Monday, 1 May 2023

उन्हाळ्यात पुरळ, रॅशेस येतात, खाज सुटते? १ सोपा उपाय, मिळेल झटपट आराम...

 *उन्हाळ्यात पुरळ, रॅशेस येतात, खाज सुटते? १ सोपा उपाय, मिळेल झटपट आराम.....*


उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेताना आपल्याला त्वचेचीही विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाचा कडाका तीव्र असल्याने त्वचा काळवंडणे, त्वचेवर रॅश येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. इतकेच नाही तर उकाड्याने घाम येतो आणि तो शरीरावर तसाच राहीला तर पुरळ येणे, खाज सुटणे, लाल होणे अशा समस्याही उद्भवतात. उन्हाळ्याच्या दिवसांत एकदा हे त्रास सुरू झाले की आपल्याला काही सुचत नाही. मग काही ना काही घरगुती उपाय करुन आपण त्यापासून आराम मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा अगदीच जास्त झालं तर डॉक्टरांकडे जाऊन उपाययोजना करतो.


आयुर्वेदात असाच एक सोपा उपाय सांगितला आहे. वाळा हा गवताचा एक प्रकार असून भारतात तो सहज उपलब्ध होतो. माठातल्या पाण्याला चांगला वास यावा यासाठी आपण उन्हाळ्यात आवर्जून माठात वाळा घालतो. इतकेच नाही तर शरीराला थंडावा मिळावा म्हणून वाळ्याचे सरबतही प्यायले जाते. त्याचप्रमाणे त्वचेच्या समस्यांसाठीही वाळा कसा उपयुक्त ठरतो याविषयी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यांनी असाच एक सोपा उपाय सांगितला आहे. तो कसा करायचा आणि त्वचेच्या तक्रारी दूर होण्यासाठी त्याचा कसा फायदा होतो पाहूया...


*उपाय...*

वाळ्याच्या गवताची बारीक पावडर करायची. यामध्ये साधे पाणी किंवा गुलाब पाणी घालायचे. ही पेस्ट चेहऱ्याला आणि इतर आवश्यक त्या ठिकाणी त्वचेवर लावायची. १५ ते २० मिनीटे ही पेस्ट चेहऱ्यावर फेस मास्कप्रमाणे ठेवायची आणि मग चेहरा पाण्याने धुवून टाकायचा. यामुळे त्वचेचा काळेपणा तर दूर होतोच पण उन्हामुळे त्वचेची आग होणे, रॅश येणे अशा काही समस्या उद्भवल्या असतील तर त्या दूर होण्यासही याची चांगली मदत होते.


*फायदे...*

१. यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत होते. 


२. त्वचा ग्लो करण्यासही याचा चांगला उपयोग होतो. 


३. शरीराचा काही कारणाने दाह होत असेल तर तो कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो. 


४. प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल, त्यामुळे खाज आणि वास येत असेल तर आवळा चूर्ण घालून ही पेस्ट उटण्याप्रमाणे आंघोळीपूर्वी वापरल्यास उन्हाळ्यात फायदा होतो.


याशिवाय...


*चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी वॉटर थेरपी.* *(Water Therapy)*


*1) Step-1 Water (11.5 PH) -* संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करावा. बोटाने गोलाकार पद्धतीने हळुवारपणे घासावे. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून चेहरा कोरडा करावा. हे चेहऱ्याच्या त्वचेवरील छीद्रांमधील घाण व तेलकट द्रव्ये काढून त्वचेची छीद्रे स्वच्छ करते.


त्यानंतर...


*2) Step-2 Water (2.5 PH)-* संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करावा. त्यानंतर थोडा वेळ थांबून स्वच्छ कपड्याने पुसून चेहरा कोरडा करावा. यामुळे चेहऱ्यावरील विषाणू संसर्ग (Bacterial Infection) व बुरशी (Fungal Infection) नष्ट करते.


त्यानंतर...


*3) Step-3 Water (6 PH) -* संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करावा. हे फेस टोनर असल्यामुळे पुसायचे नाही, चेहऱ्यावर वाळू देणे. यामुळे चेहरा टवटवीत (फ्रेश) दिसतो.


*ही वॉटर थेरपी म्हणजे चेहरा स्वच्छ धुण्यासारखेच आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष सर्वचजण नियमितपणे करु शकतात. यामुळे चेहऱ्यावरी सर्व फोडी, डाग दूर होऊन चेहऱ्याची चमक दिवसेंदिवस वाढत जाईल.* 


*(हे दिवसातून तीन ते चार वेळा करणे. शिवाय यासोबत हायड्रोजनेटेड (ORP-rich) पाणी पिल्यास अतिउत्तम.)*


*संकलन-* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



गर्जा महाराष्ट्र माझा

 


गुटखा त च जा

 शाहरुख खान,सलमान खान, अजय देवगन, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आदि इन सभी को पान मसाले का विज्ञापन करते आपने देखा होगा अब जरा इस वीडियो को गौर से सुनिये ।🫣


बहुगुणी आरोग्यदायी, सौंदर्य दायी जास्वंद.....*

 *बहुगुणी आरोग्यदायी जास्वंद.....*


काही जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही त्यांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत. रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं. सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा.


एका तासाने फक्त पाण्याने केस धुऊन टाकावेत. यामुळे केसांना चांगली चमक येते.


हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात, उदाहणार्थ तिळाच्या अथवा खोबरेल तेलात पाच ते सहा जास्वंदाची फुलं टाकावी. हे तेल कोमट करून कापूस किंवा बोटांऐवजी जास्वंदीच्या फुलांनी केसांच्या मुळांना चोळलं तर केसांची मुळं मजबूत होतात.


भरपूर जास्वंदाची फुलं, दोन आवळे, थोडी शिकेकाई आणि दोन रिठे पाण्यात टाकून ते मिश्रण व्यवस्थित उकळवून ठेवा.


केसांसाठी हेअरवॉश म्हणून वापरता येईल. हा हेअरवॉश रोज वापरला तरी चालेल.


मोड आलेली मेथी, कोरफड चिक, जास्वंदाची फुलं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटावी. हा पॅक केसांना लावावा. याने केसांना नैसगिर्क चमक येते.


जास्वंदीची फुलं, कोरफडीची पानं, ५० मिलि राईचं तेल आणि ५० मिलि तिळाचं तेल एकत्र गरम करून ठेवावं. शक्यतो काचेच्या बाटलीत हे तेल भरून ठेवून वापरावं. आठवड्यातून दोनदा तरी हे तेल केसांना लावावं. बाजारात मिळणारं जास्वंद तेलही खूप गुणकारी असतं. फक्त पाणी घालून ते थोडं पातळ करून लावा.


जास्वंद जेलचा अरोमा थेरपीच्या तेलांमध्येही खूप उपयोग होतो. पण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ते वापरू नये.


ब्राह्मी, माका, नागरमोथा,जांभळं आणि जास्वंदीची फुलं एकत्र उकळवून त्याचं पाणी काचेच्या बाटलीत भरून ठेवावं आणि हेअर वॉटर म्हणून वापरावं.


मेंदी कालवताना ताक, जास्वंद तेल आणि मंडूर पावडर एकत्र भिजवावी. हे मिश्रण लावल्यामुळे केसांना नैसगिर्क रंग येतो.


जास्वंद जेलमध्ये शिकेकाई, रिठा, कचूर सुगंधी, संत्र्याचीसाल आणि मुलतानी माती एकत्र करून त्याचा लेप केसांना लावावा.


*डॉ. सुनील इनामदार,*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


Sunday, 30 April 2023

पूर्णब्रह्म -भाजलेल्या वांग्याचे फायदे.....*

 *भाजलेल्या वांग्याचे फायदे.....*


वांग्याचे भरीत तुम्ही अगदी चवीने खात असाल परंतु यामधील औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संक्रमित आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. भारतातील जवळपास सर्व भागांमध्ये वांग्याची शेती केली जाते. आदिवासी भागांमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वांगे वापरले जाते. वांग्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता, अपचन, डायबिटीज इत्यादी समस्या दूर होतात. येथे जाणून घ्या, वांग्याचे काही खास उपाय आणि फायदे…


*खोकल्यावर गुणकारी...* 

पाताळकोट येथील आदिवासी वांगे चुलीवर भाजून त्यावर चवीनुसार मीठ टाकतात. यांच्या माहितीनुसार अशा पद्धतीने वांगे खाल्ल्यास खोकला बरा होण्यास मदत होते आणि कफ बाहेर पडतो.


*भूकेला शांत करते...* 

वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर्स आढळून येतात, जे वजन कमी करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. वांग्याचे सेवन केल्याने शरीरातील फायबर्सचे प्रमाण वाढते आणि यामुळे कॅलरीज कमी होऊ शकतात. फायबर्सचे पोटातील प्रमाण वाढल्यामुळे भूक शांत होते.


*उच्च रक्तदाबाची समस्या ठीक होते...*

आदिवासी लोकांच्या माहितीनुसार वांग्याचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार ठीक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. आधुनिक विज्ञानानुसार शरीरातील आयर्नचे जास्त प्रमाण नुकसानदायक ठरू शकते. वांग्यातील नासुनीन नावाचे रसायन शरीरातलं अतिरिक्त आयर्न नियंत्रित करते. या कारणामुळे हृदय संचालन सामान्य राहते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो.


*शांत झोप लागते...*

भाजलेल्या वांग्यावर चवीनुसार मध टाकून रात्री खाल्ल्यास शांत झोप लागते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार वांग्याच्या सेवनाने अनिद्रेची समस्या दूर होते. रक्ताची कमतरता दूर होते.


*अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते...* 

वांग्याचे सूप तयार करून त्यामध्ये हिंग आणि चवीनुसार लसुन टाकून सेवन केल्यास पोट फुगणे, गॅस होणे, बद्धकोष्ठता, अपचन इ. समस्या दूर होण्यास मदत होते.


*डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर...*

वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते आणि यामधी कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे विरघळत नाहीत. यामुळे टाइप 2 डायबिटीज ग्रस्त रुग्णांनी नियमित वांग्याचे सेवन केल्यास साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळेल.


नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

   

*नितीन जाधव,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत


 


            मुंबई, दि.३० :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ आयोजित करण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण ४,६७,०८५ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेकरिता राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावरील एकूण १,४७५ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे ८०% उपस्थिती असल्याचे दिसून आले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात आली आहे.


            महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण ८,१६९ पदे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती असून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.



000000


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन


 


            मुंबई, दि.30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अभिवादन केले.


 


            यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Featured post

Lakshvedhi