सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 5 October 2023
मानवी तस्करी रोखण्यासाठी ‘यंग इंडिया अनचेन्ड’ चा
मानवी तस्करी रोखण्यासाठी ‘यंग इंडिया अनचेन्ड’ चा
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ
मुंबई दि. 4 : मानवी तस्करी रोखण्यासाठी महाविद्यालयीन मुलांना गुन्हेगारी विश्वाबाबत जागरुक करत महाविद्यालयस्तरावर तस्करीविरोधी क्लबची स्थापना करण्याचा ‘यंग इंडिया अनचेन्ड’ उपक्रम राज्य महिला आयोग आणि अलायन्स अगेन्स्ट सेंटर ऑफ ट्राफिकिंग (अॅक्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते याचा शुभारंभ होणार आहे. दि. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार्या या कार्यक्रमास महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आयोगाच्या सदस्य, महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील महाविद्यालयीन तरुणांना समाज प्रबोधनात सहभागी करुन घेत महिलांविषयक गुन्हेगारीला, तस्करीला आळा घालण्याचा प्रयत्न राज्य महिला आयोग ‘यंग इंडिया अनच्नेड’ या उपक्रमाद्वारे करत आहे.
या उपक्रमाद्वारे महाविद्यालयात मानवी तस्करी विरोधी क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याना महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत जागरुक करत त्यांचा समाज प्रबोधनात सहभाग वाढवणे, महिला व बालकांविरोधात होणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांबाबत अवगत करणे, महाविद्यालयीन कॅम्पस तरुणींसाठी सुरक्षित असेल या दृष्टीने प्रयत्न करणे, गुन्हा घडल्यास तरुणांनी त्याबाबत आवाज उठवावा, तरुणांच्या धोरण निश्चितीमध्ये मुलांचा सहभाग वाढवणे, विविध समाज घटकांशी तरुणांचा संवाद घडवून आणणे अशी विविध उदिष्ट या उपक्रमाद्वारे पुर्ण करण्यावर भर राहणार आहे.
अलायन्स अगेन्स्ट सेंटर्स ऑफ ट्राफिकिंग (अॅक्ट) या अंतर्गत प्रकृती ट्रस्ट, युवा रुरल असोसिएशन, प्रथम, विप्ला फाउंडेशन अशा विविध संस्था मानवी तस्करी रोखण्यासाठी एकत्रित काम करत आहेत. ॲक्ट आणि राज्य महिला आयोगाच्या वतीने होणाऱ्या ‘यंग इंडिया अनचेन्ड’ शुभारंभ प्रसंगी महिला व बाल विकास मंत्री, आयोगाच्या अध्यक्षा यांच्यासह एनडीआरएफचे माजी महासंचालक डॉ. पी. एम. नायर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
०००
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लंडनमध्ये उभारणार
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लंडनमध्ये उभारणार
- मंत्री सुधीर मुनगंटीवार
लंडन, दि. 4 : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमीत उभारण्यासाठी आपण व्यक्तिशः आणि महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट संग्रहालयाशी यशस्वी करार केल्यानंतर मंत्री श्री. मुनगंटीवार यांचा लंडनच्या स्थानिक मराठी बांधवांनी सत्कार केला. या सोहळ्यात ते बोलत होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मला जेव्हा सूचना केली की लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर पुतळा उभा करावा, तेव्हा मला आनंद झाला; मी लगेच संमती दिली. यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्तीने तुमच्या पाठिशी उभे राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगात सर्वत्र पोहचविण्याचा संकल्प शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाने केला आहॆ. यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षी काम करण्याची संधी मिळाली. राज्यात ठिकठिकाणी जाणता राजा महानाट्याचे प्रयोग, असे विविध उपक्रम राबविण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले.
दरम्यान, सामंजस्य करार झाल्यानंतर अतिशय देखणा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला; स्फूर्ती गीत, पोवाडा, पारंपरिक नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसंग अशा विविध छटांचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
000
सकारात्मक विचारांचे सामर्थ्य*
*सकारात्मक विचारांचे सामर्थ्य*
*मनासारखा नवरा नाही मिळाला. करायचा म्हणून संसार करते, जगण्यात काही मजाच नाही सर, खूप नैराश्य येते, रोजचीच भांडणं, हेवे-दावे-तूतू मैं-मैं जीवन नकोसे वाटतंय, झोप येत नाही, जेवण जात नाही अस उदास व रडक्या आवाजत रडगाणं गाणार्या महिलेला पाहून वाटलं. त्या स्त्रीला कसा का होईना – नवरा बरोबर आहे. ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे? त्याच वेळी एक गाणं आठवलं.*
*‘‘चाँद मिलता नही – सबाके संसार मे ।है दिया ही बहोत रोशनी के लिए.’’*
*खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे. मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.*
*ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी – भय – यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना – सकारात्मक करणे गरजेचे असते.*
*सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना – सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच – मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!*
*थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले – हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. – थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?*
*थॉमस म्हणाला – 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही.*
*नेपोलियन समुद्र किनार्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार – सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे – तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे – मी तुझी आहे, मी तुझी आहे….*
*मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.*
,🙏 *धन्यवाद* 🙏,
Wednesday, 4 October 2023
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला
मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा
मुंबई, दि. ३ : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या विविध अडचणी आणि कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू अजय भामरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठाची विद्यार्थी संख्या जास्त आहे. परीक्षेचे नियोजन, निकाल वेळेत जाहीर करणे. याबाबत कालबद्ध पद्धतीने नियोजन करावे. यासाठी खासगी कंपन्यांची मदत लागली, तर त्या बाबतही आराखडा तयार करावा आणि वेळेत परीक्षेचे निकाल जाहीर करावेत. तसेच प्राध्यापक भरती प्रक्रियेला गती देऊन तातडीने याबाबत जाहिरात प्रसिद्ध करावी. बैठकीत शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अडचणी, विद्यार्थी डेटा, डॅशबोर्ड, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
0000
विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना
विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना
पुणे, दि. ३ : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे, पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेचे पर्यावरण विभागप्रमुख प्रा. अमित मल्लिक, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमपीएमएल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते
श्री. राव म्हणाले की, अतिरिक्त कार्बन उत्सर्जनामुळे गंभीर स्वरूपाच्या पर्यावरणीय हानीपासून पृथ्वीला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्ष काळाची गरज असल्यामुळे स्वयंस्फूर्तीने हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून कार्बनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. कार्बन स्थिरीकरणाच्या महत्वाविषयी जनजागृती करणे, हा या कक्ष स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीपासून या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली जाणार असून हा प्रकल्प यापुढे कार्बन स्थिरीकरणासाठी संपूर्ण पुणे विभागात राबविण्यात येणार असल्याचेही श्री. राव म्हणाले.
या कक्षाचे सनियंत्रण सहआयुक्त पूनम मेहता आणि उपायुक्त विजय मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासन विभागाद्वारे करण्यात येणार आहे.
0000
जिल्हा भेटीच्या वेळी रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार
जिल्हा भेटीच्या वेळी रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार
- राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. ३ : राज्यपाल रमेश बैस यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (दि. ३) राजभवन मुंबई येथे बैठक घेऊन संस्थेच्या समस्यांचा आढावा घेतला. राज्यपाल हे इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊ, त्यावेळी आपण रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांची त्या त्या जिल्ह्यात आवर्जून बैठक घेऊ, असे राज्यपालांनी बैठकीत सांगितले. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रेडक्रॉसच्या कार्याला जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, याची दखल घेऊन राज्यपालांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविण्याचा सूचना दिल्या.
यावेळी रेडक्रॉस महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने राज्यपालांना संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. रेडक्रॉसचे विक्रोळी येथील कोठार असलेल्या जागी आपत्ती निवारण केंद्र विकसित करणे, महाराष्ट्र शाखेच्या वतीने करण्यात येणारे रक्त संकलन, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात सहकार्य करणे, प्रथमोपचार प्रशिक्षण, पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटल व वाई येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचलन, नर्सिंग कॉलेजचे संचलन इत्यादी कार्याची माहिती रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होमी खुसरोखान यांनी यावेळी दिली.
बैठकीला महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष सुरेश देवरा तसेच भंडारा, वर्धा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सांगली, पुणे व कोल्हापूर रेडक्रॉस शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.
००००
Maharashtra Governor meets officials of State Branch of Indian Red Cross
Mumbai 3 :- Maharashtra Governor Ramesh Bais, in his capacity as the State President of the Indian Red Cross Society met officials of the State Branch of the Society at Raj Bhavan Mumbai on Tue (3 Oct)
Chairman of the State Branch Homi Khusrokhan, Vice Chairman Suresh Deora and members of district branches of Red Cross Society were present.
Addressing the office bearers, the Governor said he will hold review meetings of the Red Cross District branch officials during his visit to various districts of the State.
Taking cognisance of the lack of support received to the Red Cross Branch from district administration, the Governor directed to call for reports from the concerned districts.
Chairman Homi Khusrokhan briefed the Governor about the various activities of the Society, while district representatives flagged the problems faced by them.
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...