Friday, 8 September 2023

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ

 एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

            मुंबई, दि. 8 : गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.


            सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.


-----

०-----


कृषी महाविद्यालयात शासकीय रोपवाटिका व्यवस्थापनाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

 कृषी महाविद्यालयात शासकीय रोपवाटिका व्यवस्थापनाच्या

राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

 

            मुंबई दि. 8 : कृषी महाविद्यालय, पुणे येथील शिरनामे सभागृहात ‘शासकीय रोपवाटिका व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कृषी आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

             या वेळी फलोत्पादनचे संचालक डॉ.कैलाश मोतेसहसंचालक अशोक किरनळीबाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे प्राध्यापक डॉ.पराग हळदणकरकृषी अभियांत्रिकीचे  प्राध्यापक डॉ.रवींद्र बनसोडे उपस्थित होते.

            शासकीय रोपवाटिकेमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारीसर्व संबंधित उपविभागीय कृषी अधिकारीजिल्हा अधिक्षक कृषी



अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी कार्यशाळेत सहभागी झाले होते.

बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू;

 बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू;

सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार

- मंत्री मंगल प्रभात लोढा

 

            मुंबईदि. ८ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची अंमलबजावणी विभागाने सुरू केली असूनत्या अंतर्गत अंधेरी पूर्व येथील कोल डोंगरी परिसरातील नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे या रात्र अभ्यासिकेचे उद्घाटन केले.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले की, मुंबई शहरात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागाआवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीतत्यामुळे इच्छा असताना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासप्रगती करण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मुंबईमध्ये रात्र अभ्यासिकेची नितांत गरज होती. या अभ्यासिकेमुळे मुलांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने लवकरच आपल्या शहरात ३५० रात्र अभ्यासिका सुरू व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू होणार असूनत्याचा लाभ या शाळेत शिकणाऱ्या सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना होणार असल्याचे, मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही प्रथम रात्र अभ्यासिका सुरू झाली असूनयापुढे प्रत्येक वार्डमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

            महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या तसेच परिसरातील खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्रवेश घेता येणार आहे. उत्कर्ष शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने, पालिकेच्या शाळांमध्ये तळमजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र खोली उपलब्ध असेल अशा इमारतीतच ६ ते ८ या वेळात रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी पालकांकडून संमती पत्रत्याचबरोबर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आवश्यक असणार आहे.  

            या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार पराग आळवणीमाजी नगरसेवक अभिजित सावंत आणि संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

जागतिक कराटे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

 जागतिक कराटे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

            मुंबई, दि.8 :- जागतिक कराटे चॅम्पियनशिपध्ये सहभागी होणाऱ्या टीमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.


            ऑक्टोबर, २०२३ मध्ये जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या जागतिक कराटे चॅम्पियनशिपमध्ये मुंबईतील कराटेनोमिची वर्ल्ड फेडरेशन इंडिया संस्थेतील खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या संघातील या संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह ७ खेळाडू, २ पंच अधिकारी अशा ९ जणांच्या चमूला मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

हातावर दहीहंडी, कलाकार ला एक salute

 


Thursday, 7 September 2023

 



Maharashtra Governor visits Radha Gopinath Mandir on Janmashtami

 Maharashtra Governor visits Radha Gopinath Mandir on Janmashtami


 


Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by his family visited the Radha Gopinath Mandir at Girgaum Chowpatty in Mumbai on the occasion of Janmashtami on Thursday (7 Sept).


 


The Governor accompanied by Smt Rambai Bais performed the Dugdh Abhishek on the occasion. The Governor also paid his respects to the murti of the Founder of ISKCON Srila Prabhupada on the occasion.


 


Trustee of the temple Gauranga Prabhu welcomed the Governor and briefed him about the activities of ISKCON.

Featured post

Lakshvedhi