Thursday, 4 May 2023

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठीदरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती

 कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठीदरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश


 


            मुंबई, दि. ३ : कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ जणांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.


            वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही योजना मांडली होती. या योजनेअंतर्गत दरवर्षी २५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर केल्याबद्दल वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.


            वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात येणार असून टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग (THE च्या २०० च्या आतील किंवा QS – Quacquarelli Symonds रँकिंग १५० च्या आतील) परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. यापैकी तीस टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येईल. मरिन सायन्स, मरिन इकॉलॉजी, ओशोनोग्राफी, मरिन बायोलॉजी, मरिन फिशरीज, मरिन बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोडायव्हर्सीटी या अभ्यासक्रमांसाठी १५ पदव्युत्तर पदवी आणि १० पीएच.डी. अशा दरवर्षी २५ शिष्यवृत्ती दिल्या जातील. पदव्युत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे वय कमाल ३५ वर्षे आणि पीएचडीसाठी कमाल वय ४० वर्षे असावे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. या योजनेसाठी ३१ कोटी ५० लाख रुपये इतका खर्च येणार आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी पीएचडी करीता ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो, तसेच पदव्युत्तर पदवीकरीता २ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो ठरविण्यात आला आहे.


            या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. परदेशातील हा अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्याने दोन महिन्यांच्या आत कार्यकारी संचालक कांदळवन प्रतिष्ठान यांना अंतिम परीक्षेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र व प्रगती अहवाल, पदवीदान समारंभाचे छायाचित्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.


            राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे जैवविविधता या विषयावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार असून या क्षेत्राकडे नवतरुणांचे लक्ष केंद्रित होईल, असा विश्वास वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन यासाठी शासन कटिबद्ध असून, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात उचलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन श्री. मुनगंटीवार यांनी केले.


००००

भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त

 भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


 


            मुंबई, दि. 3 : भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त आहे. जगातील ज्या चांगल्या शिक्षण पद्धती अथवा चांगले अभ्यासक्रम असतील त्यांचा अवश्य स्वीकार करा. तथापि प्राथमिक स्तरावर भारतीय शिक्षण पद्धती योग्य असल्यास ती विनाकारण बदलू नका, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. तसेच इंग्रजीच्या अट्टाहासातून बाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी केले.


            महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) नियामक मंडळाची २५१ वी सभा आज शालेय शिक्षण मंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झाली. यावेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक तथा माध्यमिक शिक्षण संचालक आणि नियामक मंडळाचे सदस्य सचिव कृष्णकुमार पाटील तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि शिक्षण पद्धती पुरातन आहे. विद्यार्थ्यांना हसत - खेळत शिकवताना झालेला अभ्यास कायम लक्षात राहतो. त्यामुळे जे चांगले आहे ते स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, बालभारतीची पुस्तके आणि त्यासाठी साठवायचा पेपर खराब होणार नाही याची दक्षता घेताना राज्यातील गोडाऊन सुस्थितीत ठेवावेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत. जगात ज्या चांगल्या शिक्षण पद्धती आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी जाणून घेता याव्यात याअनुषंगाने एक संग्रहालय तयार करावे, असे सांगून हे संग्रहालय संशोधनासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


            सर्व शाळा इंटरनेटशी जोडल्या जाणार आहेत. यासाठी दुर्गम भागातील ज्या शाळांमध्ये नेटवर्क नाही, त्यांची माहिती घेऊन त्या उपग्रहाद्वारे जोडण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी केली. येत्या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध करून देण्यात येणारी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वेळेत मिळतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देऊन लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर आवडीची पुस्तके देखील शाळेत उपलब्ध करून द्या, असेही त्यांनी सांगितले.

ल व ल व ती विक्राळ ब्रम्हांडी ज्वाला

 



Noto की गड्डी देखी अपने

 


महाराशट्र दिन ठाणे कोरास टॉवर,वर्तक नगर

 1मे पूर्ण कोरस टाॅवर्स दिंडी


उत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय ?*

 *उत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय ?*


              जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी, आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व सामाजिक दृष्टया सुखकारक किंवा कल्याणकारी मानवी अवस्था म्हणजे आरोग्य.

             समजा एखाद्या व्यक्तीचं शरीर व्याधी मुक्त आहे , त्याला कोणताही आजार नाही परंतु तो सतत कोणत्या न कोणत्या तणावाखाली असतो, कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो. एकादा कायमस्वरूपी रागीट, आदळआपट करत असतो, लालची किंवा लोभी असतात तर अशा व्यक्तीला निरोगी म्हणता येणार नाही.

               आपल्याला जर अध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर आपल्याला शारीरिक आरोग्या सोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तितकाच भर दिला पाहिजे तरच आपण एक मानव म्हणून समाजाचा उत्कर्ष करू शकू...


*मानसिक आरोग्य* 

मानसिक स्वास्थ्य म्हणजे अशी स्थिती जिथं ताण , तणाव, चिंता , नकारात्मक विचारसरणी ला आपल्याला मनात स्थान नसेल .


*भावनिक आरोग्य* 

भावनिक आरोग्य म्हणजे अशी संतुलीत स्थिती जिथं राग लोभ, अहंकार व तिरस्कार ला आपल्याला जीवनात स्थान नसेल.


*अध्यात्मिक आरोग्य* 

अध्यात्मिक आरोग्य म्हणजे एकात्मता आणि सुसंवाद ने राहणं म्हणजेच अध्यात्मिक आरोग्य. आपल्या स्वतःच्या धर्म आणि परंपरागत चालीतीरी वर विश्वास असणे व दुसऱ्यांच्या धर्म व परंपरा चा आदर करणे म्हणजे अध्यात्मिक आरोग्य व स्वास्थ.


*शारीरिक आरोग्य* 

जेव्हा आपल शरीर कोणत्याही प्रकारच्या व्याधी पासून व शारीरिक इजे व अनियमितते पासून मुक्त असतो अशा स्थितीस उत्तम शारीरिक आरोग्य म्हणून ओळखलं जात.


*संकलन-* 


*डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



मायग्रेन >>>>>> अर्धशिशी ===================

 मायग्रेन >>>>>> अर्धशिशी

===================


मायग्रेनचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. डोक्याच्या एका भागात होणा-या या वेदना खुप भयानक असतात. चक्कर येण्यापासुन तर उलट्या देखील होऊ शकता. तणाव, जास्त वेळ उपाशी राहणे अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. दिर्घकाळ डोक्यात वेदना होण्याची समस्या असेल तर यावर दुर्लक्ष न करता याचे चेकअप केले पाहिजे.मानवी शरीराचा प्रत्येक अवयव, भाग महत्त्वाचा आहे. पण त्यातही डोक्याचा भाग खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या शरीराच्या हालचाली नियंत्रित करण्याचं, त्यांना कार्यान्वित करण्याचं महत्त्वाचं काम होतं ते मेंदूकडूनच. त्यामुळे जेव्हा कधी डोक्याची एकच बाजू दुखू लागते किंवा कधी पूर्ण मस्तक जोरात ठणकू लागतं, तेव्हा माणूस अगदी हतबल होतो. अशा पद्धतीने खूप काळ ठणकणारं डोकं अर्धशिशीमुळे असू शकतं. सामान्य डोकेदुखीपेक्षा काहीसा गंभीर असा हा डोकेदुखीचा प्रकार. इतर आजारांप्रमाणे या आजाराची कोणतीही पूर्वलक्षणं यात आढळत नाहीत. त्याचप्रमाणे अर्धशिशी कशामुळे होते यामागचं ठाम शास्त्रीय कारण आजही कोणाला माहीत नाही. एकदा का रुग्णाचं डोकं दुखू लागलं की ते दोन तासांपासून ते बहात्तर तासांपर्यंत डोकं दुखत राहतं. या वेदना अचानकपणे सुरू होतात. काही जणांना अर्धशिशीचं दुखणं सुरूहोण्यापूर्वी डोकं जड वाटू लागतं. आजूबाजूच्या आवाजाचा, प्रकाशाचा त्रास होऊ लागतो. काहींना डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखं वाटतं. यालाच retinal migraine म्हणतात. काही वेळेला डोळ्यांच्या हालचालीत शिथिलता येते (opthalmic migraine), तर काही वेळेस हात आणि चेहरा हेसुद्धा निर्जीव, लकवा झाल्यासारखे वाटतात (hemiplegic migraine) मानसिक ताणामुळेही र्अध किंवा पूर्ण डोकं जोरात ठणकू लागतं.


अर्धशिशी सुरू होताना डोक्यातील रक्तवाहिन्या प्रमाणापेक्षा जास्त आकुंचन व प्रसरण पावतात. मज्जातंतूंच्या दाहामुळेही डोकं जोरात ठणकू लागतं. या डोकेदुखीचा पुढचा भाग म्हणजे रुग्णाला अर्धशिशीचा अ‍ॅटॅकही येऊ शकतो. जर या वेळेस त्या रुग्णाला वेळेत औषध मिळालं नाही तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या अभ्यासानुसार जगातील दहा टक्के लोक हे या आजाराने ग्रस्त आहेत. महिलांमधलं या आजाराचं प्रमाण सर्वात जास्त आहे.


अर्धशिशीचा अ‍ॅटॅक येण्याचीही काही कारणं आहेत. त्यापैकी महत्त्वाची कारणं म्हणजे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी होणा-या हार्मोन्स बदलामुळे, एखाद्या गोष्टीचा उग्र दर्प उदा. रंगाचा, अत्तराचा सुगंध, प्रकाशाची तीव्रता, चहा-कॉफीचे अति सेवन, अति तेलकट खाणं, अनियमित झोप, अति शारीरिक श्रम, कामाचा ताण, अति व्यायाम, ऋतुमानातील बदल यांमुळे अर्धशिशीचा त्रास वाढू शकतो.


त्यासाठी हे टाळा


SMOKE & DRINK 1>फार काळ उपाशी राहू नये.

>तंबाखू, दारू, सिगारेट आदी व्यसनं टाळा.

>अति विचार करू नका.

>अति मांसाहार करू नका.

>दही वर्ज्य करा.

>उन्हात फिरणं टाळा.

>छत्री किंवा टोपी घेतल्याशिवाय बाहेर पडू नका.

>मानसिक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. अति ताण टाळा.

>स्ट्रेस हार्मोन्स (ताण वाढवणारे हार्मोन्स) वाढले तर त्यामुळेसुद्धा हा त्रास वाढतो.


आहार कसा असावा


>आहार वेळेवर आणि हलका घ्या.

>मेंदूला साखर (ग्लुकोज) पोहोचली पाहिजे. त्यासाठी उन्हाळ्यात खाण्यामध्ये गोडाचं प्रमाण थोडं तरीअसावं.

>पाणी भरपूर प्या.

>गोडं ताक, कोकम सरबत, आवळा सरबत यांचंही सेवन करा.

>थंडीमध्ये भुकेचं प्रमाण जास्त असतं. तेव्हा न्याहारी जास्त घ्या.

>गोड जिलेबी खा. त्यामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/EiFGDjj0bY0B1VwZpV3ebm




घरगुती उपाय


>स्वच्छ धुतलेल्या आल्याच्या छोट्या तुकड्यावर थोडं लिंबू पिळून चघळल्यास डोकेदुखीत आराम मिळतो.

>अळशीच्या बिया भाजून, त्याची पूड बनवून त्यात चवीपुरतं मीठ घालून त्याचं २-४ चमचे चूर्ण नियमित दोन-तीन महिने घेतल्यास त्याने आराम मिळतो.

>राईचे पोटीस डोक्याखाली, मानेवर लावल्यास त्यानेही बराच आराम मिळतो.

>सुंठ, दालचिनीचे, वेलदोडय़ाचं तेल यांचाही वापर तुम्ही करू शकता.

>सुंठ आणि जायफळ यांचा लेप डोक्याला लावल्यास त्यानेही आराम मिळतो.


अर्धशिशीसाठी गुणकारी योगासने


>योगासनांमुळे शरीरात रक्ताभिसरण क्रिया अतिशय उत्तम प्रकारे होते. शरीरातील सगळ्याच बाहय आणि आंतरिक अवयवांचं मालिश होतं. >आंतरस्त्रावी ग्रंथी शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. या आंतरस्रवी ग्रंथींचं कार्य बिघडल्यास व्यक्ती आजारी पडते. त्यामुळे या ग्रंथींचं कार्य बिघडलं असेल तर ते सुरळीत करण्याचं काम योगासने करतात.


ही योगासने करा


अर्धशिशीसाठी शशांकासन (चंद्रासन), अधोमुख श्वानासन, सुप्त भद्रासन, पाद हस्तासन, विपरीतकरणी मुद्रा, शीर्षासन, सर्वागासन (शीर्षासन करण्यास कठीण असलेल्यांना अत्यंत सुलभ असं सर्वागासन आहे.), मत्स्यासन तसेच नाडीशोधन प्राणायाम (अनुलोम विलोम), कपालभाती, भस्त्रिका, शीतली आणि शीतकारी हे प्राणायाम अत्यंत गुणकारी आहेत. मेंदूला जास्तीत जास्त रक्तपुरवठा त


सेच प्राणवायू (ऑक्सिजन) या योगासनांमुळे आणि प्राणायामामुळे मिळतो. त्यामुळे शांत आणि गाढ झोप लागते.


पण पूर्णपणे घरगुती उपायांवर अवलंबून राहणंही चुकीचं आहे. त्यासाठी जर वारंवार डोकं दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं कधीही सोयीस्कर. आपल्याला असणारी डोकेदुखी नक्की अर्धशिशीच आहे का, हे फक्त डॉक्टरच सांगू शकतात. उन्हाळा आता सुरू होईल. उन्हाळ्यात अर्धशिशीचा त्रास अधिक होतो. तेव्हा घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेऊन बाहेर पडा. शक्य असल्यास एखादं गोड चॉकलेट वा गोड पदार्थ जवळ ठेवा आणि आपली तब्येत सांभाळा. 


परंतु अवेळी होणा-या या त्रासापासुन मुक्ती मिळवण्यासाठी याचे क्विक ट्रीटमेंट जाणुन घेणे खुप आवश्यक आहेत...


पुदीना

पुदीन्याचा अँटीृइन्फ्लेमेटरी गुण नसांना आराम पोहोचवण्याचे काम करते. या हर्बचा सुगंधच डोकेदुखीची अर्धी समस्या दुर करते. याच्या पानांचा वापर चहात करणे फायदेशीर असते. यामध्ये चवीसाठी मध मिळवता येऊ शकते.


अदरक

अद्रक खाल्ल्याने ब्लड वेसेल्समध्ये कोणत्याच प्रकारचा कॉन्ट्रॅक्शन होत नाही ज्यामुळे वेदनांची समस्या होत नाही. अद्रकची चहा प्या किंवा फक्त अद्रक खाल्ल्याने देखील फायदा होतो.


बर्फ

मायग्रेनच्या त्रासापासुन सुटका मिळवण्यासाठी आइस क्यूब्सचा वापर खुप फायदेशीर आहे. बर्फाचा तुकडा एका स्वच्छ कपड्यात घेऊन टॉवेलमध्ये गुंडाळून याने डोके शेका.


 ज्यांना कामाचा ताण असतो , त्यांना मोठ्या प्रमाणात डोकेदुखी होते. ध्यानधारणा आणि प्राणायाम केल्याने या त्रासापासून बऱ्याच प्रमाणात मुक्ती मिळू शकते.

3. काही पदार्थ असे आहेत ज्यामुळे डोकेदुखीपासून बराच आराम मिळतो. त्यात आल्याचं नाव सर्वात आधी घ्यावं लागेल. म्हणजे आल्याकडे आपण ' पेन रिलिव्हर ' म्हणून बघू शकतो. आल्याचा एक तुकडा घेऊन त्यावर थोडं लिंबू पिळा. चवीसाठी त्यावर थोडं काळं मीठ घाला आणि हलके चघळा. आलं चघळल्याने साधी डोकेदुखी थांबत असेल तर चिवट अर्धशिशीवरही नियंत्रण मिळवता येतं. आलं वेदना कमी करतं..


अर्धशिशीचा त्रास होत असेल तर -सुंठ अधिक जायफळ यांचा लेप भुवईच्या वर लावावा. 


शिंक काढण्याच्या कोणत्याही उपायाने शिंक काढल्यासही अर्धशिशी कमी होते .


सकाळी उठल्या बरोबर पेढा खाल्ल्याने ती कमी होते. 

अर्धशिशी पित्त व सर्दीमुळे होते. पेढयाने पित्त कमी होते व शिंक काढण्याने सर्दी मोकळी होते. 


ज्यांचं वारंवार डोकं दुखतं अशांनी दोन ते चार टेबलस्पून आळशीच्या बियांची पूड नियमितपणे दोन-तीन महिने खावी. आळशीच्या बियांची पावडर बनवण्यासाठी आधी त्या कोरड्याच भाजाव्या. चवीसाठी त्यात मीठ मिसळा.


मीरे आणि साखर

सकाळी उठल्यावर मीरपुड आणि साखर पाण्यात टाका आणि याचे सरबत तयार करुन प्या. खुप परिणाम कारक उपाय आहे.


तुप

मायग्रेन दूर करण्याचा सर्वात सोपा फॉर्मूला म्हणजे तूप कोमट करुन नाकात टाकणे, यामुळे तात्काळ आराम मिळतो.


लसुन

लसुनची एक लहानशी पाकळी खाऊन अनेक रोगांवर उपचार केला जाऊ शकतो. याचा ज्यूस नाकात टाकल्याने आणि पेस्ट कानामागे लावल्याने मायग्रेनच्या वेदनांपासुन आराम मिळतो.


पुर्ण झोप घेणे

कमी झोपणे हे या आजाराचे सर्वात मोठे कारण असु शकते यामुळे बॉडीची अॅक्टीव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी 7-8 तासांची झोप अवश्य घ्या.



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi