Saturday, 4 February 2023

कौशल्य विकास विभागाच्या रोजगार मेळाव्यात 745 उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड

 कौशल्य विकास विभागाच्या रोजगार मेळाव्यात

745 उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड


            मुंबई, दि. 4 : कौशल्य विकास विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गोरेगाव येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात एकूण 1 हजार 418 नोकरीइच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यातील 745 उमेदवारांची विविध नोकऱ्यांकरिता प्राथमिक निवड झाली असून 144 उमेदवारांची विविध कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध पदांसाठी अंतिम निवड केली. आज सकाळी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. 


            मेळाव्यात विविध 41 उद्योग, आस्थापना तथा कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील 6 हजार 389 जागांसाठी आज मुलाखती घेतल्या. गोरेगावातील शहीद स्मृती क्रीडांगण येथे झालेल्या या मेळाव्यास आमदार विद्या ठाकूर, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र. वा. खंडारे यांच्यासह नगरसेवक, विविध उद्योग, आस्थापनांचे प्रतिनिधी आणि नोकरीइच्छुक उमेदवार उपस्थित होते. 


राज्यात 300 पेक्षा अधिक रोजगार मेळावे - मंत्री मंगलप्रभात लोढा


            मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, राज्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना विविध कंपन्या, आस्थापनांमध्ये नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत राज्यात ठीकठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. 300 पेक्षा जास्त मिळावे घेण्याचे नियोजन आहे. आज गोरेगाव येथे होत असलेल्या मेळाव्याला नोकरीइच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशाच पद्धतीने राज्याच्या सर्व भागात मेळाव्यांचे आयोजन करून प्रत्येक नोकरीइच्छुक उमेदवाराला रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


            आजच्या मेळाव्यात विविध उद्योग, आस्थापनांनी सहभाग घेत त्यांच्याकडील रिक्त जागांसाठी मुलाखती घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने सब्र रिक्रुटमेंट, डुआर्ज सर्विसेस. टेलीएक्सेस बीपीओ, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, वन स्टेप अवे एलएलपी, डायरेक्शन्स एचआर, श्री कन्सल्टन्सी, एसीइ टेक्नॉलॉजी, फन अँड जॉय अॅट वर्क, क्यूएचएसई इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, अंबिशस रिक्रुटमेंट, करिअर एन्ट्री, रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, पीपल ट्री, एनएसइ एम्पिरियल अकॅडमी, टाटा स्ट्राइव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम, भारती एअरटेल सर्व्हिसेस लिमिटेड, मनी क्रिएशन, युनि डिझाईन ज्वेलरी, थॉमस रिक्रुटमेंट सोल्युशन, टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स, पावर एंटरप्राइजेस, इम्पेरेटिव्ह बिझनेस लिमिटेड, बझवर्क्स बिझनेस सर्विसेस, जीएस जॉब सोल्युशन, स्पॉटलाईट आणि आयुष्य हेल्थकेअर सर्व्हिसेस या कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील 6 हजार 389 इतक्या जागांसाठी मुलाखती घेतल्या. याचबरोबर राज्य शासनाची विविध आर्थिक विकास मंडळेही मेळाव्यात सहभागी झाली होती. त्यांनी उमेदवारांना त्यांच्याकडील स्वयंरोजगारविषयक विविध कर्ज योजनांची माहिती दिली. 


००००



संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा

संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा

       मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरी जीवनाबरोबरच ग्रामीण भागातील बदलांची साहित्यिकांना नोंद घेण्याचे आवाहन करतांना समृद्धी महामार्गाचा उल्लेख केला. या महामार्गासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण व नागरी जीवनावर झालेल्या सकारात्मक बदलांचे प्रतिबिंब साहित्यात उमटावे, देश-विदेशातील विकासात्मक व प्रेरणादायी साहित्य मराठी भाषेत अनुवादित व्हावे, शासन यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.


संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा


            अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना राज्य अतिथींचा (स्टेट गेस्ट) दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. मराठी साहित्य मंडळाने राज्य शासनाकडे या संदर्भात मागणी केली होती, ती मागणी मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


 ‘लाईट, साऊंड ॲण्ड लेझर शो’ ची मागणी मान्य


            वर्धा येथील साहित्य संमेलनात शहराच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाला मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सेवाग्राम मार्गावरील चरखा भवन येथे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या मोठ्या प्रतिमा लावलेल्या ठिकाणी ‘लाइट, साऊंड ॲण्ड लेझर शो’ राज्य शासनामार्फत सुरु करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात वर्ध्याच्या वैभवात भर घालण्यासाठी सौंदर्यीकरणाची ही मागणी मान्य करण्यात येत असल्याचे जाहीर केले.


            मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर यांनीही यावेळी संबोधित केले. ते म्हणाले, साहित्यिक हे समाजाची ज्योत आहे, ही ज्योत तेवत ठेवण्यासाठी राज्य शासन सदैव पाठिशी आहे. मराठी साहित्याच्या विकासासाठी राज्य शासनाची प्रतिबद्धता असल्याचे सांगत त्यांनी साहित्य क्षेत्रात राज्य शासन हस्तक्षेप करणार नाही. सातारा जिल्ह्यातील वाई येथे मराठी विश्वकोश भवन आणि मुंबईत मराठी भाषा भवन बांधण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देण्यात येणारे अनुदान ५० लाखाहून वाढवून २ कोटी करण्यात आले. तसेच, विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठीचे अनुदान १० कोटींहून वाढवून १५ कोटी केल्याचेही त्यांनी सांगितले . 


            यावेळी श्री. मेघे, पद्मश्री डॉ. तिवारी, डॉ. विश्वास, न्या.चपळगावकर, श्री. सासणे, श्री. दाते आदींची समयोचित भाषणे झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष न्या. चपळगावकर आणि पूर्वाध्यक्ष श्री. सासणे यांचा सत्कार करण्यात आला. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमिताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘दौत लेखनी’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले.


            यावेळी आयोजन समितीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या वर्धा गौरव गीत, कविवर्य सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य…’ हे मराठी अभिमान गीत आणि संमेलन गीताचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी, तर आभार प्रदर्शन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहंदळे यांनी केले.  


०००००



महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटींचा निधी

 महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात

13 हजार 539 कोटींचा निधी


- केंद्रीय रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव


            नवी दिल्ली, 03 : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार 539 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातील 123 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येईल. यासह ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे जमीन अधिग्रहणाच्या आवश्यक मंजुरीचे काम पूर्णत्वास झाले असल्याची माहिती, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज येथे दिली.


            येथील रेल भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. वैष्णव बोलत होते. त्यांनी सांगितले, रेल्वेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे एक महत्वाचे राज्य आहे. यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार 539 कोटी रूपयांची भरीव तरतूद केली गेली आहे.


            महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल. याअंतर्गत निवड केलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये मुलभूत तसेच अद्यावत सुविधा पुरविण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या कंत्राटाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होऊन त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी माहिती मंत्री श्री. वैष्णव यांनी दिली. 


            ‘बुलेट ट्रेन’ रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने जमीन अधिग्रहणाच्या आवश्यक मंजुरीचे काम पूर्ण झालेले आहे. मुंबई ते वापीपर्यंतच्या कामाचे कंत्राट दिले गेले आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गावरील बांधणी सुरू झालेली आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत बुलेट ट्रेन धावणार असल्याचेही मंत्री श्री. वैष्‍णव यांनी यावेळी सांगितले.


            अद्यायावत तंत्रज्ञानयुक्त आणि सुविधापूर्ण असणाऱ्या ‘वंदे भारत’ रेल्वेची सुरूवात झालेली आहे. येत्या काळात अधिक संख्येने ‘वंदे भारत’ रेल्वे गाडया धावतील. तसेच, 50 ते 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दोन शहरांना जोडण्यासाठी, प्रादेशिक दळवळणाला अधिक गती देण्यासाठी ‘वंदे मेट्रो’ नावाने गाडयांचे काम हाती घेतले असून ‘वंदे मेट्रो’ नजीकच्या शहरांना जोडणाऱ्या गाड्या पुढील काळात दिसतील. याशिवाय हायड्रोजन रेल्वे भविष्यात सुरू केली जाईल. सध्या जगातील दोन-तीन देशात हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे आहेत. भारतातही या दिशेने काम सुरू झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.


            मागील वित्त वर्षात जवळपास 250 रेल्वे डब्यांचा दर्जा वाढलेला आहे. यावर्षी 300 रेल्वे गाड्यांचे जुने डबे बदलून राजधानी दर्जाचे केले जातील. यावर काम सुरू आहे. कवच (स्वंयचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली) आहे. या प्रणालीत 5 जी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. कवच प्रणालीच्या वापराने अपघाताचे प्रमाण कमी होईल. सध्या या प्रणाली अंतर्गत 4 हजार किलोमीटरचे काम सुरू आहे. येत्या वर्षभरात यात पाच हजार किलोमीटरची भर पडणार असल्याची, माहिती श्री. वैष्णव यांनी यावेळी दिली.


0000



तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्षमुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित

 तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्षमुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित

- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन


            मुंबई, दि. 3: तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालये संलग्नित गोकुळदास तेजपाल रुग्णालय येथे तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष आणि व्यसनोपचार केंद्राचे ई उद्घाटन आज वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सर.ज.जी. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, डॉ. भालचंद्र चिखलकर, गौरी सावंत, सलमा खान आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्षाबाबतच्या मार्गदर्शन सूचना पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.


            कमी वेळात अत्यंत मेहनतीने डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी हा विशेष कक्ष सुरु केल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना मंत्री श्री. महाजन म्हणाले की, तृतीयपंथीयांच्या अनेक वैद्यकीय समस्या होत्या, या समस्या सोडवून या घटकाला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून 30 खाटांचा विशेष कक्ष आजपासून जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. आतापर्यंत तृतीयपंथीयाना पुरुष किंवा महिला कक्षात भरती करायचे हा प्रश्न असायचा, मात्र आता हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या विशेष कक्षात तृतीयपंथीयांवर शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचार केले जाणार आहे.


            या विशेष कक्षात येणाऱ्या तृतीयपंथीयांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. 2 व्हेंटिलेटर, मॉनिटतृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्षमुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वितर, सेमी आयसीयू यासह येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. येत्या काही काळात सर ज.जी. समूहाच्या सेंट जॉर्ज, जे.जे. रुग्णालय आणि कामा हॉस्पीटल येथेही विशेष कक्ष सुरु करण्यात येईल. जे.जे.रुग्णालयात आजपासून व्यसनोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता मिळविण्यासाठी उपचार, समुपदेशन तसेच पुनर्वसनाची गरज असते. आजपासून हे व्यसनोपचार केंद्र कार्यान्वित झाले असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.


            राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सध्या 13 जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात सक्षम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करणे यावर भर असणार असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.


            आतापर्यंत राज्य शासनाच्या वैद्यकीय रुग्णालयात भरती होत असताना केस पेपरवर महिला किंवा पुरुष असे दोनच रकाने असायचे आता तृतीयपंथी हा नवीन रकाना असणार असल्याचे या कार्यक्रमादरम्यान प्रस्ताविकात डॉ.सापळे यांनी सांगितले.


००००

एकाच वेळी दोन दृश्य


 हा शाॅट घेण्यासाठी एका जर्मन फोटोग्राफर ने 16 कॅमेरे लावले ज्यासाठ 62 दिवस वाट पहावी लागली स्क्रिनला स्पर्श करा आणि चंद्र आणि सूर्य एकत्र पाहु शकता हे फक्त आणि फक्त 2035 पुन्हा पाहिले जाऊ शकते फोटो चा आनंद घ्या

👵🏻 *"आजीचा मेकअप बॉक्स"* 👵🏻


 👵🏻 *"आजीचा मेकअप बॉक्स"* 👵🏻


'ए अग, मेकअप बॉक्स काय म्हणतेस ग,. माझं नाव 'फणेरी' किंवा 'फणी करंड्याची पेटी' असं आहे. माझं वय अंदाजे ९५ वर्ष. 


माझा जन्म गुहागर मधल्या एका खेड्यात झाला. खास फणसाच्या झाडापासून बनवलय हो मला 🌳 आणि म्हणूनच इतकी वर्ष अडगळीत असूनही वाळवी शिवली सुद्धा नाही मला, 👍🏼 जुनं खोड ना मी. 😜


एका कोकणकन्येच्या म्हणजे यमीच्या रुखवतावर ठेवण्यासाठी मी खास घडवले गेले हो...


एक आयाताकृती भक्कम पेटी आहे मी. आतमध्ये दोन खण आहेत. एकात हस्तिदंती फणी, केस बांधायचे आगवळ ( म्हणजे रबर गो), आकडे, खोबरेल तेल असायचे अन दुसऱ्या खणात मेणाची डबी, पिंजर, आंबाड्यावर लावायच मोत्याच फूल अन् अस काय काय असायचं बर.. 

पोरांनो आगवळ म्हणजे गोफ. अन् पूर्वी कपाळावर मेण लावून त्यावर गोलाकार पिंजर म्हणजे कुंकू लावायचे बर. तेव्हा ओल कुंकू अन् टिकली चा जन्म व्हायचा होता. 


पेटीच्या झाकणाच्या आतल्या बाजूला छोटासा आरसा असायचा. झाकणाच्या खोबणीत बरोबर अडकवलेला होता तो.


तुम्हाला सांगते, पूर्वीच्या बायका अहोरात्र काम करायच्या बरे. अगदी परकऱ्या पोरी देखील दिवसभर लुडबूडत काम शिकायच्या. भल्या पहाटे न्हाणीघरातून आल्या आल्या काय तो नट्टापट्टा. ते देखील काय तर भल्यामोठ्या केसांचा तेल लावून घट्ट अंबाडा बांधायचा अन् वर आवर्जून एक तरी फूल किवा वेणी माळायची. कपाळावर टप्पोर लाल कुंकू रेखायच अन् काय ते दागिने ल्यायचे. पावडरचा जन्म देखिल नव्हता हो झाला तेव्हा. तरी देखील माझी यमी साक्षात लक्ष्मी दिसायची हो.. 


मग तिची लेक आली, सून आली. पण हो माझा वावर काय तो माजघरात होता बरं. ओसरी, पडवी ठावूक नव्हती मला अन् यमीलाही.. 😊


हळूहळू कालपरत्वे माजघरातील पैंजणाची किणकिण ओसरीवर ऐकू येऊ लागली म्हणजे थोडक्यात सांगायचं तर स्त्रीस्वातंत्र्याचे वारे वाहू लागले अन् मोठा आरसा, माझा शत्रूच म्हणा की, भिंतीवर विराजमान झाला. झालं तेव्हा पासून माझ्या अस्तित्वाला जणू उतरती कळा लागली. 😢 माझा वापर कमी कमी होत मी कशी अन् कधी अडगळीच्या खोलीत गेले कळलच नाही हो. 😭


गेल्या वर्षी अचानक माळ्यावर खूप गडबड चालू झाली. 😱 माझी यमी तर कधीच कालवश झाली होती. तिची सून, मुलगी पण वारल्या की पूर्वीच. मग कोण बर असेल. 🤔


अरे देवा, भंगारवाला आलाय हो. 🙆 माझा अंत जवळ आलाय कळून चुकलं होतं मला. साक्षात यमदेव दिसायला लागला समोर. मी डोळे मिटून राम म्हणणार तोच तिने मला भंगारवाल्याच्या हातून खेचून घेतलं. 


"माझ्या पणजी ची पेटी आहे ही. ही नाही न्यायची, जुनं ते सोन," असं म्हणून तिने मला जवळ घेतलं. तब्बल सहा दशकानंतर मला मानवी स्पर्श झाला आणि तोही माझ्या पणतीचा, गौरीचा. 


गौराईने मला नाहू माखू घातले, रंगवले अन् नवा लूक दिला. मॉर्डन का काय म्हणतात ना तसा. अन् आश्चर्य म्हणजे आपल्या दिवाणखान्यात मानाचे स्थान दिले. 🙏🏼 आता मी तिच्या दिवाणखान्यात दिमाखात बसून तिच्या घरच्या किल्ल्या सांभाळते. 👍🏼 आहे की नाही माझी ऐट💃.


एवढेच नाही तर माझे सगळे सवंगडी म्हणजे फिरकीचा तांब्या, हांडे, घागरी अन् पाट वगैरे पण खुश आहेत आता. 

आम्हाला नवा लूक अन् स्टेटस मिळालंय. अजून काय पाहिजे महाराजा या मॉडर्न युगात.😂


चला तर मी तुमची रजा घेते. 🙏🏼

माझा एखादा सवंगडी येईलच आता त्याचं मनोगत मांडायला. 👍🏼😊 

सायोनारा...👋


                

*लेखिका: गौरी गोरे दातार*

स्वामी समर्थ भक्तांसाठी सूचना


 *कृपया स्वामी भक्तांनी ही पोस्ट जरूर पहावी हा एक नंबर आहे जो अक्कलकोट भक्त निवास नावाने आहे पण हा नंबर फ्रॉड आहे या नंबर वर कॉल केल्यानंतर तुमची रूम बुक झाली व तुम्ही पैसे पाठवा असे सांगण्यात येते पण कृपया या नंबर वर कॉल करू नये* कॉल करून आपली फसवणूक करून घेऊ नये🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑

Featured post

Lakshvedhi