Tuesday, 3 October 2023

व्यक्ती आणि वल्ली, ह्याला जिवन ऐसें नाव दोन घडीचा डाव पहा तर खर

 


मनाचं इंधन*!😌 *त्या प्रसंगातून मला मात्र एक मोलाची शिकवण मिळाली.*

 *मनाचं इंधन*!😌

*त्या प्रसंगातून मला मात्र एक मोलाची शिकवण मिळाली.*


आज नेहमीच्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी म्हणून थांबलो होतो. पेट्रोलपंप अगदी टापटीप आहे, थंडपाण्याची पाणपोई सुध्दा आहे. असो.


 इथले वैशिष्ट्य म्हणजे येथे दिवसभर 'एफएम' रेडिओ चालू असतो. पंपावर येणाऱ्या ग्राहकांच्या कानावर घटकाभर जुन्या हिंदी गाण्यांच्या मधुर चाली पडत असतात. 


आज एक गंमतच झाली आणि त्या प्रसंगातून मला मात्र एक मोलाची शिकवण मिळाली. एक तरुण रांगेत आमच्या पुढे उभा होता. त्याने बाईकमध्ये पेट्रोल भरलं. पेट्रोल टँकचं झाकण बंद करुन थोडं पुढे जाऊन नुसता उभा राहिला. पंपावरच्या कर्मचाऱ्याला वाटलं की काही सुटे पैसै तर द्यायचे नाहीयेत, तरी हा का बरं थांबलाय? त्याने खुणेने त्याला विचारले की काय हवंय? ..... 

आणि तो तरुण चक्कं थोडं लाजून म्हणाला, 

'काही नाही, 'एफएम' वर आवडीचं गाणं लागलंय ते ऐकतोय.!!


मित्रहो, हे उत्तर ऐकून त्या कर्मचाऱ्यासह पंपावर उपस्थित अनेकांच्या चेहऱ्यावर स्मीत उमटले. परंतु मी मात्र एकदम अंतर्मुख झालो. 


सहज मनात विचार डोकावला की खरंच, 

वाहनाप्रमाणेच मनालाही इंधनाची गरज असते की...!! 


पोषक, सकारात्मक, आनंददायी, आल्हाददायी आदी प्रकारचे इंधन पुरवल्यावर मनुष्याचं ह्दयरुपी इंजिनदेखील का बरं चांगल्या तऱ्हेने परफॉर्म नाही करणार.? 

मन का बरं प्रसन्न तथा तंदुरुस्त नाही रहाणार? का नाही ते आनंदविश्वात छानपैकी रपेट मारुन येणार.? 


थोडक्यात असे इंधन मनामध्ये भरुन घेण्याची मुळात आपली इच्छा असली पाहिजे. त्यासाठी थोडी सवड काढली पाहिजे. ..!!!


आपले छंद, आवडीनिवडी, आपल्याला प्रेमजिव्हाळा लावणारी माणसे, मित्रपरिवार, निसर्ग, ठराविक ठिकाणे आदी गोष्टी मनामध्ये याप्रकारचे इंधन भरुन देणारे पेट्रोलपंप असावेत. . .

चला तर मग, मनाच्या इंधनाची टाकीपण सदा फुल्ल करुन घेत जाऊयात...


आयुष्य हे आनंदयात्रा म्हणून घडवायचं आहे ना.?

🙏🌿🌹🌿🌹

Monday, 2 October 2023

स्वच्छ,सुंदर मुंबईसाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करणार

 स्वच्छ,सुंदर मुंबईसाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करणार

                                                                                                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सफाई कामगारांच्या वसाहतीच्या भेटीतून मुख्यमंत्र्यांची महात्मा गांधी यांना स्वच्छांजली

कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना तयार करण्याचे निर्देश

 

            मुंबईदि. 2 : - 'मुंबई शहर स्वच्छ करणारेते सुंदर करणारे आणि मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करण्यात येईल. या वसाहतीतील सुविधांचा तत्काळ स्वतंत्र टिमद्वारे आढावा घेण्यात यावाअसे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

            मुंबईकर नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ऊन-वारा-पावसात राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट देतमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महात्मा गांधी यांना जयंतीदिनी आगळी स्वच्छांजली अर्पण केली. मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सफाई कामगारत्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केल्यामुळे या बांधवानींही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.

            अलीकडच्या काळात या वसाहतीला आवर्जून भेट देऊनयेथील अडीअडचणी समजावून घेणारेमुख्यमंत्री श्री. शिंदे पहिलेच मुख्यमंत्री असल्याचीही प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केली.

            स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास या राज्यस्तरीय मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागात भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगार वसाहतीची पाहणी केली.

            त्यांनी कासार वाडी कोहिनुर मॉलचा परिसरतसेच गौतम नगर  हिंदमाता थिएटर येथे भेट देऊन स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. यावेळी आमदार सदा सरवणकरमुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल आदी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

            मुख्यमंत्री म्हणाले कीया वसाहतीतील गैरसोयींची पाहणी केली. येथे आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत मुंबई महापालिकेने स्वतंत्र टिमद्वारे आढावा घ्यावा असे निर्देश दिले आहेत. या परिसरातील दोन इमारतींचे काम रखडले आहे. ते पुर्ण व्हावे याकरिता तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. दोन शिफ्ट मध्ये काम सुरू करावे. या परिसरातील मुख्य रस्ताअंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत. येथील शौचालयेस्वच्छतागृहांची स्थिती सुधारली पाहिजे यासाठी सूचना केल्या आहेत. या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी अभ्यासिका व्हावी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. या कामगार बांधवांच्या उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी एक योजना तयार करावी अशा सूचना महापालिकेल्या दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            यावेळी मुख्यमंत्र्यांनी या उपस्थित कामगरांशीही संवाद साधला.आपण सर्व मुंबई शहराच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी कष्ट करता आणि आपल्यालाच गैरसोयींना तोंड द्यावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातीलअशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

            स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास या राज्यस्तरीय मोहिमेचा महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला गिरगाव चौपाटी येथे प्रारंभ करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालयेस्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई करण्यात यावीत असे निर्देश दिले होते.

            काल देखील त्यांनी कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली होती. केवळ मुख्य रस्तेचौकसमुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याबरोबरच गल्ली बोळातील रस्त्यांचीझोपडपट्टी तेथील परिसरशौचालयेगटारे यांची साफसफाई करण्याच्या सूचना केली होती. 

००००


साखर चतुर्थी गणपती

 घोलनगर-वडखळ, पेण.


छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्यासाठीव्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमशी होणार सांमजस्य करार

 छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्यासाठीव्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमशी होणार सांमजस्य करार


                                             -मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 2: छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली ही वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला गेले आहेत. दि.3 ऑक्टोबर,2023 रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत या करारावर स्वाक्षरी होणार आहे.


            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षात वाघनखे शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने सांमजस्य करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे भावोद्गार मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी काढले. यावेळी आमदार पराग अळवणी, ओमप्रकाश चव्हाण, अमोल जाधव, विनीत गोरे, स्थानिक नगरसेविका उपस्थित होते.


            मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देत हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित रयतेचे राज्य महाराष्ट्राला देण्याचा संकल्प करुन काम करीत असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची प्रेरणा आहे त्यांच्या विचारसरणीला धरून केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काम करीत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.


            दि. 15 एप्रिल, 2023 रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उपउच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय सबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सु

रू केला होता.


राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

 राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन


 

        ठाणे, दि. 2 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


            ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात आमदार भरत गोगावले, तहसीलदार संजय भोसले, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनीही अभिवादन केले.


000

 



राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना मंत्रालयात


मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून अभिवादन


     मुंबई दि,2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

      यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


000


                                                                     



 


 

गधा कौन

 


Featured post

Lakshvedhi