Friday, 6 October 2023

शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आयटी’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा

 शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत

पोहोचविण्यासाठी ‘आयटी’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबईदि. 5 : राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट पोहोचवण्याच्या प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान विभागाचा वाटा लक्षणीय असून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी कृषी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या.

            कृषी विभागामार्फत कार्यान्वित आयटी उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमारमाहिती तंत्रज्ञान विभागाच्या (महा आयटी) व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोजकृषी विभागाच्या सहसचिव सरिता बांदेकरफलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांची उपस्थिती होती.

            कृषी विभागाच्या विविध 27 योजना महाडीबीटी पोर्टलमार्फत सुरू असून आतापर्यंत 34 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी करून विविध योजनांसाठी एक कोटी दोन लाख अर्ज केले आहेत. या माध्यमातून शासनाकडे शेतकऱ्यांची व त्यांच्या जमीन आणि पीक प्रक्रियेची माहिती संकलित झाली आहे.

            कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलमहाकृषी मोबाईल ॲप्लिकेशन व वेब पोर्टलक्रॉपसॅपक्रॉपवॉचकृषी निविष्ठा विक्री परवाना वितरण कार्यप्रणालीफार्मर डेटाबेसमहाॲग्रीटेकपर्जन्यमापन आणि विश्लेषणई-ठिबकई- सॉईल ३.००नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेअंतर्गत सुरू असलेला तांत्रिक प्रक्रियेचा आढावा यावेळी कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी घेतला. तसेच प्राप्त अर्जांच्या तुलनेत लाभार्थींची संख्या वाढवण्याची महत्त्वपूर्ण सूचना कृषी विभागाला केली.

            शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांची प्राथमिकता ठरविण्यात यावी. तांत्रिक बाबतीत सुधारणा करण्यात यावीप्रथम येणाऱ्या अर्जाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. संपूर्ण पूर्तता करून आलेले सर्व अर्ज मंजूर करून उपलब्ध निधीनुसार लाभ देण्यात यावा. लॉटरी पद्धत बंद करण्याबाबत तातडीने कार्यवाही व्हावीशेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सुधारित एसओपी तयार करण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्री. मुंडे यांनी दिल्या.

००००

दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

 दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

 

            मुंबईदि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया ॲपवर शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा 'दिलखुलासकार्यक्रम प्रसारित होईल.

            वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटीलनिवेदक रिताली तपासे यांनी मं‍िमंडळ निर्णयांची माहिती 'दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.


श्रीमंत पेशवे यांच्या श्रीवर्धन येथील स्मारकाचा आराखडा तयार करावा

 श्रीमंत पेशवे यांच्या श्रीवर्धन येथील स्मारकाचा

आराखडा तयार करावा

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

        

            मुंबई, दि. 5 : श्रीवर्धन (जि. रायगड) येथील श्रीमंत पेशवे यांच्या नियोजित स्मारकासाठी सर्व परवानग्या जलदगतीने घेऊन आराखडा उत्कृष्टरितीने तयार करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात यासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजनमुख्याधिकारी (श्रीवर्धन) विराज लबडे, नारायण देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रसाद पेंडसे, प्रतिनिधी अविनाश गोगटे, श्रेयस जोशी, लक्ष्मी नारायण देवस्थानचे प्रतिनिधी गजानन करमरकर उपस्थित होते.

                  यावेळी स्मारकाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने मार्ग काढावा, अशी सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केली. देवस्थान समितीने स्मारकासाठी जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा केलीतरीही याबाबतीत काही अडचणी असल्यास धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.                  

             मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, नगरविकास, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी स्थानिक ठिकाणी आवश्यक त्या परवानग्या विहीत वेळेत घेऊन या कामाला गती द्यावी. या ठिकाणी उभारण्यात येणारे स्मारक आपल्या इतिहासाचे साक्षीदार ठरेल असे स्मारक उभारण्यासाठी सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन काम करावे. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकइतिहासप्रेमी  आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे हे स्मारक होईल, अशी अपेक्षाही यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी व्यक्त केली.                             

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचे

 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचे


नाशिकला 6 व 7 ऑक्टोबर रोजी आयोजन

            मुंबई, दि. 5 : ग्रामीणस्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देशात सुमारे दीड लाखांहून अधिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या निर्देशानुसार पश्चिम विभागातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची (सीएचओ) दुसरी प्रादेशिक परिषद ६ आणि ७ ऑक्टोबर २०२३ असे दोन दिवस नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.


            केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेला सुरुवात होणार आहे.


            महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, दादरा-नगर हवेली, आणि दमण-दीव या सहभागी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे २०० समुदाय आरोग्य अधिकारी या परिषदेत सहभागी होणार आहेत. आतापर्यंत देशात एकूण १ लाख ६१ हजारांपेक्षा अधिक आरोग्य सेवा केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. प्रत्येक उपकेंद्रातील प्राथमिक आरोग्य पथकात एक महत्त्वाची भर म्हणून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. देशात सुमारे १ लाख ३० हजारांहून अधिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.


              या परिषदेला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी, आयुष मंत्रालयाचे अधिकारी, राज्य अधिकारी, राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ, आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राला मदत करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक, आयुष संचालक आदी उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठीकोल्हापूरातील मध्यवर्ती जागा निश्चित करावी

 आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठीकोल्हापूरातील मध्यवर्ती जागा निश्चित करावी


- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 5 :- कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान विषयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील किंवा शहरात मध्यवर्ती ठिकाणची अन्य जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्या उपस्थितीत उपकेंद्रासाठी जागेची पाहणी करावी. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार उपकेंद्रासाठी जागा अंतिम करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर येथील उपकेंद्रास जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकुलगुरू डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. एम. शिंदे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.   


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, कोल्हापूर येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रास जागा मिळाल्यास कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विविध आरोग्य अभ्यासक्रम सुरु करता येतील. आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कामासाठी वारंवार नाशिकला जाण्याची गरज राहणार नाही. यातून वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होईल. या पार्श्वभूमीवर आरोग्य विज्ञान विद्यापीठ उपकेंद्रासाठी आवश्यक असलेली तीन एकर जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी. आवश्यक असलेल्या जागेची पाहणी वैद्यकीय शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी संयुक्त करून जागा निश्चित करावी. ही जागा योग्य नसल्यास अन्य पर्यायी जागेची उपलब्धता करून द्यावी. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

गेंड्यासारखे प्राणी कोकणातील कातळशिल्पांवर कसे?

 गेंड्यासारखे प्राणी कोकणातील कातळशिल्पांवर कसे?



- "गेंडा व कोकण" हे कोडं सोडवायचं कसं?

कोकणातील कातळशिल्पांमध्ये अनेक प्राणी पक्षी दिसतात. गेंडा, पानघोडा हे त्यापैकी विशेष आणि आश्चर्यचकित करणारे. कारण हे प्राणी कोकणात, महाराष्ट्रात किंवा जवळपासच्या प्रदेशात सध्या आढळत नाहीत. मग ते कातळशिल्पांवर कसे? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण या प्राण्यांमुळे ही शिल्पे कोणत्या काळात खोदली गेली यावर प्रकाश पडतो.
गेंडा-पानघोडा हे प्राणी फार पूर्वी महाराष्ट्रात होते. पण हवामान बदलले तसे साधारणपणे वीसेक हजार वर्षांपूर्वी ते येथून नामशेष झाले. हा संदर्भ पाहिला तर कोकणातील कातळशिल्पांचा काळ नक्कीच २० हजार वर्षांपर्यंत मागे नेता येतो.

कातळशिल्पांना असे अनेक पैलू, कंगोरे आहेत. त्यामुळे ती तज्ञांसोबत पाहायला आणि समजून घ्यायला हवी.
ही संधी "भवताल" उपलब्ध करून देत आहे, १३ ते १५ ऑक्टोबर २०२३ या काळात.
त्यात जरूर सहभागी व्हा.

संपर्क:
9545350862 / 9922063621

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी:

- भवताल टीम

--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत कामे गतीने पूर्ण करावेतश्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा

 रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत

कामे गतीने पूर्ण करावेत

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. 5 : रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत श्रीवर्धनम्हसळातळामाणगावरोहा येथील विविध  विकास कामे  सुरू असून  यासाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद आहे.  ही कामे  विहित वेळेत प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

             श्रीवर्धन मतदार संघातील प्रादेशिक पर्यटन विकास कामांबाबत मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टमोडपर्यटन विभागाच्या सहसचिव उज्ज्वला दांडेकरउपवनसंरक्षक (रोहा) अप्पासाहेब निकतमुख्याधिकारी (म्हसळा) विठ्ठल राठोड आदी उपस्थित होते.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीसार्वजनिक बांधकाम विभागनगरपालिकारायगड पाटबंधारे विभागजिल्हा परिषदग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि पर्यटन संचालनालय यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रादेशिक पर्यटनाच्या विकास कामांना गती द्यावी.

            दिवेआगार येथे कासव संवर्धन प्रकल्प उभारणेपर्यटन मार्केट सुविधा तयार करणेतळा महादेव तलाव परिसराची पर्यटनदृष्ट्या सुधारणा करणेमोरबा येथील गाव तलावाचे सुशोभीकरण करणेरोहा नगरपरिषद हद्दीतील मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणेश्रीवर्धन समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर सुशोभीकरण करणेरोहा येथील ग्रामपंचायत पाटण - सई हद्दीतील कामेजोगेश्वरी मंदिर परिसर सुशोभीकरणमौजे नागोठाणे येथील सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुरातन निवासस्थान सुशोभीकरण,   रोहा नगरपरिषद हद्दीतील हनुमान टेकडी परिसर सुशोभीकरणतळघर येथील तलावाचे संवर्धन करणे  अशी रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत सन २०२१-२२ मधील श्रीवर्धनम्हसळातळामाणगावरोहा येथील विविध  ४४ कोटी ७९ लाख रुपयांची कामे प्राधान्याने पूर्ण करावेत.

            श्रीवर्धन शहरातील पर्यटक निवासी इमारतींचे नूतनीकरणतलाव कुंडाचे नूतनीकरण,म्हसळा येथील जानसई नदी सुशोभीकरण कामेश्रीवर्धन येथील मंदिर विकासाची कामेरोहा नगरपरिषद हद्दीतील शिवसृष्टी परिसर सुशोभीकरणरोहा येथे शिवसृष्टी शिल्प तयार करणेतळा येथील कुडा लेणी येथे पर्यटनाच्या मूलभूत सुविधा निर्माण करणे, अशी सन 2022 -23 मधील बारा कामे १२ कोटी ५१ लाखांची असून  सर्व यंत्रणांनी हे कामे गतीने पूर्ण करावेत, असेही निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

*****

Featured post

Lakshvedhi