Monday, 26 June 2023

वाढत्या वयानुसार, आपलं इम्युनिटी सिस्टम कमकुवत

 वाढत्या वयानुसार, आपलं इम्युनिटी सिस्टम कमकुवत होत जाते. तसेच स्नायू कमकुवत होतात. परंतु जर डाएटमध्ये काही महत्त्वाचे बदल केले तर त्यामुळे मदत मिळू शकते. खासकरून वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर डाएटमध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला काही डाएट टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वाढत्या वयात आरोग्य जपण्यासाठी फायदा होईल. आणि आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.ब्राउन राइस, गहू, बाजरी यांसारख्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करणं फायदेशीर ठरतो. यांमध्ये असलेलं फायबर पचनक्रिया मजबुत ठेवण्यासाठी मदत करतो. एवढचं नाहीतर हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही

होल ग्रेनपासून तयार करण्यात आलेले पदार्थ मदत .फॅट डाएटपासून शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असे अनेक पदार्थ आहेत, जे लगेच वजन कमी करण्याचा किंवा शरीराला अनेक फायदे होण्याचा दावा करतात. पण हेल्दी राहायचं असेल तर फॅटयुक्त पदार्थांपासून दूर राहणं फायदेशीर ठरतं.

प्रमोद पाठक.


_*

तुम्ही खरंच हेल्दी आहात? कसं ओळखाल.....?*

 *तुम्ही खरंच हेल्दी आहात? कसं ओळखाल.....?*


काही लोक सतत आजारी पडतात. यासाठी अनेकदा ते डॉक्टरांकडेही जातात पण त्याचा कधीही फायदा होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. आपण काही कारणे जाणून घेऊया.


*या कारणांमुळे तुम्ही हेल्दी आहात का? हे जाणून घेण्यास सोपी जाणार...*


*१) तुमचा आहार योग्य आहे का...?*


आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते.


*२) आपल्याला व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता आहे का...?*


आपल्या सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते ते म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे.


*३) तुम्ही पुरेसे पाणी पिताय ना...?*


आपल्या शरीरात ६० टक्के पाणी असते त्यामुळे शरीराच्या सगळ्याच क्रिया पूर्ण होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.


*४) तुम्हाला पुरेशी झोप मिळते आहे का...?*


आपले शरीर हे कोणत्याही रोगविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर रोग, सूज, जखम ह्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडते.


*५) तुम्ही तोंडाची नीट स्वच्छता करता ना...?*


आपले तोंड हा अनेक बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. अनेक चांगले वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडात वाढतात आणि नंतर आपल्याला ते आजारी पाडतात.


*६) तुमच्या कुटुंबात कुणी सतत आजारी पडते का...?*


अनेकवेळा असे दिसून आले आहे की रक्तातील पांढऱ्या पेशी, ज्या कोणत्याही रोगाचा सामना करतात त्यांची संख्या जर कमी असेल तर तो माणूस सतत आजारी पडतो.


*७) तुम्हाला ताण आहे का...?* 


आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण-तणाव नसलेला माणूस मिळणे जवळपास अशक्य आहे. पण जर आपल्याला अतिरिक्त ताण असेल तर त्यामुळे आपल्या शरीराची खूप हानी होते. यापैकी जे काही कारण आपल्याला सापडेल ते दूर करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो


डॉ. प्रमोद ढे

शहरातील 436 कोटी रुपयांच्याविकास कामांचे भूमिपूजन

 

            अमृत अभियानांतर्गत 329 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश


            नांदेड, दि. 25 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत 436 कोटी 48 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांच्या बळकटीकरणाच्या कामांसह रस्ते विकास कामांचा यामध्ये समावेश आहे.

            चैतन्य नगर येथील शिवमंदीर परिसरात झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.

         केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नांदेड शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांचे बळकटीकरण आणि संलग्नीकरण कामासाठी 329.16 कोटी रूपये निधी मंजूर आहे. यामधून शहरात अद्याप मलनिस्सारण वाहिनी नसलेल्या भागात नवीन मलनिस्सारण वाहिनी करण्यात येणार आहे. तसेच ज्या भागातील मलनिस्सारण वाहिनी नादुरुस्त झाली आहे, तेथे जुनी वाहिनी बदलून नवीन मलनिस्सारण वाहिनी जोडली जाणार आहे. एकूण 430 किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलनिस्सारण वाहिनीची जोडणी याद्वारे केली जाणार आहे. तसेच मलनिस्सारण केंद्रातील विविध यंत्रसामग्रीचा यामध्ये समावेश आहे.

            महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नांदेड शहर रस्ते विकास प्रकल्पातील 107.32 कोटी रूपये निधी मंजूर आहे. या निधीतून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील 182 रस्त्यांची कामे होणार आहेत. या दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.


0000

योजना कल्याणकारी, शासन आपल्या दारी

 योजना कल्याणकारी, शासन आपल्या दारी

अन् आता हक्काची भाकर मिळाली ! लक्ष्मीबाईंनी व्यक्त केला आनंद


            नांदेड दि.25 (जिमाका) : जिंदगीनं नेहमी परीक्षा घेतली… लेकरं लहान असताना नवरा मेला, लेकरांना मोठं करताना, शेतीनं पोटाची भूक भागवली... पिढ्यानं पिढ्या जमीन कसत होतोच, पण जमीन नावावर नव्हती. त्यामुळं कोणत्याही शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नव्हता… आज मुख्यमंत्री सायबांनं 6 एकर जमीन नावावर केल्यानं मला हक्काची भाकर मिळाल्याचा आनंद लक्ष्मीबाई भिमराव कुसराम यांनी बोलून दाखविला.


            लक्ष्मीबाई किनवट तालुक्यातील माळ बोरगावच्या गोंड आदिवासी महिला आहेत. "शासन आपल्या दारी" या कार्यक्रमात आज त्यांना वन निवासी हक्क अधिनियमानुसार सहा एकर जमिनीचा हक्क देण्यात आला. त्यांना याबाबत विचारले असता, त्यांचे डोळे भरून आले. ‘ज्या शेतीत माझ्या सासू-सासऱ्यांचे आयुष्य गेले… माझा नवरा या शेतात राबला. लेकरं लहानाची मोठी झाली. पण त्या जमिनीवर मालकी हक्क नव्हता, याची मनात नेहमीच रूखरूख असायची. आता पिढ्यानं पिढ्या कसलेली जमीन आमच्या नावावर झाल्यानं मोठं समाधान वाटलं.’


 संधीचं केलं सोनं…


            ‘मी स्त्री आहे आणि मी फक्त चार भिंतीत माझं अस्तित्व बांधून ठेवावं, हे मला मान्य नव्हतं.. मी साडी सेंटर टाकलं आणि मदतीला धावून आले ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. तीन लाख रुपयाचे कर्ज घेतले… त्याचा परतावा आता वेळच्या वेळी मिळतो... संधी मिळाली.. संधीचे सोनं केलं’ हे सांगत होत्या नांदेडच्या श्रीमती अर्चना रामराव रेवले. त्यांच्या बोलण्यात एक आत्मविश्वास जाणवत होता. महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाचे हे अत्यंत बोलके उदाहरण शासन आपल्या दारी या कार्यक्रमात पहावयास मिळाले.


स्वयंरोजगारातून मिळाले आर्थिक बळ…


             अडीच एकर शेतीवर संसार चालवणे ही तारेवरची कसरत, पण त्याला एका खंबीर व्यवसायाची जोड मिळाली तर सगळं चित्र कसं बदलू शकतं, हे उमरी तालुक्यातील रहाटीचे रहिवासी गंगाधर गायकवाड यांच्या यशातून कळते. "मी 12 वी शिकलेला सुशिक्षित बेरोजगार, अडीच एकर शेतीत मुला बाळांना शिकवणं, उत्तम सांभाळ करणं शक्य नाही, या जाणीवेतून जेसीबीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. माझ्या या निर्णयाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने कर्जाची फाईल मंजूर करून बळ दिलं... आता आत्मविश्वास निर्माण झाला आहे…उत्तम व्यवसाय करतो आहे, चांगले पैसे मिळतायत. मुलांना उत्तम शिक्षण देऊ शकेन, घरच्यांच्या आवडी- निवडी पुरविल्याचे समाधान मिळतेय."


फक्त ठेव नाही भविष्य सुरक्षित झालं…


            कोलाम आदिवासी समाजाच्या तीन मुली, शीतल रामदास आत्राम, इयत्ता 9 वी, रेश्मा लक्ष्मण आत्राम इयत्ता 9 वी आणि सुनीता माधव आत्राम इयत्ता 8वी... अत्यंत आनंदाने सांगत होत्या, की “आज शासनाने "अदिम जमाती कन्या शिक्षण प्रोत्साहन योजनेंतर्गत" प्रत्येकी 70 हजार रुपये एवढ्या रक्कमेची ठेव आमच्या नावाने बँकेत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे खूप आनंद वाटत आहे. या पैशातून आमचे भविष्य सुरक्षित होणार आहे. या पैशामुळे घरचे पुढील शिक्षणाला विरोध करणार नाहीत. ही रक्कम आमचं आयुष्य उभं करण्यासाठी मोठं पाठबळ असेल." या मुली अठरा वर्षाच्या झाल्यानंतर, अविवाहित असताना ही रक्कम मिळेल. त्यामुळे बाल विवाहसारख्या प्रथा बंद व्हायला मदत होईल. या आर्थिक बळावर त्यांचे शिक्षण होईल आणि त्यामुळ प्रवाहात येतील, हा केंद्र शासनाच्या या योजनेच्या मागचा उद्देश असल्याचे किनवटच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हा अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले. तर ही योजना युनेस्कोच्या कन्याश्री या योजनेच्या प्रेरणेतून सुरू केल्याचेही त्या म्हणाल्या.


***


वृत्त क्र. 2019


 


 

येणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य माणसाचा !

 येणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य माणसाचा 

त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत राहणार - मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे 

 


▪ शासन आपल्या दारी कार्यक्रमात विविध विभागाच्या योजनांमधून


2 हजार 213 कोटी रुपयांचे लाभ 


▪ मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शहिदांना अभिवादन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद 


▪ लाभधारकांच्या अभूतपूर्व गर्दीने अबचलनगर फुलले


▪40 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतली अनुभूती  


 


            नांदेड (जिमाका) दि. 25 :- शासनाने केवळ 11 महिन्यात घेतलेले निर्णय हे मागील अडीच वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढणारे असून “सरकारी काम सहा महिने थांब” ही संकल्पना आपण सर्वांनी मोडीत काढून दाखविली आहे. सरकारी कामासाठी आता सर्वसामान्यांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, कारण शासनच आपल्या दारी आले आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य जनतेचा असेल व त्यांच्या हितासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण सतत काम करत राहू या शब्दात आश्वस्त केले. नांदेड येथील अबचलनगर येथे आयोजित “शासन आपल्या दारी” या भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.


            यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार संतोष बांगर, आमदार ज्ञानराज चौगुले, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक, विविध योजनांचे लाभार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी माहूरगड येथील श्री रेणुकादेवी, श्री गुरूगोविंद सिंघजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामातील सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचा, हुतात्म्यांचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासाची बांधिलकी आम्ही स्विकारली आहे. नांदेड जिल्ह्यातील जनतेसाठी विविध शासकीय विभागांच्या योजनांमधून सुमारे 2 हजार 213 कोटी रुपयांचे लाभ दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 


शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत उभे


 शेतकरी हा आपला अन्नदाता असून त्याच्या कष्टाचा सन्मान सर्वांनी करायला हवा असे मुख्यमंत्री म्हणाले. शासनाला आता कुठे एक वर्षच पुर्ण होईल परंतू या अल्पकाळात शासनाने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. शासनाने एनडीआरएफच्या दरापेक्षा दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत केली, आतापर्यंत शासनाने जवळपास 10 हजार कोटी रुपयांची मदत आपदग्रस्त शेतकऱ्यांना केली आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची नुसतीच घोषणा झाली होती परंतू हे 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे काम या शासनाने केले आहे. सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा निर्णय शासनाने केला, त्यासाठी 1 हजार 500 कोटी रुपयांची तरतूदही केली. शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. प्रधानमंत्री महोदयांनी 6 हजार रुपयांची शेतकरी सन्मान योजना सुरु केली होती आपण त्यात आणखी सहा हजार रुपयांची भर घालून शासनाने ही रक्कम 12 हजार रुपये इतकी केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


 


सरकार सर्वसामान्यांचे


सर्वसामान्य माणसांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे शासन काम करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या शासनाने सर्वसामान्य माणसाच्या हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय असो, पर्यटनाचा, ई फाईलिंगचा निर्णय असो की अन्य कोणताही, शासनाने 75 हजार युवक-युवतींना शासकीय नोकऱ्या देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. विविध कंपन्यांसमवेत चर्चा आणि समन्वय करून आपल्या तरूणांच्या हाताला रोजगार देण्याचे काम कौशल्य विकास विभाग करत असून आतापर्यंत दीड दोन लाख लोकांना रोजगार देण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.


 


कृषि महाविद्यालयाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय


नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, पैनगंगा नदीवर 1 हजार 600 कोटी रुपये खर्चाचे सात बंधारे बांधण्यास शासनाने मंजुरी दिली आहे यातून 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. विविध सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने 6 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचेही ते म्हणाले, लेंडी प्रकल्प असो की नांदेडला जोडणारे रेल्वे प्रकल्प असो, शासन नांदेडच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करील, समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हिंगोलीमध्ये शंभर कोटीचा हळद प्रकल्प शासन सुरु करत आहे. नांदेडच्या कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव तपासून त्यावरही सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


 


हक्काचे सरकार आणि हक्काचा माणूस..


महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली असून लेक लाडकी उपक्रम असेल, बचतगटांच्या वस्तुचे ब्रॅण्डिग आणि मार्केटिंग असेल, महिलांना एसटी बस प्रवासात 50 टक्के तिकिट दरात सवलत असेल, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास असेल या सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांचा लाभ आज राज्यातील नागरिक घेत आहे, हे आपल्या हक्काचे सरकार आणि मी आपल्या हक्काचा माणूस असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.


 


गावापर्यंत पोहचण्याचा शुद्ध हेतू म्हणजे शासन आपल्या दारी - पालकमंत्री गिरीष महाजन


 


दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या योजना पोहोचाव्यात या शुद्ध हेतूने शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम आपण राबवित आहोत. सर्वसामान्य माणसाला बऱ्याचवेळा त्यांच्या हक्काच्या, तो ज्या योजनेला पात्र आहे त्या योजनेबाबत नेमकी कुठे अर्ज करावा लागतो याची कल्पना नसते. त्या-त्या योजनांचे निकषही त्याला माहित नसतात. अशावेळी शासन ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचते याला खूप अनन्य साधारण महत्त्व आहे. कर्तव्याची भावना आणि जबाबदारी स्विकारून शासकीय योजनेत अधिक पारदर्शकता व साक्षरता यातून निर्माण होईल, असा विश्वास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दररोज सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे दु:ख समजून घेत आहेत. त्यांच्यासाठी शासन पातळीवर अनेक योजना घेऊन ते पोहोचत असल्याचे गौरव उद्गार नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काढले.


     शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी आम्ही सदैव तत्पर - कृषि मंत्री अब्दुल सत्तार


निसर्गाच्या आव्हानात शेतकरी हा नेहमी गुरफटलेला असतो. विविध आव्हानात गुरफटलेल्या शेतकऱ्यांना अनेक विकास योजनांच्या माध्यमातून आर्थीक विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकरी निसर्गाकडून आणि बाजारपेठेतील शेतमालाच्या भावात होणाऱ्या बदलातून सदैव त्रस्त असतो. जेंव्हा शेतमालाचे उत्पादन अधिक होते तेंव्हा बाजारात भाव नसतो. शेतकऱ्यांची ही आर्थिक कुचंबना थांबविण्यासाठी शासनाने गोडाऊन योजनेवर भर दिला आहे. यासाठी तब्बल 60 टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जात आहे. बाजारात जेंव्हा शेतमालाला भाव नसतील तेंव्हा हा शेतमाल गोडाऊनमध्ये साठवता येईल, असे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधतांना सांगितले. शेतीसमवेत शेतीपूरक उद्योग व्यवसायावर अधिक भर दिला आहे. महिला बचतगटांना शेळी याचबरोबर गाई व म्हशीबाबतचा निर्णय शासनाने घेतला. मागेल त्याला शेततळे, सौरऊर्जा, औजार बँक, नांगर, वकर, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, ड्रोनने फवारणी यासाठी विद्यापीठ पातळीवर प्रशिक्षण, सौरऊर्जेवर कृषिपंप अशा विविध योजना घेऊन सरकार शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध असल्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.


उद्योग विकासाला चालना मिळेल - खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर


राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावी, तत्पर सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी झटत आहेत. हे सरकार देणारे असल्याचे सांगून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात उद्योग व रस्ते विकासाचा प्रलंबित अनुशेष पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.


 


शासन आपल्या दारी अभियानाच्या अनुभूतीने सर्वसामान्यांचा विश्वास वाढला - खासदार हेमंत पाटील


शासनाशी संबंधित सर्वसामान्य माणसाला अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागतो. साध्या प्रमाणपत्रापासून ते लाभाच्या योजनेपर्यंत त्याला कार्यालयात खेटे मारावे लागतात. शासन आणि लाभार्थी यांच्यामधील ही दरी कमी करण्यासाठी शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम अत्यंत मोलाचा असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले. रिक्षा चालविण्यापासून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अनुभव घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप काही अनुभवले आहे. ही अनुभवाची शिदोरी घेऊन शासकीय योजनांना त्यांनी अधिक जबाबदार व लोकाभिमूख केल्याचे त्यांनी सांगितले.


 


कृषि महाविद्यालयाची आ. कल्याणकर यांची मागणी या कार्यक्रमात आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून शासना आपल्या दारीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात शासकिय योजनांना गती मिळाल्याचे सांगितले. याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील कृषिचे क्षेत्र लक्षात घेता कृषि महाविद्यालयाची मागणी केली.


 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचे वितरणही करण्यात आले. “माझी मुलगी माझा अभिमान” अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 5 हजार घरांना मुलींचे नाव दिले. या अभियानाला अधोरेखीत करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी सौ. लताताई एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी कुमारी प्रगती व्यंकट नव्हाते या लहान मुलीच्या हस्ते मुख्यमंत्री यांना देण्यात आली. याचबरोबर त्यांच्या हस्ते शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 2 हजार 123 शेतकऱ्यांना 2 कोटी 5 लक्ष एवढे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात आले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.


 


00000


वृत्त क्र. 2020


 

Sunday, 25 June 2023

मात्र आपल्या ज्ञानोबा तुकोबांचा विदेशी गाणं समुह

 *स्थळ - अमेरिका*

गायक - अमेरिकन

वादक - अमेरिकन

प्रेक्षक - अमेरिकन

गजर - मात्र आपल्या ज्ञानोबा तुकोबांचा


*शेवटचा विठ्ठल जागर अप्र


तीम* ☝

शॉर्ट कट रे बाबनु

 😊😇 रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂  


जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😂 


गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 😂 


आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..😂 .  


जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😂 


होमिओपॅथीची औषधं घेण्यातली मजा काही औरच...

औषधाच्या बाटलीतून ४ गोळ्या काढाव्या म्हटलं तर साबुदाण्याच्या ६ गोळ्या बाहेर पडतात. त्यातल्या पुन्हा २ गोळ्या परत टाकायला गेलो तर ४ गोळ्या बाटलीत परत जातात... 😂

या गदारोळात रोग्याचं लक्ष आजारावरून दूर होतं आणि तो लवकर बरा होतो...


😂खरं पाहिलं तर जगातला कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो ...

कारण , 

थोडं बहुत डोकं तर प्रत्येक जण खात असतो.

😛😛😛😛😛😛


🌹 नोटा कागदापासून बनतात, कागद लाकडापासून बनतो आणि लाकूड झाडापासून मिळतं .......

याचा अर्थ असा की पैसे झाडाला लागतात. 😜😜👍👍


🌹 विवाहित माणसाला त्याच्या जीवनात किमान दोन खर्च तरी करावेच लागतात...

१. बायको गोरी असेल तर..

Sun Screen...

आणी

२. सावळी असेल तर...

Fair & Lovely.....

😝😝😝😝😜


🌹 म्हणतात की, जो हसला, त्याचं घर बसलं !!

पण .........

ज्याचं घर वसलं, त्याला विचारा......

की तो मग केव्हा हसला??

😄😄😄😛😛😛


🌹 बायकोला समजून घेणं म्हणजे :~

32 GB चा 

Video Download करणं.

आणि ..........

31.5 GB Download

झाल्यावर Error मेसेज दिसणं !!!!

😝😝😝😝


🌹 जगात केवळ तेच लोक साधेभोळे असतात, ज्याच्या मोबाइल मध्ये पासवर्ड नसतात.

😛😛😛😛😛😛


🌹 कांही लोक whatsapp वर फक्त

दोनच स्टेटस पोस्ट करतात....

पहिलं:-- good morning....

दूसरं:-- good night .....

असं वाटतं..... जणू whatsapp च्या दुकानाचं शटर उघडायची आणि बंद

करायची जबाबदारी यांच्यावरच सोपवली असावी...... आणि मालाच्या खरेदी - विक्रीची जबाबदारी आपली.

😜😜😜😒😒


🌹एक सर्व्हेनुसार, आजही आपल्या देशात......

'तू प्यार है, किसी और का, तुझे चाहता कोई और है'

हे गाणं वाजल्यावर १० पैकी ८ मुलं इमोशनल होऊन जातात ...

💔💔😂😂😝😝


🌹 माणूस सर्वात अधिक खुश तेव्हा होत असतो, जेव्हा रेल्वे फाटक बंद होत असतं त्याच्या आधीच तो आपली गाडी फाटका पलिकडे काढून घेतो.......

आई शप्पथ सांगतो की त्याला आॕलिंपिक रेस जिंकल्याचं समाधान मिळत असतं.

😂😂😂😂


🌹 अजून पर्यंत हे समजलं नाही की 

OK च्या ऐवजी K आणि GOOD MORNING च्या ऐवजी GM लिहिणारे, आयुष्याचे २ सेकंद वाचवून काय करत असतील ?

आणि .....ह्या hmmm ...वाल्यांनी तर फारच त्रास दिला आहे, असं वाटतं की आपण म्हशीशीच बोलतोय ! 

😜😜😃😛


🌹So confusing 😳

आई बाप आपल्या मुलीसाठी सुयोग्य स्थळ शोधताना दोन गोष्टींकडे लक्ष देतात...

पहिली म्हणजे मुलगा खात्या पित्या घरातला असावा.....

आणि दूसरी

तो पिणारा - खाणारा नसावा ....

हे कसं काय बुवा ....?? 

😳😄😂😂


गळ्यात मंगळसूत्र पडलेलं असेल तर मुलीचं लग्न झालेलं आहे.....

आणि

चेहरा पडलेला असेल तर मुलाचं लग्न झालेलं असावं ,,,,

😂😜😂😜😂😭😜


🌹जीवन चांगलं जगायचं असेल तर हसणं आवश्यक आहे. ।।।🌹

🙏🤗🙏🤗🙏🤗🙏

Featured post

Lakshvedhi