणावे लागेलअसे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सांगत असतात. 
 त्यातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात शासन महिला केंद्रीत योजना राबवित आहे.  एसटीच्या प्रवास  शुल्कात महिलांना 50 टक्के सूट यासारख्या योजनेमुळे तोट्यात असलेले एसटी महामंडळ नफ्यात आले आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण योजना याबरोबरच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही क्रांतिकारी योजना शासन राबवित आहे. आतापर्यंत कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.  लवकरच आणखी कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.
शेतकऱ्यांचे पुढील पाच वर्षाचे वीज बिल शासन भरणार आहे. 
 12 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करत असून येत्या काळात 12 महिने दिवसा वीज देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.  फडणवीस म्हणालेराज्यासाठी आदर्शवत ठरणारे उपक्रम राबविण्यात सातारा जिल्हा अग्रेसर आहे. पहिले पुस्तकाचे गाव साताऱ्या जिल्ह्यातलेपहिले मधाचे गाव सातारा जिल्ह्यातलेआता पहिले सौर उर्जेचे गाव मान्याचीवाडी होत आहे.  या गावाला त्यामुळे मोफत वीज मिळणार आहे. मान्याचीवाडीप्रमाणे राज्यातील अन्य गावांनीही त्यांचा आदर्श घेऊन गावे सौर उर्जेवर चालणारी करावीत. यावेळी त्यांनी सातारा पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपायोजनांचे कौतुक केले. भरोसा केंद्राचे भूमिपूजनॲटोरिक्षामध्ये क्युआर कोड प्रणालीबसेसमध्ये कॅमेरेमहिलांसाठी हेल्पलाईन या सर्व उपक्रमांबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन केले.


            महिला व बाल विकास मंत्री  आदिती तटकरे म्हणाल्यासातारा जिल्ह्यात लाख 21 हजारापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वांत जास्त ऑनलाईन नोंदणी गतीमान पद्धतीने झाली आहे. 90 टक्क्यापेक्षा अधिक बहिणींना लाभ वितरित झाला आहे. ज्यांचे आधार लिंकींग झाले नाहीत त्यांचे आधार लिकींग करण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या खात्यावरही पैसे जमा होतील. या योजनेत अंगणवाडी सेविकामदतनीसग्रामसेवकडेटा ऑपरेटर यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.


            प्रास्ताविकात पालकमंत्री श्री. देसाई म्हणालेमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम सातारा जिल्ह्यात जुलै पासून सुरु झाले. पहिल्या पाच दिवसात बहुतांश सर्व अर्ज भरले गेले. 
 घरोघरीशेतावरबांधावरकामाच्या ठिकाणी जावून महिलांकडून अर्ज भरुन घेण्याची संकल्पना प्रथम सातारा जिल्ह्याने सुरु केली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी स्वत: लक्ष घालून या योजनेच्या कामाला अतिशय गती दिली.  अंगणवाडी सेविकामदतनीसआशा वर्कर या सर्वांनीच यामध्ये खूप मेहनत घेतली आहे. बहुतांश महिलांच्या खात्यावर योजनेचे दोन हप्ते जमा झाले आहेत. या योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणी समाधानी झाल्या आहेत. खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सण गोड करण्याचे काम शासनाने केले आहे.


            या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीमुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनपोलीस अधीक्षक समीर शेखअपर जिल्हाधिकारी जीवन गलांडेनिवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटीलसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 
 या कार्यक्रमास जिल्ह्याच्या विविध भागातून पन्नास हजारहून अधिक महिला उपस्थित होत्या.  

0000

Featured post

Lakshvedhi