Wednesday, 17 April 2024

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज


पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज



·       19 एप्रिल रोजी मतदान 10 हजार 652 मतदान केंद्र

·       मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा

- मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

            मुंबई, दि. 16 : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल  रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 10,652 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत 95,54,667 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी बॅलेट युनिट (बीयु) 21,527 तर कंट्रोल युनिट (सीयु) 13,963 आणि 14,755 व्हीव्हीपॅट उपलब्ध असून 97 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

            मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके उपस्थित होते.

            यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 97 उमेदवार लढत आहेत. या निवडणूकीसाठी लागणारे साहित्यसाधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  तसेच गडचिरोली मतदारसंघात सात हॅलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

            मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही      रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दिव्यांग व ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा

            85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह    मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या  ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये ईटीपीबीएसद्वारे एकूण 9,416 मतदार तर 12डी या अर्जाद्वारे 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग असे एकूण 6,630 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

            मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. गडचिरोली-चिमुर (अज) या लोकसभा मतदार संघातील आमगांवआरमोरीगडचिरोलीअहेरी या चार विधानसभा मतदारसंघात व भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगांव एका विधानसभा मतदारसंघात अशा एकूण पाच विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.

 

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

            मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी पाचही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाहीअसे आयोगाचे निर्देश आहेत.

            राज्यातील पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. या पाच लोकसभा मतदार संघातील निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.

             मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाई

            कायदा व सुव्यवस्थांतर्गत 11 एप्रिलपर्यंत 43,893 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 723 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 70,967 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  

        राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 39.10 कोटी एकूण रोख रक्कम तर 27.18 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 63.82 कोटी रुपये, ड्रग्ज 212.82 कोटी, फ्रिबीज 0.47 कोटी आणि इतर बाब अंतर्गत 78.02 कोटी रुपये अशा एकूण 421.41 कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

18722 तक्रारी निकाली

               16 मार्च ते 13 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 2337 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 2331 (99.63%) तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 19018 तक्रारीपैकी 18722 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे 54 प्रमाणपत्र वितरित

               राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 54 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय तयारीची माहिती खालीलप्रमाणे

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

मतदान केंद्रे

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या

बॅलेट युनिट (बीयु)

कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट

1

09 - रामटेक

2405

28

5904

3283

3372

2

10- नागपूर

2105

26

5165

2874

2951

3

11- भंडारा-गोंदीया

2133

18

5518

2866

3097

4

12- गडचिरोली-चिमूर

1891

10

2330

2330

2517

5

13-चंद्रपूर

2118

15

2610

2610

2818

एकूण

10,652

97

21,527

13,963

14,755

 

मतदारांची संख्या खालीलप्रमाणे 

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकुण

ETPBS द्वारे मतदान करणारे सेवा मतदार

85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12अर्जांची संख्या.

1

9- रामटेक

10,44,891

10,04,142

52

20,49,085

1867

1070

2

10 - नागपुर

11,13,182

11,09,876

223

22,23,281

1001

1385

3

11- भंडारा-गोंदिया

9,09,570

9,17,604

14

18,27,188

3211

1465

4

12-गडचिरोली -चिमुर

8,14,763

8,02,434

10

16,17,207

1483

1438

5

13-चंद्रपुर

9,45,736

8,92,122

48

18,37,906

1854

1272

एकूण

48,28,142

47,26,178

347

95,54,667

9,416

6,630

 

 

वयोगटानुसार मतदार संख्या

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

18-19

20-29

30-39

40-49

50-79

80 +

1

9- रामटेक

31,725

3,83,276

4,90,339

4,76,971

6,20,361

46,413

2

10 - नागपुर

29,910

3,37,961

5,06,372

5,07,640

7,70,700

70,698

3

11- भंडारा-गोंदिया

31,353

3,66,570

3,99,115

3,98,749

5,93,132

38,269

4

12-गडचिरोली -चिमुर

24,026

3,28,735

3,56,921

3,48,585

5,25,381

33,559

5

13-चंद्रपुर

24,443

3,42,787

4,25,829

4,20,965

5,86,402

37,480

एकूण

1,41,457

 17,59,329

21,78,576

 21,52,910

30,95,976

2,26,419

 

 

मतदारांचा तुलनात्मक तपशील :-

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

2014 मधील मतदार संख्या

2019 मधील मतदार संख्या

2024 मधील मतदार संख्या

1

9- रामटेक

16,77,266

19,22,764

20,49,085

2

10 - नागपुर

19,00,784

21,61,096

22,23,281

3

11- भंडारा-गोंदिया

16,55,852

18,11,556

18,27,188

4

12-गडचिरोली -चिमुर


Tuesday, 16 April 2024

तु मारो कौन लागे

 *राजस्थानातील सिरोही गावातील पिपळेश्वर महादेवाच्या मंदिरात रात्रीच्या वेळी बिबट्याचे कुटुंब येऊन पुजाऱ्याजवळ झोपते, अशी अफवा पसरली होती. शासकीय वन्यजीव विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. हे सुंदर दृश्य जरा बघा...*


अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

 अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

 

            मुंबईदि. १५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने केवळ अत्यावश्यक सेवेत मतदानाच्या दिवशी कार्यरत असल्यामुळे मतदान न करू शकणाऱ्या मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधा प्रक्रियेसाठी संबंधित विभागाने समन्वय अधिकारी नियुक्त करणे आवश्यक असल्याचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी कळविले आहे.

            राज्यातील पाचव्या टप्प्यात दि.२० मे रोजी मतदान होणारे लोकसभा मतदारसंघ ०२. धुळे२०-दिंडोरी२१. नाशिक, २२-पालघर२३-भिवंडी२४-कल्याण, २५-ठाणे, २६-मुंबई उत्तर, २७ मुंबई उत्तर-पश्चिम २८-मुंबई उत्तर-पूर्व२९-मुंबई उत्तर-मध्य३०-मुंबई दक्षिण मध्य३१- मुंबई दक्षिण असे आहेत.

पोस्टल मतदानासाठी महत्वाच्या सूचना

            शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांची मतदार नोंदणी झालेली आहे आणि त्याची दि. २० मे २०२४ रोजी अत्यावश्यक सेवेत ड्युटी असल्यामुळे त्यांना मतदान केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करणे शक्य होणार नाहीफक्त अशा मतदारांनी अर्ज क्र. १२-ड भरुन समन्वय अधिकारी यांचेमार्फत दि. १ मे पर्यंत बप्पासाहेब थोरातभ्रमणध्वनी क्रमांक ९९२३९७३८८८. समर्पित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहरओल्ड कस्टम हाऊसदुसरा मजलाकक्ष क. २०५शहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई ४००००१ या ठिकाणी सादर करावयाचे आहेत.

            हे अर्ज समन्वय अधिकारी यांनी तपासून साक्षांकित करून सादर करावयाचे आहेत. मंजूर झालेल्या अर्जाबाबत संबंधित मतदारास मोबाईलद्वारे लघुसंदेश (एसएमएस) किंवा नोडल ऑफिसर यांचेमार्फत कळविले जाईल.

             टपाली मतदान केंद्र (पोस्टल व्होटिंग सेंटरहे निवडणूक निर्णय अधिकारी३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ यांचे कार्यक्षेत्रात असणार आहे. हे सुविधा केंद्र १४ मे ते १६ मे २०२४ या तीन दिवसात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यरत असेल.

             टपाली मतदान केंद्र सुविधा ही अतिरिक्त सुविधा आहे. या व्यतिरिक्त मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोग प्रोत्साहन देत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

0000

पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन १६ राज्यस्तरीय सदिच्छादूत

 पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय

सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन

१६ राज्यस्तरीय सदिच्छादूत

            मुंबई दि. 15 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावामतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कलाक्रीडासाहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत.

            समाज माध्यमेमुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरातफलकभित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकरसाहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिकअभिनेते प्रशांत दामलेअभिनेत्री मृणाल कुलकर्णीअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाडअभिनेत्री उषा जाधवअभिनेत्री सान्वी जेठवानीमहिला क्रिकेटपटू स्मृती मनधनासुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबतअर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंततृतीयपंथी प्रणीत हाटेतृतीयपंथी झैनाब पटेलदिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीतदिव्यांग कार्यकर्ती सोनल नवनगुल यांचा समावेश आहे.

आता प्रत्येक जिल्ह्यासाठी सदिच्छादूत

            प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे असे काही मान्यवर असतात जे समाजाला प्रेरित करतात. हेच मान्यवर आता सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. अहमदनगरसाठी पद्मश्री राहीबाई पोपरेप्रणिता सोमणशिवम लोहकरेमिलिंद शिंदेआरुष बेडेकरवेदांत वाघमारे हे अहमदनगर जिल्ह्यात मतदारांनी मतदान करावे यासाठी आवाहन करणार आहेत. अकोल्यात पलक झांबरे आणि अमरावतीमध्ये संकेत जोशी मतदारांना आवाहन करणार आहेत. बीडमध्ये योगेश्वर घाटबंधेमयुरी लुतेप्रमिला चांदेकर तर बुलढाण्यात प्रथमेश जावकर आणि मोनाली जाधव हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

            औरंगाबादमध्ये नवेली देशमुखउस्मानाबादमध्ये राहुल लखाडेधुळेमध्ये वैष्णवी मोरे आणि पार्वती जोगीगडचिरोलीमध्ये पद्मश्री डॉ. परशुराम खुणेगोंदियामध्ये मुनालाल यादवजळगावमध्ये निलिमा मिश्राजालनामध्ये किशोर डांगेडॉ. निकेश मदारे आणि निशा पुरी सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

            कोल्हापूरमध्ये वीरधवल खाडेलातूरमध्ये बसवराज पैकेमेघा पवारसृष्टी जगतापमुंबई शहरामध्ये दिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीतमुंबई उपनगरासाठी दिव्यांग कार्यकर्ती विराली मोदी हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. याशिवाय नागपूरसाठी जयंत दुबळे आणि ज्योती आमगेनांदेडसाठी भाग्यश्री जाधवसृष्टी जोगदंडकपिल गुडसुरकरनंदूरबारसाठी प्रतिक कदमरिंकी पावरा आणि शिवाजीराव मोरे काम करणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी चिन्मय उद्गगीरकरसागर बोडकेपालघरसाठी विक्रांत केणीपूजा पाटीलशुभम वनमाळीभाविका पाटीलपुण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आर.जे. संग्राम खोपडे हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करतील.

            रायगडसाठी तपस्वी गोंधळीरत्नागिरीसाठी संकेत चाळके आणि पल्लवी मानेसांगलीमध्ये संकेत सरगरसातारामध्ये आदिती स्वामीसिंधुदुर्गमध्ये ओमकार अटारीसोलापूरमध्ये तानाजी गालगुंडेआनंद बनसोडेप्रार्थना ठोंबरे तर ठाण्यात अशोक भोईरवर्ध्यात निमिश मुळ्ये निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

            यवतमाळमध्ये अंकुर वाढवेआकाश चिकटेचंद्रपूरमध्ये शेख गायसुद्दिन आणि हिंगोलीमध्ये महेश खुळखुळे काम करणार आहेत. परभणीमध्ये संकर्षण कऱ्हाडेप्रशांत पाईकरावशुभम म्हस्केसुनील तुरुकमानेडॉ. राजगोपाल कलानी निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा - २०२३ राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा - २०२३

राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

 

            मुंबईदि. १५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ५ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब सेवा मुख्य परीक्षा - २०२३ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण १५९ पदांचा अंतिम निकाल आज १५ एप्रिल२०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

            या परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत अनिल दरेकर हे राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून पुणे जिल्ह्यातील अश्लेषा शशिकांत जाधवह्या राज्यात प्रथम आल्या आहेत. मागासवर्गवारीतून कोल्हापूर जिल्ह्यातील रोहित विठ्ठल बेहेरे  हे राज्यात प्रथम आले आहेत.

             उमेदवारांच्या माहितीसाठी या परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

             अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांतआयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळास भेट द्यावी असे आयोगाने कळविले आहे.


अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

 अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

 

            मुंबईदि. १५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने केवळ अत्यावश्यक सेवेत मतदानाच्या दिवशी कार्यरत असल्यामुळे मतदान न करू शकणाऱ्या मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधा प्रक्रियेसाठी संबंधित विभागाने समन्वय अधिकारी नियुक्त करणे आवश्यक असल्याचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी कळविले आहे.

            राज्यातील पाचव्या टप्प्यात दि.२० मे रोजी मतदान होणारे लोकसभा मतदारसंघ ०२. धुळे२०-दिंडोरी२१. नाशिक, २२-पालघर२३-भिवंडी२४-कल्याण, २५-ठाणे, २६-मुंबई उत्तर, २७ मुंबई उत्तर-पश्चिम २८-मुंबई उत्तर-पूर्व२९-मुंबई उत्तर-मध्य३०-मुंबई दक्षिण मध्य३१- मुंबई दक्षिण असे आहेत.

पोस्टल मतदानासाठी महत्वाच्या सूचना

            शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांची मतदार नोंदणी झालेली आहे आणि त्याची दि. २० मे २०२४ रोजी अत्यावश्यक सेवेत ड्युटी असल्यामुळे त्यांना मतदान केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करणे शक्य होणार नाहीफक्त अशा मतदारांनी अर्ज क्र. १२-ड भरुन समन्वय अधिकारी यांचेमार्फत दि. १ मे पर्यंत बप्पासाहेब थोरातभ्रमणध्वनी क्रमांक ९९२३९७३८८८. समर्पित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहरओल्ड कस्टम हाऊसदुसरा मजलाकक्ष क. २०५शहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई ४००००१ या ठिकाणी सादर करावयाचे आहेत.

            हे अर्ज समन्वय अधिकारी यांनी तपासून साक्षांकित करून सादर करावयाचे आहेत. मंजूर झालेल्या अर्जाबाबत संबंधित मतदारास मोबाईलद्वारे लघुसंदेश (एसएमएस) किंवा नोडल ऑफिसर यांचेमार्फत कळविले जाईल.

             टपाली मतदान केंद्र (पोस्टल व्होटिंग सेंटरहे निवडणूक निर्णय अधिकारी३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ यांचे कार्यक्षेत्रात असणार आहे. हे सुविधा केंद्र १४ मे ते १६ मे २०२४ या तीन दिवसात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यरत असेल.

             टपाली मतदान केंद्र सुविधा ही अतिरिक्त सुविधा आहे. या व्यतिरिक्त मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोग प्रोत्साहन देत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi