Thursday, 29 February 2024

अमेरिका – महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवणार अमेरिका व राज्यातील विद्यापीठांनी शिक्षक – विद्यार्थी तसेच सत्र देवाणघेवाण वाढवावे

 अमेरिका – महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवणार 

अमेरिका व राज्यातील विद्यापीठांनी शिक्षक – विद्यार्थी तसेच सत्र देवाणघेवाण वाढवावे  

राज्यपाल रमेश बैस

 

            मुंबई, दि. 29 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी आज अमेरिकेतील विद्यापीठांना महाराष्ट्रातील विद्यापीठांसोबत शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. त्या शिवाय विद्यार्थीशिक्षक तसेच सत्रांची देवाण घेवाण व ऑनलाईन पद्धतीने क्रेडीट हस्तांतरण करण्याबाबत विचार करण्याचे आवाहन केले.

            अमेरिकेतील १४ विद्यापीठांचे प्रमुख आणि राज्यातील निवडक पारंपरिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची संयुक्त बैठक गुरुवारी (दि. २९) राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झालीत्यावेळी ते बोलत होते.

            अमेरिका व राज्यातील विद्यापीठांमधील शैक्षणिक आणि संशोधन सहकार्याला चालना देण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एजुकेशन या संस्थेच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

            बैठकीला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत माईक हॅन्कीशासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीअमेरिकेच्या पब्लिक डिप्लोमसी अधिकारी सीता रायटरइन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन (IIE) चे अध्यक्ष विवेक मनसुखानीसह-अध्यक्ष जेसन सिझ आदी उपस्थित होते.

            आगामी शैक्षणिक सत्रापासून राज्यात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाणार असून हे धोरण उच्च शिक्षण प्रणालीच्या आंतरराष्ट्रीयीकरणाला चालना देणारे आहेअसे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

            या धोरणानुसार अधिकाधिक परदेशी विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठांमध्ये आकर्षित करणे व देशातच शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे अभिप्रेत असल्याचे  राज्यपालांनी सांगितले. 

            हे धोरण परस्पर क्रेडिट मान्यता आणि हस्तांतरपरदेशी विद्यापीठांना भारतात विद्यापीठ परिसर स्थापन करणे तसेच देशांतील विद्यापीठांना विदेशात कॅम्पस उघडण्यास प्रोत्साहन देते असे राज्यपालांनी सांगितले.

            उच्च शिक्षणातील सकल विद्यार्थी नोंदणी सध्याच्या 26 टक्क्यांवरून 2035 पर्यंत 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहेअसे नमूद करून महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थती आणि लोकांची विविधता लक्षात घेतादूरस्थ आणि मुक्त शिक्षण हा सहकार्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेलअसे राज्यपालांनी सांगितले.

            कौशल्य क्षेत्रात अमेरिकेतील विद्यापीठांकडून सहकार्य मिळाल्यास त्याचे स्वागतच होईल असे सांगून भारतातील बहुसंख्य तरुणांना अमेरिकेतील विद्यापीठांकडून कौशल्य प्रशिक्षणकौशल्य वर्धन आणि पुनर्कौशल्य ग्रहण क्षेत्रात संधी मिळाल्यास आनंद होईल असे राज्यपालांनी सांगितले.

            पूर्वी भारतात उत्कृष्ठ उच्च शिक्षण व्यवस्था होती व अनेक नामांकित विद्यापीठे होती. भारत वेदउपनिषदयोगन्यायशास्त्र आणि इतर अनेक विषयांच्या प्राचीन ज्ञानाचे भांडार असून विद्यापीठ स्तरावरील सहकार्यामुळे अमेरिकेतील विद्यापीठांना भारताकडून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवायोगआयुर्वेदज्योतिषखगोलशास्त्रवैदिक गणित इत्यादी क्षेत्रांमध्ये सखोल अध्ययनाची संधी मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी बोलताना अमेरिकन शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांना व्यावसायिक कार्य अनुभवासह अनेक गुणात्मक लाभ देत असल्याचे अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत माईक हॅन्की यांनी सांगितले.

            आज 2.7 लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेत असून एकट्या मुंबई दूतावासाने 90,000 विद्यार्थी व्हिसा जारी केले असल्याचे त्यांनी सांगितले.

            अधिकाधिक अमेरिकन विद्यार्थी महाराष्ट्रात उच्च शिक्षणासाठी आले तर आपल्याला आनंदच होईलअसे हॅन्की यांनी सांगितले.

            बैठकीला सलमा घानेमप्रोव्होस्टडीपॉल युनिव्हर्सिटीस्टेफनी डॉशरफ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीरंजन मुखर्जीमिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीजेनी अकुनेयुनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेराजीव मोहनयुनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनमलिसा लीकॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीजेफ्री सिम्पसनओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीवेंडी लिन-कुकमॉन्टक्लेअर स्टेट युनिव्हर्सिटीमोहिनी मुखर्जीरटगर्स युनिव्हर्सिटीजीत जोशीकॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी हे उपस्थित होते.

            राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा सुरेश गोसावीमुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणेमहाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ अपूर्वा पालकरमुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा अजय भामरेएसएनडीटीच्या प्र कुलगुरू प्रा रूबी ओझा आदी यावेळी उपस्थित होते.

००००

राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ संपन्न

 राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ संपन्न

 

          मुंबई, दि. २९ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ आज (दि. २९) विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या सरचिटणीस डॉ. श्रीमती पंकज मित्तल यांनी यावेळी दीक्षांत भाषण केले.

            यावेळी दीक्षांत समारंभात १९७१६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या तर ११८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व २०५ स्नातकांना पीएच.डी.  प्रदान करण्यात आल्या. 

            कुलगुरु प्रो. विजय माहेश्वरीप्रकुलगुरु सोपान इंगळेपरीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटीलकुलसचिव डॉ विनोद पाटील तसेच विविध अधिष्ठाताप्राध्यापक व स्नातक उपस्थित होते.

0000

 

Governor presides over 32nd Convocation of Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University through online mode

 

     Mumbai, 29th Feb : Maharashtra Governor and Chancellor of universities Ramesh Bais presided over the 32nd Annual Convocation of Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon (KBCNMU) through online mode on Thu (29 Feb).  Secretary General of Association of Indian Universities (AIU) Dr (Mrs) Pankaj Mittal delivered the Convocation address.

      Vice Chancellor Prof. Vijay Maheshwari, Pro Vice Chancellor Prof. Sopan Ingle, Director of Board of Examinations and Evaluation, Registrar Dr. Vinod P. Patil, Members of various boards of authorities, Deans, faculty and graduating students were present.

      Degrees were presented to 19716 graduating students while 118 students were awarded Gold Medals. In all 205 graduating students were awarded Ph.Ds.

000

 

दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांकडून शुभेच्छा आत्मविश्वासाने आणि तणावमुक्त राहून परीक्षांना सामोरे जावे

 दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांकडून शुभेच्छा

आत्मविश्वासाने आणि तणावमुक्त राहून परीक्षांना सामोरे जावे

- मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 29 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वीच्या लेखी परीक्षांना उद्या शुक्रवार दि. 1 मार्च 2024 पासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्याव्यातअसे आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

            राज्यातील पुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरमुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता 10 वी साठी एकूण 5086 केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी 23 हजार 272 शाळांमधून एकूण 16 लाख 09 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती, शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

            परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावीअसे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी केले आहे.

00000

विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम

 विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम

मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 29 : दाओस येथील आंतरराष्ट्रीय उद्योग प्रदर्शनामध्ये मागील वर्षी सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने विविध आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी केलेल्या एक लाख 37 हजार कोटी रुपये इतक्या करारांपैकी 73 टक्के प्रकल्पांची आत्तापर्यंत राज्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे. गेले 16 महिने महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत देशात क्रमांकावर असल्याची माहितीउद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

            विधानपरिषदेत नियम 260 अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या चर्चेत उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत हाते. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेप्रवीण दरेकर यांच्यासह विविध सदस्यांनी सहभाग घेतला.

            राज्यामध्ये जेम्स व ज्वेलरी संबंधित उद्योगांमध्ये 50 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. उद्योग विभागासह नगर विकासपर्यावरणगृहनिर्माणतलाठी भरतीदुग्ध व्यवसाय विकास आदी विभागांशी संबंधित मुद्द्यांवर मंत्री श्री.सामंत यांनी माहिती दिली.

            मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणारा कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात असून पहिल्या टप्प्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल. मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांवर बोलताना त्यांनी रस्ते विकासगिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्नजुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकाससीआरझेडरिक्त पदे भरती आणि मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई शहरात सुरू केलेल्या स्वच्छता (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) मोहिमेमुळे मुंबईतील प्रदुषणाची पातळी कमी झाली आहे. ही मोहीम राज्यातील इतर शहरातही राबविण्यात येणार आहे. इमारतींचा पुनर्विकास करताना प्रथमत: मालकाची जबाबदारी असून त्यानंतर भाडेकरूंनी पुनर्विकासाची कार्यवाही करणे गरजेचे आहे. हे झाले नाही तर नंतर यंत्रणांकडून कार्यवाही केली जाईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

            मंत्री श्री. सामंत विविध विभागांशी संबंधित बाबींवर बोलताना म्हणालेतलाठी भरती बाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही होत असून नेमण्यात आलेल्या टीसीएस या एजन्सीद्वारे पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महानंदाशी संबंधित कामगारांच्या पगाराच्या प्रश्नासह विविध बाबी निकालात काढण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. महानंदाच्या एसआरए स्कीममध्ये काही अनियमिता झाली असेल तरचौकशी करून कारवाई करण्यात येईलअसे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी मंत्री उदय सामंत यांनी गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी चांगले काम होत असून नोंद झालेल्या पात्र गिरणी कामगारांपैकी 15 हजार कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर उर्वरित कामगारांना घरे देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात विविध ठिकाणी जमीन उपलब्ध करून दिली जाणार असून त्यापैकी ठाणे येथे 22 हेक्टर जागा उपलब्ध केली असल्याचेही मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश § सामान्य नागरिकांना वेळेवर दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे

 आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

 

§  सामान्य नागरिकांना वेळेवर दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

 

            मुंबईदि. २९ : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी     ‘गट-अ’ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारआरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

            आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती झाली असून त्यामाध्यमातून सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावीअसे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

            महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी ‘गट-अ’ या संवर्गातील १७२९ रिक्त पदांसाठी एमबीबीएस व बीएएमएस उमेदवारांचे एकूण २९ हजार ५५६ अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झाले होते. ६५७५ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी अर्ज केले होते. एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन अंतिम गुणवत्ता यादीनुसार १४४६ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यांना पदस्थापनेचे आदेश देण्यात आले.

            वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदे नामनिर्देशनाने भरण्याबाबत शासनाने ३० जानेवारी २०२४ रोजी मान्यता दिली होती. पदभरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर छाननी प्रक्रीया पूर्ण करून आदेशही देण्यात आले. अत्यंत कमी दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्तीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले.

            विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरआरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमारसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

0000


सूचना पेन्शन धारकांसाठी


 

राज्य के युवाओं को कौशल आधारित प्रशिक्षण के माध्यम से रोजगार दिया जायेगा

 राज्य के युवाओं को कौशल आधारित

प्रशिक्षण के माध्यम से रोजगार दिया जायेगा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

• अहमदनगर में विभागीय नमो महारोज़गार मेला एवं कैरियर मार्गदर्शन शिबिर

• महारोजगार मेले में 300 से अधिक नामांकित कंपनियां सहभागी

            अहमदनगर दि. 28 फरवरी (जिमाका):- बेरोजगारी दूर करने के लिए सरकार गंभीरता से प्रयत्न कर रही है। महाराष्ट्र सरकार ने हाल ही में जर्मनी के साथ एक समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किये हैंजिसके माध्यम से 4 लाख बेरोजगार युवाओं को कौशल-आधारित प्रशिक्षण देकर रोजगार प्रदान किया जायेगा। दावोस में निवेश सम्मेलन में हुए समझौते से 2 लाख युवाओं के लिए रोजगार निर्मित होगा।  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आश्वासन दिया कि राज्य में चल रहे विभागीय नमो महारोज़गार मेले के माध्यम से 2 लाख से अधिक रोजगार उपलब्ध होंगे। नमो महारोजगार मेला एवं कैरियर मार्गदर्शन शिबिर के लिए श्री शिंदे ने वीडियो कान्फ्रेंसिंग (दृश्य श्रव्य संचार प्रणाली) के माध्यम से मार्गदर्शन दिया।           

            कौशलरोजगारउद्यमिता और नवाचार विभाग और जिला प्रशासन के संयुक्त तत्वावधान में आयोजित विभागीय नमो महारोजगार मेला और कैरियर मार्गदर्शन शिबिर का उद्घाटन राजस्व मंत्री और जिले के पालक  मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर कौशलरोजगारउद्यमिता और नवाचार विभाग के मंत्री मंगलप्रभात लोढ़ासांसद डॉ. सुजय विखे पाटिलअहमदनगर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के अध्यक्ष शिवाजीराव कार्डिलेनासिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेजिलाधिकारी सिद्धाराम सालीमठजिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकरमनपा आयुक्त डॉ. पकंज जावलेकौशल विकास विभाग के नासिक विभागीय उपायुक्त सुनील सैंदाणेजिला कौशलरोजगार और उद्यमिता सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी आदि उपस्थित थे।         

            राज्य में नागपुरलातूर के बाद अहमदनगर में नमो विभागीय रोजगार मेला आयोजित हो जा रहा है। यह बात कहते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहाशासन आम जनता का है।  युवाओं को रोजगार उपलब्ध कराने के लिए सरकार गंभीरता से प्रयत्न कर रही है। राज्य में सभी विभागों में रोजगार मेलों का आयोजन किया जा रहा है।  'सरकार आपके द्वारउपक्रम के माध्यम से राज्य के ढाई करोड़ लोगों को सरकारी योजनाओं का लाभ प्राप्त हुआ। इसी प्रकार रोजगार मेले के माध्यम से लाखों युवाओं को रोजगार मिलेगा और युवा अपने पैरों पर खड़े हो सकेंगेश्री  शिंदे ने कहा।           

प्रमोद महाजन कौशल विकास केंद्र के माध्यम से 50 हजार युवाओं को प्रशिक्षण

उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ने ऑडियो-विजुअल संदेश के माध्यम से अपनी शुभकामनाएं दीं। उन्होंने कहा कि राज्य सरकार लगातार कौशल विकास पर जोर दे रही है। राज्य में दो हजार प्रमोद महाजन कौशल विकास केंद्र स्थापित करने का बजट में निर्णय किया गया। ये केंद्र 34 जिलों के 250 तालुकाओं के 511 गांवों में स्थापित किये जा रहे हैं। इन केन्द्रों से प्रति वर्ष 50 हजार युवक-युवतियों को प्रशिक्षित किये जाने से ग्रामीण क्षेत्रों में रोजगार एवं स्वरोजगार के अच्छे अवसर पैदा होंगे। उद्योग और रोजगार योग्य युवाओं की बातचीत से भी अनेक अवसर पैदा होते हैं।  परिवार की समृद्धि के लिए रोजगार मिलना  अत्यंत आवश्यक है।  इस रोजगार मेले में सभी को योग्यताकौशल के अनुसार रोजगार प्राप्त होगा।  उपमुख्यमंत्री श्री फडणवीस ने यह भी विश्वास व्यक्त किया कि यह नमो महारोज़गार मेला अनेक युवक-युवतियों को अपने पैरों पर खड़ा करने वाला सिद्ध होगा।

0000

 


 

Forged signature of Chief Minister on statements

Police complaint from Chief Minister's Secretariat

         

      Mumbai 28 Feb : The Chief Minister's Secretariat noticed that some of the statements received for action had forged signatures and stamps of Chief Minister Eknath Shinde. A complaint has been lodged in this regard at the Marine Lines Police Station.

      Statements and letters signed by Chief Minister Mr. Shinde are being received from all over the Chief Minister's Secretariat for further action.These statements are recorded in the post office and are recorded in the e-office system and sent to the concerned administrative departments.

       The staff noticed that Chief Minister Shri.Shinde's signature and stamps were suspicious and fake. Staff/employees brought this matter to the notice of the seniors. Chief Minister Mr. Shinde has taken serious notice of this matter and directed to file a complaint with the police immediately. A complaint has been filed at the Marine Lines Police Station and the police are investigating further.

      The Chief Minister Mr. Shinde has given instructions to the office staff / workers be alert while working.

0000


 

Youth in the state would be given employment through skill-based training

– Chief Minister Eknath Shinde

NaMo mega-employment divisional meet and career guidance camp

More than 300 reputed companies participated in mega-employment meet

 

            Ahmednagar, Feb 28 (DIO) – Stating that his government was working with honesty to remove unemployment, Chief Minister Eknath Shinde said that Maharashtra Government has recently signed an MoU (memorandum of understanding) with Germany which would provide employment to 4 lakh unemployed youth by imparting skill training to them. Informing that through the MoUs signed at Davos investment summit, 2 lakh youth would be able to avail employment, he assured that more than 2 lakh youth would avail employment through NaMo mega-employment meets being held a divisional level in the state. Chief minister Shinde was addressing via video-conference call to the NaMo mega-employment meet and career guidance camp.

            Revenue minister and the guardian minister for the Ahmednagar district Radhakrishna Vikhe-Patil inaugurated NaMo mega-employment meet and career guidance camp organized jointly by Skill development, employment, entrepreneurship and innovation department along with district administration. The minister for skill development, employment, entrepreneurship and innovation Mangalprabhat Lodha, MP Dr Sujay Vikhe-Patil, Ahmednagar district central cooperative bank chairman Shivajirao Kardile, Nashik divisional commissioner Radhakrishna Game, district collector Siddharam Salimath, ZP CEO Ashish Yerekar, Ahmednagar municipal commissioner Dr Pankaj Jawle, Nashik division deputy commissioner Sunil Saindane, district assistant commissioner Nishant Suryavanshi and others were present.

            Pointing out that after Nagpur and Latur, the NaMo divisional employment meet is being held at Ahmednagar, chief minister Shinde said that it is the people’s government which is trying with honesty to provide employment to youth in the state. Sating that employment meets are being organized in all parts of the state, he said that through Government at Your Doorstep initiative, 2.5 crore people in the state have received benefits of various government schemes. In the same way, he added, the employment meets would make lakhs of youngsters capable of availing employment to stand on their own feet.   

Training to 50 thousand youth through Pramod Mahajan skill development centre

– Dy CM Devendra Fadnavis

            Deputy chief minister Devendra Fadnavis in his wishes through the audio-visual medium said that the state government is constantly giving thrust on skill development. He said that a decision to set up 2 thousand Pramod Mahajan skill development centres in the state has been announced in the state budget and such centres are being set up in 511 villages of 250 Tehsils in 34 districts. Stating that 50 thousand young girls and boys would be imparted training every year through these centres, he said that it would lead to employment and self-employment opportunities in rural villages and opportunities are created through a dialogue between employable youth and the industry. Underlining that it is important for prosperity of any family to avail employment, he said that through these employment meets, everyone would be able to avail employment as per his or her quality and skill. Fadnavis expressed confidence that this NaMo mega-employment meet would result in enabling young girls and boys to stand on their own feet.

0000


Featured post

Lakshvedhi