Sunday, 5 February 2023

दिलखुलास' कार्यक्रमात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांची मुलाखत

 दिलखुलास' कार्यक्रमात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांची मुलाखत


            मुंबई, दि. 3: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक कर्करोग दिनानिमित्त कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. 4 व सोमवार दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


            दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिवस जगभर पाळला जातो. यानिमित्ताने जगभरातील व्यक्तींनी एकत्र येऊन रोग ओळखणे, रुग्णांची काळजी घेणे, रोगाशी लढण्याचे त्यांना बळ देणे, रूग्णांना भावनिक आधार देण्याबाबत जनजागृती केली जाते. या आजाराबाबत रूग्णांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने शासनाच्यामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.


            कर्करोग हा आजार काय आहे, या आजाराची लक्षणे, प्रभावी उपचार पद्धती, आरोग्याची घ्यावयाची काळजी अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आजीचा मेकअप बॉक्स


 

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्याएफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

 राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्याएफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या

एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

२० खेळाडूंची निवड करून जर्मनीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण

 

            मुंबईदि. 3 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि फुटबॉल क्लब बायर्न यांच्यातील करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून निवडलेल्या खेळाडूंना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी  राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या "एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल  स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

            फुटबॉल  क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल  स्पर्धा आयोजित करूनत्यातून निवडलेल्या २० खेळाडूंना म्युनिकजर्मनी येथे जाणे-येणेतेथील निवासप्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांचा लोगो वापरण्याची मुभा दिलेली आहे. तसेच एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडककरिता टी. व्ही ९ मराठी हे मीडिया पार्टनर आहेत.

            राज्यात फुटबॉल  खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिकजर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्यपुणे यांच्यावतीने करारनामा झाला आहे. बायर्न म्युनिक हा जागतिक पातळीवर लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेलखेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षणक्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबद्ध प्रशिक्षणपायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे.

            राज्यातून २० खेळाडू जर्मनी येथे या प्रशिक्षणासाठी जाण्याकरीता, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत " एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक स्पर्धेचे आयोजन जिल्हाविभाग व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. ही स्पर्धा १४ वर्षाखालील मुलांच्या गटात होईल. या करीता जिल्ह्यातील १४ वर्षाखालील मुलांचे संघ जास्तीत जास्त सहभागी होतील यासाठी शाळांना अवगत करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत भाग घेण्याकरीता dsomumbaisub2020@gmail.com वर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमुंबई उपनगर (शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसरसंभाजी नगर समोर आकुर्ली रोडकांदिवली पू.) संपर्क क्रमांक - ०२२/२८८७११०५ येथे आपले अर्ज दि ०६/०२/२०२३ रोजी दु.३.०० वाजेपर्यंत पाठवावेत. शैक्षणिक संस्थाशाळा, फुटबॉल संघटना व फुटबॉल क्लब यांनी या स्पर्धेत अधिकाधिक संघ सहभागी करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई उपनगर यांनी केले आहे.

0000२० खेळाडूंची निवड करून जर्मनीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण.

            मुंबई, दि. 3 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि फुटबॉल क्लब बायर्न यांच्यातील करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून निवडलेल्या खेळाडूंना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या "एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.


            फुटबॉल क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करून, त्यातून निवडलेल्या २० खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे, तेथील निवास, प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांचा लोगो वापरण्याची मुभा दिलेली आहे. तसेच एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडककरिता टी. व्ही ९ मराठी हे मीडिया पार्टनर आहेत.


            राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने करारनामा झाला आहे. बायर्न म्युनिक हा जागतिक पातळीवर लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे.


            राज्यातून २० खेळाडू जर्मनी येथे या प्रशिक्षणासाठी जाण्याकरीता, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत " एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. ही स्पर्धा १४ वर्षाखालील मुलांच्या गटात होईल. या करीता जिल्ह्यातील १४ वर्षाखालील मुलांचे संघ जास्तीत जास्त सहभागी होतील यासाठी शाळांना अवगत करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत भाग घेण्याकरीता dsomumbaisub2020@gmail.com वर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर (शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजी नगर समोर आकुर्ली रोड, कांदिवली पू.) संपर्क क्रमांक - ०२२/२८८७११०५ येथे आपले अर्ज दि ०६/०२/२०२३ रोजी दु.३.०० वाजेपर्यंत पाठवावेत. शैक्षणिक संस्था, शाळा, फुटबॉल संघटना व फुटबॉल क्लब यांनी या स्पर्धेत अधिकाधिक संघ सहभागी करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.


0000

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी पुणे येथे राज्यस्तरीय कार्यशाळा.

 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी

पुणे येथे राज्यस्तरीय कार्यशाळा.

            मुंबई, दि. 3 : ग्रामविकास विभागाच्या योजना गतिमान करून, तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्यावतीने पुणे येथील आर्किड हॉटेल मध्ये दि. 4 ते 5 फेब्रुवारी, 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.


            ही कार्यशाळा ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे. या कार्यशाळेला जिल्हा परिषदांचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त (विकास), उपायुक्त (आस्थापना), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), राज्यस्तरावरील सर्व अधिकारी व कार्पोरेट कंपन्यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.  


            या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना गतिमान करण्याचे नियोजन व अंमलबजावणी करणे, तसेच जिल्ह्यांनी सुरू केलेल्या नाविण्यपूर्ण योजना व यशोगाथांचे सादरीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावतीने करण्यात येणार आहे.


            या कार्यशाळेमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने अमृत महाआवास अभियान अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे 2024’ कार्यक्रमाचे सादरीकरण, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सुधारित ग्राम स्वराज अभियानाची (RGSA) अंमलबजावणी, बचत गटांच्या उत्पादनांना बाजार जोडणी इ. विषयावर चर्चा करण्यात येणार असून यावेळी व्हिएसटीएफ अंतर्गत कार्पोरेट कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या कार्यशाळेस ग्रामविकास विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज विभागाने केले आहे.

Saturday, 4 February 2023

जामनेर येथे नवीन क्रीडा संकुलास मान्यता; लवकरच निघणार शासन निर्णय येथे नवीन क्रीडा संकुलास मान्यता; लवकरच निघणार शासन निर्णय

 जामनेर येथे नवीन क्रीडा संकुलास मान्यता; लवकरच निघणार शासन निर्णय येथे नवीन क्रीडा संकुलास मान्यता; लवकरच निघणार शासन निर्णय


                                          -क्रीडा मंत्री गिरीश महाजन

            मुंबई, दि. 4 : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील सर्व सुविधायुक्त आणि अद्ययावत नवीन तालुका क्रीडा संकुलास मान्यता देण्यात आली असून लवकरच शासन निर्णय निघणार आहे. जळगाव जिल्हा क्रीडा संकुलास अतिरिक्त निधी देण्यात येणार असून यामध्ये आधुनिकीकरणासह सिंथेटिक मॅट बांधण्यात येणार असल्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            मंत्रालयात राज्य क्रीडा विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे, उप सचिव सुनील हांजे यांची प्रमुख उपस्थिती होती.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, पारोळा, एरंडोल या तालुका क्रीडा संकुलास निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जामनेर येथे बांधण्यात येणारे क्रीडा संकुल हे स्थानिक खेळाडूंच्या सरावासाठी आणि क्रीडा स्पर्धांकरीता सर्व क्रीडा साहित्यासह अद्ययावत बांधण्यात येणार आहे. मुलांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी याठिकाणी विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे सुलभ होण्यासाठी आवश्यक ते उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            ऑलिम्पिकमधील पदकामध्ये वाढ होण्यासाठी ठरावीक खेळावर लक्ष केंद्रित करून आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यातील विविध खेळ आणि खेळाडू यांचा अभ्यास करुन ज्या भागात संबंधित क्रीडा प्रकाराच्या खेळाडूंची संख्या जास्त आहे त्या भागात त्या खेळाच्या सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात याव्यात. क्रीडा क्षेत्राचा नवीन आराखडा बनवण्यात येणार आहे, असेही श्री. महाजन म्हणाले तसेच मंत्री श्री. महाजन यांनी राज्यातील सर्व क्रीडा संकुलांचा यावेळी आढावा घेतला.


एफ.सी. बायर्न फुटबॉल क्लब जर्मनी यांच्याशी झालेल्या काराराच्या अनुषंगाने होणाऱ्या स्पर्धेकरिता 1.30 कोटी निधी मंजूर


            क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जर्मनीच्या एफ.सी. बायर्न फुटबॉल क्लब यांच्यातील करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून त्यांना जर्मनी येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या "एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. एफ.सी. बायर्न फुटबॉल क्लब जर्मनी यांच्याशी झालेल्या काराराच्या अनुषंगाने होणाऱ्या स्पर्धेकरिता राज्य शासनाकडून 1.30 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या करारामुळे राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करून, त्यातून निवडलेल्या 20 खेळाडूंना प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. फुटबॉल खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री. महाजन यावेळी केले.


00000000

जिल्हा परिषदांनी बचतगटाच्या महिलांच्या उत्पादनांसाठी विक्री केंद्र उपलब्ध करून द्यावेत.

 जिल्हा परिषदांनी बचतगटाच्या महिलांच्या उत्पादनांसाठी विक्री केंद्र उपलब्ध करून द्यावेत.

                                                                                               - ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन.

            पुणे, दि. 4 : “राज्याचा ग्रामविकास साधायचा असेल तर महिलांना केंद्र स्थानी ठेवावे लागेल. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्व जिल्हा परिषद यंत्रणांनी बचत गटाच्या महिलांच्या उत्पादनासाठी सरकारी मालकीचे गाळे किंवा इमारती विक्री केंद्र म्हणून उपलब्ध करून द्याव्यात.” असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले.


            ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालक यांच्यासाठी निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.


             या कार्यशाळेत बोलताना मंत्री श्री.महाजन म्हणाले की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात राज्याच्या ग्रामीण महिलांनी खूप चांगले संघटन आणि बळकट संस्था उभ्या केल्या आहेत. त्यांच्या प्रगतीमध्ये सर्वांनी सोबत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामविकास विभागाच्या इतर सर्व योजनासुद्धा ग्रामीण जनतेच्या हितासाठी प्रभावीपणे राबवाव्यात, ग्रामीण भागातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर उपलब्ध करून देण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजनेतून ग्रामीण तरुणांना दर्जेदार प्रशिक्षण मिळायला हवे, ग्राम स्वराज्य अभियानातून राज्यातील प्रत्येक ग्रापंचायतीला सर्वार्थाने बळकट करण्यासाठी प्रभावी कार्यशैली अवलंबिली पाहिजे, अशा सूचनाही मंत्री श्री.महाजन यांनी केल्या.


            ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उद्घाटन कार्यक्रमात सर्व योजनांची स्थिती आणि भविष्यातील नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. सामान्य माणसाला उपयुक्त धोरणे या विभागाकडून राबविली जावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


            कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर,अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाचे संचालक राजाराम दिघे, ग्रामस्वराज अभियानाचे संचालक आनंद भंडारी, अवर सचिव धनवंत माळी इत्यादी उपस्थित होते.


000


 



मुंबईत रविवारपासून कुस्त्यांची दंगल

 मुंबईत रविवारपासून कुस्त्यांची दंगल                       राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धा - 2023


            मुंबई, दि. 4 : राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेस उद्या, रविवार दि. 5 फेब्रुवारी 2023 पासून सुरुवात होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रमिक जिमखाना, लोअर परेल येथे आमदार अजय चौधरी, कामगार विभागाचे अवर सचिव दिलीप वणिरे, सोफिटेल रिसॉर्ट अँड हॉटेलचे संचालक सलील देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चंद्रमोरे व कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. 5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान दररोज संध्याकाळी कुस्त्यांचs सामने खेळवले जातील. सामने मॅटवर खेळवले जाणार असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमांप्रमाणे व मुंबई शहर तालीम संघाच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. 


            महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगारांसाठी कामगार केसरी आणि कामगार पाल्यांसाठी कुमार केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यासह विविध पाच वजनी गटातील सामने यावेळी खेळवले जाणार आहेत. कामगार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.75 हजार, द्वितीय रु.50 हजार, तृतीय रु.35 हजार व उत्तेजनार्थ रु.20 हजार आहे. तर कुमार केसरी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु.50 हजार, द्वितीय रु.35 हजार, तृतीय रु.20 हजार व उत्तेजनार्थ रु.10 हजार आहे. तसेच वजनी गटात 25 हजार ते 10 हजारांची पारितोषिके दिली जातील. 


            बजाज ऑटो वाळूंज, कुंभी कासारी सह.साखर कारखाना कोल्हापूर, वडगांव यंत्रमाग वस्त्रोद्योग, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सोलापूर, विमा साखर डिस्टिलरीज सोलापूर, क्रांती अग्रणी साखर कारखाना कुंडल आदी कंपन्यांच्या 106 हून अधिक नामांकित पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने स्पर्धेस उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.


000



Featured post

Lakshvedhi