Wednesday, 21 June 2023

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे

 राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे   

गुरुपौर्णिमेपासून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार

- महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा


            मुंबई, दि. २१ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून 3 ते 15 जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव श्री. ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले, अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे अत्याचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खुपच आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आयुक्त, महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापिठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.


युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत

पहिला दिवस

  महिला व मुलींवरील हिंसाचार-संकल्पना व सद्यस्थिती या विषयावर भारतीय स्त्री शक्ती संस्था मार्गदर्शन करेल. सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी होतील.


            तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके या विषयावर सायबर सेल तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करतील. दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागीहोतील


दुसरा दिवस 

स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक     स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.


            आधुनिक प्रशिक्षण या विषयावर सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.


तिसरा दिवस         

            प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

            प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

                 या तीन दिवसाच्या शिबीरानंतर ज्या युवतींना अधिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणात रुची असेल, अशा युवतींची संख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने पुढील दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विभागामार्फत करण्यात येईल.

मुंबई विद्यापीठ, एस. एन. डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार

                 महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या स्तरावर अव्यावसायिक तत्वावर आज मुंबई विद्यापीठ, एस. एन.डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. वेळोवेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था यांचेसोबत आवश्यकतेनुसार सामजंस्य करार करण्यात येतील. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यापीठ, स्वयंसेवी संस्थांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये ४० लाख बालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उस्फूर्तपणे योग दिवस साजरा केला असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

केस गळण्यावर घरगुती उपाय, केसातील कोंडा उपाय, केसांची काळजी कशी घ्याल

 केस गळण्यावर घरगुती उपाय, केसातील कोंडा उपाय, केसांची काळजी कशी घ्याल


आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सूचवितो. या उपायमुळे तुम्हाच्या केसांमधला कोंडा दूर होण्यास मदत होईल. त्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करून घ्या. मग तुम्ही ही पेस्ट आणि दही एकत्र करून केसांना लावा.


क्रोध, शोक, शारीरिक व मानसिक श्रम यांच्या अतिरेकाने जेव्हा शरीरातील उष्णता डोक्‍यात पोचते, तेव्हा केस अकाली पांढरे होण्यास सुरवात होते. रसधातूतील बिघाडामुळे व पित्तप्रकोपामुळेही केस पांढरे होतात. केस गळणे- याचीही कारणे वरीलप्रमाणेच असतात. हवामानातील व पाण्यातील बदल, केसांची स्वच्छता न राखणे, हॉर्मोन्सचे असंतुलन, उष्णता वाढणे, रासायनिक द्रव्यांच्या वापराने वगैरे कारणांनी केस गळू शकतात. 

केसांचे आरोग्य राखणे, सौंदर्य वाढवणे याला प्राचीन काळापासून खूप महत्त्व आहे. आयुर्वेदातच नव्हे, तर वेदातही, विशेषतः अथर्ववेदात केशबृंहण, केशवर्धन करणारी औषधे वगैरेंचे संदर्भ आढळतात. 

https://chat.whatsapp.com/D4l65sV1RCf4opa92N9fhm

केशप्रसाधन म्हणजे केसांच्या विविध रचना करून सौंदर्यामध्ये भर घालणे हीसुद्धा प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेली गोष्ट आहे.

"व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती' या नियमानुसार प्रत्येक व्यक्‍तीचे केस वेगवेगळे असतात. केसांची जाडी, लांबी, पोतसुद्धा प्रकृतीसापेक्ष असते; मात्र प्रकृतीला साजेसे केस आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे निरोगी केस असण्यासाठी प्रयत्न निश्‍चित करता येतात. केसांचा संबंध असतो हाडांशी. "अस्थ्नोः मलः' म्हणजे केस अस्थिधातूचा मलभाग असतात, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. अस्थिधातूमध्ये बिघाड झाला की त्यामुळे केसामध्ये दोष निर्माण होतो, असेही चरकसंहितेत सांगितलेले आहे. याखेरीज रसधातूतील बिघाडाचा केसांवर विपरीत परिणाम होतो. तसेच पित्तदोष प्रमाणापेक्षा अधिक वाढणे, हेसुद्धा केसांसाठी हानिकारक असते. यावरून एक गोष्ट लक्षात येऊ शकते, की केसांच्या आरोग्यासाठी, केसांच्या सौंदर्यासाठी बाह्य उपचारांबरोबर आतून हाडे, रसधातू व पित्त निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते. केसांच्या आरोग्याचा विचार करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की केस धुण्यासाठी, केशरचना करण्यासाठी किंवा केसांचे कंडिशनिंग वगैरे करण्यासाठी नैसर्गिक द्रव्यांचाच वापर करायला हवा. अनैसर्गिक, रासायनिक द्रव्यांपासून बनविलेल्या असणाऱ्या उत्पादनांमुळे तात्पुरता फायदा झाल्यासारखा वाटला तरी त्यांचे दुष्परिणाम अतिशय घातक ठरू शकतात. याउलट नैसर्गिक द्रव्यांचा वापर केला असता केसांचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही सुरक्षित राहतात, बरोबरीने रसायनांमुळे होणाऱ्या प्रदूषणालाही प्रतिबंध होऊ शकतो. 


केसांच्या सामान्य तक्रारी व त्यावरचे उपचार यांची माहिती आपण घेणार आहोतच. तत्पूर्वी दैनंदिन जीवनात केसांची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्‍यात पुढीलप्रमाणे सांगता येईल.


* त्यामुळे उत्साह वाढायला मदत मिळते, केसांमधील गुंता नीट काढल्यामुळे विचारातही सुसूत्रता येण्यास मदत मिळते. 

* डोक्‍यावरून अति गरम पाणी न घेणे.

* उन्हात जाताना डोक्‍यावर टोपी, स्कार्फचे संरक्षण घेणे.

* केस नीट विंचरण्यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत मिळते, तसेच केसांच्या मुळांशी असणाऱ्या तैलग्रंथींना उत्तेजना मिळाल्याने केसांचे पोषण होते. 

* केस विंचरण्यापूर्वी केसांच्या मुळाशी व केसांनाही थोडे तेल लावणे चांगले असते, त्यामुळे गुंता निघायला मदत मिळते व केस अकारण तुटत नाहीत. 

* आठवड्यातून दोनदा तरी केस धुणे उत्तम होय. केस धुण्यासाठी शिकेकाई, आवळा, रिठा, नागरमोथा, संत्र्याची साल यांसारख्या द्रव्यांच्या मिश्रणाचा किंवा तयार "संतुलन सुकेशा' मिश्रणाचा वापर करता येतो. यामुळे केस, डोके स्वच्छ होतेच, पण केस आवश्‍यकतेपेक्षा कोरडे होणे टळते. 

* डोक्‍याला आणि केसांना नियमित तेल लावणेसुद्धा केसांच्या आरोग्यासाठी व सौंदर्यासाठी महत्त्वाचे असते. केस चिकट होतील या कारणाने बऱ्याचदा तेल लावणे टाळले जाते; पण शास्त्रोक्‍त पद्धतीने बनविलेले औषधी तेल वापरले तर ते लावण्याने केस तेलकट होत नाहीत. उलट केसांचा अनावश्‍यक कोरडेपणा दूूर होऊन केस मऊ, रेशमी व्हायला मदत मिळते. असे "संतुलन व्हिलेज तेला'सारखे आतपर्यंत जिरणारे तेल लावलेले असले की नंतर केस धुण्यासाठीसुद्धा नैसर्गिक द्रव्ये वापरता येतात. 

* केस धुतल्यावर लगेच न विंचरणे चांगले असते, कारण केसांची मुळे नाजूक झालेली असतात, तसेच केस कोरडे होण्यासाठी गरम झोत येणारा ड्रायर वापरणे तितकेसे चांगले नाही. यामुळे केस कोरडे होण्याची प्रवृत्ती वाढते. 


केसांचे कंडिशनिंग होण्यासाठी घरच्या घरी साधे व प्रभावी उपाय करता येतात. 

* केस धुण्याअगोदर केसांना 20-25 मिनिटांसाठी कोरफडीचा ताजा गर लावून ठेवणे.

* जास्वंदीची फुले, कळ्या व कोवळी पाने बारीक वाटून बनविलेला लेप 20-25 मिनिटांसाठी लावून मग केस धुणे.

* ताजी पाने आणि आवळा यांच्यापासून तयार केलेला लेप किंवा 100 टक्के शुद्ध मेंदीचे आणि आवळ्याचे चूर्ण पाण्यात मिसळून तयार केलेला लेप केसांना लावून मग केस धुणे.

* नारळाचे दूध केसांना लावून मग केस धुणे.

याप्रकारे सुरवातीपासून केसांची नीट काळजी घेतली, केसांची निगा राखण्यासाठी नैसर्गिक द्रव्यांचाच वापर केला आणि अस्थी व रसधातूचे पोषण व पित्तसंतुलन याकडेही लक्ष ठेवले, तर केसांचे आरोग्य व सौंदर्य नीट राहील.

केसांच्या सामान्य तक्रारी व त्यावरचे उपाय-

- केसांमध्ये कोंडा होणे. आयुर्वेदात याला दारुण असे म्हणतात.

दारुणा कण्डुरा रुक्षा केशभूमिः प्रपाठ्यते । कफमारुतकोपेन विद्यात्‌ दारुणकं तु तम्‌ ।।...माधवनिदान

कफ आणि वातदोषाच्या प्रकोपामुळे डोक्‍यावर कोंडा होतो. त्या ठिकाणची त्वचा अतिशय कोरडी, खरखरीत होते, खाज सुटते. कधी कधी यामध्ये पित्त व रक्‍तप्रकोपाचाही सहभाग असू शकतो. नावाप्रमाणेच कोंडा "दारुण' म्हणजे कष्टप्रद, बरा होण्यास कठीण असतो. 


कोंड्यासाठी घरच्या घरी करता येण्याजोगे उपाय पुढीलप्रमाणे होत-

* डोके धुण्याअगोदर लिंबाची फोड डोक्‍यावर हलक्‍या हाताने चोळणे व 20-25 मिनिटांनंतर शिकेकाई, रिठा, आवळा वगैरे द्रव्यांनी केस धुणे.

* खसखस दुधात भिजवून तयार केलेला लेप डोक्‍याला लावून ठेवण्यानेही कोंडा कमी व्हायला मदत मिळते.

* मेथीच्या बियांचे चूर्ण पाण्यात भिजवून उमलून आले की त्याचा डोक्‍यावर लेप करण्यानेही कोंडा कमी होऊ शकतो. 

https://chat.whatsapp.com/D4l65sV1RCf4opa92N9fhm

* केस अकाली पांढरे होणे.. याला आयुर्वेदात पलित असे म्हणतात,

क्रोधशोकश्रमकृतः शरीरोष्मा शिरोगतः । पित्तं च केशान्‌ पचति पलितं तेन जायते ।।...माधवनिदान

क्रोध, शोक, शारीरिक व मानसिक श्रम यांच्या अतिरेकाने जेव्हा शरीरातील उष्णता डोक्‍यात पोचते, तेव्हा केस अकाली पांढरे होण्यास सुरुवात होते. रसधातूतील बिघाडामुळे व पित्तप्रकोपामुळेही केस पांढरे होतात. केस गळणे- याचीही कारणे वरीलप्रमाणेच असतात. हवामानातील व पाण्यातील बदल, केसांची स्वच्छता न राखणे, हॉर्मोन्सचे असंतुलन, उष्णता वाढणे, रासायनिक द्रव्यांच्या वापराने केसांना इजा पोचणे वगैरे कारणांनी केस गळू शकतात. 


केस गळणे थांबावे व केस पांढरे होऊ नयेत यासाठी पुढील उपायांची योजना करता येते. 

* आवळा, जटामांसी अनंतमूळ, ब्राह्मी वगैरे केश्‍य म्हणजे केसांना पोषक अशा द्रव्यांपासून बनविलेले हेअर पॅक केस (उदा. "सॅन वात हेअर पॅक', "सॅन पित्त हेअर पॅक') धुण्याआधी अर्ध्या तासासाठी लावून ठेवणे.

* झोपण्यापूर्वी शीतल द्रव्यांचा संस्कार केलेले "नस्यसॅन घृता'सारख्या औषधी तुपाचे 2-3 थेंब नाकात टाकणे.

* नियमित पादाभ्यंग करून शरीरातील उष्णतेचे, पित्ताचे संतुलन करणे.

* दूध, खारीक, डिंकाचे लाडू, खसखस, प्रकृतीनुरूप फळांचे रस, बदाम अशा रसधातू, अस्थिधातूला पोषक गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश करणे.

* "सॅन रोझ',"मॅरोसॅन', "कॅल्सिसॅन', "हेअरसॅन' यासारख्या रसधातू, अस्थिधातूपोषक रसायनांचे सेवन करणे.


केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा परत आणण्याचेही काही उपाय आहेत. केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केस गळणे थांबवणे अवघड आहे.


Cp


_*

कोरडा खोकला*

 *कोरडा खोकला*


 हा खोकला अतिशय त्रासदायक असतो. खोकताना पोट आणि बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही कोरड्या खोकल्याच्या त्रासातून स्वतःला मुक्त करू शकता.


कोरडा खोकला दूर करण्यासाठी ६ घरगुती उपायः-


बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या-मोठ्या आजारांची लागण होते. यातही सर्दी, खोकला आणि ताप येण्याच्या तक्रारी अधिकतर उद्भवतात. सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक बळावतो. त्यातही कोरडा खोकला त्रासदायक असतो. योग्य वेळेत यावर उपाय केल्यास तुम्हाला आराम मिळेल. पण दुर्लक्ष केलं तर प्रकृती गंभीर देखील होऊ शकते.


खोकल्याचा त्रास कमी प्रमाणात असला तरीही त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. 


यासाठी तुम्ही घरगुती तसंच नैसर्गिक उपचारांची मदत तुम्ही घेऊ शकता. 


सर्दी, खोकला होणे ही छोटी समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. याच निष्काळजीपणामुळे गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. 


आजारांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.


मध


कोरड्या खोकल्यावर मधाचे सेवन करणं हा रामबाण उपाय मानले जाते. मधामुळे घशातील खवखव कमी होते. तसंच घशामधील संसर्गही दूर होतो. कोरडा खोकला कमी करण्यासाठी छोट्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. मध आणि पाणी नीट मिक्स झाल्यानंतर ते प्या. नियमित हा उपाय केल्यास कोरड्या खोकल्यापासून तुम्हाला आराम मिळेल.


आले आणि मीठ


खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. आल्याचा छोटा तुकडा कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्यावा. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका.


ज्येष्ठमधाचा चहा


ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास चहामध्ये मध मिक्स करू शकता. दिवसातून दोन वेळा हा चहा घेवू शकता.


हळदीचे दूध


हळदीचे दूध प्यायल्याने केवळ खोकलाच नाही तर कित्येक आजारांपासून तुमची सुटका होण्यास मदत मिळते. एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित प्या. तुमचा कोरड्या खोकल्याचा त्रास काही दिवसात कमी होईल. हळदीमध्ये कर्रक्युमिन नावाचे घटक असते. या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो.


गूळ


सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हा प्रभावी उपाय आहे. गुळातील पोषक घटकांमुळे जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत मिळते. 


सर्दी खोकल्याव्यतिरिक्त गुळामुळे पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतात. कोमट पाण्यामध्ये गूळ पावडर मिक्स करा आणि प्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाण आणि दिवसातून किती वेळा हा उपाय करावा, याबाबत सल्ला घ्या.


मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

एका मोठ्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करावा. खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानं श्वसन नलिकेतील संसर्ग दूर होण्यास मदत मिळते. शिवाय खोकल्यामुळे घशामध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होतात.


गरम पाण्याची वाफ


सर्दी खोकल्यामुळे कधी कधी आपल्याला श्वास घेणे देखील कठीण होते. अशा वेळेस गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ बाहेर पडतो. श्वासोच्छवास करताना होणाऱ्या अडचणी दूर होतात. तसंच चेहऱ्यावरील रोम छिद्रांमध्ये जमा झालेली धूळ, माती आणि दुर्गंध देखील बाहेर फेकली जाते. पण आठवड्यातून दोन वेळाच हा उपाय करावा. अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात.


_*(

_मनाची अवस्था_*

 *_मनाची अवस्था_*


     एकदा धनाढ्य व्यक्तिने एका गुरुजींना जेवणासाठी निमंत्रित केले... परंतु एकादशीचा उपवास होता, म्हणून गुरुजी जाऊ शकले नाहीत... परंतु गुरुजींनी आपल्या दोन शिष्यांना त्या व्यक्तिकडे भोजन करण्यासाठी पाठवून दिले...

     परंतु जेव्हा दोन शिष्य परत आले तेव्हा त्यातला एक शिष्य दुःखी आणि दुसरा प्रसन्न होता...

     गुरुजींना त्यांना बघून आश्चर्य वाटले... म्हणून गुरुजींनी एका शिष्याला विचारले, "बाळा तू दुःखी का आहेस?... मालकाने भोजनात काही फरक केला का"?... "नाही गुरुजी"...

     मालकाने बसण्यात फरक केला का?... "नाही गुरुजी"...

     मालकाने दक्षिणेमध्ये फरक केला का?... "नाही गुरुजी"...    

     दक्षिणा बरोबर २ रुपये "मला आणि २ रुपये दुसऱ्याला" दिली...

     आता तर गुरुजींना अजूनच आश्चर्य वाटले आणि त्यांनी विचारले, मग कारण काय आहे?... जो तू दुःखी आहेस?... तेव्हा दुःखी शिष्य बोलला, "गुरुजी, मी तर विचार करायचो की, ती व्यक्ती खूप श्रीमंत आहे... कमीत कमी १० रुपये दक्षिणा देईल... परंतु त्यांनी २ रुपये दिले म्हणून मी दुःखी आहे...

     गुरुजींनी दुसऱ्याला विचारले तू का प्रसन्न आहेस?... तेव्हा दुसरा म्हणाला, गुरुजी मला माहीत होते की, ती धनाढ्य व्यक्ती खूप कंजूष आहे... आठाण्यापेक्षा जास्त दक्षिणा देणार नाही... परंतु त्यांनी २ रुपये दिले, म्हणून मी प्रसन्न आहे...

     हीच आपल्या मनाची अवस्था आहे... संसारात घटना या समानरुपी घडतात... परंतु कोणी त्या घटनांद्वारे सुख प्राप्त करतात... तर कोणी दुःखी होते... परंतु खरंतर दुःख अथवा सुख, हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे...

     म्हणून मन प्रभुच्या चरणाशी जोडून असूद्या... इच्छा पूर्ण झाली नाही, तर दुःख आणि इच्छा पूर्ण झाली, तर सुख... परंतु जर कोणती इच्छाच नसेल, तर आनंद... 

      ज्या शरीराला लोक सुंदर समजतात, मेल्यानंतर तेच शरीर सुंदर का वाटत नाही?... त्याला घरी न ठेवता जाळून का टाकतात?... ज्या शरीराला सुंदर मानतात, फक्त त्याची त्वचा काढून टाका... तेव्हा वास्तव दिसेल की, आत काय आहे?... आत फक्त रक्त, रोग, मळ आणि कचरा भरलेला आहे... मग हे शरीर सुंदर कसं असेल?...

     शरीरात कोणती ही सुंदरता नाही. तर सुंदर असतात ते व्यक्तिचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याची वागणूक, त्याचे संस्कार आणि त्याचे चारित्र्य!... ज्याच्या जीवनात हे सर्व आहे, तीच व्यक्ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ती आहे...

     दुधाला दुःख दिले की, दही बनते... दह्याला दुखावले की, ताक बनते... ताकाला त्रास दिला, तर लोणी बनते... आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते...

     दुधापेक्षा दही महाग... दह्यापेक्षा ताक महाग... ताकापेक्षा लोणी महाग... लोण्यापेक्षा तूप महाग... परंतु या सर्वांचा रंग एकच... तो म्हणजे शुभ्र...

     याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलूनही जो माणूस आपला रंग बदलत नाही, अशा माणसाची समाजातील किंमत जास्त असते...

     दूध उपयोगी आहे, पण ते एक दिवसात नासते... दुधाचे विरजण, दही दोन दिवस टिकेल... दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस तीन... ताकामधले लोणी आठवडाभर राहील... पण लोण्याचे कढवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही...

    आता बघा आहे की नाही गंमत... एका दिवसातच नासणाऱ्या दुधात कधीही न नासणारे तूप लपले आहे...

     तसेच आपले मन अथांग आहे... त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा... चिंतन करा, मनन करा... आपले जीवन तावून सुलाखून घेतलेले आणि त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही... म्हणजेच कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तिमत्त्व... मग निष्कारण घाबरायचे कशाला?... फक्त एवढेच करा की, आपल्या चंचल मनाला सावरा आणि आवरा..

२१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस; १३ तास १३ मिनिटे; दिवस मोठा अन् रात्र राहणार छोटी*

 🟪🟪

*२१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस; १३ तास १३ मिनिटे; दिवस मोठा अन् रात्र राहणार छोटी* 


*मुंबई-* पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळेमुळे २१ जूनला १३ तास १३ मिनिटांचा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. याच दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होत असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.


पृथ्वीचे अक्षवृत्त साडेतेवीस डिग्रीच्या झुकाव्याने ११ हजार किमी प्रति तासाच्या गतीने पश्चिमेकडे पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून १,०५,००० किमी प्रति तासाच्या वेगाने सुमारे ८९.४० कोटी किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातला जसा २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो, त्याप्रमाणे २२ डिसेंबर हा वर्षातला सर्वात लहान दिवस असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायन सुरू होत असते.


पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी जास्त होत आहे. सन २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामी झाली होती. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घड्याळामध्ये लिप सेकंद ॲडजस्ट करावा लागतो, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने, हौशी खगोल अभ्यासक यांनी दिली. खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी २१ जून या उत्तर गोलार्धातील सर्वात मोठ्या दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व अनुभव घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 *न्यूजमंत्रा*

मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ*

 *मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ*


*केळी* - कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. (मुलांना सतत कफ व सर्दी च्या तक्रारी नसल्यास)


*साय असलेले दूध* - यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.


*भात -* यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.


*चिकू* - यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.


*मासे* - यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.


*सोयाबीन* - सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.


*डाळ* - यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.


*चीज* - यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.


*अंडी*- प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.


*दही* - यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.


*संत्री* - यामधील व्हिटॅमिन सीमुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.


*डाळिंब* - यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.


*पालक* - यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.


*पनीर* - यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





लहान मुलांचे पोट दुखणे आणि अन्य दुखणे

 *लहान मुलांचे पोट दुखणे आणि अन्य दुखणे 



तान्ह्या बाळाला पोट दुखतं हे त्याला सांगत येत नाही त्यामुळे त्याला काही झालं की ते रडतं. जर बाळ रडत असेल, काही दूध प्यायला तयार नसेल, बाळाचे पोट फुगलेले दिसत असले, पोटाला हात लावला असता रडणे वाढत असले तर बाळाचे पोट दुखते आहे असे समजावे.


 *बाळाचे पोट दुखत असल्यास हिंग घालून कोमट लेप बाळाच्या बेंबीभोवती लावावा.


 *हिंगाप्रमाणेच डिकेमालीचा लेप लावल्यास बाळाच्या पोटातील गॅसेस मोकळे होऊन पोट दुखायचे कमी होते.


*ओव्याचे चूर्ण पाण्यात कालवून बाळाच्या पोटावर लेप केल्यास पोट दुखणे कमी होते.

* बाळाच्या पोटावर हलका शेक करण्यानेही बहुतेक वेळेला पोट दुखायचे लगेचच थांबते. यासाठी गरम तव्यावर सुती हातरूमाल गरम करून, चटका बसणार नाही याची खात्री करून बाळाचे पोट शेकावे.

*बाळाची शी होण्यासाठी

मुलांना रोज कमीत कमी १-२ वेळा शी व्हायला हवी. रोज पोट साफ होत नसल्यास, खडा होत असल्यास किंवा बाळाला शी करायला जोर लावावा लागत असेल तर पुढील उपाय करावे


*आईने आहार हलका ठेवावं वातूळ पदार्थ टाळावे. उकळून कोमट केलेलं पाणीच प्यावे व जेवणानंतर ओवा, बडीशेप, बाळंतशेप, जिरे, सैंधव यांचे मिश्रण मुखशुद्धीप्रमाणे खावे किंवा चूर्ण करून गरम पाण्याबरोबर घ्यावे.


*बाळाच्या पोटावर एरंडेल तेल हलक्‍या हाताने चोळावे.


*१०-१५ काळ्या मनुका कोमट पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी बाळाला पाजावे.


*आईच्या आहारात साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश असावा.


*आई ने गरम पाणी पुरेशा प्रमाणात प्यावे. ते. "शी'च्या जागी बोटाने एरंडेल तेल लावावे.


*एक दाण्या एवढे हिंग व दोन चार थेंब पाणी दिल्यास शी होते

पोस्ट आवडल्यास आयुर्वेद प्रचार हे पेज लाईक शेअर करा.

कुठलाही आजारावरील निशुल्क उपाययोजना साठी व्हाँटसप करा.


वैद्य. गजानन.



_*

Featured post

Lakshvedhi