Wednesday, 3 May 2023

जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात 7 मोठे फायदे.

 जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात 7 मोठे फायदे

जीरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जीरा पाणी बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. त्याच सोबत याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये स्वयपाक घरामध्ये जीरा वापरतात. जीरा टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात. जीरे पदार्थात आवश्य वापरले पाहिजे कारण यामुळे पाचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते.


 जीरे सुगंधी असते आणि याची चव देखील वेगळीच असते. जिरे पाणी पिण्यामुळे वजन कमी होते त्याच सोबत अनेक फायदे मिळतात. चला पाहू जीरा पाणी पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत.


1. बद्धकोष्ठता : 

जीऱ्याचे पाणी पोटाच्या संबंधित कोणतेही आजार दूर करण्यासाठी मदत करतात. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास जीरा पाणी पिण्यामुळे अपचन आणि पोटाच्या संबंधित आजारामध्ये आराम मिळतो. असे मानले जाते कि जीरा आपल्या पाचन तंत्राला बुस्ट करतो. आणि पचन संबंधित समस्या दूर करतो.


2. वजन कमी करतो : 

जीऱ्यामध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट आणि पोषक तत्व चयापचय वाढवते. जीरा आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर काढते. ज्यामुळे शरीरातून चरबी कमी होते.


3. हार्ट अटैकचा धोका कमी करतो : 

जीरा पाणी शरीरातील फैट आणि कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करतो. कोलेस्ट्रोलची कमी हार्ट अटैकचा धोका कमी करण्यास मदत होते.


4. मासपेशीच्या वेदना पासून आराम : 

जीरा पाणी शरीरातील रक्त संचार वाढवतो. यामुळे मासपेशीच्या वेदना कमी होतात. आणि शरीर थकण्या पासून वाचवतो.


5. इम्यूनिटी सिस्टम मजबूत करतो : 

रोग प्रतिकारकशक्ती मजबूत असेल तरच आजारा पासून बचाव होतो. जीऱ्याच्या पाण्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते. आयर्न आपली रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करते. याच सोबत जीऱ्यामध्ये विटामिन ए आणि सी असते. यामुळे इम्युनिटी लेवल वाढते.


6. एनीमिया दूर करण्यास मदत करते : 

रक्ताची कमी एनिमिया रोग असतो. याचा उपाय जीऱ्याच्या पाण्याने केला जाऊ शकतो. जीऱ्यामध्ये आयरन भरपूर असते ज्यामुळे हिमोग्लोबिन संतुलित ठेवण्यास मदत होते. यामुळे एनिमियाची समस्या देखील दूर होऊ शकते. जर शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर नियमितपणे जीऱ्याचे पाणी सेवन करावे.


7. झोपेची समस्या दूर करतो : 

झोपेची समस्या वजन वाढल्यामुळे होते. वजन वाढल्यावर झोपेची समस्या होणे सामान्य आहे. जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होत असेल तर जीऱ्याचे पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.



 सुनिता सहस्त्रबुद्धे


*⭕️

झाडाची मुळे हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहेत

 झाडाची मुळे हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहेत


   1) *एक कडूनिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.*

 याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांबळ, अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील.

 म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे.

   2) *एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.*

 आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली.

 वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. 

याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.      

   *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.* आपण एका बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. 

एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.

पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'.  


 🌳🌴🪴🍀🌿🌱🌳 🙏🙏 *झाडाचे महत्व जाणाल तर तुमचं महत्व वाढेल.* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 


*झाडे लावा निसर्ग वाचवा*

 🙏🙏🙏

सुरक्षा स्वतची

 सुरक्षा स्वतचं स्वतः घ्यावी.🙏🙏 जेष्ठ नागरिक यांनी घरातून बाहेर जाताना केवळ मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनींग वॉकच नव्हे तर प्रत्येक वेळी, एकटे किंवा आपल्या पत्नीसह, किंवा जेष्ठ नागरीकां सोबत आपल्या आधारासाठी व त्यापेक्षाही स्वतःच्याच संरक्षणासाठी आपले सोबत Walking stick, किंवा 4 फूट ते 5 फूट लांबीची जाड मजबूत काठी न चुकता सोबत बाळगावी. जेणेकरून कोणत्याही लहान मोठया प्रसंगात (आपत्तीत ) उपयोगी पडेल. From: - *मधुकर शेंबडे* "आपत्ती व्यवस्थापन ,वहातूक व्यवस्थापन, रस्ता सुरक्षा विषयाचा अभ्यासक व प्रशिक्षक महाराष्ट्र पोलीस सातारा 9423260251


शासन व जन हितार्थ 

उन्हाळ्यात दिवसातून कितीवेळा अंडी खावी? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात.....*

 *उन्हाळ्यात दिवसातून कितीवेळा अंडी खावी? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात.....*


उन्हाळा सुरु झाला आहे. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे शरीराची लाही लाही होत आहे. अशा हवामानात आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या ऋतूमध्ये पोटाच्या समस्या जास्त होतात. उन्हाळ्यात तोलून मापून अन्न खावं लागतं. अशातच उन्हाळ्यात अंडी खावी का असा प्रश्न पडतो. त्यात अंडी खाणे बहुतेक लोकांचा हा आवडता नाश्ता असतो. आरोग्य तज्ज्ञ न्याहारीमध्ये अंडी खाण्याचा सल्ला देतात.तसेच फिटनेस फ्रेकदेखील प्रोटिन्स मिळविण्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करतात. एकूणच अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे स्नायूंच्या विकासापासून शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरते. पण आता प्रश्न असा आहे की दिवसात किती अंडी खावीत, रोज अंडी खाणे सुरक्षित आहे का? तुमच्याया या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आम्ही सांगणार आहोत.


*एका दिवसात किती अंडी खाणे योग्य आहे...?*

तज्ञांच्या मते, निरोगी व्यक्तीने दररोज दोन ते तीन अंडी खाणे आवश्यक आहे. निरोगी लोक आठवड्यातून ७ ते १० अंडी खाऊ शकतात. जे खेळाडू आहेत किंवा जे जीम, वर्कआउट करतात, त्यांना जास्त प्रोटीनची गरज असते त्यामुळे ते दिवसातून चार ते पाच अंडी खाऊ शकतात. जे लोक रोज अंडी खातात त्यांनी अंड्याचा पांढरा भागच खावा. याशिवाय जर कोणाला हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी दिवसात दोनपेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी अंड्याचे सेवन कमी करावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


*अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्याने पडाल आजारी...*

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंडी पूर्णपणे शिजवली पाहिजेत. कारण, कमी शिजवलेल्या अंड्यामुळे संसर्ग होऊ शकतो. अंड्याच्या बाहेरील आणि पिवळ्या भागात साल्मोनेला बॅक्टेरिया असू शकतात. जे तुम्हाला आजारी बनवू शकते. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या रुग्णांनी अंडी खाणे टाळले पाहिजे. पण तरीही जर तुम्ही त्यातील पिवळा भाग काढून खाल्लात तर त्यातून नुकसान होण्याची शक्यता कमी असते. कारण पिवळ्या भागात फॅट असते, ज्यामुळे हाय बीपी असलेल्या व्यक्तीला त्रास होतो. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात अंड्यांचा समावेश करावा. अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते आणि त्यामुळे तुमचे पोटही खराब होऊ शकते.


*अंडी खाण्याचे फायदे...


*अंडी खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते.


*वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग खावा.


*अंडी खाल्ल्याने शरीराला पुरेसे प्रथिने मिळतात.


*अंडी खाल्ल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे अस्वास्थ्यकर अन्न टाळले जाते.


कोणताही उपाय वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

जीवन गाणे







 

शिबे,सुरमा*

 *शिबे,सुरमा*



छोटे छोटे पांढरे डाग छातीवर, मानेवर पाठीवर,गळ्यावर

कारण अशुध्द रक्त. त्वचेवरील मेलांजीन या द्रवाची कमतरता.

उपाययोजना

१)साबण लावू नये शिकेकाई चा वापर करा.तसेच कडुलिंबाच्या पानांना गरमपाण्यात उकळून ते लावावे.

२)रक्त दोषांतक घ्यावे.

३)बावचा तेल डागावर लावावे व कोवळ्या सुर्यकिरणात बसावे.

४)लिंबाचा रस अंगावर चोळावा.

५)सारिवाद्यासव व दोन दोन चमचे समभाग पाण्यात घ्या.



 वैद्य.गजानन



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



बार कौन्सिलची ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त;

 बार कौन्सिलची ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त;


राज्यातील न्यायालयांचे कामकाज मराठीतून व्हावे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ई-फाईलिंग आणि सुविधा केंद्रांचे उद्घाटन.

            मुंबई, दि. 2 : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ई-फाईलिंग सुविधा निर्माण करण्याचे बार कौन्सिलचे कार्य अभिनंदनीय आहे. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच राज्यातील न्यायालयाचे कामकाज मराठीतून करण्याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, अशी अपेक्षादेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.  


            दादरमधील स्वामी नारायण मंदिर सभागृहात आयोजित मुंबई महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ई-फाईलिंग आणि सुविधा केंद्रांच्या वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह राज्याचे महाधिवक्ता, राष्ट्रीय बार कौन्सिलचे अध्यक्ष, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.


            देशात डिजिटल व्यवस्था उभी राहत आहे. या सुविधांमुळे न्यायव्यवस्थेला गती मिळत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक विकासकामे करीत असल्याचे सांगून वकीलांसाठीच्या नवीन प्रशिक्षण केंद्रासाठी जागा देण्याबरोबरच इतर मागण्यांबाबत राज्य सरकार सहकार्य करेल. न्यायालये, न्यायाधीशांची संख्या वाढविणे, न्यायालयांमध्ये सोयीसुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. तसेच राज्यातील न्यायालयांचे कामकाज मराठीतून करण्याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, अशी अपेक्षादेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.  


न्यायव्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी सात हजार कोटींची तरतूद; भारतीय भाषांचा वापर करण्याचा केंद्राचा मानस - केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी अर्थसंकल्पात सात हजार कोटींची तरतूद केली आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत भारतीय भाषांचा वापर वाढावा असा केंद्र सरकारचा मानस आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून न्यायालयांमध्ये भारतीय भाषांचा वापर वाढविण्याच्या दिशेने केंद्र सरकार पावले उचलत असल्याची माहिती केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.


            केंद्रीय मंत्री श्री. रिजिजू म्हणाले, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी तंत्रज्ञानयुक्त उपक्रम राबविणे महत्त्वपूर्ण आहे. केंद्र सरकारने २०१४ नंतर क्रांतिकारी निर्णय घेतले. आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त जुने कायदे हटवले. यापुढे वर्तमानात औचित्य नसलेले जुने कायदे हटवणार आहोत, अशी घोषणा देखील श्री. रिजिजू यांनी केली. सर्वोच्च आणि उच्च न्यायालय, विधि महाविद्यालयात आणि बार कौन्सिलमध्ये महिलांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकार काम करेल. भयमुक्त वातावरणात वकीलांनी काम करावे यासाठी संरक्षण कायदा करण्याबाबत केंद्र सरकार पावले उचलेल, असेही केंद्रीय विधि व न्याय मंत्री श्री. रिजिजू यांनी स्पष्ट केले.


            यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, नवीन वकिलांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी मुंबईतील जागा उपयुक्त ठरेल. वकिलांच्या संरक्षण कायद्यासाठी पाठपुरावा करणार आहे. न्यायालयातील विविध प्रलंबित प्रकरणे डिजिटल सुविधेमुळे लवकर मार्गी लागतील, असे श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरातील न्याय व्यवस्था डिजिटल सुविधेमुळे संपूर्ण कोविड काळातही सुरु राहिली. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पारदर्शकता येते. लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. हळूहळू संपूर्ण न्याय व्यवस्था डिजिटल होईल. त्यामुळे नागरिकांना गतीने न्याय मिळेल. प्रशिक्षण केंद्रासाठीच्या जागेबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. वेल्फेअर ॲक्टबाबत बार कौन्सिलसमवेत चर्चा करण्यात येईल. वकिलांच्या संरक्षण कायद्याबाबत सकारात्मक विचार करुन यासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. लोकोपयोगी सुविधा सुरु करणाऱ्या बार कौन्सिलच्या पाठिशी उभे राहणे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील बार कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


००

Featured post

Lakshvedhi