Friday, 8 December 2023

अग्निप्रतिबंधक यंत्रांची सुस्थिती पाहणी करण्यासाठी भरारी पथक

 अग्निप्रतिबंधक यंत्रांची सुस्थिती पाहणी करण्यासाठी भरारी पथक

                                                            उद्योगमंत्री उदय सामंत

 

            नागपूरदि. 8 : मुंबईसह राज्यातील शहरांतील इमारतीच्या अग्निप्रतिबंधक यंत्रांच्या सुस्थितीची पाहणी करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

            विधानपरिषदेत महाराष्ट्र अग्नि प्रतिबंधक जीव संरक्षण उपाययोजना अधिनियमानुसारइमारतींचे मालक भोगवटादार गृहनिर्माण संस्थांनी इमारतीचे फायर ऑडिट परवाना अग्निशामक यंत्रणेमार्फत करून घेण्यासंदर्भात सदस्य प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

            मुंबई अग्निशमन दलामार्फत उत्तुंग इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वीया इमारतीस सशर्त देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रातील अग्निसुरक्षाविषयक बाबींची पूर्तता केल्याबाबत अग्निसुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाते व त्यानुसार त्याबाबतचा अहवाल ऑनलाईन पध्दतीमध्ये जतन करुन त्याबाबतचे अभिप्राय संबंधितांना पाठविले जात असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

            आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी मुंबई अग्निशमन दलामार्फत एकूण 6 हजार 975 अग्निस्वयंसेवकांना तसेच  2 हजार 50 अग्निरक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आहार या संघटनेकरिता उपहारगृहातील 381 कर्मचाऱ्यांना प्राथमिक अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभाग कार्यालयातील व 5 मुख्य रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना अग्निसुरक्षेबाबत प्रशिक्षण व प्रात्याक्षिके दाखविण्यात आलेली आहेत. मुंबईतील 69 मॉल्सची  तपासणी करण्यात आलेली आहेअशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुंबईतील जनतेच्या जनजागृतीकरिता दिनांक 14 एप्रिल ते 20 एप्रिल असा अग्निसुरक्षा सप्ताह तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत वेगवेगळे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम राबविण्यात आला आहेत. मुंबईतील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना अग्निशमन केंद्राच्या भेटीदरम्यान अग्निसुरक्षेबाबतची माहिती दिली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी सदस्य सचिन अहीरजयंत पाटीलप्रवीण दरेकरअनिल परब यांनी चर्चेत सहभाग घेतला.

0000000


चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर; राज्य शासनाचे अपिलाचे अधिकार

 चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर;

राज्य शासनाचे अपिलाचे अधिकार

प्रशासकीय स्तरावर प्रदान अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास दिल्याने

विलंब टाळला जाऊन अपिलकर्त्यांचा वेळ वाचणार

                                                            -उपमुख्यमंत्री अजित पवार

          नागपूरदि. 8 :- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेले सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49- चिट फंड (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक2023 मंजूर करण्यात आले. राज्य शासनाकडील अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास प्रदान केल्यामुळे अपील निकाली काढण्यातील विलंब टाळला जाणार आहे. त्यामुळे अपीलकर्त्यांचा वेळ देखील वाचणार आहे.

          विधेयक मांडताना उपमुख्यमंत्री म्हणाले कीचिटफंड अधिनियम1982 च्या माध्यमातून शासनामार्फत सर्व चिटफंडांचे नियमन केले जाते. या अधिनियमात दुरुस्ती करण्यासाठी हे विधेयक मांडले आहे. सध्या वित्त मंत्र्यांकडे अपिलाचे अधिकार आहेत. वित्तमंत्र्यांकडील कामाच्या व्यापामुळे त्यांना अपिलांचे कामकाज चालविण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अपिलाचे अधिकार राज्य कर उपायुक्त दर्जाचा अधिकारी असलेल्या सहनिबंधक या अधिकाऱ्यांकडे देण्यात येत आहेत.

          उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले कीचिटफंड चालवताना काही वेळा वाद निर्माण होतात. त्यावेळी चिटफंड चालवणाऱ्या कंपन्या कलम 69 नुसार राज्य कर विभागातील चिटस् सहनिबंधकांकडे दाद मागतात. सहनिबंधकांच्या निर्णयाने जर समाधान झाले नाही तर कलम 70 नुसार त्यांच्या निर्णयाविरुद्ध दोन महिन्यांच्या मुदतीत वित्त मंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद आहे. या सुधारणेमुळे हे अधिकार खालच्या स्तरावर म्हणजेच सहनिबंधकांकडे राहणार असून त्यामुळे अपील निकाली काढण्याची प्रक्रिया वेगाने पार पडण्यास मदत होणार आहे.

000

महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अधिक सक्षम करणार

 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण

अधिनियम 1999 अधिक सक्षम करणार

                                                            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

          नागपूरदि. 8: महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्था) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 हा कायदा आणखी सक्षम करण्यात येईल. कायद्यात करावयाच्या सुधारणांसाठी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अभ्यास गट नियुक्त करण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.  

  

          पिरकोन (ता. उरणजि. रायगड) येथे रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून नागरिकांची केलेल्या फसवणुकीबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. 

  

          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेपिरकोन येथील प्रकरणात गुंतवणूकदारांचे 39 कोटी रुपये बुडाले आहेत. या प्रकरणात पोलीस कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने जामीन दिला. मात्र या जामीनाविरुद्ध अपील करून पुन्हा मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्था) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. आरोपीकडून 9 कोटी रुपये रोखबँक खात्यातील दहा कोटी रुपये आणि दीड कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तीन महिन्यात सक्षम प्राधिकारी नियुक्त करून मालमत्तेची विक्री करण्यात येईल आणि ठेवीदारांचे पैसे परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये रोख रक्कमबँकेतील रक्कम तर तातडीने देता येईल. 

   

          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणालेआर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून नागरिकांना अशा फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक न करण्याबाबत प्रभावी जाणीव जागृती करून नागरिकांना सजग करण्यात येईल. अशाप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेअंतर्गत विशेष अधिकारी नियुक्त करण्याबाबत तपासून कार्यवाही करण्यात येईल. सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेल्या योजनेतच नागरिकांनी पैसे गुंतवावेअसे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी केले. 

  

          अशा प्रकारच्या मोठ्या जाहिरातींबाबत आर्थिक गुन्हे शाखेला सांगून नियंत्रकांकडून नियमांची तपासणी करून त्यावर कारवाई करण्यात येईल. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ठेवीदारांचे पैसे देण्याची तरतूद कायद्यात आहे. राज्यात पैसे दुप्पट करून देतोअधिकचे व्याज देतो असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात येत आहे.  त्यामुळे राज्यात बरेच नागरिक अशा योजनांमध्ये पैसे गुंतवतात. मात्र काही कालावधीनंतर  योजनेत ठरल्यानुसार गुंतवणुकदारांना रक्कम देण्यात येत नसून आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येते. वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेची व्याप्ती वाढवून अशा गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात येईल,असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

  

          यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य अशोक चव्हाणबाळासाहेब थोरातप्रशांत ठाकूररवींद्र वायकरनाना पटोले यांनी सहभाग घेतला.

0000

सहवास कोणाचा..?*

 *सहवास कोणाचा..?*                                                                          


        *दहा मिनिटे*.. बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व  कष्टपूर्ण आहे, हे कळेल...

          

        *दहा मिनिटे*.. बेवड्यासमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे, हे समजेल...         


         *दहा मिनिटे*.. 

साधू संन्याशासमोर बसा, आपल्याजवळील सर्वकाही दान करून टाकावे, असे वाटेल...


        *दहा मिनिटे*.. राजकारणी पुढाऱ्यासमोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे, कळून येईल...

        

        *दहा मिनिटे*..

विमा एजंट समोर बसा, जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे, असे वाटेल...

        

        *दहा मिनिटे*.. व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे, असे वाटेल...

       

       *दहा मिनिटे*... शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे, हे समजेल...

       

       *दहा मिनिटे*.. चांगल्या शिक्षकासमोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावे, अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल...

        

       *दहा मिनिटे*... शेतकरी, कामगार यांच्यासमोर बसा, त्यांच्या काबाडकष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता, असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल...

       

         *दहा मिनिटे*.. 

सैनिकासमोर बसा, तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे, याचा साक्षात्कार होईल...

       

         *दहा मिनिटे*...

 माऊलींच्या वारीत चाला, आपोआप तुमचा अहंकार, मीपणा गळून पडेल...      

        

       *दहा मिनिटे*.. मंदिरामध्ये बसा, मनाला मनःशांती मिळेल...   

       

       *दहा मिनिटे*... लहान बालकाशी खेळा, नि:स्वार्थ प्रेमाचा अनुभव मिळेल...

       

       *दहा मिनिटे*.. 

आई वडिलांसोबत बसा, त्यांनी तुमच्या भल्यासाठी केलेल्या कष्टाची व त्यागाची जाणीव होईल...


               


याचाच अर्थ :-

*❣️सहवास कुणाचा, हे खूप महत्त्वाचं असतं..!❣️*

🙏🏻

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे

 माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे

                                                                                                            - राज्यपाल रमेश बैस

सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या

अधिकारी आणि विविध संस्थांचा सत्कार

 

            मुंबई, दि.7 : भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच,  नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी,युद्धात अपंगत्व तसेच  सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसना करिता सशस्त्र सेना ध्वज निधीला सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावेअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

      राजभवन येथे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यांद्वारे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आयोजित  सन 2023-24 या वर्षीच्या सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस बोलत होते. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडिंगचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाइस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठीजीओसी मुख्यालय महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलॉन, एअर ऑफिसर कमांडिंग मुख्यालय मरीन एअर ऑपरेशन्सचे एअर व्हाइस मार्शल रजत मोहन यावेळी उपस्थित होते.

        शासकीय, खासगी नामवंत व्यक्ती आणि संस्थांचे राज्यपाल रमेश बैस यांनी अभिनंदन करुन गेल्या वर्षी सशस्त्र ध्वज दिन निधी संकलनाची उत्कृष्ट कामगिरी  करणाऱ्या आगामी वर्षातही यापेक्षा अधिक उत्कृष्ठ ध्वज दिन निधी संकलन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय सैन्य हे त्यांच्या त्यागआणि शौर्यामुळे ओळखले जाते. भारतीय सैन्यदल हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, ज्यामध्ये आपली माता आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, असे म्हटंले आहे. आपल्या मातृभूमिला आणि आपल्या जनतेला सैनिक अत्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करून देतात. त्यांच्यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि आपले राष्ट्र प्रगती करू शकतो. जम्मू आणि काश्मीरडोकलामअरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील बंडखोरीचा मुकाबला करण्यातही आपले सैन्य अत्यंत उत्कृष्ट  काम करत  आहे अशा सैनिकांच्या या योगदानासाठी आपण सदैव ऋणी असले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.  

            भारत देश पारतंत्र्यात होता तेव्हाचा कालावधी हा अनेक गोष्टींवर परिणाम करणारा होता. आपला समृद्ध सांस्कृतिक वारसाआपली शिक्षण पद्धती आणि अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला. इ.स. 1700 पर्यंत भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता. आज आपल्या देशाने हे गतवैभव पुन्हा प्राप्त केले असून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही अत्यंत अभिमानीची गोष्ट आहे. जेव्हा आपण राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवू आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात शिस्त पाळू तेव्हांच आपण आपले स्वातंत्र्य आणि आपली लोकशाही टिकवू शकतो. त्यामुळे या देशाला सर्वोत्तम सुरक्षा देणाऱ्या या शूरविरांच्या कुटूंबियांसाठी सर्वांनी सशस्त्र सेना ध्वज दिनासाठी  मदत करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.

यावेळी कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर,सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) राजेश गायकवाडमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी  राजेंद्र भोसले,मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर,सैनिक कल्याण बोर्डाचे मेजर प्रांजल जाधव यांच्यासह विविध देणगी  देणा-या  शासकीय संस्था,शाळामहानगरपालिकाशासनाचे विविध विभाग आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी आणि अधिकारी,नामवंत देणगीदार यांचा सन 2022-23 या वर्षात  ध्वज दिन निधी संकलनाची उत्कृष्ट कामगिरी  केल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सन 2023-24 साठी उपस्थित मान्यवरांनी ध्वजनिधी संकलनात आपला सहभाग नोंदवला. 

000

सिल्लोड येथे अल्पसंख्याक समाजातील लाभार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 सिल्लोड येथे अल्पसंख्याक समाजातील लाभार्थ्यांसाठी

दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 

मुंबईदि. ०७ : अल्पसंख्याक विकास विभागाच्या अंतर्गत असलेले मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या वतीने सिल्लोड येथे शनिवार दि.९ व रविवार दि.१० डिसेंबर २०२३ रोजी अल्पसंख्याक समाजातील गरजू लाभार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा लाभ अल्पसंख्याक समाजातील गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन अल्पसंख्यांक विकास व औकाफपणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

            अल्पसंख्याक समाजातील होतकरू, गरजू लाभार्थ्यांना महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी या कार्यशाळेतून माहिती देण्यात येणार आहे. तसेच आवश्यक अर्थसहाय्यासाठी कर्जासंदर्भातील अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. या सर्व सुविधा या कार्यशाळेत एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. ही कार्यशाळा शनिवार दि.९ व रविवार दि.१० डिसेंबर २०२३ रोजी नॅशनल उर्दू हायस्कूल मैदानजमालशाह कॉलनी, सिल्लोड, जिल्हा-छत्रपती संभाजीनगर येथे  होणार आहेअशी माहिती मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लालमियाँ शेख यांनी दिली आहे.

          या योजनेचा लाभ राज्यातील सर्व अल्पसंख्यांक समाजातील सुशिक्षित बेरोजगारआर्थिकदृष्ट्या दुर्बलतसेच उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनी व बचत गटांनाही  घेता येईल. सर्व अल्पसंख्याक समाजातील गरजू लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन अल्पसंख्यांक विकास व औकाफपणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

००००

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 नाचणीचे आहे आहारात महत्व

 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023

नाचणीचे आहे आहारात महत्व

 

        यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. डिसेंबर महिना नाचणी या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. आरोग्यदृष्ट्याही नाचणी या तृणधान्याला महत्त्च आहे.

मानवी आहारात वापरल्या जाणाऱ्या तृणधान्य पिकामध्ये भात व गहू या प्रमुख धान्याचा समावेश होतो. इतर भरड धान्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोडो, कुटकी, बरटी व वरई या पिकांचा समावेश होतो. राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि वरई या पिकांची लागवड केली जाते. साधारणपणे 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि पारंपरिक दृष्ट्या या पिकांची लागवड आणि उत्पादन आपल्या देशात घेतले जात होते आणि आपल्या दैनंदिन आहार पद्धतीत या धान्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. कालांतराने भात आणि गहू या पिकांचे अधिक उत्पादन आणि उपलब्धता वाढल्याने व आहार पद्धतीत झालेल्या बदलामुळे आजच्या काळात या भरडधान्य पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे.  

राज्यात या खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी नाचणी महत्वाचे तृणधान्य पी आहेनाचणी/नागली (Finger millet) हे गवतवर्गीय कुळातील पीक असून याचे शास्त्रीय नाव (इलुसिन कोराकाना) Eleusine coracana असे आहे.

नाचणी पिकाची वाढ व सामान्य माहिती:

नाचणी हे गवतवर्गीय कुळातील (Poaceaeमहत्वाचे पीक आहे. त्यामुळे या पिकाची वाढ होताना मुख्य खोडासोबत फुटवे येण्याचा गुणधर्म  आहे. या धान्याचा आकार लहान असून आकार हे एकदलवर्गीय पीक आहे. या पिकामध्ये स्वपरागीभवन प्रक्रियेदवारे बीज निर्मिती होते. सर्वच भरड धान्य पीके ही बदलत्या हवामानास अनुकूल पिके आहेत. या पिकांमध्ये सीपद्धतीने प्रकाश संश्लेषण (मकाऊसज्वारी) होते. त्यामुळे पानाद्वारे अन्ननिर्मिती करताना प्रकाशपाणी व कार्बन डायऑक्साइडचा सुयोग्य वापर या वनस्पतीमध्ये केला जातो. तसेच प्रतिकूल परिस्थितीत वाढीची उत्कृष्ठ वैशिष्ट्ये जसे की, कमी ऊंचीपानांचा लहान आकारकणिस व पाने यामध्ये अन्नपदार्थ पुरविण्यासाठी योग्य पद्धततंतूमय मुळांची खोल वाढ व प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याचा गुणधर्म यामुळे या पिकांचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे.

 

नाचणी पिकाच्या कणसातील विविधता:

नाचणीच्या कणसामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. हाताच्या बोटाप्रमाणे असलेल्या अनेक पाकळ्यांचे नाचणीचे कणीस तयार होते. प्रत्येक पाकळीमध्ये समांतर पद्धतीने फुले येतात. त्यापासून धान्य निर्मिती होते. फुलांच्या एका गुच्छामध्ये असलेली लहान आकाराची फुले पहाटेच्या वेळी उमलतात, त्यामुळे प्रामुख्याने फक्त स्वपरागीभवन पद्धतीने बीज निर्मिती होते.    

विविध स्थानिक भागात कणसामध्ये पाकळ्यांच्या रचनेनुसार विविधता आढळते. त्यामध्ये प्रामुख्याने बंद कणीस, थोडे उघडलेले, अर्धवट उघडे, पूर्ण उघडे असे प्रकार आढळतात. नाचणीच्या धान्याचा रंग हा प्रामुख्याने लालसर तपकिरी असतो. काही प्रमाणात पांढऱ्या रंगाच्या नाचणी वाणांची देखील लागवड केली जाते.

नाचणीपौष्टिक गुणधर्म : अ) प्रथिने व खनिज पदार्थ:

नाचणी व तत्सम तृणधान्य वर्गातील पिकांमध्ये पुढील प्रमाणे पौष्टिक तत्वे असतात. त्यात मानवी आहाराच्या दृष्टीने नाचणी हे एक अत्यंत महत्वाचे पौष्टिक तृणधान्य आहेनाचणीमध्ये कॅल्शियम (364 मि.ग्रॅ./100 ग्रॅमया खनिजाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे भात आणि गहू धान्याच्या तुलनते 10 पटीने अधिक आहेत्याचबरोबर मॅग्नेशियम (१४६ मि.ग्रॅ./१०० ग्रॅमव लोह (४.६२ मि.ग्रॅ./१०० ग्रॅमया खनिजाचे प्रमाण भात आणि गहू या धान्यापेक्षा अधिक आहे.

ब) जीवनसत्वे:

या पिकाचे आणखी वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे या पिकांमध्ये मुबलक असलेले जीवनसत्वाचे प्रमाण. नाचणी धान्यामध्ये जीवनसत्व थायमिन बी-१ (०.३७ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम), रायबोफ्लेवीन बी-२ (०.१७ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) व फॉलिक असिड (३४.६६ µ.ग्रॅ./१०० ग्रॅम) याचे प्रमाण भात आणि गव्हापेक्षा पेक्षा जास्त आहे.

आहारातील महत्व: नाचणी- Finger millet (शास्त्रीय नाव: Eleusine coracana):

नाचणी हे एक पौष्टिक आणि आरोग्यदायी धान्य आहे. त्याचे काही पौष्टिक आणि आरोग्यदायी फायदे आहेत: पोषक तत्वांनी समृद्ध: नाचणी हे कार्बोहायड्रेट्सआहारातील तंतूमय पदार्थप्रथिनेजीवनसत्त्वे आणि खनिजांसह आवश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे. त्यात कॅल्शियमलोह आणि फॉस्फरसचे प्रमाण विशेषतः जास्त असते. आहारातील तंतूमय पदार्थाचे उच्च प्रमाण: हे आहारातील तंतूमय पदार्थांचा उत्कृष्ट स्त्रोत आहेजे पाचन आरोग्यासाठी महत्वाचे आहे. तंतूमय पदार्थामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतेगॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डरचा धोका कमी करते आणि पोट भरून ठेवते. वजन व्यवस्थापन मदत करते. ग्लूटेन-मुक्त: नाचणी नैसर्गिकरित्या ग्लूटेन-मुक्त आहेज्यामुळे सेलिआक रोग किंवा ग्लूटेन संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींसाठी एक आदर्श पर्याय बनतो.

अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध: यामध्ये फिनोलिक संयुगे आणि फ्लेव्होनॉइड्ससह विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतातजे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास आणि जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. रक्तातील साखर संतुलित करते: नाचणीचा ग्लायसेमिक निर्देशांक कमी असतोयाचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकत नाही. हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी किंवा रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेऊ पाहणाऱ्यांसाठी एक चांगली निवड बनवते. हृदयाचे आरोग्य: धान्यामध्ये तंतूमय पदार्थअँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि हृदयविकाराचा धोका कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान देऊ शकते. हाडांचे आरोग्य: नाचणीमध्ये कॅल्शियम या खनिजाचे प्रमाण इतर भात, गहू, ज्वारी, बाजरी या सर्व तृण धान्यापेक्षा सर्वाधिक आहे. त्याच बरोबर फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतातजे मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी आवश्यक असतात. गर्भधारणेसाठी पौष्टिक: उच्च लोह सामग्रीमुळेगर्भवती महिलांसाठी अशक्तपणा टाळण्यासाठी आणि गर्भाच्या निरोगी विकासास प्रोत्साहन देण्यासाठी फायदेशीर आहे. वजन व्यवस्थापन: नाचणीमधील उच्च फायबर सामग्रीमुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटू शकतेएकूण कॅलरीचे सेवन कमी होते आणि वजन व्यवस्थापनात मदत होते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते: नाचणीतील पोषक तत्वेविशेषत: अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजेरोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करतात. आतड्यांचे आरोग्य: नाचणीतील आहारातील तंतुमय पदार्थ देखील निरोगी आतड्यांतील जीवाणूच्या वाढीस व कार्यक्षमतेस प्रोत्साहन देतेजे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे. पचण्यास सोपे: नाचणी धान्य सहज पचण्याजोगे आहेज्यामुळे पचन संवेदनशीलता असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

(संदर्भ:- डॉ.योगेश बन व डॉ.अशोक पिसाळ, अखिल भारतीय समन्वीत नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

श्री.दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी

0000

Featured post

Lakshvedhi