Wednesday, 4 October 2023

पालकमंत्री गिरीश महाजन व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट

 पालकमंत्री गिरीश महाजन व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

यांची नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट

सुधारणेसाठी काही कमी पडू दिले जाणार नाही


- पालकमंत्री गिरीश महाजन    


  वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरणार


- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ


            नांदेड, दि. 3 :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गंभीर आजारी असलेली बालके दगावल्याची घटना दुर्देवी आहे. याची तत्काळ गंभीर दखल घेऊन ग्राम विकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन आज भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर आजारी रुग्णांची पाहणी करून त्यांनी वस्तूस्थिती समजून घेतली. याचबरोबर वरिष्ठ पातळीवर आढावा बैठक घेऊन निर्देश दिले.


            डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयाच्या इमारतीत वरिष्ठ पातळीवर बैठकीत त्यांनी आढावा घेतला. या बैठकीस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहन हंबर्डे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सहसंचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  


            रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर मंजूर असलेली वर्ग 4 ची सुमारे 60 कर्मचारी तातडीने भरण्याचे निर्देश वैद्यकीय मंत्री श्री. मुश्रीफ व पालकमंत्री श्री. महाजन यांनी बैठकीत दिले. याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी वर्ग 3 ची सुमारे 130 कर्मचारी भरण्याची प्रक्रिया शासनस्तरावर झाली असून ती 1 महिन्यात नियुक्त करण्याच्या सूचना आयुक्त राजीव निवतकर यांना मंत्री महोदयांनी दिल्या. वर्ग-1 व वर्ग-2 ची पदे राज्यसेवा आयोगाच्या मार्फत तत्काळ भरण्याबाबत तातडीने प्रक्रिया करण्याचेही त्यांनी सांगितले. औषधासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. या रुग्णालयातील सुधारणा करण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. दिनांक 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरच्या कालावधीत एकूण 24 अतिगंभीर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. यात 12 ही नवजात शिशू होते. यातील 9 रुग्ण हे खासगी रुग्णालयातून संदर्भीत झालेली होती. पूर्ण दिवस होण्या अगोदर जन्मलेल्या या बालकांचे वजन न भरल्याने जन्मताच त्यांची स्थिती चिंताजनक असल्याची वस्तूस्थिती महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी बैठकीत दिली. इतर 12 रुग्ण हे वयोवृद्ध होते. त्यांचा वयोगट 70 ते 80 वर्षे होता. यात 4 वयोवृद्ध हृदय विकार, 2 वृद्ध विविध अवयव निकामी झाल्याने तर 1 वयोवृद्ध विषबाधा व उर्वरीत अपघात मृत्यू असल्याची त्यांनी माहिती दिली.


00000

नांदेड येथील घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल,चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार

 नांदेड येथील घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल,चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. ३ : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करुन त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            मंत्रालय येथे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, याबाबतीत प्राथमिक माहिती घेतली असता लक्षात आले की, रुग्णालयात औषधांची कमतरता नव्हती. रुग्णालयात पुरेशी औषधे होती. तिथे पुरेसे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे. यानंतरही अशा प्रकारची घटना घडल्याने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे नांदेड येथे झालेल्या मृत्यूंची चौकशी होईल. यात कोणी दोषी आढळला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.  


            राज्य सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आता याप्रकरणी चौकशी होईल आणि पुढील कारवाई केली 

जाईल.


0000


A revised list of guardian ministers of 12 districts of the state has been announced

 A revised list of guardian ministers of12 districts of the state has been announced


 


             Mumbai, Date 04 Oct : Chief Minister Eknath Shinde has announced a revised list of guardian ministers of 12 districts of the state today. According to this revised list, Deputy Chief Minister Ajit Pawar has been appointed given the post of guardian minister of Pune district.


Responsibilities of the guardian ministers as per the revised list of 12 districts are as follows :-


Pune- Ajit Pawar


Akola- Radhakrishna Vikhe- Patil


Solapur- Chandrakant Dada Patil


Amravati- Chandrakant Dada Patil


Bhandara- Dr. Vijayakumar Gavit


Buldhana- Dilip Walse-Patil


Kolhapur- Hasan Mushrif


Gondia- Dharmaraobaba Atram


Beed- Dhananjay Munde


Parbhani- Sanjay Bansode


Nandurbar- Anil Patil


Wardha - Sudhir Mungantiwar


0000

मालाड पूर्वला हे कार्यालय व्हावे, यासाठी २०१७ मध्ये

 मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभेत मालाड पूर्वला महापालिकेच्या पी उत्तर-पूर्व विभागाचे तात्पुरते का होईना पण कार्यालायचे लोकार्पण झाले याबद्दल समाधान व्यक्त करत येणाऱ्या २-३ वर्षाच्या आत नव्या जागेवर सुसज्ज कार्यालय उभे केले पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली. पालिकेच्या पी उत्तर –पूर्व या कार्यालयाचे लोकार्पण आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पार पडले, यावेळी आजोजित समारंभात आमदार भातखळकर बोलत होते.

 

आमदार भातखळकर म्हणाले, मालाड पूर्वला हे कार्यालय व्हावे, यासाठी २०१७ मध्ये


विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी या प्रश्नाला उत्तर देताना नगरविकास विभागाने निर्णय घेतला होता. या कार्यालयासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, या प्रयत्नांना यश आले याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. आ. भातखळकर म्हणाले, या रामलीला मैदानाचा वापर खेळासाठी होत आहे त्यामध्ये कोठेही बाधा येता कामा नये. याशिवाय या कार्यालयासाठी लवकरात लवकर पश्चिम द्रुतगती मार्गावरील भूखंडाचे अधीग्रहण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

सध्या या कार्यालयामध्ये पाणी, कचरा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र अशा सामान्य लोकांशी संबंधित विभाग आज सुरु झाले आहेत. या कार्यालासाठी आवश्यक असलेली पदस्थापना झाली असल्याने येथे आठवडयातुन किमान दोन दिवस सहाय्यक आयुक्तांनी बसावे, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी यावेळी बोलताना केली. 

सदरचे वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे .

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

 राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर


 


            मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.


सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-


पुणे- अजित पवार


अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील


सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील


अमरावती- चंद्रकांत दादा पाटील


भंडारा- डॉ.विजयकुमार गावित


बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील


कोल्हापूर- हसन मुश्रीफ


गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम


बीड- धनंजय मुंडे


परभणी- संजय बनसोडे 


नदुरबार- अनिल पाटील


शिवप्रतापाची प्रेरणा घेऊनच आपली पुढची पिढी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 शिवप्रतापाची प्रेरणा घेऊनच आपली पुढची पिढी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            लंडन येथे ढोल आणि ताशांच्या निनादात आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय ' या जयघोषात अतिशय स्फूर्तिदायक वातावरणात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी या संग्रहालयातील ऐतिहासिक ठेवा मंत्री श्री. मुनगंटीवार, मंत्री श्री. सामंत आणि उपस्थितांनी पाहिला.


            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी केला होता. यासाठी केंद्र शासन तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर राज्य शासनाच्यावतीने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता. त्यास खऱ्या अर्थाने आज यश आले.


0000

पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची कामे मिशन मोडवर करावीत

 पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची कामे मिशन मोडवर करावीत

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबई, दि. ४ : घरगुती नळजोडणीची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करून दैनंदिन कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

            पुणे विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे,    जलजीवन मिशन आणि जिल्हा परिषदेचे पुणे विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित  अधिकारी उपस्थित होते.

             मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पुणे विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेकडील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करावीत. ठेकेदारांच्या कामाबाबत तक्रारी येऊ नये. ज्या तीर्थक्षेत्राला पाणीपुरवठा योजनेची गरज आहे तेथील योजनेचा सुधारित आराखडा तत्काळ सादर करण्यात यावा.

            पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनाची कामे बंद पडली आहेत, त्याचा आढावा घेऊन ती कामे पुन्हा तत्काळ सुरू करावीत. घरगुती नळजोडणीची  कामे  दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावी याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. ‘हर घर जल’ योजनाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या पाणीपुरवठा योजनांना पाणी मिळण्यासाठी अडचणी आहेत त्या योजनांना कालवा सल्लागार समिती मार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जिल्हा परिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

Featured post

Lakshvedhi