Tuesday, 6 February 2024

अनाथ मुलांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणार

 अनाथ मुलांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणार

- मंत्री आदिती तटकरे

            मुंबईदि. 5 : अनाथ मुलांचे संगोपन आणि उच्च शिक्षणासाठी राज्य शासन संवेदनशील आहे. राज्यातील अनुरक्षण गृहातील अनाथ गृहातील बालकांना शासकीय योजनांचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल. त्यानुसार उपाययोजना करण्यात येतीलअसे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. 

            विधानसभेत अनाथ बालकांबाबत दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्री कु. तटकरे यांच्या दालनात आज दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार बच्चू कडूमहिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादवउपायुक्त श्री. मोरे उपस्थित होतेतर महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्याअनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ मिळावा म्हणून सर्वप्रथम खुल्या प्रवर्गातून शिक्षण व नोकरीमध्ये एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे. अनाथ आरक्षणाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना महिला व बालविकास विभागाने निर्गमित‍ केल्या आहेत. अनाथ बालके अनुरक्षण गृहात असतानाच त्यांचे आधारकार्डशिधापत्रिकाबँकेतील बचत खातेअनाथ प्रमाणपत्रसंजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल. त्यासाठी तहसील कार्यालयाशी समन्वय साधण्यात येईल. अनाथ मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र लेखाशीर्षासाठी महिला व बालविकास विभागातर्फे सामाजिक न्याय विभागास शिफारस करण्यात येईल. आमदार श्री. कडू यांनी अनाथ मुलांना वयाच्या 21 वर्षानंतर उच्च शिक्षणासाठी स्वाधार’ योजनेच्या धर्तीवर योजना लागू करावीअशी अपेक्षा व्यक्त करीत अनाथ मुलांचे संगोपन आणि शिक्षणासाठी विविध सूचना केल्या.

गरम ताजा आहार पुरवठ्यासाठी महिला बचतगटांना प्राधान्य द्यावे

 गरम ताजा आहार पुरवठ्यासाठी

महिला बचतगटांना प्राधान्य द्यावे

- मंत्री आदिती तटकरे

            मुंबईदि. 5 : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार पुरवठ्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य द्यावेअशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिले.

            मंत्री कु. तटकरे यांच्या मंत्रालयातील दालनात आज दुपारी आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील महिलांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव उपस्थित होतेतर एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला बचत गटांना गरम ताजा आहार पुरवठ्याची कामे द्यावीत. यावेळी केंद्र सरकारकडे दर सूचीबाबत पाठपुरावा करण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले. त्यांनी महिला बचत गटांच्या समस्या जाणून घेतल्या.

यंत्रमाग धारकांच्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी गठित समितीच्या अहवालाचे प्रारूप वस्त्रोद्योग मंत्र्यांना सादर

 यंत्रमाग धारकांच्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी

गठित समितीच्या अहवालाचे प्रारूप वस्त्रोद्योग मंत्र्यांना सादर

    

            मुंबई, दि.5 :  यंत्रमाग धारकांना (27 HP) ते (201HP)  या प्रवर्गातील घटकांना प्रति युनिट 75 पैसे अतिरिक्त  वीज सवलत देण्याबाबत शासनाने प्रस्तावित केले आहे. याच धर्तीवर  साध्या यंत्रमाग धारकांना (27HP ) खालील प्रति युनिट 75 पैसे  वीज सवलत मिळण्याबाबची शिफारस गठित समितीने केली आहे. याबाबतचा  प्रस्ताव  तातडीने तयार करावा, असे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

            राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या समितीच्या अहवालाचे प्रारूप आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंहवस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडिलकरउपसचिव श्रीकृष्ण पवार संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील म्हणाले कीराज्याच्या अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योग क्षेत्राची महत्वाची भूमिका  आहे. या घटकांना चालना देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेत आहे. साध्या यंत्रमागधारकांनी विविध बँका वित्तीय संस्थांकडून व्यवसायाकरिता घेतलेल्या मुदती कर्जकॅश क्रेडिट व खेळत्या भांडवलासाठी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावर 5 टक्के याप्रमाणे व्याज अनुदान देण्यात यावे याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगून याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

            वीज बिलातील पोकळ थकबाकी वरील व्याज रद्द करणे,सौर ऊर्जा वापरसौर ऊर्जा प्रकल्प उभारणीनवीन वीज जोडणीसाठी ऑनलाईन नोंदणी एक वेळची निर्गम योजनाराज्यातील यंत्रमागांची गणनाअल्पसंख्यांक यंत्रमाग धारकमिनी टेक्स्टाईल पार्क योजना राबविणेभांडवली अनुदानएक जिल्हा एक उत्पादन(ओडीओपी )टेस्टिंग लॅबआपत्कालीन व्यवस्थामूलभूत पायाभूत सुविधाउद्योग भवन उभारणेसांडपाणी प्रक्रियाआयात मालयंत्रमाग पुनर्स्थापना याबाबत सकारात्मक चर्चा करून यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस करण्यात येईल. मल्टी पार्टी वीज जोडणी बाबतही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल असे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

            या समितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रकाश आवाडेमाजी आमदार  राईस शेखप्रवीण दटकेमंत्री सुभाष देशमुख हे समितीचे सदस्य तर व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ हे सदस्य सचिव आहेत.

०००००

काशीबाई थोरात/विसंअ

सुशासन हा आमच्या सरकारचा पाया

 सुशासन हा आमच्या सरकारचा पाया

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन

 

            मुंबईदि. ५ : सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्वाचे ठरणार आहेत. जिल्हा सुशासन निर्देशांकामुळे जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार आहे. यातून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या समान विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्देशांकात चांगली कामगिरी करुन प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेतअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या २०२३-२४ वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिककेंद्रीय कार्मिक मंत्रालयाचे सहसचिव एनबीएस राजपूत यांच्यासह सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी आणि सुशासन समितीचे पदाधिकारी यांच्यासह इतर मान्यवर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे  उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीशासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे आहेत. ‘शासन आपल्या दारी’ सारख्या उपक्रमातून सरकार थेट जनतेपर्यंत आपण नेत आहोत. करोडो लोकांना शासकीय योजनांचे लाभ आपण याद्वारे दिले आहेत. शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला बळ देणारी या निर्देशांकांची संकल्पना आहे. यातील १० क्षेत्राच्या गुणांकनात प्रत्येक जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्यास सर्वसामान्यापर्यंत शासकीय योजना-लाभ प्रभावीपणे पोहचण्यास मदत होणार आहे. याचा विचार करुन सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपला जिल्हा सुशासन निर्देशांकात अग्रेसर कसा राहील यासाठी काम करावे. यातूनच जनतेच्या मनात हे आपले सरकार आहेअसा विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहेअसेही त्यांनी सांगितले.

            सुशासन अहवालाचे सादरीकरण करतांना अपर मुख्य सचिव सौनिक यांनी सांगितले कीप्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी मंत्रालय स्तरावर ई-ऑफिस आणि मध्यवर्ती टपाल कक्ष यासारखे उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर देखील सुशासन या संकल्पनेनुसार काम होण्यासाठी विविध १० क्षेत्रांच्या कामगिरीच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्याचे या निर्देशांकाचे आधारे मूल्यमापन करण्यात येत आहे. देशात जिल्हा सुशासन निर्देशांक ही संकल्पना राबविणारा महाराष्ट्र हे देशातील पाचवे राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

            यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा सुशासन निर्देशांकाच्या संकेतस्थळाचे आणि सुशासन अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

0000

 

Sunday, 4 February 2024

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्री

 संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी

कायमस्वरुपी निधी उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

         मुंबई दि.४- संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारी आढावा बैठक वर्षा निवासस्थान येथे पार पडली. या बैठकीला पालकमंत्री दादाजी भुसेखासदार हेमंत गोडसेआमदार हिरामण खोसकरसुहास कांदेनगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच गोविंदराजनाशिक ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक प्रविण देशमानेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  आशिमा मित्तलनाशिकचे प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधेसंत निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे यांच्यासह हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले कीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखो वारकरी येत असतात. संत परंपरेतील विश्वगुरु अशी ओळख असणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांचा पौषवारी सोहळा हा आषाढी आणि कार्तिकी वारी इतकाच भव्य स्वरुपात साजरा होत असतो. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरात होणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या सोहळ्याचे नियोजन करतांना प्रशासनाने याला नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून या सोहळ्याकडे पाहावे. या यात्रौत्सवासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच वारकऱ्यांच्या वाहनांना स्टिकर पुरवून अशा वाहनांना टोल माफी देण्याबाबत नियोजन करावेअशा सूचनाही त्यांनी दिल्या. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव सर्वांच्या समन्वयातून आणि सहकार्यातून नक्कीच यशस्वी होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री भुसे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या तयारी विषयी माहिती दिली.

तो गरीब आहे

 मी शाळेत गेलो

त्यांनी माझी जात नोंदवून घेतली.

मग आम्ही सर्वांनी....

"सारे भारतीय माझे बांधव आहेत...!"

ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली..!


त्याला पुस्तके ड्रेस मिळाली,

मी पण मागितली...

तर ते म्हणाले,

"तो गरीब आहे."


"मी पण गरीबच आहे."


"तु गरीब आहेस मान्य पण तुझी जात वेगळी आहे."


दोन गरीबांची पण जात वेगवेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं.


त्याला शासनाच्या....

फी माफी आणि अन्य सर्व सुविधा मिळत होत्या,

आणि

माझी आई रोजंदारी करुन माझं शिक्षण करत होती...!


आम्ही सोबतच स्पर्धा परीक्षा दिली.

(इथे स्पर्धा हा शब्द थोडा चुकीचा नाही का वाटत..?)

तो सिलेक्ट झाला...

मी नव्हतो झालो...!


मी मार्कलिस्ट बघितली तर...

त्याला 150 पैकी....

108 मार्क होते

आणि मला 145...!


नंतर कळालं,

त्याने फॉर्म सोबत स्वतःचं जात प्रमाणपत्र जोडलं होतं.

स्पर्धेतही जातीची परीक्षा असते......

हे मला त्या दिवशी कळालं!


पुढे तो सेटल झाला...

चांगला पैसा ही आला.

घर, गाडी सर्व आलं....

त्याचं आयुष्य मजेत चालू झालं...!


अधूनमधून कुठे कुठे व्याख्यानंही द्यायचा....

सामाजिक समानतेवर तो भरभरुन बोलायचा....!!


एके दिवशी त्याची एका सुंदर मुलीशी भेट झाली....

आणि

बघताच त्याला ती खूप आवडली...!


तिच्या मनात काय हे याला नव्हतं माहीत,

तिच्यावर मात्र याची

जडली होती प्रित...!


काहीही करुन हवी होती ती त्याला...

तिला मिळवण्याचा खटाटोप त्याने सुरु केला.


एके दिवशी मात्र तो गारच पडला,

तिची जात दुसरी....

हे माहीत झालं त्याला..!


प्रचंड संतापला ...

अन् पारा त्याचा चढ़ला,

जातीच्या ठेकेदारांवर

जोराने ओरडला..!


हा जातिभेद काही मुर्खांनी तयार केला,

माणूस सर्व एकच असतो कोण सांगेल यांना...?


नंतर मग,

त्याच्या व्याख्यानाचा एकच विषय असायचा....

जात गाडून टाका

भरसभेत सांगायचा...!


आत्तापर्यन्त साथ देणारी

"जात"च

बाधक झाली होती....

त्याची मात्र यामुळे पुरती गोची झाली होती...!


काय करावे सुचेना त्याला...

आपली जात आडवी येतेय...

सर्व आहे पण एका गोष्टीमुळे मन बैचैन होतेय...!


एके दिवशी तो असाच...

स्वतःची फाईल चाळत होता,

रागारागाने तो आपल्याच

"जात" प्रमाणपत्राकडे पाहत होता!


त्याच्याकडे बघून,

ते प्रमाणपत्र ही हसले....

"चुकतोयस बेटा तू,

जरा विचार कर म्हणाले...!"


ज्या जातीने जगवलं तिचाच तुला आता राग येतोय....

फायदा बघून स्वतःचा...

तूच आज स्वार्थी होतोयस...!


तो बघ... तुझ्या सोबतचा

"तो" गुणी मुलगा,

खाजगी कंपनीत जातोय....

माझ्यामुळे बेट्या,

तू मात्र....

सुखाची रोटी खातोयस...!


जातिभेद वाईट....

हे कुणीही मान्य करेल,

पण तुला तेंव्हाच हे खटंकतय

जेंव्हा तुझ्या हिताआड येतंय...!!


याआधी तूही तुझी जात अभिमानाने मिरवायचास...

जाती मुळे मिळणारे सर्व फायदे...

तोर्यात उचलायचास...!


हे ऐकून तो थोडा स्तब्धच झाला....

मनाशी काही विचार करता झाला....!


त्या दिवशी "तो" माझ्या लग्नात आगंतुक पाहुणा म्हणून आला....

"जिंकलास गड्या तूच..."

मजपाशी येऊन म्हणाला...!


रोख त्याच्या बोलण्याचा मलाही कळला होता....

त्याला आवडणाऱ्या मुलीच्या गळ्यात,

मी हार घातलेला होता...!


तीच सुंदरी माझी

जीवनसाथी झाली होती,

कारण तिची न् माझी

जात एकच होती...!


कसं आहे ना भावा...

जीवनात प्रत्येकाला सर्वच मिळत नसतं...

कुठे न कुठे प्रत्येकाला नमतं घ्यावंच लागतं...!


तुला तुझी जात प्यारी तशीच माझी मला ही...!!

कशाला तत्वज्ञान सांगतोयस भावा....

फायद्यासाठी काहीही..?


खरंच दूर करायचेत का जातिभेद?

चल मग दोघे मिळून करु...

जातीवर नको,

जो आर्थिक गरीब त्यालाच

स्कॉलरशिप,सवलती

मिळवून देऊ...!


जात प्रमाणपत्रे कशाला वाटायची...

आपण फक्त भारतीय होऊ....

तू अन् मी एकच

हीच शिकवण सर्वांना देऊ...!


ज्याच्यात असेल गुणवत्ता

त्याचंच सिलेक्शन होईल...

त्या दिवशी माझा देश

खऱ्या अर्थाने महान होईल....!


तु ही माणूस मी ही माणूस,

मग कसला आपल्यात भेद?

जातीत विखुरला माणूस त्याचाच वाटतो खेद..!


जात हा मुद्दा भाऊ निवडणुकीतही गाजतो...

दरवेळी तुमचा उमेदवार इलेक्शन त्यावरच जिंकतो...!


तुझेन् माझे लालच रक्त,

माणूस आपली जात...

स्वार्थ नको आणू थोडी

उदात्तता हृदयात...!


माहीत मजला रुचणार नाही,

हे कधीही सर्वांना....

कारण,

प्रत्येकाला हवीय येथे....

आपल्या सोईची "जात"......!!


- #लेखक - #अनामिक...

ज्येष्ठा नागरिकांसाठी

 



Featured post

Lakshvedhi