Friday, 8 March 2024

पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली काजू परिषद संचालक मंडळाची बैठक संपन्न

 पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली

काजू परिषद संचालक मंडळाची बैठक संपन्न

            मुंबई दि. 6 : महाराष्ट्र राज्य काजू परिषद संचालक मंडळाची बैठक पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

            यावेळी काजू परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदममहाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरेकाजू प्रक्रिया उद्योजककाजू उत्पादक शेतकरी प्रतिनिधीकृषी विद्यापीठातील काजू प्रक्रिया तज्ज्ञ आणि इतर संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.

            यावेळी काजू परिषद स्थापन करण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या अहवालाची नोंद घेण्यात आली. काजू परिषदेचे मुख्यालयविकिरण सुविधा केंद्रवाशी येथे व उपविभागीय कार्यालय रत्नागिरीसिंधुदुर्ग व कोल्हापूर येथे सुरू करण्यात केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली. काजू परिषदेचे उपविधीलोगो व लेटरहेड आकृतीबंधसेवक सेवा नियम व इ. तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. काजू परिषदेचे नावे बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली. काजू परिषदेसाठी शासनाकडून आवश्यक निधीची मागणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.


कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात

 कापूससोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व

मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई दि. 6 : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम आढावा व सन २०२४-२५ आराखड्यास मान्यतेबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त प्रवीण गेडामवित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीरकृषी विभागाचे उपसचिव संतोष कराडकृषी आयुक्त कार्यालयाचे संचालक दिलीप झेंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी श्री. मुंडे म्हणाले, एकात्मिक कापूस ,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रमात सोयाबीन या पिकाचा २६ जिल्ह्यांत समावेश आहे तर २१ जिल्ह्यात कापूस पिकांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम राबविण्यास गती द्यावी.या कार्यक्रमांसाठी आणखी निधीची गरज भासल्यास तो निधी ही उपलब्ध करून देण्यात येईल.

            ही योजना समूह आधारित आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापर वाढविण्यासाठी त्यांचा प्रचार व प्रसार करावा. तसेच सन २०२४-२५ च्या पीक प्रात्यक्षिकांच्या पॅकेज मध्ये सुद्धा नॅनो युरिया व नॅनो डीएपी समावेश करण्यात येणार आहे. देशामध्ये नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरण्यात महाराष्ट्र राज्य एक नंबर बनण्यासाठी विभागाने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देशही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

कृषी सेवक पदांची भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात

 कृषी सेवक पदांची भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात

            मुंबईदि. ६ : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक (सर्व) यांच्या आस्थापनेवरील कृषी सेवक पदांसाठी भरतीप्रक्रिया आय.बी.पी.एस या संस्थेमार्फत १६ व १९ जानेवारी रोजी राबविण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अद्यापही न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असून यथाशीघ्र निकाल लावण्यासाठी आय.बी.पी.एस या संस्थेकडे पाठपुरावा सुरू आहेअशी माहिती कृषी आयुक्तालयाचे प्रशासकीय अधिकारी अखिल शेंडे यांनी दिली आहे.

0000

शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची संकेतस्थळांवर उपलब्ध 13 मार्चपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

 शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची संकेतस्थळांवर उपलब्ध

13 मार्चपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

 

            मुंबईदि. 6 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार १८ फेब्रुवारी२०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहायपेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in तसेच https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन दिनांक १३ मार्च २०२४ पर्यंत परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईलअसे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

            हे ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्रुटी किंवा आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक ६ ते १३ मार्च २०२४ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे. या ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपालसमक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटीआक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. तसेच विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईलअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.

            विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्यांचे नावआडनाववडिलांचे नावआईचे नावलिंग इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक उपरोक्त कालावधीत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हे अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाहीअसेही परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

0000

मुंबई में "स्वास्थ्य आपके द्वार" अभियान मुंबई में अप्रैल से लागू होगी जीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी मुंबईकरों को बीमारी के इलाज पर खर्च नहीं करना पड़ेगा

 मुंबई में "स्वास्थ्य आपके द्वार" अभियान

मुंबई में अप्रैल से लागू होगी जीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी

मुंबईकरों को बीमारी के इलाज पर खर्च नहीं करना पड़ेगा

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री का आपला दवाखाना में औचक दौरा

             मुंबईदिनांक: 07 मार्च:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज सुबह तकरीबन 11:30 बजे मुंबई के वर्ली इलाके में हिंदुहृदयसम्राट बालासाहेब ठाकरे आपला दवाखाना का औचक दौरा किया। इस दौरान दवाखाना का निरीक्षण करते समय मुख्यमंत्री ने इलाज और जांच कराने आये मरीजों से भी संवाद साधा।

             हम मुंबईकरों के स्वास्थ्य पर होने खर्च को कम करने की कोशिश कर रहे हैं। "स्वास्थ्य आपके द्वार" अभियान शुरू किया गया है और इस अभियान के माध्यम से घर-घर जाकर स्वास्थ्य चेक (जाँच) किया जाएगा। इस अवसर पर मुख्यमंत्री शिंदे ने कहा कि अप्रैल से जीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी भी शुरू किया जाएगा।

            मुख्यमंत्री वर्ली स्थित अभियांत्रिकी संकुल (इंजीनियरिंग कॉम्प्लेक्स) स्थित आपला दवाखाना में औचक निरीक्षण करने पहुंचे। उन्होंने दवाखाना के स्टोर रूमऔषधि कक्षजांच कक्षशौचालय का निरीक्षण किया। इस दोरान मुख्यमंत्री ने वहां जांच कराने आए कुछ वरिष्ठ नागरिकों से बातचीत की और 'आपला दवाखानाके बारे में उनका अनुभव पूछा। मुख्यमंत्री ने कहा कि मरीजों के चेहरे पर संतुष्टि दिखाई पड़ रही है।

             इस अवसर पर मीडिया से संवाद साधते हुए मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि मुंबईकरों को उनके घर के समीप ही इलाज मिलेइस विचार के साथ मुंबई में 226 स्थानों पर आपला दवाखाना शुरू किए गए हैं। अब तक 42 लाख नागरिकों ने इसका लाभ लिया हैं। यहां पर इलाज मुफ्तकैशलेसपेपरलेस  उपलब्ध है।          

              "स्वास्थ्य आपके द्वार" अभियान के जरिए मुंबई में घर-घर जाकर स्वास्थ्य की जांच की जाएगी। जीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी अप्रैल से शुरू होने वाली है। मुख्यमंत्री ने कहा कि इस बाबत 1500 करोड़ रुपये का प्रावधान किया गया है।

             इस अवसर पर मुंबई शहर के पालक मंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगर के पालक मंत्री मंगलप्रभात लोढ़ामुंबई महापालिका के आयुक्त इकबाल सिंह चहलअतिरिक्त आयुक्त वेलारासूडॉ. सुधाकर शिंदे आदि उपस्थित थे।

0000


 

World-class Park would be created at Coastal Road area

- Chief minister Eknath Shinde

CM reviews Coastal Road and concretization work at Worli and Dadar

 

            Mumbai, March 7 – Chief minister Eknath Shinde today said that a world-class park would be developed on 320 acres of land at an area around Coastal Road which is Dharmaveer Sambhaji Maharaj Mumbai Coastal Road. Along with coastal road the chief minister today reviewed cement road works being carried out at Dadar and Worli and directed BMC and other authorities to complete this work before the advent of Monsoon.

            Chief minister Shinde travelled from Worli to Marine Drive to review the Mumbai Coastal Road work and after visiting the ongoing work, he gave a few directions to the officials. Mumbai city district guardian minister Deepak Kesarkar, Mumbai suburban district guardian minister Mangalprabhat Lodha, BMC commissioner and administrator I S Chahal, additional commissioner Dr Sudhakar Shinde were present.

            The coastal road is being built by the BMC is going with speed and a massive Central Park would be created on 320 acres of land on this coastal road with plantation of a variety of trees on 200 acres of land. Chief minister Shinde told media persons that this coastal road would be opened for service of people soon and this park would be a world-class park.

            Chief minister Shinde after the coastal road visit reviewed cement road work and concretization work at Ganpatrao Kadam Road, Seth Motilal Sanghi Road near Nehru Science Centre at Worli and Dadasaheb Rege road at Dadar. He interacted with local residents and directed the officials to ensure that while taking due precaution about quality work, it needs to be also ensured that local people should not be inconvenienced while carrying out the work. Chief minister Shinde while speaking to media persons said that the soak pits have been included in this concretization work so that water can be soaked in these pits during the Monsoon days which makes this work environment-friendly.

0000

गुणवत्तापूर्ण कामातून नवनियुक्त उमेदवारांनी विभागाची प्रतिमा उंचवावी

 गुणवत्तापूर्ण कामातून नवनियुक्त उमेदवारांनी विभागाची प्रतिमा उंचवावी

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

 

            मुंबई, दि. ७ : सार्वजनिक बांधकाम विभागाचे देशाच्याराज्याच्या पायाभूत विकासात उल्लेखनीय योगदान असून या महत्वपूर्ण विभागात काम करण्याची संधी नवनियुक्तांना मिळाली आहेया संधीचा सन्मान करत आपल्या गुणवत्तापूर्ण कामातून विभागाची प्रतिमा नव नियुक्तांनी उंचवावीअसे आवाहन सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथे केले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध संर्वगातील सरळसेवा भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्या सोहळ्यात श्री.चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकरसचिव (रस्ते) सदाशिव साळुंखेसचिव (बांधकामे) एस.दशपुतेमुख्य अभियंता रणजित हांडे उपस्थित होते.

            मंत्री श्री.चव्हाण म्हणाले कीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणारे पायाभूत विकास काम राज्याच्या प्रगतीला गतिमान करणारे आहे. या विभागाला भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या सारख्या ज्येष्ठ अभियंत्याचा वारसा लाभलेला आहेतो लक्षात घेऊन नवनियुक्त उमेदवारांनी आपल्या पदाची जबाबदारी समजून घेत त्यात जास्तीत जास्त उत्कृष्ट काम करण्याचा संकल्प आजच्या आपल्या नियुक्तीच्या दिवशी करावा. प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात देशात मोठ्या प्रमाणात गुणवत्ततेच्या निकषावर पदभरती राबवण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाने अतिशय वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने अवघ्या अडीच तीन महिन्यात ही संपूर्ण पदभरती प्रक्रिया राबवत विभागाची गतिमान कार्यपद्धती अधोरेखित केलेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सर्व नवनियुक्तांनी पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावीकारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामातून थेट नागरिकांसाठीच्या सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येतात. देशाच्या नागरिकांसाठी काम करण्याची  संधी देणारा हा विभाग आहेत्यामुळे आपली जबाबदारी देखील मोठी आहे,कारण प्रत्यक्ष क्षेत्रीय ठिकाणी चांगले काम करत विभागाची प्रतिमा अधिक चांगली बनवण्याचे मोठे काम हे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यंत्रणेमार्फत होत असते. त्यामुळे आपण विभागाचे प्रतिनिधित्व करत असता हे लक्षात घेऊन अधिक चांगले काम करण्याचे आवाहन श्री.चव्हाण यांनी यावेळी केले.

            श्रीमती म्हैसकर म्हणाल्या कीविभागाची गुणवत्ता ही ओळख बनवण्याच्या आपल्या संकल्पात नवनियुक्त उमेदवारांचा सक्रिय सहभाग हा विभागाच्या कामाला अधिक उंची देणारा ठरेलशिवाजी महाराजाच्या गड किल्ल्यांच्या रुपाने महाराष्ट्राकडे गुणवत्तेचा भरभक्कम वारसा  आहेत्याची प्रेरणा घेत सर्वांनी गुणवत्तेला प्राधान्य देत काम करावेदेशाच्या अमृतकाळात काम करण्याची संधी या सर्व उमेदवारांना मिळत आहे. त्याचे महत्व लक्षात घेत  सर्वांनी आपल्या परिने अधिकाधिक  योगदान द्यावे. 

            सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध संर्वगातील सरळसेवा भरती प्रक्रिया मुख्य अभियंता, मुंबई कार्यालयामार्फत राबवण्यात आली. त्यातील पात्र एकूण १५१८ उमेदवारांना आजच्या दिवशी राज्यातील विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात येत आहेत. मुंबई येथे मंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते ४५ उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येत असल्याची माहितीसचिव श्री.दशपूते यांनी प्रास्ताविकात दिली.

            सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एकूण मंजूर पदे १९ हजार ७६६ एवढी असून त्यापैकी १३ हजार ०६८ पदे (६६%) भरलेली होती. अराजपत्रित २१०९ एवढ्या पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आली होती. भरती प्रक्रिया टाटा कंन्स्लटंसी सर्विसेस कंपनीची परीक्षा घेण्यासाठी निवड करण्यात आली. सदर निवड प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यात आली. उमेदवारांची परीक्षा घेणे ते अंतरीम निकाल घोषीत करणे नंतर उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी करून अंतिम निवड यादी घोषित करण्याची कार्यवाही अडीच महिन्याच्या आत करण्यात आली. निवड यादी घोषित झाल्यानंतर दोन आठवड्याच्या आत उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येत आहे. विक्रमी वेळेत सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही केल्याची माहिती सचिव श्री.साळुंखे यांनी यावेळी दिली.

            तत्पर भरती प्रक्रिया राबवून अवघ्या तीन महिन्यात निुयक्ती पत्र देण्याच्या गतिमान कार्यपद्धती राबवल्याबद्दल नवनियुक्त उमेदवारांनी यावेळी शासनाचे आभार मानले.

0000

तीन राज्य माहिती आयुक्तांचा शपथविधी

 तीन राज्य माहिती आयुक्तांचा शपथविधी

 

            मुंबईदि.७ : महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मकरंद मधुसूदन रानडेशेखर मनोहर चन्नेडॉ. प्रदीप कुमार व्यास यांना राज्य माहिती आयुक्त पदाची  शपथ दिली.

            आज मंत्रालयात  राज्य माहिती आयुक्त पदांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त समीर सहायसामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिकराजगोपाल देवरानितीन गद्रेमाजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहूल पांडेनाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त भुपेंद्र गुरव यांची उपस्थिती होती

Featured post

Lakshvedhi