Friday, 31 May 2024

रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’ कालावधीत सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी

 रेल्वेच्या जम्बो ब्लॉक’ कालावधीत

सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी

 

            मुंबईदि. 31 : मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी 30 मे रोजी मध्यरात्रीपासून 2 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जम्बो ब्लॉकच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

             ही परवानगी मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या टप्पा वाहतुकीस जम्बो ब्लॉक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी असणार आहेअसे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.

००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन




 

        मुंबई, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी उपसचिव रोशनी कदम - पाटील, अश्विनी यमगर, चंद्रशेखर तरंगे, अवर सचिव अशोक नायकवडे, नारायण माने, भरत बिडे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

मलेशियाचे पंतप्रधान भारत भेटीवर येणार असल्याची माहिती मलेशिया राज्याशी व्यापार, पर्यटन, विज्ञान तंत्रज्ञान देवाणघेवाण वाढविण्याबद्दल उत्सुक

 मलेशियाचे पंतप्रधान भारत भेटीवर येणार असल्याची माहिती

मलेशिया राज्याशी व्यापारपर्यटनविज्ञान तंत्रज्ञान देवाणघेवाण वाढविण्याबद्दल उत्सुक



- दातो मुजफ्फर शाह मुस्तफा

            मुंबई, दि. 31 : मलेशिया आणि भारताचे संबंध पूर्वीपासून घनिष्ठ व सहकार्याचे असून येत्या तीन वर्षात उभय देशांमधील व्यापार २० अब्ज डॉलर वरुन २५ अब्ज  डॉलर इतका वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आगामी काळात मलेशिया भारताशी पर्यटनविज्ञान व तंत्रज्ञानक्रीडा व पाम लागवड या क्षेत्रात सहकार्य वाढविणार असून या दृष्टीने महाराष्ट्र हे राज्य मलेशियाकरिता सर्वात महत्वाचे असेल असे प्रतिपादन मलेशियाचे भारतातील नवनियुक्त उच्चायुक्त दातो मुजफ्फर शाह मुस्तफा यांनी येथे केले.

            मुजफ्फर शाह मुस्तफा यांनी गुंतवणूकव्यापार व पर्यटन विषयक मलेशियाच्या शिष्टमंडळासह गुरुवारी (दि. ३०) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

            मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम लवकरच भारतभेटीवर येण्याची शक्यता असून आपल्या दौऱ्यात ते मुंबईला देखील भेट देण्याची शक्यता असल्याचे मुस्तफा यांनी सांगितले.  मलेशियाला सेमीकंडक्टर निर्मितीचा ५० वर्षांचा अनुभव असून मलेशिया - भारत डिजिटल सहकार्य परिषदेच्या माध्यमातून डिजिटल अर्थव्यवस्था तसेच सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात मलेशिया भारत सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

            मलेशिया भारतीयांना आगामी वर्षभर आगमनानंतर विजा देत असून भारताने देखील मलेशियातून येणाऱ्या नागरिकांना आल्याबरोबर विजा उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            भारतातून मलेशियाला गेल्यावर्षी ७ लाख पर्यटक आले असून यंदा त्याहून अधिक पर्यटक येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या दृष्टीने मलेशियन मुंबईदिल्ली व चेन्नई येथे पर्यटन कार्यालये उघडली असल्याचे त्यांनी सांगितले. मलेशिया वेडिंग डेस्टिनेशनगोल्फ या दृष्टीने भारतीय पर्यटकांना आकर्षित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाम तेलाबाबत गैरसमज दूर करणार

            मलेशिया भारताला ३० लक्ष टन पामोलिन तेल निर्यात करीत आहे. पामोलिन हे खाद्य तेल असले तरीही या तेलाबाबत लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत असे सांगून ते दूर करून पाम तेल आरोग्यासाठी चांगले आहे हे पटवून देण्यासाठी मलेशिया प्रयत्न करीत असल्याचे उच्चायुक्त मुस्तफा यांनी सांगितले.

            जगाची लोकसंख्या वाढत असताना पाम तेलांमुळेच लोकसंख्येची खाद्य तेलाची गरज पुरी होऊ शकते असे त्यांनी सांगितले. एक हेक्टर क्षेत्रफळातून तीस वर्षे ८ टन पाम तेलाची निर्मिती होत असल्यामुळे पाम लागवड शेतकऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचे त्यांनी सांगितले.

            भारताने नवीन परराष्ट्र व्यापार नीती जाहीर केली असून मलेशियाने भारताशी पारंपरिक क्षेत्रांशिवाय डिजिटल अर्थव्यवस्थाअक्षय ऊर्जासेमीकंडक्टर निर्मिती व स्टार्टअप क्षेत्रात देखील सहकार्य वाढावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. भारत जगाचे औषध निर्मिती स्थळ म्हणून उदयास आले असून उभय देशांनी जेनेरिक औषध निर्मितीवॅक्सीन विकास व आरोग्य कर्मचाऱ्यांची गतिशीलता या क्षेत्रात देखील सहकार्य वाढावे असे राज्यपालांनी सांगितले.

            बैठकीला मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अहमद झुवैरी यूसोफ तसेच गुंतवणूकपर्यटन व व्यापार विषयक कार्यालयांचे भारतातील प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

Malaysian High Commissioner calls on Maharashtra Governor

               Mumbai, 31st May : The newly appointed high commissioner of Malaysia to India Muzafar Shah Mustafa accompanied by a investment, trade and tourism delegation called on Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai on Thursday (30 May).

               The High Commissioner spoke of enhancing relations with India in the areas of Digital Economy, Tourism, Science and Technology and Palm plantation. He informed that the Prime Minister of Malaysia is likely to visit India during which he will also be visiting Mumbai. Consul General of Malaysia Ahmad Zuwairi Yusoff was also present.             

-----------------

* 🙏🏽 😊 *"जांको राखे साईयां मार सके ना* *कोई चाहे सारा जग क्युंँ ना बैरी होय"*🙏🏽

 *जय जिनेन्द्र* 🙏🏽 😊


*"जांको राखे साईयां मार सके ना*


 *कोई चाहे सारा जग क्युंँ ना बैरी होय"*🙏🏽


दासबोध विष्यी

 🌼🌼॥ श्री॥🌼🌼


सज्जनगडावर जी तळी आहेत त्यांना जिवंत पाण्याचे झरे नाहीत. पावसाळ्यात साठलेले पाणी वर्षभर वापरावे लागते. अशा पाण्यामुळे कफ वाढू शकतो. गडावर येण्यापूर्वी समर्थांना कफाची व्यथा होतीच. वैद्याने जिवंत पाणी वापरण्याचा सल्ला दिला. सज्जनगडापासून सर्वात जवळचे जिवंत पाण्याचे स्थान म्हणजे उरमोडी नदी. गडाच्या पायथ्याला असलेल्या परळी गावापासून ही नदी अडीच कि.मी.अंतरावर आहे. समर्थां साठी रोज दोन हंडे पाणी आणण्याची जबाबदारी कल्याणस्वामींनी स्विकारली. गुरु सेवेची उत्तम संधी मिळाल्याने त्यांना आनंद झाला. दोन भले मोठे हंडे घेऊन कल्याण उरमोडी नदीवर जाऊ लागले व येताना भरलेल्या हंड्याची कावड करुन रोज पाणी आणू लागले. एक दिवस समर्थ गडाच्या तटावर उभे राहून किल्याचे निरीक्षण करीत सता कल्याणस्वामींना पाणी आणतांना त्यांनी पाहीले. कल्याणाच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. भुकेने व उन्हाने चेहरा काळवंडलेला होता. कल्याणाची काहींतरी न्याहरीची व्यवस्था केली तरच त्याची प्रकृती उत्तम राहील असा विचार करुन समर्थ कोठीवाल्याकडे गेले व त्यांनी कोठीवाल्याला कल्याणांना रोज सकाळी दोन शेर हरभऱ्याची डाळ, अर्धा शेर गुळ व पावशेर साजूक तूप देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी कल्याणाला बोलावून घेतले व प्रकृती उत्तम रहाण्यासाठी दिलेला शिधा न्याहारीसाठी वापरण्यास सांगितले. दुसऱ्या दिवसापासून कल्याणस्वामींना रोज शिधा सुरु झाला. त्या मुळे बाकीच्या शिष्यांच्या पोटात दुखू लागले. माणसाने स्वतः जास्त खाल्ले तर त्याचे पोट दुखतेच,पण दुसऱ्याला भरपूर खायला मिळालेले पाहून त्याचे पोट दुखू शकते. कल्याणांना जास्तीचा शिधा मंजूर झाला म्हणून सारे जण त्यांना डाळगप्पू असे म्हणू लागले. खरंतर त्यांच्या तोंडावर बोलायची कोणाचीच ताकद नव्हती.

"आता हा डाळगप्पूच पहा !" केवळ ढोर मेहनत आहे. भरमसाठ खायच आणि गुरासारख राबायचं, कधी जप करणे नाही, दासबोध वाचन नाही, अशा दिनचर्येने त्याच कधीही सार्थक होणार नाही. "ही शिष्यांची चर्चा समर्थांच्या कानावर गेली. एक दिवस सायंकाळी मठाच्या अंगणात शिष्यांशी गप्पा मारता मारता समर्थ म्हणाले *"तुमच्या पैकी दासबोधाची सर्वात जास्त पारायणे कोणी केली आहेत.?"*सगळे शिष्य एकाच वेळी गलका करुन आपली पारायणसंख्या सांगू लागले. यात एकावन्न पासून अकराशे पारायणे पूर्ण करणाऱ्या शिष्यापर्यंतचा सर्वांचा समावेश त्यात होता.

*"ऐसा सद्गुरु पूर्णपणी"*पहिला चरण असलेली ओवी मला संपूर्ण आठवत नाही, तेव्हा ती ओवी कोण सांगू शकेल ?" सारे शिष्य गडबडले. अगदी अकराशे पारायणे झालेल्यासुध्दा लज्जायमान होऊन गप्प बसला. तेवढ्यात समर्थांनी कल्याणास हाक मारली व तीच ओवी विचारली तेव्हा कल्याण तात्काळ म्हणाले *"स्वामीजी, ऐसा सद्गुरु  पूर्णपणी ! तुटे भेदाची कडसणी ! देहाविण लोटांगणे ! तया सद्गुरुसी !!" ही ओवी सातव्या दशकातील पहिल्या समासात अठरावी आहे."* कल्याण चुकला असेल म्हणून शिष्यांनी दासबोध काढून पाहीला संपूर्ण बरोबर होती. समर्थांनी विचारले "कल्याणा,तुझी किती हजार पारायणे झाली." हात जोडून कल्याण म्हणाले *"स्वामीजी, आपल्या कृपेने एकच पारायण मनापासून घडले."*  स्वामी म्हणाले *"बरं ते जाऊ दे अलिकडे डाळगप्पू नावाचा कुणी साधक आला आहे काय ? हा डाळगप्पू कोण ?"* कल्याण म्हणाले *"स्वामीजी , जीव, शीव, माया, ब्रह्म, सुख-दुःख ही दोन दळं जो गप्प करुन टाकतो सदैव अद्वैत बोधात राहतो तो डाळगप्पू होय.* मात्र ही व्यक्ति माझ्या पाहण्यात आली नाही." 

कल्याणस्वामींच्या या उत्तराने सारे शिष्य खजील झाले. आपली चूक त्यांच्या लक्षांत आली, नंतर समर्थांनी अगदी खरमरीत शब्दांत सर्वांची हजेरी घेतली व सर्व शिष्यांना सांगितले "उगीच नुसती पारायणे करु नका. दासबोध हे तंत्र आहे त्याचा मंत्र बनवू नका. शांतपणे वाचून अर्थ समजून घ्या. दासबोध जगायला शिका. कोणाची निंदा नालस्ती द्वेष करु नका."


*🍁 श्री 🍁*

Thursday, 30 May 2024

उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी

 उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी


- जिल्हाधिकारी संजय यादव


            मुंबई, दि.30 : उत्तराखंडमध्ये पवित्र चारधामला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तराखंड शासनाने या काळात होणाऱ्या गर्दी व्यवस्थापनासाठी दि.31 मे, 2024 पर्यंत कोणत्याही प्रकारची "व्हीआयपी दर्शन"सुविधा देण्यात येणार नसल्याचे एका पत्राद्वारे सर्व राज्यांना कळविले असून पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.


            चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वांसाठी नोंदणी अनिवार्य आहे. तरी सर्व भक्तांनी चारधाम यात्रा 2024 च्या नोंदणीसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी केलेल्या यात्रेकरुंनाच दर्शनासाठी परवानगी देण्यात येईल.


            तसेच जेष्ठ नागरिकांनी चारधाम यात्रेपूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनाचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन उत्तराखंड शासनाने केले आहे.


     उत्तराखंड शासनाने केलेल्या आवाहनानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील चारधाम यात्रेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

  

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध

 होईपर्यंत आचारसंहिता कायम

 

            मुंबई, दि. ३० : सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

            आचार संहिता कालावधीत एखाद्या अत्यंत तातडीच्या प्रकरणी आचार संहितेतून सूट देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहेअशी प्रकरणे निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी या कार्यालयाच्या दि.२८.२.२०२४ च्या परिपत्रकान्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने शिफारस केलेले प्रस्ताव या कार्यालयामार्फत भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आचार संहिता लागू झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत अशा एकूण ५९ प्रस्तावांवर भारत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. तरी आचार संहिता कालावधीत आचारसंहितेचे कटाक्षाने पालन केले जाईल, याची सर्व संबंधितांद्वारे दक्षता घेण्यात यावी.

            भारत निवडणूक आयोगाने दि.१६.३.२०२४ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित करुन आदर्श आचार संहिता लागू केलेली आहे. आदर्श आचार संहितेच्या कालावधीमध्ये "काय करावे" व "काय करु नये" याबाबतच्या तसेच इतर विविध विषयाबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना भारत निवडणूक आयोगाच्या दि.२.१.२०२४ च्या एकूण आठ पत्रान्वये स्वतंत्ररित्या देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे कटाक्षाने पालन करावे. निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या दि.५.३.२०२४ व ७.३.२०२४ च्या पत्रांद्वारे सर्व संबंधित यंत्रणास सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नाशिक व कोकण विभागात विधानपरिषद निवडणूकीची आचारसंहिता

             नाशिक व कोकण विभागातील महाराष्ट्र विधानपरिषदेवरील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सदर रिक्त होणाऱ्या पदांसाठी भारत निवडणूक आयोगाने दि.२४.५.२०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून प्रसिद्धीपत्रक जारी केलेल्या दिनांकापासून संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या कालावधीत पालन करावयाच्या आदर्श आचार संहितेबाबतच्या सविस्तर सूचना भारत निवडणूक आयोगाच्या दि.२६.१२.२०१६ च्या पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे कटाक्षाने पालन करण्यात येईलयाची सर्व संबंधितांद्वारे दक्षता घेण्यात यावी,असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi