Tuesday, 4 July 2023

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप


            सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली आणि गेळे या गावातील शेतकऱ्यांना कबुलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            कबुलायतदार गावकर पद्धतीत महाराष्ट्रात अन्य कोणत्याही ठिकाणी अस्तित्वात नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७१ मधील नियम क्र.५२ मधील तरतूद शिथील करण्यात आली आहे. आंबोली येथे ६२९-२४.४१ हेक्टर आर हे क्षेत्र प्रवर्ग १ मधील पात्र कुटुंबांना त्यांच्या घराखालील क्षेत्रासह, शेतजमीन शेतसारा आकारून समप्रमाणात वाटप करण्यात येईल. तसेच प्रवर्ग २ मधील कुटुंबांना घराखालील जास्तीत जास्त १५० चौ.मीटर क्षेत्र शासनाच्या प्रचलित धोरणानुसार वाटप करण्यात येईल. तसेच मौजे गेळे येथे २६०-२५.७० हेक्टर आर क्षेत्र पात्र कुटुंबांना समप्रणात वाटप करण्यात येईल. मौजे आंबोली व गेळे गावात खासगी वने असा शेरा असलेल्या जमिनीबाबत वन विभागाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर त्या जमिनीचे वाटप करण्यात येईल.

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ

 उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ


            मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे हयात असलेले पती किंवा पत्नी यांना घरकाम, वाहनचालक तसेच दूरध्वनी खर्चाचा लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            सेवानिवृत्त न्यायमूर्तींना एक घरकामगार आणि एक वाहनचालक यांची कंत्राटी पद्धतीने सेवा घेण्यासाठी उच्च न्यायालयामार्फत खर्च देण्यात येईल. घरकामगारासाठी वर्ग-४चे मूळ वेतन तसेच महागाई भत्ता आणि वाहन चालकाकरिता देखील मूळ वेतन, महागाई भत्ता देण्यात येईल. न्यायमूर्ती यांना किंवा त्यांच्या मृत्यूपश्यात पती किंवा पत्नी यांना १४ हजार रुपये दरमहा कार्यालयीन सहायकासाठी तसेच दूरध्वनीसाठी ६ हजार रुपये असे भत्ते देण्यात येतील.


            सदरचे लाभ पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने त्यांच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींसाठी लागू केले आहेत.

नागपूरच्या शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांसाठी 35अधिसंख्य पदांना मान्यता

 नागपूरच्या शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांसाठी 35अधिसंख्य पदांना मान्यता


            नागपूर येथील शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी ३५ अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            या कर्मचाऱ्यांना कोणतीही वेतन थकबाकी पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार नाही. यासाठी १ कोटी १७ लाख ३ हजार ४६८ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हे मुद्रणालय राज्य शासनाच्या विदर्भ विकास महामंडळाकडे सोपवण्यात आले होते. मात्र महामंडळाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन १९९४ मध्ये ते शासकीय मुद्रण व प्रकाशन संचालनालयाकडे हस्तांतरित करण्यात आले होते.


-----०-----

दिंडोरी, त्र्यंबक तालुक्यातील वळण योजनेस मान्यता

 दिंडोरी, त्र्यंबक तालुक्यातील वळण योजनेस मान्यता


            नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते आणि दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा येथील प्रवाही वळण योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            कळमुस्ते योजनेमुळे गोदावरी खोऱ्यातील पाणीसाठा १३.६८ किमीच्या बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने वळविण्यात येईल. यामुळे गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट काही प्रमाणात भरून निघेल. यासाठी ४९४ कोटी ९८ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.


            चिमणपाडा योजनेत पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून, प्रवाही वळण योजनेद्वारे गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येईल. यामुळे करंजवण धरणातील १११ हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होईल. या प्रकल्पासाठी ३६ कोटी ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.


-----०-----

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती

 मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती


            राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेतून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.


            या समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत येत नाही. ही बाब लक्षात घेऊन क्यु-एस वर्ल्ड रँकिगमध्ये २००च्या आत मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. ही योजना २०२३-२४ पासून राबविण्यात येईल. सारथी संस्थेकडून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येतील.


            अभियांत्रिकी, वास्तुकला, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य-अर्थशास्त्र, कला, विधी, औषध निर्माण या अभ्यासक्रमांसाठी ५० पदव्युत्तर, पदवी, पदविका आणि २५ डॉक्टरेट अशी शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येईल. या योजनेसाठी ५ वर्षाकरिता २७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पहिल्या वर्षासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास आज मान्यता देण्यात आली.

राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती हरित हायड्रोजन धोरण

 राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती

हरित हायड्रोजन धोरण जाहीर, 8 हजार 500 कोटीस मान्यता


            नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ८ हजार ५६२ कोटी रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली.


            प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन जाहीर केले असून, २०२३ पर्यंत देशात ५ मिलीयन टन हरित हायड्रोजन दरवर्षी निर्मित करण्याचे उद्द‍िष्ट आहे. राज्यामध्ये देखील हरित हायड्रोजन आणि संबंधित उत्पादनांची क्षमता ओळखून, हे धोरण तयार करण्यात आले आहे. राज्याची सध्याची हायड्रोजनची मागणी दरवर्षी ०.५२ मिलीयन टन इतकी आहे. ही मागणी २०३० पर्यंत १.५ मिलीयन टनांपर्यंत पोहचू शकते.


            आज जाहीर करण्यात आलेल्या हायड्रोजन धोरणामध्ये ओपन अँक्सेसद्वारे, स्वयंवापरासाठी राज्यातून किंवा राज्याबाहेरून, राज्यातील वीज वितरण कंपन्यांकडून, पॉवर एक्स्जेंजकडून नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणाऱ्या प्रकल्पांना लाभ सवलती दिल्या जातील. महाऊर्जा कार्यालयाकडे हरित हायड्रोजन आणि संबंधित उत्पादन प्रकल्पांची नोंदणी करण्यात येईल. या प्रकल्पांना २५ हजार प्रति मेगावॅट इलेक्ट्रोलायझर क्षमतेनुसार प्रकल्प सुविधा महाऊर्जाकडे जमा करावी लागेल. प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून पुढील दहा वर्षांसाठी पारेषण शुल्क, व्हिलिंग चार्जेसमधून अनुक्रमे ५० टक्के व ६० टक्के सवलत देण्यात येईल. स्टॅंडअलोन व हायब्रीड ऊर्जा प्रकल्पांना अनुक्रमे पुढील १० वर्षांसाठी आणि १५ वर्षांसाठी विद्युत शुल्कातून १०० टक्के सवलत देण्यात येईल तसेच क्रॉस सबसिडी व अधिभारातून देखील माफी देण्यात येईल.


            याशिवाय पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटीव्ह्ज् २०१९ नुसार लाभ मिळतील, ५ वर्षांकरिता हरित हायड्रोजनच्या गॅसमध्ये मिश्रणासाठी प्रत्येक किलोकरिता ५० रुपये अनुदान देण्यात येईल. तसेच पहिल्या २० हरित हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशनला कमाल ४.५० कोटी रुपये या मर्यादेत ३० टक्के भांडवली खर्च अनुदान देण्यात येईल. पहिल्या ५०० हरित हायड्रोजन आधारित फ्युएल सेल प्रवासी वाहनांना कमाल ६० लाख रुपये प्रति वाहन, एवढ्या मर्यादेत ३० टक्के भांडवली खर्च अनुदान देण्यात येईल.


            हरित हायड्रोजन प्रकल्पांसाठी असलेल्या जमिनीला स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर, अकृषिक कर व मुद्रांक शुल्कातून पूर्ण सवलत देण्यात येईल. हरित हायड्रोजन कक्षासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ घेणे, त्यांचे प्रशिक्षण, कौशल्य विकास, एक खिडकी सुविधा इत्यांदी बाबींकरिता वार्षिक ४ कोटी याप्रमाणे १० वर्षांसाठी ४० कोटी रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली.



-----०-----


रक्त पातळ करण्याचे काही घरगुती उपाय

 रक्त पातळ करण्याचे काही घरगुती उपाय.

गुळ आणि लसूण हे रक्त पातळ करण्यासाठी चांगले उपाय आहेत. गुळ हृदयासाठी आरोग्यदायी असतो आणि लसणात अँटी-एजिंग गुणधर्म असतात, जे शरीर निरोगी ठेवतात. तुम्ही हे दोन पदार्थ मिक्स करून एक चटणी बनवू शकता आणि ही चचटणी शरीरातील तुमचे रक्त पातळ करण्यास मदत करेल.भरपूर पाणी प्यायल्याने रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यास मदत होते कारण ते रक्त पातळ आणि सुरळीत वाहण्यास मदत करते. रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यासाठी दिवसातून किमान आठ ग्लास पाणी पिण्याची शिफारस केली जाते.हळद


लोक हळदीचा वापर औषधी म्हणून फार पूर्वीपासून करत आहेत. हळदीतील कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी आणि रक्त पातळ करणारे किंवा अँटीकोएगुलंट गुणधर्म असतात. जे शरीरात रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्याचे काम करतात.


रक्त घट्ट होण्यापासून आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या नैसर्गिक गोष्टींचाही वापर केला जाऊ शकतो.


हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी काही वैद्यकीय स्थिती तसेच रक्त पातळ करणाऱ्या औषधांची आवश्यकता असू शकते. रक्त पातळ करणारे अँटीप्लेटलेट्स रक्त पेशींना एकत्र चिकटून राहण्यापासून रोखतात ज्यामुळे त्यांना गोठण्यापासून प्रतिबंध होतो. जेव्हा शरीरात रक्त घट्ट होऊ लागते, तेव्हा तुमचे शरीर अनेक प्रकारे त्याचे संकेत देऊ लागते. 


यामध्ये चक्कर येणे, मासिक पाळी दरम्यान रक्त प्रवाह वाढणे, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, त्वचेला खाज सुटणे, अंधुक दृष्टी, संधिवात यांचा समावेश होतो. शरीरात रक्त घट्ट होण्यापासून आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या नैसर्गिक गोष्टींचाही वापर केला जाऊ शकतो. या पदार्थांचा वापर करण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

लसूण

लसूण, फ्लेवर फूडमध्ये जोडले जाते, त्यात नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात.फूड सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी मधील 2018 च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की लसूण पावडरमुळे उंदरांमध्ये अँटीथ्रोम्बोटिक क्रिया झाल्याचे दिसून आले आहे. अँटीथ्रोम्बोटिक एजंट हा एक पदार्थ आहे जो रक्त गोठण्यास प्रतिबंध करतो.


व्हिटामीन ई


व्हिटॅमिन ई रक्तातील गोठण्याची क्रिया कमी करते. हे परिणाम एखाद्या व्यक्तीने घेतलेल्या व्हिटॅमिन ईच्या प्रमाणावर देखील अवलंबून असतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ऑफिस ऑफ डायटरी सप्लिमेंट्सने शिफारस केली आहे की जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत त्यांनी व्हिटॅमिन ई ओव्हरडोज घेणे टाळावे.


हळद


लोक हळदीचा वापर औषधी म्हणून फार पूर्वीपासून करत आहेत. हळदीतील कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी आणि रक्त पातळ करणारे किंवा अँटीकोएगुलंट गुणधर्म असतात. जे शरीरात रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्याचे काम करतात. हळद रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यास मदत करू शकते. परंतु रक्त पातळ करणाऱ्यांसाठी हळद थेट घेण्याची शिफारस केलेली नाही. तुम्ही स्वयंपाकात, सूपमध्ये आणि गरम पाण्यात मिसळून हळद खाऊ शकता.


आलं खाल्ल्यानं रक्त पातळ होतं का?


आले हा एक दाहक-विरोधी मसाला आहे जो रक्तातील गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करतो. त्यात सॅलिसिलेट नावाचे नैसर्गिक आम्ल असते. ऍस्पिरिन सॅलिसिलेट, ज्याला एसिटिलसॅलिसिलिक ऍसिड म्हणूनही ओळखले जाते, हे सिंथेटिक गुणधर्मांसह शक्तिशाली रक्त पातळ करणारे आहे. नैसर्गिक सॅलिसिलेट्सचे प्रभाव मिळविण्यासाठी, लोक नियमितपणे ताजे किंवा वाळवलेले आले स्वयंपाक करताना वापरू शकतात.

प्रमोद पाठक.



Featured post

Lakshvedhi