Sunday, 3 December 2023

आंबा, काजू, संत्रा फळपिकांसह ज्वारीचा पीकविमा 04 व 5 डिसेंबर रोजी भरता येणार

  

आंबाकाजूसंत्रा फळपिकांसह ज्वारीचा पीकविमा

 04 व डिसेंबर रोजी भरता येणार

 

मुंबई, दि. 02 - रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्वारीसह आंबाकाजूसंत्रा आदी फळपिकांचा पीकविमा येत्या 4 व 5 डिसेंबर, 2023 रोजी भरता येणार आहे. या पिकांचा विमा भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपली असूनकृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीनंतर केंद्राकडून व डिसेंबर या दोन दिवसांसाठी पीक विमा पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. 

रब्बी हंगामातील ज्वारीतसेच आंबाकाजूसंत्रा आदी फळपिकांचा एक रुपयात पीकविमा भरण्यासाठी केंद्राकडून 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता आले नव्हते. याबाबत माहिती मिळताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी किमान दोन दिवस वरील पिकांचा विमा भरण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात यावेअशी विनंती केंद्राकडे केली होती. ही विनंती केंद्राकडून मान्य करण्यात आली आहे. 

दरम्यान  ज्वारीआंबाकाजूसंत्रा आदी उत्पादक शेतकरी विहित वेळेत आपला विमा भरु शकले नव्हतेत्यांनी दि. व डिसेंबर दरम्यान आपला विमा भरुन प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घ्यावाअसे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

 

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान 4 डिसेंबर रोजी करणार अनावरण

 सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या

 पुतळ्याचे पंतप्रधान 4 डिसेंबर रोजी  करणार अनावरण

 

 

 नवी दिल्ली, 2: पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. संध्याकाळी 4.15 वाजता महाराष्ट्रातील सिंधुदूर्गला पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदूर्ग येथे 'नौदल दिन 2023' कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील. पंतप्रधान भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके  सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील.

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदूर्ग येथील 'नौदल दिन 2023' सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करत आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे पंतप्रधानांनी जलावतरण केले. तेव्हा शिवरायांच्या राजमुद्रेपासून  प्रेरणा घेत साकारण्यात  आलेल्या नौदलाच्या नव्या ध्वजाचा भारतीय नौदलाने स्वीकार केला आहे.  

दरवर्षी, नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांद्वारे 'कार्यान्वयन प्रात्यक्षिके' आयोजित करण्याची परंपरा आहे. ही 'कार्यान्वयन प्रात्यक्षिके' लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-क्षेत्रीय मोहिमांचे विविध पैलू पाहण्याची संधी देतात. हे राष्ट्रीय सुरक्षेप्रती नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकते, तसेच नागरिकांमध्ये सागरी जनजागृतीचा प्रसारही करते.

0 0 0 0 0


शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा

 शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

मुंबईदि. 02: राज्य पायाभूत शैक्षणिक आराखडा तयार करताना पूर्व प्राथमिकप्राथमिक वर्गांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमामुळे बालकांवर अतिरिक्त भार न येता त्यांना जे ज्ञान मिळणे गरजेचे आहेते सुद्धा दिले गेले पाहिजेअशा पद्धतीने अभ्यासक्रम बनविण्यात यावा. सर्वंकष अभ्यासक्रम तयार करण्यासाठी शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्व शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावाअसे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

जवाहर बालभवन येथे राज्य पायाभूत शैक्षणिक आराखडा बाबत राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत आढावा घेताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते. बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलराज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगेएकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे सहायक आयुक्त अरविंद रामरामेशिक्षण संचालक सर्वश्री संपत सुर्यवंशीमहेश पालकर आदी उपस्थित होते. तर दुरदृष्य प्रणालीद्वारे शिक्षण आयुक्त सुरज मांढरेएससीईआरटीचे संचालक अमोल येडगेडॉ. दीपक म्हैसेकरसुहास पेडणेकरडॉ. मधुश्री सावजी आदी उपस्थित होते.

पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमाबाबत सूचना देताना मंत्री श्री. केसरकर म्हणालेशालेय शिक्षण विभागाने बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेबरोबर करार केला आहे. अभ्यासक्रम बनवितांना बालमनाचा अभ्यास करण्यासाठी बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी. बाल मानसोपचार तज्ज्ञ यांचेही मार्गदर्शन घ्यावे. मुलांवर अभ्यासाचे दडपण येणार नाहीयाची काळजी घ्यावी. याबाबत तज्ज्ञांचे पॅनल तयार करावे. त्यांचे मत जाणून घेऊन अभ्यासक्रम बनवावा. पॅनलमध्ये बाल मानसोपचार तज्ज्ञआंतरराष्ट्रीय शाळा अभ्यासक्रमातील तज्ज्ञसीबीएससी शाळा अभ्यासक्रमातील तज्ज्ञबोर्डाच्या शाळा अभ्यासक्रमातील तज्ज्ञ यांचा समावेश असावा. पॅनलवरील तज्ज्ञांचा अहवाल घ्यावा. या अभ्यासक्रमात बोली भाषा व मराठीची सांगड घालावी.

मंत्री श्री. केसरकर पुढे म्हणालेमुलांना आनंद मिळावाअशा पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करण्यात यावा. बोली भाषेतून भाषा ज्ञान देण्यात यावे. अभ्यासक्रम अंतिम होण्यापूर्वी तज्ज्ञांच्या माध्यमातून विचार मंथन झाले पाहिजे. सर्वंकष अभ्यासक्रम तयार झाला पाहिजे. अध्यापनाबाबत शाळांमध्ये पालकांचा प्रतिसाद घ्यावा. पालकांच्या प्रतिसादानुसार अध्यापनामध्ये शिक्षकांनी बदल करावा. महिन्यातून किमान एक वेळ तरी पालकांचा प्रतिसाद घ्यावा. मुलांच्या शाळांची वेळ व दिवसातील तासांचा कालावधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निश्चित करावा. त्यासाठी राज्यातील उत्कृष्टनावाजलेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांचे दिवसाचे शैक्षणिक तास लक्षात घ्यावे. याबाबतीत झालेले संशोधन तपासावे. त्यानुसार पूर्व प्राथमिकप्राथमिक शाळांसाठी धोरण ठरवावे. दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतंत्र शाळेसोबतच आठवड्यातून किमान एक दोन दिवस अन्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण देण्याची व्यवस्था करावी.  जेणेकरून त्यांच्यातील न्यूनगंड दूर होईल.

बैठकीत उपस्थित सदस्यांनी सूचना मांडल्या. तसेच पुढील बैठकीपूर्वी दिलेल्या सूचनांनुसार आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी दिले. संचालक श्री.येडगे यांनी आभार मानले. बैठकीला समितीचे अशासकीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा 5 डिसेंबरपासून प्रारंभ

 मुख्यमंत्री- माझी शाळासुंदर शाळा’ अभियानाचा डिसेंबरपासून प्रारंभ

                                   - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

मुंबईदि. 02: राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणेशाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणेविद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणेआरोग्यपर्यावरणकौशल्य विकासआर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा’ अभियानाचा डिसेंबरपासून प्रारंभ करण्यात येणार आहेअशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

जवाहर बालभवन येथे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल उपस्थित होते.

या अभियानासोबतच दत्तक शाळा योजनामहावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळमाझी शाळा माझी परसबागस्वच्छता मॉनिटर टप्पा – 2 या उपक्रमांचा शुभारंभ देखील डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय कार्यक्रमात राजभवनमुंबई येथे करण्यात येणार आहेअसे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना मंत्री श्री. केसरकर म्हणालेउद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस असणार आहेत. तर उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलग्रामविकास मंत्री गिरीष महाजनकृषी मंत्री धनजंय मुंडेकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका आणि अ व ब वर्गाच्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा आणि उर्वरित महाराष्ट्रातील शाळा अशा स्तरांवर राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात विभाग व राज्यस्तरतर उर्वरित महाराष्ट्रात तालुकाजिल्हाविभाग व राज्यस्तरावर विजेती शाळा निवडण्यात येणार आहे. या अभियानातून कोटी मुलांपर्यंत पोहचण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सर्व स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

मंत्री पुढे म्हणालेदत्तक शाळा योजनेत मोठ मोठे उद्योग समूह सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व)  निधीच्या उपयोगातून शाळांमध्ये पायाभूत सोयी – सुविधा अद्ययावत करून देणार आहेत. या योजनेतून कुठल्याही प्रकारे शाळांचे खाजगीकरण करण्यात येणार नाही. केवळ शाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयी – सुविधा अद्ययावत करण्याचा यामागील उद्देश आहे. महावाचन उत्सव – महाराष्ट्रातील वाचन चळवळ या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वाचनातून प्रगल्भ करण्याचा उद्देश आहे. उच्च शिक्षण विभागाच्या राज्यात असलेल्या विविध ग्रंथालयांना या उत्सवासाठी शाळांसोबत संलग्न करण्यात येणार आहे. वाचन उत्सवातून विद्यार्थ्यांचा प्रतिसादही जाणून घेण्यात येणार आहे.

माझी शाळा – माझी परसबाग उपक्रमाविषयी माहिती देताना मंत्री श्री. केसरकर म्हणालेया उपक्रमातून शाळांमध्ये परसबाग तयार करण्यात येत आहे. शाळांमध्ये परसबाग असणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शेतीबद्दलचे ज्ञान वाढेलत्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येईलशेतीबद्दलचे आकर्षण वाढेल. परसबागेत भाजीपाला उत्पादनासाठी कृषी विभागामार्फत बियाणे पुरविण्यात येतील. परसबागेत उत्पादीत भाजीपाल्याचा समावेश पोषण आहार’ मध्ये करण्यात येईल. यात आठवड्यातून एक दिवस अंडीभात किंवा भरड धान्यापासून बनविलेला पदार्थाचा समोवश करण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणालेस्वच्छता मॉनिटर उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचा संस्कार रूजत आहे. स्वच्छतेसाठी विद्यार्थी आग्रही होत आहे. हा सकारात्मक बदल दिसून येत आहे. 

शालेय शिक्षण विभागाच्या महत्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ डिसेंबर रोजी होत आहे. या उपक्रमांमध्ये शाळांनी उत्स्फुर्त सहभाग घ्यावाअसे आवाहनही मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केले.

 

00000

 

वृत्त क्र. 3932


Saturday, 2 December 2023

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार

 ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च

पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार

 

मुंबईदि. 1 (रानिआ) : ग्रामपंचायत निवडणुकांतील सर्व उमेदवार ट्रू व्होटर ॲपबरोबरच आता पारंपरिक पद्धतीनेदेखील (ऑफलाइन) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करू शकतातअसे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त/ दुर्गम भागात मात्र 7 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे.

सर्व उमेदवारांना ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले होतेपरंतु त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले होते. त्यामुळे आता ज्यांना ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक दाखल करणे शक्य नाहीत्यांना पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने देखील निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करता येईलअसेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

०-०-०


राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी

 राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी


 - मुख्यमंत्री एकनाथ शिंद


अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू


नागपूर, दि.१ : राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.


         नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे राज्याच्या विविध भागात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले. त्यानुसार राज्यात नुकसानाचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.


       २ हेक्टर ते ३ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानाचे पंचनामे करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातून पिकांच्या प्राप्त नुकसानींचे अहवाल एकत्र आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.


           खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲड. आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आदींनी मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर स्वागत केले.


००००



 

मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनासह संवर्धनाबाबत इंडियन ओशन टुना कमिशनमध्ये चर्चा

 मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनासह संवर्धनाबाबत


इंडियन ओशन टुना कमिशनमध्ये चर्चा


4 डिसेंबरला आयोगाच्या मुख्य वैज्ञानिक समितीची बैठक


मुंबई, दि. 01- टुना मत्स्यपालन क्षेत्रात सुधारित आणि सुयोग्य व्यवस्थापनाची गरज आहे. याशिवाय, मत्स्यव्यवसाय संवर्धनासाठी विविध देशांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज हिंद महासागर टुना आयोगाच्या (इंडियन ओशन टुना कमिशन) मुंबई येथे आयोजित बैठकीत व्यक्त करण्यात आली. या परिषदेत सहभागी असलेल्या विविध देशांच्या मान्यवरांनी आज भाऊचा धक्का, मुंबई येथे व तेथील मासळी बाजारास भेट दिली. दरम्यान, आयोगाच्या मुख्य वैज्ञानिक समितीची बैठक हॉटेल सेंट रेजिस येथे 4 ते 8 डिसेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला तसेच राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी सुरुवात होणार आहे. ट्युना आणि शाश्वत व्यवस्थापनाशी संबंधित वैज्ञानिक शिफारसींसंदर्भात यामध्ये चर्चा होणार आहे.


            केंद्र शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने 28 नोव्हेंबरपासून इंडियन ओशन टुना कमिशनच्या 19 व्या डाटा संकलन आणि सांख्यिकी बाबतच्या कार्यकारी समितीच्या बैठकीस सुरुवात झाली. केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहसचिव नितुकुमारी प्रसाद, केंद्रीय मत्स्यव्यवसाय उपायुक्त संजय पांडे, राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, सहआयुक्त महेश देवरे यावेळी उपस्थित होते.


जगभरातील टुना मत्स्यपालन क्षेत्रातील नामवंत शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांना एकत्र आणणारी ही आंतरराष्ट्रीयस्तरावरील आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक आहे. ट्युना आणि इतर मोठ्या पेलाजिक प्रजाती, जसे की बिलफिश, शार्क आणि रेस यांचे मत्स्यव्यवसायात आर्थिकदृष्ट्या महत्व आहे. यात टुनाचा मोठा वाटा आहे. या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्याप्तीसाठी बहुराष्ट्रीय मत्स्यव्यवसायाद्वारे अति मासेमारी करण्याची त्यांची संवेदनशीलता लक्षात घेता, सुधारित व्यवस्थापन आणि मत्स्यव्यवसाय संवर्धनासाठी सर्व राष्ट्रांच्या सहयोगी प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केले.


या बैठकीकरिता इंडोनेशिया, फ्रान्स, स्पेन, युरोपियन युनियन देश, सेशेल्स, टांझानिया, इराण, थायलंड, जपान, श्रीलंका, ओमान आणि भारत या देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय, इतर विविध देशांतील अनेक प्रतिनिधी आणि वैज्ञानिक संस्था दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे देखील बैठकीला उपस्थित आहेत.


मत्स्यव्यवसाया संदर्भातशास्त्रज्ञ विविध देशांनी केलेला डेटा संकलन, आणि आयोगाला अहवाल देण्यासाठी अवलंबलेल्या विद्यमान वैज्ञानिक पद्धतींवर विचारमंथन आणि विश्लेषण करत आहेत आणि हिंद महासागर क्षेत्रातील डेटा/माहिती संकलन आणि आकडेवारीच्या प्रगत आणि सरलीकृत पद्धती तयार करणार आहेत.


आजच्या बैठकीनंतर प्रतिनिधींच्या भाऊचा धक्का, मुंबई येथे व तेथील मासळी बाजारास भेटीचे नियोजन सहआयुक्त महेश देवरे, सहाय्यक आयुक्त संजय माने, मत्स्य व्यवसायविकास अधिकारी अशोक जावळे यांच्यासह नीरज चासकर, रवी बादावार, निखिल नागोठकर, दीपाली बांदकर, सागर कुवेस्कर यांनी भरीव प्रयत्न केले आहेत. या भेटी दरम्यान मान्यवरांनी तेथील नौकांची पाहणी केली तसेच टुना/ कुपा हा मासा किती प्रमाणात बाजारात येतो. त्याची मासेमारी याची पाहणी केली. भाऊच्या धक्क्यालगत उभ्या असलेल्या बोटींची आणि शाश्वत पद्धतीने मासेमारी बाबत माहिती घेतली. भाऊच्या धक्क्यालगत लिलाव सभागृह, मासेविक्री बाजार व्यवस्था, इंधन पुरवठा याचे व्यवस्थापन याची पाहणी करुन त्यांनी सूचनाही केल्या. नौका मासेमारी करुन आल्यानंतर मासे उतरविताना नौकांमधील ठराविक अंतर हे अत्यंत शिस्तबद्ध असल्याचे मान्यवरांनी सांगून मुंबईतील मच्छीमारांच्या सांधिक समन्वयाबद्दल अभिनंदन केले. भाऊचा धक्का सीफूड सप्लायर्स असोसिएशनचे सचिव फैजल अल्वारे यांना त्यांचे कामकाज कसे चालते याबाबत सखोल माहिती विचारण्यात आली. तसेच पाहणी दरम्यान महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल इमॅन्यूअल चॅसॉट, सेशेल्स यांनी विशेष उल्लेख केला. 


000

Featured post

Lakshvedhi