Tuesday, 3 October 2023

वारकरी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेटवारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक

 वारकरी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेटवारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मंत्रालयात घुमला ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर


 


            मुंबई, दि. ३: राज्यातील वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्य शासनाला वारकरी बांधवांविषयी आत्मियता, आदर, सन्मान आहे. वारकऱ्यांच्या मागण्यांबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्री दादाजी भुसे समन्वय करतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे यावेळी वारकरी बांधवांनी 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल'चा एकच गजर केला. त्यामुळे मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील मंत्रिमंडळ सभागृहातील मुख्यमंत्र्यांचे दालन दुमदुमले.


            मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मंत्री सर्वश्री दादाजी भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड यांच्यासह आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, वारकरी प्रबोधन महासमिती, वारकरी महामंडळ,वारकरी प्रबोधन महासमिती, संत मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर, वारकरी महामंडळ (नाशिक जिल्हा व श्री वारकरी प्रबोधन महासमिती जिल्हाध्यक्ष), तारकेश्वर गड संस्थान (पाथर्डी, अहमदनगर) यांचे पदाधिकारी उपस्थित होते.


            श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर हे शासनाच्या ताब्यातच रहावे,संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार करणारे आळंदी येथील 'पूज्य सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत निवास, कीर्तन भवन, शिक्षण वर्ग, भजन हॉल करिता ४७ कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा यासह विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.


            वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी मंत्री श्री. भुसे समन्वयन करतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी शिष्टमंडळातर्फे मुख्यमंत्र्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रत भेट देण्यात आली.


            शिष्टमंडळात संदिपान शिंदे, आसाराम बडे, शिवाजी काळे, संतोष सुंबे, बालाजी भालेराव, रामेश्वर शास्त्री, आदिनाथ शास्त्री, हरिदास हरिश्चंद्र यांच्यासह वारकरी बांधव उपस्थित होते.

Finally found married monkey, नवरा धूनी धूनारच मग तो स्री चा असो नाहीतर प्राणी

 Finally found married monkey


परीक्षेतील एक प्रश्न असा होता की, पुढील वाक्याचा भावार्थ लिहा : बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत... पण दोरीला बांधलेला पेन मात्र तसाच राहिला...

 परीक्षेतील एक प्रश्न असा होता की, पुढील वाक्याचा भावार्थ लिहा : बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत... पण दोरीला बांधलेला पेन मात्र तसाच राहिला...

   एका प्रतिभावंत विद्यार्थ्याने लिहिलेला अर्थ (उत्तर) खालील-प्रमाणे आहे... लक्ष्मीला लोक चोरून नेऊ शकतात... पण सरस्वतीला नाही... म्हणूनच आपण आपल्या मुलांना सुशिक्षित करायचं असतं, धनवंत नव्हे..."फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्यालाच कळतो"... "माणसाची पारख ही रूपावरून करू नका... खरा महत्त्वाचा असतो, तो त्याचा स्वभाव"...!जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन संपते... पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन सुरू होते... आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवतेच... स्वत:वरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका..सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते... खरं तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो... जीवन मोजकेच असते. ते हसत हसत जगायचे असते... सुख दु:खाने भरलेले हे आयुष्य असते... कुठे काही हरवते, तर कुठे काही सापडते... त्यातूनच सापडलेले जपायचे असते... 

*जर तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तर तुमच्या कामाची पद्धत बदला... तुमचे तत्त्व नाही... कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही ....*


 *वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा* 

*माणसाला जास्त थकवतात*...

*सुख आपल्या हातात नाही*, 

*पण सुखाने जगणे* 

*हे नक्की आपल्या हातात आहे*..🙏💐🙏

होन्नावर येथील जी डी भट्ट यांनी बनवलेली ही गणेश मूर्ती. मूर्तीवरील रेशमी धोतर आणि शालही मातीची आहे. अप्रतिम. झूम करून पहा.

 


होन्नावर येथील जी डी भट्ट यांनी बनवलेली ही गणेश मूर्ती. मूर्तीवरील रेशमी धोतर आणि शालही मातीची आहे. अप्रतिम. झूम करून पहा
.

स्वामी रामानंद तीर्थ यांना विधान भवनात अभिवादन

 स्वामी रामानंद तीर्थ यांना विधान भवनात अभिवादन


            मुंबई, दि. ३ : थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानसभेचे अध्यक्ष अॅड्. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


            याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, उप सभापतीचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबूडकर, विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


०००

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दर बुधवारी मुंबई शहराचे पालकमंत्री

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दर बुधवारी मुंबई शहराचे पालकमंत्री केसरकर साधणार सुसंवाद मुंबई, दि. ३ - मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर दर बुधवारी नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. यासाठी ते मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात दुपारी १ ते ४ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने मुंबई शहरातील सर्व नागरिकांनी शासकीय योजना, विकासकामे याबाबतच्या सूचना तसेच इतर समस्या असल्यास उद्या बुधवार ४ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याबाबतच्या निवेदन अथवा लेखी अर्जासह उपस्थित राहावे. नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विषयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच इतर विषयांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात उपस्थित राहता येईल, असे आवाहन पालकमंत्री श्री.केसरकर यांनी केले आहे. ज्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठक असल्यास पालकमंत्री

विविध देशांचा 'वर्ल्ड ट्रेड एक्स्पो' मध्ये सहभाग राज्य

  

विविध देशांचा 'वर्ल्ड ट्रेड एक्स्पो' मध्ये सहभाग

राज्यपालांच्या हस्ते मुंबईत जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन

 

            मुंबई, दि. ३ : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी - २० शिखर परिषदेच्या यशानंतर भारताचे जागतिक पटलावर महत्व अधोरेखित झाले आहे. विविध देश आज व्यापार विस्तारासाठी चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताकडे पाहत आहेत. युवा लोकसंख्येच्या रुपाने भारताला आणखी एक लाभांश मिळाला आहे.  या महत्वाच्या वेळी आयोजित करण्यात आलेले जागतिक व्यापार प्रदर्शन विविध देशांमध्ये व्यापार सहकार्य व विकास वाढविण्याच्या दृष्टीने मैत्रीपूर्ण पुलाचे कार्य करेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.  

       राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील जागतिक व्यापार केंद्र येथे मंगळवारी  (दि. ३) दोन दिवसांच्या चौथ्या जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज तर्फे जागतिक व्यापार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

          'व्यापार, तंत्रज्ञान व पर्यटन' या विषयावर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पर्यटन हा जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक झाला आहे.  गेल्या वर्षी एकट्या भारतातून १.८० कोटी पर्यटक विविध देशांत गेले व ६१ लाख विदेशी पर्यटक भारतात आले. देशांतर्गत १७.३१ कोटी पर्यटकांनी देखील पर्यटनाला चालना दिली.

       महाराष्ट्र उद्योग व गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वांत आकर्षक राज्य असून राज्यात पर्यटन विकासाच्या अनेक संधी आहेत.  वर्ल्ड ट्रेड एक्स्पोच्या माध्यमातून विविध देशांना आपल्या देशातील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाच्या संधी दाखविण्याची तसेच राज्यातील व्यापाराच्या शक्यता जाणून  घेण्याची संधी मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले. 

       व्यापार प्रदर्शनात सहभागी सर्व देशांनी महाराष्ट्राशी सहकार्य वाढवावे व इतर क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवनवी क्षितिजे शोधावीत अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

३० देशांचा सहभाग

 जागतिक व्यापार प्रदर्शनात ३० देशांचा सहभाग असून  देशातील पाच राज्ये देखील यात सहभागी होत असल्याची माहिती, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे व मुंबईच्या जागतिक व्यापार केंद्राचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री यांनी यावेळी दिली. 'वर्ल्ड ट्रेड एक्स्पो'मध्ये व्यापार - व्यापार सहकार्य व व्यापार - शासन सहकार्य या विषयावर बैठक -सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. जागतिक व्यापार केंद्राच्या वतीने कौशल्य प्रशिक्षण केंद्र देखील चालविण्यात येत असून अनेक महिलांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

       यावेळी राज्यपालांनी जागतिक व्यापार प्रदर्शनात लावलेल्या  व्हिएतनाम, अर्जेंटिना, इथिओपिया, काँगो, केनिया यांसह विविध देशांच्या स्टॉल्सना भेट दिली व व्यापार प्रतिनिधींची चौकशी केली.

       कार्यक्रमाला प्रयागराजच्या खासदार रिटा बहुगुणा-जोशी, ब्रिटनचे मुंबईतील उप उच्चायुक्त हरजिंदर कांग, जागतिक व्यापार केंद्राचे उपाध्यक्ष कॅप्टन सोमेश बत्रा, केंद्राच्या कार्यकारी संचालक रुपा नाईक, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत तसेच उद्योग व व्यापार प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

Featured post

Lakshvedhi