Wednesday, 4 October 2023

विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना

 विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना

            पुणेदि. ३ : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

            यावेळी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखसोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादपुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाणसोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळेपुणे आंतरराष्ट्रीय संस्थेचे पर्यावरण विभागप्रमुख प्रा. अमित मल्लिकपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणपुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकापीएमपीएमएलमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीनगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते

            श्री. राव म्हणाले कीअतिरिक्त कार्बन उत्सर्जनामुळे गंभीर स्वरूपाच्या पर्यावरणीय हानीपासून पृथ्वीला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्ष काळाची गरज असल्यामुळे स्वयंस्फूर्तीने हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून कार्बनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. कार्बन स्थिरीकरणाच्या महत्वाविषयी जनजागृती करणेहा या कक्ष स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीपासून या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली जाणार असून हा प्रकल्प यापुढे कार्बन स्थिरीकरणासाठी संपूर्ण पुणे विभागात राबविण्यात येणार असल्याचेही श्री. राव म्हणाले.

            या कक्षाचे सनियंत्रण सहआयुक्त पूनम मेहता आणि उपायुक्त विजय मुळीक  यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासन विभागाद्वारे करण्यात येणार आहे. 

0000

जिल्हा भेटीच्या वेळी रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार



 जिल्हा भेटीच्या वेळी रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबई, दि. ३ : राज्यपाल रमेश बैस यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (दि. ३) राजभवन मुंबई येथे बैठक घेऊन संस्थेच्या समस्यांचा आढावा घेतला.  राज्यपाल हे इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

            राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊत्यावेळी आपण रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांची त्या त्या जिल्ह्यात आवर्जून बैठक घेऊअसे राज्यपालांनी बैठकीत सांगितले. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रेडक्रॉसच्या कार्याला जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाहीयाची दखल घेऊन राज्यपालांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून  अहवाल मागविण्याचा सूचना दिल्या. 

            यावेळी रेडक्रॉस महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने राज्यपालांना संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. रेडक्रॉसचे विक्रोळी येथील कोठार असलेल्या जागी आपत्ती निवारण केंद्र विकसित करणे,  महाराष्ट्र शाखेच्या वतीने करण्यात येणारे रक्त संकलनप्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात सहकार्य करणेप्रथमोपचार प्रशिक्षणपाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटल व वाई येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचलननर्सिंग कॉलेजचे संचलन इत्यादी कार्याची माहिती रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होमी खुसरोखान यांनी यावेळी दिली.  

            बैठकीला महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष सुरेश देवरा तसेच भंडारावर्धाजळगावछत्रपती संभाजीनगरसांगलीपुणे व कोल्हापूर रेडक्रॉस शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.   

००००

Maharashtra Governor meets officials of State Branch of Indian Red Cross

      Mumbai 3 :- Maharashtra Governor Ramesh Bais, in his capacity as the State President of the Indian Red Cross Society met officials of the State Branch of the Society at Raj Bhavan Mumbai on Tue (3 Oct)

            Chairman of the State Branch Homi Khusrokhan, Vice Chairman Suresh Deora and members of district branches of Red Cross Society were present.

            Addressing the office bearers, the Governor said he will hold review meetings of the Red Cross District branch officials during his visit to various districts of the State.

            Taking cognisance of the lack of support received to the Red Cross Branch from district administration, the Governor directed to call for reports from the concerned districts. 

            Chairman Homi Khusrokhan briefed the Governor about the various activities of the Society, while district representatives flagged the problems faced by them.

पालकमंत्री गिरीश महाजन व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट

 पालकमंत्री गिरीश महाजन व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

यांची नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट

सुधारणेसाठी काही कमी पडू दिले जाणार नाही


- पालकमंत्री गिरीश महाजन    


  वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरणार


- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ


            नांदेड, दि. 3 :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गंभीर आजारी असलेली बालके दगावल्याची घटना दुर्देवी आहे. याची तत्काळ गंभीर दखल घेऊन ग्राम विकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन आज भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर आजारी रुग्णांची पाहणी करून त्यांनी वस्तूस्थिती समजून घेतली. याचबरोबर वरिष्ठ पातळीवर आढावा बैठक घेऊन निर्देश दिले.


            डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयाच्या इमारतीत वरिष्ठ पातळीवर बैठकीत त्यांनी आढावा घेतला. या बैठकीस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहन हंबर्डे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सहसंचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  


            रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर मंजूर असलेली वर्ग 4 ची सुमारे 60 कर्मचारी तातडीने भरण्याचे निर्देश वैद्यकीय मंत्री श्री. मुश्रीफ व पालकमंत्री श्री. महाजन यांनी बैठकीत दिले. याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी वर्ग 3 ची सुमारे 130 कर्मचारी भरण्याची प्रक्रिया शासनस्तरावर झाली असून ती 1 महिन्यात नियुक्त करण्याच्या सूचना आयुक्त राजीव निवतकर यांना मंत्री महोदयांनी दिल्या. वर्ग-1 व वर्ग-2 ची पदे राज्यसेवा आयोगाच्या मार्फत तत्काळ भरण्याबाबत तातडीने प्रक्रिया करण्याचेही त्यांनी सांगितले. औषधासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. या रुग्णालयातील सुधारणा करण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. दिनांक 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरच्या कालावधीत एकूण 24 अतिगंभीर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. यात 12 ही नवजात शिशू होते. यातील 9 रुग्ण हे खासगी रुग्णालयातून संदर्भीत झालेली होती. पूर्ण दिवस होण्या अगोदर जन्मलेल्या या बालकांचे वजन न भरल्याने जन्मताच त्यांची स्थिती चिंताजनक असल्याची वस्तूस्थिती महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी बैठकीत दिली. इतर 12 रुग्ण हे वयोवृद्ध होते. त्यांचा वयोगट 70 ते 80 वर्षे होता. यात 4 वयोवृद्ध हृदय विकार, 2 वृद्ध विविध अवयव निकामी झाल्याने तर 1 वयोवृद्ध विषबाधा व उर्वरीत अपघात मृत्यू असल्याची त्यांनी माहिती दिली.


00000

नांदेड येथील घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल,चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार

 नांदेड येथील घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल,चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. ३ : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करुन त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            मंत्रालय येथे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, याबाबतीत प्राथमिक माहिती घेतली असता लक्षात आले की, रुग्णालयात औषधांची कमतरता नव्हती. रुग्णालयात पुरेशी औषधे होती. तिथे पुरेसे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे. यानंतरही अशा प्रकारची घटना घडल्याने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे नांदेड येथे झालेल्या मृत्यूंची चौकशी होईल. यात कोणी दोषी आढळला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.  


            राज्य सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आता याप्रकरणी चौकशी होईल आणि पुढील कारवाई केली 

जाईल.


0000


A revised list of guardian ministers of 12 districts of the state has been announced

 A revised list of guardian ministers of12 districts of the state has been announced


 


             Mumbai, Date 04 Oct : Chief Minister Eknath Shinde has announced a revised list of guardian ministers of 12 districts of the state today. According to this revised list, Deputy Chief Minister Ajit Pawar has been appointed given the post of guardian minister of Pune district.


Responsibilities of the guardian ministers as per the revised list of 12 districts are as follows :-


Pune- Ajit Pawar


Akola- Radhakrishna Vikhe- Patil


Solapur- Chandrakant Dada Patil


Amravati- Chandrakant Dada Patil


Bhandara- Dr. Vijayakumar Gavit


Buldhana- Dilip Walse-Patil


Kolhapur- Hasan Mushrif


Gondia- Dharmaraobaba Atram


Beed- Dhananjay Munde


Parbhani- Sanjay Bansode


Nandurbar- Anil Patil


Wardha - Sudhir Mungantiwar


0000

मालाड पूर्वला हे कार्यालय व्हावे, यासाठी २०१७ मध्ये

 मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभेत मालाड पूर्वला महापालिकेच्या पी उत्तर-पूर्व विभागाचे तात्पुरते का होईना पण कार्यालायचे लोकार्पण झाले याबद्दल समाधान व्यक्त करत येणाऱ्या २-३ वर्षाच्या आत नव्या जागेवर सुसज्ज कार्यालय उभे केले पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली. पालिकेच्या पी उत्तर –पूर्व या कार्यालयाचे लोकार्पण आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पार पडले, यावेळी आजोजित समारंभात आमदार भातखळकर बोलत होते.

 

आमदार भातखळकर म्हणाले, मालाड पूर्वला हे कार्यालय व्हावे, यासाठी २०१७ मध्ये


विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी या प्रश्नाला उत्तर देताना नगरविकास विभागाने निर्णय घेतला होता. या कार्यालयासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, या प्रयत्नांना यश आले याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. आ. भातखळकर म्हणाले, या रामलीला मैदानाचा वापर खेळासाठी होत आहे त्यामध्ये कोठेही बाधा येता कामा नये. याशिवाय या कार्यालयासाठी लवकरात लवकर पश्चिम द्रुतगती मार्गावरील भूखंडाचे अधीग्रहण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

सध्या या कार्यालयामध्ये पाणी, कचरा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र अशा सामान्य लोकांशी संबंधित विभाग आज सुरु झाले आहेत. या कार्यालासाठी आवश्यक असलेली पदस्थापना झाली असल्याने येथे आठवडयातुन किमान दोन दिवस सहाय्यक आयुक्तांनी बसावे, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी यावेळी बोलताना केली. 

सदरचे वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे .

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

 राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर


 


            मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.


सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-


पुणे- अजित पवार


अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील


सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील


अमरावती- चंद्रकांत दादा पाटील


भंडारा- डॉ.विजयकुमार गावित


बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील


कोल्हापूर- हसन मुश्रीफ


गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम


बीड- धनंजय मुंडे


परभणी- संजय बनसोडे 


नदुरबार- अनिल पाटील


Featured post

Lakshvedhi