Friday, 9 February 2024

सायबर सुरक्षित राज्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पाची आखणी

 सायबर सुरक्षित राज्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पाची आखणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

            नाशिकदि. ८ : आजच्या डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षित राज्य बनविण्याकरीता अत्याधुनिक तंत्रज्ञानकुशल मनुष्यबळ व संसाधनानी परिपूर्ण अशा प्रकल्प निर्मितीची आखणी करण्यात येत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 च्या उद्घाटन समारंभा प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसेआमदार सुहास कांदेसीमा हिरेपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाराज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसादविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेनाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकरअपर पोलीस महासंचालक निखील गुप्ताविशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. आरती सिंगनाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक दत्ता कराळेपोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमारपोलीस आयुक्त संदीप कर्णिकपोलीस अधीक्षक विक्रम देशमानेजिल्‍हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तलअपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्यात सायबर सुरक्षेसाठी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरटेक्नॉलॉजी असिस्टेड इन्वेस्ट‍िगेशनसेंटर ऑफ एक्सलन्सक्लाऊड आधारित डेटा सेंटरसिक्युरिटी ऑपरेशन सेंटर यांचा समावेश असलेला 837 कोटींचा सायबर सुरक्षा प्रकल्प निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या प्रकल्पाला राज्यातील सर्व सायबर पोलीस ठाणे जोडण्यात येणार असून 24/7 कार्यरत असणाऱ्या कॉल सेंटरवर दूरध्वनीमोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा पोर्टलवर सायबर गुन्ह्यांविषयक तक्रार नोंदवून या गुन्ह्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यात येणार आहे. तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच पोलीस दलातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरण्याकरीता साधारण १७ हजार पदांची भरती प्रक्रियाही सुरु करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना घरबांधणीसाठी पूर्वीप्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला असून पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मोटार परिवहन विभागासाठी आस्थापना मंडळे गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            जगातही महाराष्ट्र पोलिसांचा जसा लौकीक आहेतसाच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही दबदबा आहे. यावेळी भारतासाठी पहिलं ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. खेळखिळाडुवृत्ती आणि पोलीस दलाचे मनोबल यांचा परस्पर संबंध असल्याने राज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात येतो आहे. खेळातूनच उत्तम पोलीस मनुष्यबळ मिळणार असल्याने क्रीडा सुविधांवरही भर देण्यात येतो. याचअनुषंगाने बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारयाचे नियोजित असून छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठास ५०  कोटी रुपये व ४८ हेक्टर जागाही उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विभागीयजिल्हा आणि तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी विभागीय ५० कोटीजिल्ह्यासाठी २५ आणि तालुक्यासाठी ५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी रोख पारितोषिकांत पाच पटींनी भरीव वाढ करण्यात आली आहे. खेलो इंडियाराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यातील खेळाडूंना २८ कोटी रुपयांची पारितोषिके वितरीत केली आहेत. राज्यराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत ५ टक्के आरक्षण देण्यात येत आहे. क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरु केली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

            राज्याच्या पोलीस दलातील खेळाडुंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शारिरीक तंदुरूस्तीतून कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची क्षमताताकद अंगी येते. पोलीस दलातील प्रत्येकामध्ये एक क्रीडापटूखेळाडू असतो. या खेळाडूंना पोलीस क्रीडा स्पर्धाच्या निमित्तानं चांगले मैदान मिळत असून हे मैदान जितके गाजवालतितकीच चांगली प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देशासाठी उत्तम असे क्रीडापटू मिळातील या अपेक्षेसह सर्वांनी देशाचे आणि पर्यायाने आपल्या राज्याचे नाव राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय स्तरावर उंचवाण्यासाठी योगदान द्यावेअशा शुभेच्छाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

            सांघिक क्रीडा प्रकारात हॉकीफुटबॉलव्हॉलिबॉलबास्केटबॉलहॅण्डबॉलकबड्डीखो-खो यांचा तर कुस्तीॲथलेटिकबॉक्सिंगवेट लिफ्टिंगस्वीमिंगज्युदोक्रॉस कंट्रीत्वायक्वांदोवु-शूशुटिंग (स्पोर्ट वेपन)शुटिंग (सर्व्हिस वेपन)पावर लिफ्टिंगबॉडीबिल्डिंगवरिष्ठ अधिकारी शुटींग, 05 कि.मी. चालणे इत्यादी वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे. यास्पर्धेत दोन हजार 444 पुरुष, तर 888 महिला सहभागी झाल्या आहेत.

            यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला यांनी केले तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक श्री. कराळे यांनी मानले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

क्रीडा स्पर्धेत सहभागी संघ….

            अमरावती परिक्षेत्रऔरंगाबाद आणि नांदेड परिक्षेत्रकोल्हापुर परिक्षेत्रनवी मुंबई / मीरा भाईंदर (कोकण परिक्षेत्र)मुंबई शहरनागपूर शहरनागपूर परिक्षेत्रनाशिक परिक्षेत्रपुणे शहर / पिंपरी चिंचवड आयुक्तालयरेल्वे परिक्षेत्रएस.आर.पी.एफ. परिक्षेत्रठाणे शहरप्रशिक्षण संचालनालय.

राज्य पोलीस दलातर्फे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस साजरा

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा वाढदिवस राज्य पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारीकर्मचारी कुटुंबीयांसमवेत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. भुसेपोलीस महासंचालक श्रीमती शुक्लापोलीस आयुक्त श्री. कर्णिक यांच्यासह पोलीस दलातील अधिकारीकर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू

पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू 

ओटीएममध्ये एमटीडीसीच्या दालनाला प्रतिसाद 

मुंबई, ९ फेब्रुवारी : कोकणमुंबईलोणावळामहाबळेश्वरनागपूरताडोबाशिर्डीछत्रपती संभाजी नगर तसेच महाराष्ट्रातील गड किल्ले अशा महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळ आणि समृद्ध वारासंघाची ओळख जगभरात पोहचविणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दालन सध्या जगभरातील आकर्षण बनले आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरवांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ओटीएम प्रदर्शनी मध्ये असलेल्या या दालनाला भारतासह जगभरातील पर्यटक आणि पर्यटन संबंधित सेवा देणाऱ्या कंपन्यांनाचा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे, पर्यटन  डॉ. बी.आर. पाटीलसंचालकपर्यटन संचालनालय यांनी महाराष्ट्रातील कंपन्यांचे प्रमुख प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय पाहुणे आणि पर्यटन भागधारकांच्या उपस्थितीत प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन केले.

  यावेळी जयस्वाल म्हणाले कीया प्रदर्शनीमध्ये देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटन क्षेत्रातील ट्रॅव्हल एजन्सीरिसॉर्टविविध पर्यटन संस्थांची माहिती असलेले माहितीपूर्ण स्टॉल आहेत. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी इतर राज्यातील पर्यटन क्षेत्रातील विविध उद्योजकांशी  चर्चा करता येईल. पर्यटन क्षेत्रात इतर राज्यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम संवादातून समजतीलइतर राज्यांच्या पर्यटन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन राज्यातील पर्यटन वाढीसाठी त्याचा नक्कीच लाभ होईल. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना ‘ओटीएम’ प्रदर्शनीच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाची माहिती देशपातळीवर नेता येईल. "कोकणमुंबईलोणावळामहाबळेश्वरनागपूरताडोबाशिर्डीछत्रपती संभाजी नगर आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या कंपन्यांसह राज्यातील प्रादेशिक वैविध्य उत्कृष्टपणे पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित केले जाईल." असे जयश्री भोजआयएएस मानद प्रधान सचिवपर्यटन यांनी यावेळी सांगितले. कॉन्क्लेव्हरोड शो आणि ट्रेड मेळावे अशा कार्यक्रमांची मालिका करण्यावर महाराष्ट्र टुरिझमचा भर आहे. या प्रक्रियेतदूरसंचार विभाग देशभरातील विविध प्रमुख पर्यटन व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होत आहे”अशी माहिती दिली.

दुनिया के लिए महाराष्ट्र, अब एक विश्वव्यापी आकर्षण 

ओटीएम में एमटीडीसी की गैलरी पर प्रतिक्रिया

मुंबई, 9 फरवरी: महाराष्ट्र पर्यटन विकास निगम का हॉल, जो कोंकण, मुंबई, लोनावाला, महाबलेश्वर, नागपुर, ताडोबा, शिरडी, छत्रपति संभाजी नगर के साथ-साथ महाराष्ट्र के गढ़ किलों जैसे विभिन्न पर्यटन स्थलों और समृद्ध वारसा  का ज्ञान लाता है। दुनिया के लिए महाराष्ट्र, अब एक विश्वव्यापी आकर्षण बन गया है। जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स में ओटीएम प्रदर्शनी में स्थित इस प्रदर्शनी को पूरे भारत के साथ-साथ दुनिया भर से पर्यटकों और पर्यटन से संबंधित सेवा कंपनियों से प्रतिक्रिया मिल रही है। महाराष्ट्र पर्यटन विकास निगम के महाप्रबंधक चंद्रशेखर जयसवाल, पर्यटन निदेशालय कोंकण संभागीय पर्यटन उपनिदेशक हनुमंत हेडे, पर्यटन डॉ. बी.आर. पर्यटन निदेशालय के निदेशक पाटिल ने महाराष्ट्र की कंपनियों के प्रमुख प्रतिनिधियों, अंतरराष्ट्रीय मेहमानों और पर्यटन हितधारकों की उपस्थिति में प्रदर्शनी स्टाल का उद्घाटन किया। इस अवसर पर जयसवाल ने कहा कि इस प्रदर्शनी में देश के हर राज्य के पर्यटन क्षेत्र की ट्रैवल एजेंसियों, रिसॉर्ट्स, विभिन्न पर्यटन संगठनों की जानकारी वाले ज्ञानवर्धक स्टॉल लगे हैं. घरेलू पर्यटन को बढ़ावा देने के लिए अन्य राज्यों के पर्यटन क्षेत्र के विभिन्न उद्यमियों से चर्चा की जा सकती है। संवाद के माध्यम से अन्य राज्यों द्वारा पर्यटन के क्षेत्र में की जा रही नवीन गतिविधियों को समझा जाएगा, इससे निश्चित रूप से अन्य राज्यों की पर्यटन क्षेत्र में की जा रही नवीन गतिविधियों को जानने से राज्य में पर्यटन के विकास में लाभ होगा। 'ओटीएम' प्रदर्शनी के माध्यम से राज्य के पर्यटन क्षेत्र के उद्यमी स्थानीय पर्यटन की जानकारी राष्ट्रीय स्तर तक पहुंचा सकेंगे। "कोंकण, मुंबई, लोनावाला, महाबलेश्वर, नागपुर, ताडोबा, शिरडी, छत्रपति संभाजीनगर और अन्य जगहों से आने वाली कंपनियों के साथ राज्य की क्षेत्रीय विविधता को मंडप में अच्छी तरह से प्रदर्शित किया जाएगा।" जयश्री भोज, आईएएस मानद प्रमुख सचिव, पर्यटन ने इस अवसर पर कहा। महाराष्ट्र पर्यटन कॉन्क्लेव, रोड शो और व्यापार मेलों जैसे कार्यक्रमों की एक श्रृंखला आयोजित करने पर ध्यान केंद्रित करता है। इस प्रक्रिया में, दूरसंचार विभाग देश भर के विभिन्न प्रमुख पर्यटन व्यापार मेलों में भाग ले रहा है", बताया गया।

पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू ओटीएममध्ये एमटीडीसीच्या दालनाला प्रतिसाद

Thursday, 8 February 2024

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ

विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबईदि.७ : विकसित राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांची भूमिका महत्वाची असून विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांना योगदान देता यावेत्यांचा सक्रिय सहभाग वाढवा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत@२०४७: Voice of Youth’ हा उपक्रम जाहीर केला आहे.असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

            मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ सोहळा   राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली आणि  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. या प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रदान जगदीश कुमारप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी,प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरेप्रभारी कुलसचिव  डॉ. बळीराम गायकवाडप्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ  डॉ. प्रसाद करांडे उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.बैस म्हणाले कीसर्व यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना  खूप आनंद होत आहे. आजचा क्षण हा केवळ या गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच नाही तर प्राध्यापकपालक आणि ज्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.त्यांच्यासाठी देखील महत्वाचा क्षण आहे.असे सांगून राज्यपालांनी सर्वांचे अभिनंदन केले.

            राज्यपाल श्री.बैस म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प केला आहे. भारताच्या सुवर्ण युगाच्या काळात आजची  युवा पिढी महत्वाची भूमिका बजावणारआज मिळालेल्या पदवीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणार आहे.  विद्यापीठातून पदवी घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यापीठावर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे.

            नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० देशाच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे बनवले गेले आहे. या शैक्षणिक धोरणाने आकांक्षी उद्दिष्टांसह विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि पुनर्रचना करण्यात आली आहे. विकसित भारतासाठी पुढील दहा वर्षांत विद्यापीठाला भारतातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान प्राप्त होईल यासाठी लक्ष्य निश्चित करावेविद्यापीठ प्रशासकीय कामकाजात सुधारणा करून विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे प्रामाणिकपणे निराकरण करण्यासाठी प्रणाली विकसित करावी. गाव दत्तक प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावेकौशल्य आधारित उद्योजकता आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी केल्या.

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक ओळख निर्माण केली : मंत्री श्री.पाटील

            मुंबई विद्यापीठाने १६७ वर्षाचा गौरवशाली प्रवास केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवताना अनुभवला आहे आणि  तीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा केली आहे. सामाजिक व औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित अनेक उपक्रमांची पायाभरणी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या ज्ञानशाखेला उत्कृष्ट मापदंड निश्चित करता आला आणि उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. जगभरात मुंबई विद्यापीठाने आपली ओळख निर्माण केली आहे.

             मुंबई शहर सांस्कृतिक एकात्मता राष्ट्रीय एकात्मतेचे  प्रतिबिंब आहे. येथील अथ:क कार्यसंस्कृती या शहराची वैशिष्ट्ये आहे. या संस्कृतीला आत्मसात केल्यानंतर जगाच्या पाठीवर कुठेही गेला आणि कितीही  आव्हाने आली तरी ती आव्हाने यशस्वीपणे पूर्ण करण्याची ताकत या विद्यार्थ्यांकडे असेल.

            नवीन शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय संशोधन अनिवार्य करून  समाजाच्या आणि मानवतेच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे.यात कौशल्य विकास व रोजगार क्षमता आणि उद्योजकता वाढीला प्रोत्साहन दिले आहे. एका बाजूस ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य तर दुसरीकडे विकसित भारत संकल्पनेत सहभागी होऊन दर्जेदार शैक्षणिक संस्था,कुशल मनुष्यबळ उपलब्धता याकडे अधिक लक्ष दिले आहे. असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

            श्री.जगदीशकुमार म्हणालेनवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवीन संशोधनाला अधिक प्रोत्साहन देण्यात आले आहे. विकासित भारतासाठी युवकमहिला,शेतकरी आणि शिक्षण हे प्रमुख स्तंभ आहेत.याला अधिक विकसित केले तर त्याचे सकारात्मक परिमाण देशाच्या विकासावर होतील.

लोहा तालुक्यातील अन्न विषबाधेनंतर आरोग्य विभागाद्वारे शीघ्र कृती पथकाची स्थापना

 लोहा तालुक्यातील अन्न विषबाधेनंतर आरोग्य विभागाद्वारे

 शीघ्र कृती पथकाची स्थापना

            मुंबईदि. 07 : नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामधील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये प्रसादातून सुमारे 2 हजार भाविकांना मंगळवारीदि. 6 फेब्रुवारी रोजी अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने शीघ्र कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनेची शहानिशा करून अहवाल सादर करावाअसे आदेश संचालकपुणेआरोग्य सेवा यांनी जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत. दरम्यानसर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सद्यस्थितीत विषबाधेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

            कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने आयोजित केलेल्या यात्रेमध्ये 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर सुमारे 2 हजार भाविकांना 7 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळून आले आहे. या रुग्णांना मळमळउलटीशौचास लागणे अशी लक्षणे दिसून आल्यानंतर 600 रुग्णांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड, 100 रुग्णांना श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय, 150 रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय लोहा, 20 रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रमाळाकोळी, 150 रुग्णांना लोहा येथील खाजगी रुग्णालय  येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे अतिरिक्त खाटांची पूर्वतयारी करण्यात आलेली आहे.

              रुग्णांना कोष्ठवाडीसावरगावपोस्ट वाडीरिसनगावमस्की या गावातून रुग्णालयात उपचारासाठी आणण्यासाठी टोल फ्री 102 क्रमांकाच्या 8 रुग्णवाहिका आणि टोल फ्री 108 क्रमांकाच्या 6 रुग्णवाहिकाखासगी 3 बसेस,  महामंडळाची एक बस तसेच गावातील इतर प्रवासी वाहतूक वाहनांचा वापर करण्यात आला आहे. रुग्णांना औषधोपचारासाठी मुबलक औषधींचा साठा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा रुग्णालय औषधी भांडारजिल्हा परिषद नांदेड औषधी भांडार येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे तात्काळ औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांच्या पुढील तपासणीसाठी अन्नपाणी आणि उलटीचे नमुने घेण्यात आलेले आहेत.

            आरोग्य विभागजिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत या गावामध्ये 5 आरोग्य पथके हे औषधोपचारसर्वेक्षणसाठी कार्यरत आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शीघ्र कृती पथक स्थापन करण्यात आलेले आहे. नांदेडचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी हे पथकाचे प्रमुख असून  डॉ. नितीन अंभोरेशासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेडडॉ. बालाजी माने (बाल रोग तज्ञ) जिल्हा रुग्णालय नांदेडडॉ. तज्जमुल पटेलजिल्हा रुग्णालय नांदेड यांचा या पथकात समावेश आहे.

            याकामी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनवैद्यकीय महाविद्यालयसार्वजनिक आरोग्य विभाग हे समन्वयाने कार्यरत आहेत. विषबाधेमुळे सद्यस्थितीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करावेअसे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

0000

राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने काम करावे

 राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने काम करावे

-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

राज्यस्तरीय मेळाव्यात 400 संस्थाचा सहभाग    

              मुंबईदि. ७ :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कौशल्यरोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी  आणि नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी  सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश र्काशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

            हायलॅण्ड ग्राऊंडढोकाळीमाजीवाडाठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागांतर्गत ठाणेपालघररायगडसिंधुदुर्गमुंबई उपनगरमुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता राज्यस्तरीय 'नमो महारोजगार मेळाव्याचेआयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोमध्ये ४०० विविध औद्योगिक शासकीय व खाजगी संस्था सहभागी होणार असून हा मेळावा २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४  रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल.या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्सइनव्हेस्टर्स व इन्क्यूबेटर्स या सर्वांना सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

         मंत्रालयातील परिषद सभागृह येथे राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा पूर्व तयारीबाबत बैठक झाली. बैठकीत मार्गदर्शन करताना कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकरमहाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडकेठाणेचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळसिंग राजपूतकौशल्य विद्यापीठाच्या कुलगूरू डॉ. अपूर्वा पालकरव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिंगाबर दळवीव्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील,नवी मुंबईचे कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे उपआयुक्त दि.दे.पवास यासह इतर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

           कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले कीया मेळाव्यात राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी आणि औद्योगिक संस्थांनी नावनोंदणी करावी यासाठी सर्व विभागांनी, स्थानिक प्रशासनाने याबाबत जनजागृती करावी. जास्तीत जास्त उद्योजक आणि विविध शासकीय आस्थापना यांनी याबाबत माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी  यासाठी प्रयत्न करावेत. मेळाव्यासाठी उभारण्यात येणारे स्टॉल्स आणि रोजगार नोंदणी याबाबत स्थानिक प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रातील औद्योगिक शासकीय व खासगी संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. नमो महारोजगार मेळाव्यात जास्तीत नोकरीइच्छुक उमेदवार यांचा सहभाग वाढावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.तसेच नमो महारोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने उभारण्यात येणा-या सोयी सुविधांचा अशा सूचना त्यांनी केल्या.                          

नमो महारोजगार राज्यस्तरीय मेळावा

           राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यामध्ये दहावीबारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर, पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेत रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd  किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंकवर जाऊन उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एका पेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करुन मुलाखत देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतीलत्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत.या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी कसून प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

                  नमो महारोजगार मेळाव्याकरिता जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत

       कोकण विभागांतर्गत ठाणेपालघररायगड,सिंधुदुर्गमुंबई उपनगरमुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीयखाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

                                                   -000000-

संध्या गरवारे/विसंअ

व्हॉट्सॲप चॅटबोट' आणि ‘आई’ महिला केंद्रित धोरण ॲप'मुळे राज्याच्या पर्यटनाला गती मिळेल

 व्हॉट्सॲप चॅटबोट' आणि ‘आई’ महिला केंद्रित धोरण ॲप'मुळे

राज्याच्या पर्यटनाला गती मिळेल

पर्यटन मंत्री गिरीश महाजन

            मुंबईदि.७ :  व्हॉट्सॲप चॅटबॉट लाँच  केल्यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना  होईल तसेच ‘आई’ महिला केंद्रित धोरणाची माहिती नव्याने सुरू केलेल्या ॲपमुळेपर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजिकांना  होईल या दोन्ही उपक्रमांमुळे राज्याच्या पर्यटनाला चालना मिळेल असे मत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

               वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे राज्य पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यावेळी उपस्थित होते.

               मंत्री श्री. महाजन म्हणाले की,राज्यात पर्यटन क्षेत्रांची माहिती पर्यटकांना सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले जाणे ही काळाची गरज आहे.राज्यात येणा-या पर्यटकाला उत्तम मुलभूत सोयी सुविधापर्यटन स्थळांची अचूक माहिती देखील प्राप्त होईल. पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा,महिलांचे आर्थिक स्वावलंबन व्हावे यासाठी ‘आई’ हे महिला केंद्रीत पर्यटन धोरण आणले आहे या माध्यमातून अनेक योजना सुरू करण्यात येत आहेत याची अद्ययावत माहिती महिलांना  आई पॉलिसी धोरण ॲपच्या माध्यमातून होण्यासाठी  मदत होईल.

                पर्यटन सचिव जयश्री भोज म्हणाल्या, राज्यातील ११ गड किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत नामांकन मिळाले आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जगाच्या पर्यटनस्थळात आपल्या पर्यटन स्थळांना मिळालेले स्थान यामुळे निश्चितच पर्यटक वाढतील.पर्यटन विभाग पर्यटन वाढीसाठी अनेक धोरण आखत आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नव्याने आलेले ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण निश्चितच राज्यातील पर्यटन क्षेत्रातील महिलांच्या विकासाला हातभार लावेल असेही त्या म्हणाल्या.

                पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील म्हणाले, पर्यटन क्षेत्रात पाच लाख रोजगार उपलब्ध व्हावेत अशी धोरण आखली जात आहेत. राज्यातील संस्कृतीवर आधारित वेगवेगळे महोत्सव आयोजित करून स्थानिक ठिकाणी रोजगार प्राप्त व्हावा यासाठी पर्यटन संचालनालय काम करीत आहे. आई महिला केंद्रित पर्यटन धोरण देखील प्रभावीपणे राबवत आहे.

           पर्यटन तज्ज्ञ स्वाती खांडेलवाला,डॉ.संतोष सुर्यंवशी,सगुना बाग ॲग्रो टुरिझमचे संचालक चंदन भडसावळे,पॅराग्लाइंडीग व्यावसायिक विस्तापस खरस,सचिन पांचाळ,केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या मोनिका प्रकाश,ग्रामीण पर्यटन तज्ज्ञ प्रा.डॉ.कामाक्षी माहेश्वरी यांनी पर्यटन विषयक विचार मांडले.

००००

Featured post

Lakshvedhi