सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 3 June 2023
व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फ्रेश.....*
*व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फ्रेश.....*
सकाळी दिवस सुरू झाला की ओट्यापाशी नाश्ता, स्वयंपाक सगळ्यांचे डबे भरणे, मुलांचे आवरणे, साफसफाईची कामे आणि ऑफीसला जाण्याची घाई. पुन्हा ऑफीस सुटलं की घरी पोहचून स्वयंपाक करायचा असल्याने घरी पोहोचण्याची घाई. या सगळ्या धावपळीत महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ होतोच असे नाही. घरातील सगळ्यांची काळजी घेता घेता आपण अनेकदा स्वत:कडे दुर्लक्ष करतो. अनेकदा आपल्याला नीट बसून खायलाही वेळ होत नाही. त्यामुळे व्यायामाला तर वेळ मिळेल याची शक्यताच नसते. घरातली कामे म्हणजे व्यायाम नाही. त्यातही दिवसभर बैठे काम असेल तर शरीराची फारशी हालचाल होत नाही. यामुळे कालांतराने पचनाच्या तक्रारी, लठ्ठपणा, सांधेदुखीच्या तक्रारी उद्भवायला लागतात.
आजकाल कमी वयातच या सगळ्या तक्रारी उद्भवत असल्याने आपण आपल्या हातानेच आरोग्याची हेळसांड करत असल्याचे दिसते. शरीराचे कार्य सुरळीत चालायचे तर शरीराला थोडा तरी व्यायाम हवाच. यासाठी रोजच्या दिनक्रमात सहज करता येतील अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया
*१. सूर्यनमस्कार...*
आपण सकाळी उठल्यावर ब्रश करतो, आंघोळ करतो. त्याचप्रमाणे १२ सूर्यनमस्कार घालण्याची शरीराला सवय लावली तर संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होण्यास मदत होते. १२ सूर्यनमस्कार घालायला मोजून १२ ते १५ मिनीटे लागतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर इतर गोष्टींप्रमाणेच आपण स्वत:साठी हा वेळ आवर्जून काढायला हवा. यामुळे आपल्याला नक्कीच दिवसभर फ्रेश वाटेल.
*२. जीने चढ-उतार...*
आपण वरच्या मजल्यावर राहत असू तर लिफ्टचा वापर न करता आवर्जून जिन्यांचा वापर करायला हवा. ऑफीसमध्येही लिफ्टच्या ऐवजी जिन्यानेच चढ-उतार करायला हवी. यामुळे किमान व्यायाम होतो. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा जीने चढ-उतार केल्यास आपला एन्ड्युरन्स चांगला राहण्यास मदत होते आणि स्टॅमिनाही वाढतो.
*३. शतपावली...*
दिवसभराचे काम करुन आपण आधीच थकलेले असतो. त्यातही संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक आणि मागची आवराआवरी, दुसऱ्या दिवशीची तयारी हे करता करता आपण पार थकून जातो. त्यामुळे जेवण झाल्यावर कधी एकदा आपण आडवे होतो असे आपल्याला होऊन जाते. अशावेळी कंटाळा घालवण्यासाठी आपण टिव्ही पाहणे किंवा एकमेकांशी गप्पा मारणे हे आवर्जून करतो. त्या वेळात आपण घराच्या आजुबाजूला १५ मिनीटे शतपावली केल्यास दिवसभराचा ताण तर निघून जातोच पण अन्न पचण्यासही त्याचा चांगला उपयोग होतो. शरीराची हालचाल झाल्याने झोपही गाढ लागण्यास मदत होते.
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
*डॉ. प्रमोद ढेरे,
हा गेम कूणी खेळला आहे का ??-- आतापर्यंत " नवीन गेम आहे , सुरुवात करू शकता.😂😂🤪
हा गेम कूणी खेळला आहे का ??-- आतापर्यंत " नवीन गेम आहे , सुरुवात करू शकता.😂😂🤪
Friday, 2 June 2023
संजय गांधी निराधार अनुदान योजनेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनयोजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा
संजय गांधी निराधार अनुदान योजनेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनयोजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा.
मुंबई, दि. २ : संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनामधून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दरमहा वेळेत अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.४८ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १०० कोटी असा एकूण रु. १४८ कोटी इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना आज २ जून २०२३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरीत करण्यात आला आहे.
मागील आठवड्यातच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेतील सर्वसाधारण व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रु.११९७ कोटी इतका निधी वाटपासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना उपलब्ध करुन दिला आहे. उपलब्ध निधीमुळे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.
या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजार पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थ्यांना रुपये १ हजार दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्र्यरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व रु.२१ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थ्यास दरमहा रु. १ हजार अर्थसहाय्य देण्यात येते.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनांचे स्वरुप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरीत होण्यासाठी आपल्या स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या असून निधीचा वितरणाचा आढावा घेऊन शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचनाही विभागीय महसूल आयुक्तांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिलेल्या आहेत.
मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ
मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार मुंबईत स्वागत
मुंबई, दि. 2 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शनिवार ३ जून २०२३ रोजी सकाळी ११.०५ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार दि. ३ जून २०२३ रोजी सायंकाळी ६.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे वंदेभारत एक्स्प्रेसचे स्वागत करतील.
प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा मार्गावरील दळणवळण सुधारेल आणि या भागातील लोकांना वेगवान आणि सुखकर प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होईल. ही रेल्वेगाडी देशातील १९ वी आणि राज्यातील चौथी वंदे भारत रेल्वे असेल. ही रेल्वेगाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वे गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वे गाडी हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल, यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासांची बचत होईल. स्वदेशी बनावटीची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वेगाडी दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल.
चेन्नईस्थित इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती झाली आहे. देशभरात सध्या ७५ वंदे भारत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर मुंबईतून गांधीनगर (गुजरात), शिर्डी आणि सोलापूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या एक्स्प्रेसमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. वंदेभारत एक्स्प्रेसची गेल्या महिन्यात कोकण रेल्वेच्या मार्गावर यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. उदघाटन सोहळ्यानंतर मडगावहून निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस स्वागत करतील, तसेच प्रवाशांशी संवाद साधतील.
मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे थांबे खालील प्रमाणे :
मडगाव, करमळी, थिवी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, कोलाड, पनवेल, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई).
०००००
अनधिकृत फेरीवाल्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी
अनधिकृत फेरीवाल्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी
- पालकमंत्री दीपक केसरकर
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात साधला 'जनतेशी सुसंवाद'
मुंबई, दि. 2 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दक्षिण मुंबई स्थित ‘ए’ आणि ‘बी वॉर्ड’ मध्ये अनेक ऐतिहासिक आणि वारसा इमारती आहेत. या परिसरात अधिकृत फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करून अनधिकृत फेरीवाल्यांचा नागरिक, पर्यटकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
नागरिकांच्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ आले आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध वॉर्डमध्ये पालकमंत्री म्हणून आपण स्वतः रहिवाशांची भेट घेत असून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले. गुरूवारी सायंकाळी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ आणि ‘बी’ वॉर्ड मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ‘ए’ व ‘बी’ वॉर्ड यांचा संयुक्त कार्यक्रम एशियाटिक लायब्ररीजवळील रेडक्रॉस सोसायटी येथे आयोजित करण्यात आला. यावेळी एकूण ११० तक्रारींचे निराकरण करण्यात आले. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधींसह महानगरपालिकेच्या उपायुक्त (परि-१) डॉ. संगीता हसनाळे, सहाय्यक आयुक्त सर्वश्री शिवदास गुरव, अजितकुमार अंबी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस तसेच विविध शासकीय खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अन्नधान्य वितरणासाठी वाहनाची व्यवस्था
मुंबईतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगून श्री. केसरकर म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना दुकानावरून अन्नधान्य आणणे शक्य होत नाही. याकरिता अन्न धान्य वाटप करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
दक्षिण मुंबईतील अनधिकृत फेरीवाले, गुन्हेगारी रोखणे, पदपथावर राहणाऱ्यांना निवारा उपलब्ध करून देणे आदी समस्या पालकमंत्र्यांसमोर प्रामुख्याने मांडण्यात आल्या. गुन्हेगारी रोखण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
00000
दहावी परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
दहावी परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
आवडते करिअर निवडण्यासाठी दिल्या शुभेच्छा.!
मुंबई, दि. 2 :- ‘दहावीच्या परीक्षेतील यशानंतर करिअर निवडीसाठी विविध मार्ग दिसू लागतात. या मार्गावरून पुढे जाण्यासाठी, आवडते क्षेत्र निवडण्यासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहावीच्या परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे अभिनंदन केले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, शालेय जीवनात दहावीची परीक्षा एक महत्वाचा टप्पा समजला जातो. हा टप्पा यशस्वीपणे पार केल्याबद्दल, यशवंत, गुणवंतांचे मनापासून अभिनंदन. आपल्या या यशासाठी मार्गदर्शन करणारे गुरूजन, पाठबळ देणारे कुटुंबीय या सर्वांचेही अभिनंदन. या परीक्षेतील यशानंतर आपल्याला करिअरचे वेगवेगळे मार्ग खूणावू लागतात. हे मार्ग चोखंदळपणे, डोळसपणे निवडल्यास पुढे यश तुमचेच असेल. असे आवडते क्षेत्र निवडण्यासाठी, त्यात यश मिळावे यासाठी देखील मनापासून शुभेच्छा !
काहीजणांना या परीक्षेतील यशाने हुलकावणी दिली असेल. तर त्यांनी खचून न जाता नव्याने तयारी करावी. त्यासाठी फेर परीक्षेचा पर्याय उपलब्ध आहे, त्याचा अवलंब करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 1784
दहावीचा निकाल 93.83 टक्के : उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन
यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत
- दीपक केसरकर
मुंबई दि. 2 : दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले आहे, तर उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे, असे आवाहन केले आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या
दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 41 हजार 666 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 29 हजार 096 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 93.83 अशी आहे, तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 60.90 अशी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण उल्लेखनीय
नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 8,397 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,312 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यातील 7,688 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 92.49 अशी उल्लेखनीय आहे. या विद्यार्थ्यांचेही मंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.
मुलींची आघाडी
सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 95.87 इतकी असून मुलांची टक्केवारी 92.05 इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.82 टक्क्यांनी जास्त आहे.
दहावीच्या एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर 23 हजार 013 शाळांपैकी 6,844 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी 4 लाख 89 हजार 455 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, तर 5 लाख 26 हजार 210 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे.
विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 98.11 टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92.05 टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात 95.64, औरंगाबाद विभागात 93.23, मुंबई विभागात 93.66, कोल्हापूर विभागात 96.73, अमरावती विभागात 93.22, नाशिक विभागात 92.22 आणि लातूर विभागात 92.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.
00000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
नवीन एक्सेस कंट्रोल रस्त्यामुळे कोकणचा कायापालट कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर नऊ ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुर...