Wednesday, 1 November 2023

सामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांच्या धर्तीवर आदिवासी विकास विभाग महामंडळामार्फत योजना राबविणार

 सामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांच्या धर्तीवर

आदिवासी विकास विभाग महामंडळामार्फत योजना राबविणार

- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

 

             मुंबईदि. 31 : सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ या महामंडळांच्या योजनांच्या धर्तीवर शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ व  आदिवासी  विकास महामंडळामार्फत योजना राबविण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

            सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळांच्या योजनांची कार्यप्रणाली व स्वरूप याबाबतचा आढावा मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

                 मंत्री डॉ. गावित म्हणाले कीशबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाते. तसेच महामंडळामार्फत अल्प व्याजदरात कर्ज योजनाही राबविण्यात येते. आदिवासी दुर्गम भागात प्रक्रिया उद्योगाला संधी आहे. या उद्योगांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या बीजभांडवल योजनाथेट कर्ज योजना आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या महामंडळांमार्फत राबविण्यात येतील. आदिवासी बांधवांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण होईल.

               या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे उपसचिव विजेंद्रसिंग वसावेउपसचिव र. तु. जाधवमहात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक दत्तराज शिंदेअण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक य. रा. पवारसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाचे उपव्यस्थापक नागनाथ पवार उपस्थित होते.

****

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख

 राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख

केंद्रशासित प्रदेश स्थापना दिवस साजरा

            मुंबई, दि. 31 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस राजभवन येथे समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.

            केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत विविध राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिवस साजरे करण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून मंगळवारी (दि. ३१) जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्र शासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

            गेल्या दोन वर्षांत काश्मीर शांतता आणि समृद्धीच्या दिशेने सातत्याने प्रगती करत आहे. देशातून आणि विशेषतः महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक जम्मू-काश्मीर आणि लडाखला जात आहेत. महाराष्ट्रात देखील जम्मूकाश्मीर आणि लडाखमधून अनेक विद्यार्थी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. विकास व व्यापार वृद्धीचे नवीन मार्गही वेगाने उघडत आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या युवकांसाठी नव-नव्या संधी निर्माण होत आहेत. ही सकारात्मक बाब असल्याचे राज्यपालांनी सांगितले. केंद्रशासित प्रदेश स्थापना दिनानिमित्त सर्वांनी सुसंवादी आणि सर्वसमावेशक भारताच्या निर्मितीसाठी एकजूट झाले पाहिजेअसे आवाहन राज्यपालांनी केले.

            जम्मू आणि काश्मीरच्या संस्कृतीत संगीतनृत्यसणसाहित्यपाककृती यांना महत्वाचे स्थान आहे. हिंदू धर्मसूफी आणि बौद्ध धर्माचा सांस्कृतिक वारसा असलेला हा अद्वितीय प्रदेश आहे. येथे सर्व धर्माचे लोक सर्व सण समान उत्साहाने साजरे करतातअसे राज्यपालांनी सांगितले.

            केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस हा औपचारिक उत्सव न राहता तो राष्ट्रीय एकात्मतेसाठी समर्पित होण्याचा दिवस असला पाहिजेअसे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी लडाख येथील पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आलेल्या कलाकारांच्या चमूने तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी व युवा कलाकारांनी जम्मू व काश्मीर तसेच लडाखच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम सादर केला. लडाखचे जाब्रो लोकनृत्यहाफिजा नृत्यकव्वालीमाता वैष्णोदेवी गीतलोकवाद्य संगीत आदी कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले.

            राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी प्रास्ताविक केले, तर राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांनी आभार प्रदर्शन केले.

            कार्यक्रमाला राज्यपालांचे विशेष सचिव विपीनकुमार सक्सेनामुंबई विद्यापीठाचे अधिकारीनिमंत्रित तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

**

Jammu and Kashmir and Ladakh UT Formation Day

celebrated in Maharashtra Raj Bhavan

               Mumbai, 31st Oct : The Foundation Day of the Union Territories of Jammu and Kashmir, and Ladakh was celebrated in Maharashtra Raj Bhavan in the presence of Maharashtra Governor Ramesh Bais on Tue (31 Oct).

               The Union Territory Formation Day of Jammu and Kashmir, and Ladakh was celebrated as part of the 'Ek Bharat Shreshtha Bharat' initiative of Government of India.

               Speaking on the occasion,  Governor Ramesh Bais said, Kashmir has been steadily progressing towards peace and prosperity during the last two years.  He said, a large number of tourists from Maharashtra are visiting Jammu and Kashmir and Ladakh and employment opportunities are opening for the people. The Governor said, new avenues of development and trade growth are  opening in the region.

               He said, the Foundation Day of Union Territories is not just a formal event, but it is a celebration of the unity in diversity of the nation.

               A cultural programme depicting the rich culture and traditions of Jammu and Kashmir and Ladakh was presented on the occasion. Students and artists of University of Mumbai and the student- artists sent by the Department of Tourism and Culture, Ladakh presented the cultural programme.

               Folk dance and folk music of Ladakh, the Hafiza dance, Jobro Folk Dance, Mata Vaishno Devi song, Kawwali and other cultural programs were presented.

               Special Secretary to the Governor Vipin Kumar Saxena, Secretary to Governor (I/C) Shweta Singhal, Comptroller of the Governor's Households Arun Anandkar, invitees and officers and staff of Raj Bhavan were present.


मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

 मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

राज्यात शांतताकायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 1 :- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नयेराज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावीअसे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावेअसे आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणमंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटीलचंद्रकांत पाटीलछगन भुजबळदिलीप वळसे-पाटीलगिरीश महाजनदादाजी भुसेविधान परिषदेचे  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेविधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारविविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री जयंत पाटीलनाना पटोलेसुनील तटकरेअनिल परबसुनील प्रभूआशिष शेलारराजेश टोपेसदाभाऊ खोतजोगेंद्र कवाडेसुलेखा कुंभारेबच्चू कडूशेकापचे जयंत पाटीलराजू पाटीलकपिल पाटीलसदाभाऊ खोतराजेंद्र गवईडॉ.प्रशांत इंगळेकुमार सुशीलबाळकृष्ण लेंगरे आदी उपस्थित होते. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिकमहाधिवक्ता बिरेंद्र सराफसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेइतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            या ठरावात पुढे असे म्हटले आहे कीमराठा आरक्षणाविषयी कायदेशीर कार्यवाही  शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्रत्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहेहे आंदोलकांनीही समजून घ्यावे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून आम्ही त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नयेराज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावीअसे आवाहनही करण्यात आले आहे.

कुणबी प्रमाणपत्रांबाबत तातडीने अंमलबजावणी सुरु - मुख्यमंत्री श्री. शिंदे

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विषयक घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले कीसरकार प्राधान्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकडे लक्ष देत असूनमहाराष्ट्रात जाती-जातींमध्ये सलोख्याची संस्कृती टिकवणे महत्वाचे आहे. आपल्या सगळ्यांचा उद्देश मराठा समाजाला आरक्षण देण्याचा असूनसर्व पक्ष संघटनांनी आपापल्या भागात या विषयी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले पाहिजे. एकीकडे आपण सर्वोच्च न्यायालयात क्युरिएटेव्ह याचिकेद्वारे राज्य शासनाची भूमिका भक्कमपणे मांडत आहोत. त्यासाठी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ नियुक्त केले आहे. दुसरीकडे आपण मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे निर्देशही दिले आहेत.

पूर्वीच्या त्रुटी दूर करून टिकणारे आरक्षण देणार

            मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी ज्या कारणांमुळे आणि त्रुटींमुळे रद्द केले होतेतसेच जी निरीक्षणे नोंदविली होती. त्या त्रुटी आता नव्याने माहिती (डाटा) गोळा करताना होणार नाहीतयाची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. या पावलांमुळे न्यायालयात टिकणारे असे आरक्षण मराठा समाजाला मिळू शकेलअशी खात्री आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर तत्काळ या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला असून सर्व जिल्हाधिकारीतहसीलदार यांना कालच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कुणबी नोंदी असलेल्यांना तातडीने प्रमाणपत्रे देण्याचे निर्देश दिले आहेत. मोडी लिपीतील आणि ऊर्दू भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करूनडिजीटाईझ करण्यासाठी व पब्लिक डोमेनवर आणून त्याआधारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.

            यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येतील. तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून त्रुटी नसलेलापरिपूर्ण डाटा विहित कालावधीत गोळा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

            यावेळी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती दिली. प्रारंभी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी न्या. संदीप शिंदे समितीने आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी व सर्व तहसीलदार यांना कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे सांगितले. बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते श्री.दानवेविधान सभेतील विरोधी पक्ष नेते श्री.वड्डेटीवार तसेच इतर उपस्थित पक्षांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचना मांडल्या.

००००

विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद

 विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

प्रभावी कामगिरी केलेल्या स्वच्छता मॉनिटर्स’ विद्यार्थ्यांचा गौरव

            मुंबईदि. 31 : विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद असते. स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ते सिद्ध केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वच्छतेचे स्वप्न विद्यार्थी प्रत्यक्षात आणत आहेतअशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वच्छता मॉनिटर्स’ बनून उत्कृष्ट कार्य केलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

            मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते लेटस् चेंज अभियानांतर्गत स्वच्छता मॉनिटर्स’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा गौरव सोहळा तसेच दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ सोहळा आज येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित करण्यात आला. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओलसहसचिव इम्तियाज काझीज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्राप्रकल्प संचालक रोहित आर्यागांधीजींची वेशभूषा करून स्वच्छता मॉनिटर्स प्रकल्पाला पाठिंबा देणारे शरद नयनपल्ली यांच्यासह राज्यात प्रभावी कामगिरी केलेल्या 100 शाळांमधील 300 विद्यार्थीउत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यांचे समन्वयक आणि शिक्षणाधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाचा दुसरा टप्पा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

            मंत्री श्री. केसरकर म्हणाले कीभारत हा तरुणांचा देश आहे. आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून विद्यार्थ्यांना जगभराचे क्षीतिज मोकळे झाले आहे. भविष्यात याच विद्यार्थ्यांनी जगाचे नेतृत्व करावेअशी इच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली असून राज्यात स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावी कार्याद्वारे आपली क्षमता सिद्ध केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीचे पत्र उत्कृष्ट कार्य केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जाणार असल्याचे सांगून दुसऱ्या टप्प्यासाठी मंत्री श्री.केसरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

            ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी परिसर स्वच्छ राखण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यांचा झाला गौरव

            मंत्री श्री.केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पात उत्कृष्ट कार्य केलेल्या बुलढाणाजालनामुंबई उपनगरसातारासोलापूर आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या समन्वयक आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील प्रभावी कामगिरी केलेल्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलअंकुशनगरजि.जालनामत्स्योदरी विद्यालयअंबडजि.जालनायुगधर्म पब्लिक स्कूलबुलढाणाआदर्श जि.प. स्कूलबोरखेडीजि.बुलढाणाएन.व्ही. चिन्मया विद्यालयशेगाव आणि जनता हायस्कूलजालना या शाळांच्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

उपक्रमाविषयी : महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या 'स्वच्छता मॉनिटरप्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्स बनून स्वच्छता राखण्याबाबत नागरिकांची न कळत होणारी चूक दाखवून देऊ लागले. यावर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आला. यात राज्यातील 64,198 शाळांमधून 59,31,410 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून समाज माध्यमांतून यासंदर्भातील 15 लाखांहून अधिक व्हीडिओ शेअर झाले आहेत.

            प्रकल्प संचालक श्री. आर्या यांनी प्रास्ताविकाद्वारे उपक्रमाची माहिती दिली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/


नटसम्राट सारखी अवस्था नाट्यगृहाची दामोदर नाट्यगृह परल हॉ या, कोणी जिवदान देता का हो या नाट्यगृहा


या हॉ या, कोणी जिवदान देता का हो या नाट्यगृहा ला 

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार

 राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार

            राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.

            राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.

            आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली.  यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत. 

            राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत, अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.


(The 99 Club ) चे मेंबर व्हाच

 (The  99  Club )

                                                                                                    डॉ. स्वाती गानू     

      

  एक अत्यंत धनाढ्य राजा साऱ्या सुखसुविधा , संपत्ती असूनही आनंदी नव्हता, समाधानी नव्हता. एके दिवशी त्याने आपल्या सेवकाला आनंदाने गाणं गात काम करताना पाहिलं . राजाला आश्चर्य वाटलं की मी ह्या देशाचा राजा असूनही मी दुःखी, उदास आणि तो गरीब सेवक मात्र इतक्या आनंदात कसा? शेवटी त्याने सेवकाला विचारलंही तू इतका आनंदी कसा काय? तेव्हा तो म्हणाला," महाराज, मी एक अगदी सामान्य माणूस आहे पण आम्हाला फार काही लागत नाही . डोक्यावर छत आणि पोट भरेल इतकं अन्न मिळालं की आम्ही समाधानी असतो. पण राजाला आपल्या त्या सेवकाचे उत्तर पटले नाही म्हणून त्याने आपल्या विश्वासू  मंत्र्याला विचारले. राजाची शंका आणि त्या सेवकाची गोष्ट ऐकल्यावर तो मंत्री म्हणाला," मला वाटतं तो सेवक ‘99 Club’ चा भाग झाला नसावा अजून.


ते ऐकल्यावर आश्चर्याने राजाने मंत्र्याला विचारलं ‘99 Club’? म्हणजे नेमकं काय?


 महाराज आपण ९९ मोहरा भरलेली थैली त्याच्या घराबाहेर ठेवा . राजाने तसे करवून घेतले. जेव्हा त्या सेवकाला ती थैली आपल्या घराबाहेर दिसली तेव्हा त्याने ती आत नेली. त्यातील सुवर्णमुद्रा पाहून तो हर्षभरित झाला.मोहरा मोजल्यावर त्या ९९ भरल्या. शंभरावी सुवर्णमुद्रा गेली तरी कुठे म्हणून तो शोधायला लागला. खूप शोधल्यावरही ती सापडेना म्हणून थकून तो विचार करायला लागला की कोणी ९९ सुवर्णमुद्रा कशा काय ठेवेल? पण शंभरावी नाहीये हे ही खरं . त्याने ठरवलं की कठोर परिश्रम करायचे म्हणजे शंभरावी सुवर्णमुद्रा घेता येईल.


त्या दिवसापासून त्या सेवकाचं आयुष्यच बदललं . तो अक्षरशः यंत्राप्रमाणे , रात्रंदिवस झपाटल्यासारखा काम करायला लागला. कुटुंबातल्या सगळ्यांनी त्याला मदत करायलाच पाहिजे म्हणून ओरडाआरड करायला लागला. काम करताना त्यांचं गाणं म्हणणं ऐकू येईनासं झालं . राजानेही ते पहिले . त्याच्यातला हा बदल पाहून  राजाने मंत्र्याला कारण विचारलं तेव्हा मंत्र्याने उत्तर दिले की आता तो सेवक '‘99 Club’ 'चा मेंबर झालाय.


ही कथा वाचनात आली आणि वाटलं सध्याच्या काळात आपल्यापैकी खूपच जण '99 Club’ 'चे मेंबर झालो आहोत. प्रत्येकाला त्याच्याजवळ जे आहे त्यापेक्षा अधिकच भूक आहे. पैसे सगळ्यांजवळ आहेत . आपल्या गरजाही भागताहेत. सुखासमाधानाने जगतोय पण यापेक्षा जास्त श्रीमंत व्हायचंय . पुरेसं होईल असं घर आहे पण प्रशस्त तीन-चार बेडरूमचं घर हवंय. घरात बऱ्यापैकी मोठा टी.व्ही आहे पण सोनीचा सगळ्यात मोठा टी. व्ही हवाय. ब्रँडेड म्युझिक सिस्टीम , फ्रीज , झुळझुळीत पडदे, ए.सी , महागडी कार , परफ्यूमस, कपडे, हॉटेलिंग , मोबाईल मिळवण्यासाठी ह्या  ‘99 Club’ च्या मेंबर्सची रात्रंदिवस धावपळ चाललीये. पैशाबरोबरच ऑफिसमध्ये , राजकारणात अधिक उच्च पदं, अधिक सत्ता ह्या हव्यासाचा कडेलोट होतोय.

मुलांना शंभरपैकी ९९ मार्क मिळाले तर एक मार्क नेमका कुठे गेला हे शोधायला ९९ मार्क मिळाल्याचा आनंद पालक हरवून बसताहेत. जे आहे त्यापेक्षा जे कमी वाटतंय ते मिळवण्याच्या मागे आपण काय गमावतोय याचं भानच उरलेलं नाही. आपल्याजवळ असणारं घर, घरातली माणसं, वस्तू, पैसा, समाजातली प्रतिष्ठा , नावलौकिक , यश ह्याच्यात दडलेलं असतं समाधान. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आणखी जास्त मिळवायचंय असा विचार करणारे लोक आनंदाच्या शोधात असतात मात्र समाधान हाताच्या ओंजळीतून निसटून जातं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आपण ९९ सुवर्णमुद्रा असल्या तरी शंभराव्या नाण्याचा शोध घेण्यासाठी तळमळत राहतो. स्वतःला सांगत राहतो की ते शंभरावं नाणं एकदा का मला मिळालं की मग मी कायमचा आनंदी, सुखी होईन आणि असं तो आयुष्यभर म्हणतच राहतो . आपली रात्रीची झोप , आपला आनंद सारं घालवून बसतो. जे हवं ते मिळवण्याची अभिलाषा अशी की जवळच्यांची मनंही दुखावताहेत. आपल्या गरजा, इच्छा वाढताना आपण ह्या  ‘99 Club’ चे मेंबर कधी होतो ते आपल्याला कळतही नाही.

आपण आयुष्यात उच्च ध्येय ठेवणं चुकीचं नाही मात्र शिखरावर पोचताना ध्येयापेक्षा त्या प्रवासाला अधिक महत्व असतं हे लक्षात ठेवायला हवं. आपण लोभ,मोह याच्यामागे झपाटल्यासारखं लागलो तर कायमच असमाधानी राहू यात शंकाच नाही. अशा ‘99 Club’ ‘चा मेंबर होण्यासाठी फी शून्य लागते पण त्यातून बाहेर पडण्याची मात्र फार मोठी किंमत चुकवावी लागते. म्हणूनच म्हणतात नं की Life is a journey not a destination. आपण समाधान मिळवण्याचा प्रवास करायचा आहे आणि आनंद प्राप्तीच्या मोहाने ‘99 Club’ चे मेंबर तर आपण होत नाही आहोत ना याचं भान राखायचं आहे.

Featured post

Lakshvedhi